Saturday, 20 May 2023

नक्षत्र - कुंडलीचा मेरुमणी – भाग 3

 || श्री स्वामी समर्थ ||




नक्षत्र अढळ आहेत ,ते आपली जागा सोडत नाहीत .

नक्षत्र – न सरती , न क्षरती- क्षर म्हणजे नाश होणे .नक्षत्र हे तारकांचे पुंज आहेत त्यातील एखादा ठळक तारा असतो त्याला योग तारा म्हणतात . हि सर्व नक्षत्र आपल्या क्रांतीवृत्तावर चपलख बसलेली आहेत . 

पृथ्वी आपल्या भोवती फिरते तसेच ती सूर्याभोवती फिरते . विषुवृत्त आणि क्रांतीवृत्त हे आपापल्या गतीने फिरतात त्यामुळे इथे ऋतू होतात . ग्रह हे फिरत राहतात कारण ते चल आहेत पण नक्षत्र हि एकाच ठिकाणी आहेत म्हणजेच ती अचल आहेत .नक्षत्रातून ग्रहांचे भ्रमण होत असते. 

ग्रह कधीच वक्री होत नसतो तो त्याच्या गतीने चालतच असतो अर्थात ह्या सर्व भासमान अवस्था आहेत . 

नक्षत्र कधीही अस्तंगत होत नाही . ग्रह सूर्याजवळ येतो तेव्हा अस्तंगत होतो .

पृथ्वी प्रत्येक 18 सेकंदाला 5 मैल पुढे जात आहे . बाळ जन्माला येते तेव्हा आपण सेकंदाचा विचार करत नाही . तो केला तर आपल्याला लग्नाचे बिंदू बरोबर मिळतील. नक्षत्राचे चरण आणि अंश बरोबर येतील आणि फलित योग्य होयील.

फलित हे आपण घडवत नसतो तर ते आपण जन्माला घेवूनच आलेलो असतो . प्रत्येकाचा platform वेगळा आहे. 

महादशा ह्यासुद्धा नक्षत्रावरून येतात . अभंग राहणारी हि नक्षत्रे आहेत . नक्षत्रांना प्रत्येक भाषेत वेगवेगळी नावे आहेत . चीनी भाषेत त्याला सिवो म्हंटले आहे .अरबी भाषेत त्याला Manajil म्हणजे मंजिल म्हंटले आहे.

मंजिल म्हणजेच मुक्कामाचे ठिकाण . नक्षत्रे हि देवांची तेजस्वी घरे आहेत . ग्रह सतत भ्रमण करतात ते चालत राहतात म्हणून आपण सुद्धा चालत राहिले पाहिजे . ज्ञान ग्रहण करत राहिले पाहिजे . आपण वाढत राहतो. उत्पत्ती स्थिती आणि लय ह्या चक्रात आपणही फिरत राहतो.

ग्रह भ्रमणशील आहेत म्हणून आपल्याला ह्या सर्व नक्षत्रांचे दर्शन होते , ग्रह भ्रमणशील नसते तर आपल्याला हि नक्षत्रे दिसलीच नसती.

मुळारंभाचा एक तारा  झिटा हा कल्पून तिथून ह्या ग्रहांचे भ्रमण चालू होते. दोन बांगड्या घेतल्या आणि त्या एकमेकीत अडकवल्या तर आतली बांगडी जरा तिरकस होयील ,म्हणजे पृथ्वीचा अर्धा भाग जो विषुवृत्त म्हणतो तोसुद्धा काल्पनिक आहे आणि त्यातून जाणारा हा क्रांतीवृत्ताचा तिरकस भाग जिथे विषुवृत्ताला छेद करतो म्हणजेच दोन्ही बांगड्यांचा भाग जिथे टेकतो तिथून ग्रहांचा आरंभकाल सुरु होतो. 

गोल हा ३६० अंशांचा आहे आणि शून्य अंशावरून ह्या ग्रहांचे भ्रमण सुरु झाले. आरंभ स्थानात २ मते पडली . काहींनी त्याला आयनांश मध्ये convert केले आणि सायन फलित पद्धती सुरु केली .सायन पद्धती पाश्चात्य देशात वापरली जाते . आपण पाहिले कि चंद्र वृषभेत आहे तर त्यांच्या सायन पद्धतीप्रमाणे तो मिथुन राशीत असतो. आपली निरमय पद्धती योग्य आहे कारण ग्रह हे प्रत्येक नक्षत्रातून जाताना आपण चक्षूने पाहतो. आपण सर्व ग्रह डोळ्याने पाहतो तेच सत्य आहे. चंद्रावर गुरुवर वस्ती असेल तर तिथून ते आपल्या गुरूलाही पाहत असतील. 

ख म्हणजे आकाश आणि ख स्वस्तिक म्हणजे डोक्यावर आलेले हे आकाश . पृथ्वीची गती कोण उत्तर ठरवते तर ध्रुवाचा तारा . उत्तर धृवाच्या तार्याच्या जवळील गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीने आकाशात फिरणारे सर्व तारे आणि पृथ्वीची गती नियंत्रित केली आहे. 

ग्रहांचा व्यक्तीवर परिणाम होतो आणि त्यालाच आपण आपल्या पत्रिकेतील लग्नबिंदू म्हणतो. 

360 अंशाची आपली पत्रिका आहे आणि म्हणून प्रत्येक राशीला ३० अंश मिळाले आहेत. क्रांतीवृत्त आहे म्हणून सर्व मार्गात भ्रमण करत आहेत . 360 ला २७ ने भागले तर 13.20 कला प्रत्येक नक्षत्राला मिळतात .ह्या 13.20 मध्ये जे जे तारे येणार आहेत ते ह्या राशीचे अंतर्भूत घटक ठरणार आहेत . ह्या तार्यांमध्ये जे ठळक तारे आहेत जे अधिक चमकतात , दिसतात ,परिणाम करतात ,डोळ्यांनी दिसू शकतात अश्या तार्यांना आपण नाव देऊन मग ते तारे निश्चित केले .मग हि २७ नक्षत्र आहेत त्याच्या 13.20 कलांचे फलिताचा सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी ,प्रत्येक नक्षत्राचे 4 भाग केले ज्याला आपण चरण किंवा पाद म्हणतो . प्रत्येक नक्षत्राला 9 चरण मिळाले .प्रत्येक चरणाला ३ अंश 20 कला आले. 

काही राशीत नक्षत्रांचे 4 पूर्ण चरण आले तर काही राशीत १/३ तर काही राशीत २/२ असे चरण आले. 

आधी ७ ग्रह होते पण मग राहू केतू शंकराकडे गेले आणि म्हणाले आम्ही पण अमृत प्राशन  केले आहे मग आम्हाला ग्रहांसोबत का जागा नाही मग शंकराने सांगितले ठीक आहे म्हणून अश्या प्रकारे 9 ग्रह तयार झाले आणि त्यानाही नक्षत्रांच्या घरातून जायची परवानगी मिळाली परंतु राहू आणि केतुला राशी दिल्या नाहीत त्यामुळे ते ज्या राशीत असतील त्याच्या राशीस्वमिचे फळ प्रदान करतात . 

पंचांगातील सुद्धा प्रत्येक गोष्टीला ग्रहाचे नामाभिमान दिले गेले. कारण तिथी वार योग सर्वांवर ग्रहांचा शिक्का आहे. नक्षत्राचा अधिपती सुद्धा कुणी न कुणी ग्रह आहे. 

नक्षत्रातील प्रत्येक चरणावर सुद्धा ग्रहाचे आधिपत्य आहे. ह्या सगळ्या आकाशात घडणाऱ्या काल्पनिक गोष्टी पण त्याचा पृथ्वीवर परिणाम होताना दिसतो. शून्य तिथी आहे मग अभ्यास नको .प्रत्येक तिथीला स्वामी ग्रह आहे. प्रत्येक तिथीला स्वामी आहेत .एखादे मुल कुणाचे आहे त्याच्या वडिलांवरून आपण पाहतो. वडील सज्जन आहेत त्यांचे हे मुल आहे . आपला दृष्टीकोन तयार होतो त्या मुला विषयी .एखाद्या वंशाबद्दल पण आपण असेच नामाभिमान करतो. कुठले ऋषी आहेत ह्या कुळाचे तर विश्वामित्र म्हणजे ते जरा तापट आहेत , परशुराम आहेत म्हणजे हे लढवय्ये असतील , कुठले आहेत तर काश्यप आहेत म्हणजे सर्वाना दैत्य आणि देवांना निर्मिती करणारे ,दोघानाही मनाला समतोल वृत्तीचे आहेत म्हणजे ती लोकही तशीच असतील . 

प्रत्येक ग्रहाच्या वृत्ती हि आहेत . मंगळ हा लाल आहे तेजस्वी आहे भांडखोर आहे लढणारा आहे . तर रवी हा पण तेजस्वी आहे पण तो ह्या जगाला जगवतो.

क्रमशः 

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230


1 comment: