|| श्री स्वामी समर्थ ||
उपवर वधू /वर ह्यांच्या पालकांनी हे अवश्य वाचावे .
आपल्या पत्रिकेतील 9 ग्रह हे आपल्या कर्माप्रमाणे फळ द्यायला समर्थ आहेत पण त्यातील काही आनंद सौख्य तर काही वेदना , दुक्ख देणारे आहेत . विवाह हा आनंदाचा आणि जीवनाचा भला मोठा टर्न आहे . आपल्या सहचरा सोबतचा नवा वेगळ्या वाटेवरचा पण सुखकर प्रवास म्हणजेच सहजीवन आणि तो सुखकर होण्यासाठी पत्रिका मिलन करताना खालील गोष्टी अभ्यासल्या तर नक्कीच उपयोग होयील असे वाटले म्हणून हा लेखनप्रपंच .
विवाह कुणाला हवा आहे ? चंद्र आणि शुक्र . चंद्र हा प्रेम माया ममता आणि मनाचा कारक तर शुक्र वैवाहिक सुख प्रदान करणारा म्हणजे हे दोन्ही ग्रह प्रामुख्याने विवाह देणार . ते बिघडले तर कठीण . कन्या राशीत असलेला शुक्र किंवा अष्टम स्थानातील शुक्र वैवाहिक सौख्यात अडथळे आणतो. व्यय भावात एकटा शुक्र वाईट मानलेला नाही .
आता विवाह कुणाला नकोय तर शनीला. शनी विरक्ती देणारा आणि विलंब करणारा . शनी पत्रिकेत 1 12 10 5 ह्या भावात नसलेला बरा . कुटुंब स्थानावर त्याची दृष्टी नकोच . त्यात हा शनी मेष कर्क सिंह कन्या आणि वृश्चिक ह्या राशीत नसावा.
लग्नात एकापेक्षा अधिक पापग्रह नसावेत कारण त्याची दृष्टी सप्तम स्थानावर असते तसेच सप्तम स्थानावर कुठल्याही स्थानातील पापग्रहांची दृष्टी नसावी , सप्तम स्थानात पापग्रह नसावेत .
सप्तम स्थान हे मनोमिलनाचे स्थान आहे त्यामुळे तिथे शुभ ग्रह असावेत ,शनी रवी मंगळ हर्शल राहू केतू नसावेत . गुरु हा अध्यात्मिक ग्रह आहे त्याचे सप्तमात निष्फळ आहे.
सप्तम स्थानाच्या व्ययात येणारे षष्ठ स्थान आणि धनात येणारे अष्टम स्थान ह्यात पापग्रह असतील तर सप्तम स्थान पापकर्तरी योगात येयील म्हणून तिथेही पापग्रह नसावेत .
सप्तम स्थानातील हर्शल नेप प्लुटो हे आकस्मिक विवाह आणि विवाहाच्या वेळी गोंधळाची गूढ विचित्र ग्रहस्थिती दाखवतात .
प्रथम भावात शनी आणि सप्तमात मंगळ हा कुयोग आहे , हा प्रतियोग नसावा तसेच प्रथम भावात मंगल आणि सप्तम भावात शनी नसावा. पत्रिकेतील 12 1 4 7 8 ह्या भावात शनी मंगल युती नसावी .
धनु राशीचा गुरु सप्तम भावात नसावे गुरूला सप्तम भाव न मानवणारा आहे. व्यय भावात शुक्र आहे आणि त्यावर शनी मंगळाची दृष्टी वैवाहिक सुखात कमतरता आणते .
मंगळाच्या पत्रिकेचे स्तोम जरुरी पेक्षा अधिक झाले आहे . जगात हजारो लोकांच्या पत्रिकेत मंगळ आहे मग त्यांनी विवाह करायचा नाही का? असे अजिबात नाही . मंगळ कुठल्या भावात राशीत नक्षत्रात आहे ह्याचा विचार केला पाहिजे तो गुरूबरोबर किवा गुरु दृष्ट असेल तर त्याचा नकारात्मक परिणाम कमी होतो. अश्यानेक गोष्टी तपासून मगच निर्णय घ्यावा . उगीचच मंगळाच्या पत्रिकेचा बाऊ करू नये.
वैवाहिक सौख्य प्रदान करणारा मुख्य ग्रह शुक्र तसेच कुटुंब स्थान आणि सुख स्थान व्यवस्थित शुभ असतील तर पत्रिकेचा दर्जा विवाहासाठी नक्कीच उंचावेल . शुक्र केतू , शुक्र राहू , शुक्र शनी ,शुक्र हर्शल ह्या युती वैवाहिक सुखात अडथळे आणतात .
प्रत्येक पत्रिका वेगळी आहे कारण प्रत्येकाचे आयुष्य आणि प्राक्तन वेगळे आहे. सप्तम भाव , सप्तमेश आणि त्यातील ग्रह कुठल्या नक्षत्रात आहेत , ते वक्री अस्तंगत आहेत का ?? जाणकार प्रत्येक पेहलूचा अभ्यास करून निर्णय देतील. विवाह हा आयुष्याचा प्रश्न आहे तो घाईघाईत उरकून टाकायचा नाही कधीच नाही.
पत्रिकेतील गुणमिलन आणि ग्रहमिलन कसे करावे ह्यासाठी एक स्वतंत्र कार्यशाळेचे आयोजन करण्याचा मानस आहे जेणेकरून पालकांना आपल्या पाल्याची पत्रिका थोडीफार समजेल आणि त्याच्याशी कुणाच्या पत्रिकेचे उत्तम गुणमिलन ग्रहमिलन करता येयील ह्याचा अंदाज सुद्धा येयील.
संकलन : सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment