Thursday, 18 May 2023

मृत्यूशी कर्माचे अतूट नाते ( पौराणिक कथा )

 || श्री स्वामी समर्थ ||


महाभारत पर्वातील हि कथा सर्वश्रुत आहे . गौतमी नावाची एक धार्मिक स्त्री होती तिच्या मुलाला सापाने दंश केला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. गौतमी शोकाकुल झालेली असताना तिथे एक शिकारी आला आणि त्याच्या हातातील सर्पाकडे पाहून म्हणाला कि “ हाच तुझ्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत आहे “. ह्याचे काय करू कसा दंड देऊ त्याला ते सांग. गौतमी म्हणाली कि त्याचा काहीच उपयोग नाही त्याला दंड देवून माझा मुलगा तर आता परत येणार नाही . त्यावेळी तो साप बोलू लागला आणि म्हणाला कि विनाकारण तुम्ही मला त्याच्या मृत्यूला दोषी ठरवू नका मी फक्त मृत्यू देवांच्या आदेशाचे पालन केले तेव्हा मृत्यू देव सुद्धा तिथे प्रगट झाले आणि म्हणाले कि मीही ह्यात दोषी नाही कारण मला प्रत्यक्ष कालपुरुषाने सांगितले तेच मी केले. आता तिथे प्रत्यक्ष काल उपस्थित झाले आणि म्हणाले कि आपल्यापैकी कुणीही त्याच्या मृत्यूला दोषी नाही. जर कुणी दोषी असेल तर तो स्वतःच म्हणजे त्याची स्वतःची कर्मच त्याच्या मृत्यूस जबाबदार आहेत .

आपल्या मृत्यूचे खरे कारण आपली कर्म असतात . इतर कुणीही त्यास कारणीभूत असू शकत नाही . जो जो ह्या पृथ्विलोकात जन्म घेयील त्याला एक दिवस मृत्यूला सामोरे जायला लागणारच आहे . जन्म आणि मृत्यू ह्या दोन घटना आहेत  आणि आपण त्या स्वीकारल्या पाहिजेत .  आपल्याला मुक्ती देणारी घटना म्हणजे “ मृत्यू  “  . शेवटच्या क्षणी मनात अनंत विचार येतात पण तरीही ह्यातून कुणाचीही सुटका नाही . मी हे औषध घेतले असते तर बरा झालो असतो वगैरे विचारांना तसाही अर्थ नसतो कारण आपल्या मृत्यूस संपूर्णपणे आपली कर्म जबाबदार असतात . 

म्हणूनच आपल्याला आपला अंतिम क्षण चांगला , विना व्याधीचा आणि शांतपणे यायला हवा असेल तर आपण आपली कर्म प्रत्येक क्षणी तपासून पहिली पाहिजेत . जसजशी चांगली कर्म आपल्या हातून घडत जातील तसतसे आकाश निरभ्र होत जायील आणि जीवनात अनेक चांगल्या घोष्टी नकळत घडायला लागतील. त्याचा खर्या अर्थाने आनंदाने उपभोग घेता घेता आपली अखेर किती शांतपणे झाली हे आपले आपल्यालाही समजणार नाही .म्हणूनच जीवनात चांगली कर्म करत राहिले पाहिजे .

मृत्यू जे जीवनाचे अंतिम सत्य आहे आणि आपण जितक्या आनंदाने जीवन व्यतीत केले त्याहूनही आनंदाने त्याला जवळ करता आले पाहिजे इतके कर्म शुद्ध आणि सात्विक असले पाहिजे .

कुठल्याही चांगल्या कामास मुहूर्त बघायला नको . आत्ता ह्या क्षणापासून आपली कर्म अधिक चांगली करुया .  

शुभं भवतु

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

No comments:

Post a Comment