|| श्री स्वामी समर्थ ||
नक्षत्रांचा अभ्यास किंवा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करताना साधना आवश्यक आहे. अभ्यासासाठी -ज्योतिषाने गणपती आणि सूर्याची आराधना करावी .सूर्यकवच म्हणावे . तेजतत्व आहे.
मनाने ठरवले तर एखादी गोष्ट पूर्ण होते .ज्योतिष शास्त्र हे वेदांचे चक्षु आहेत . चक्षु म्हणजे ज्ञान देणारा .शून्याचा शोध ब्रम्हगुप्ताने लावला. कृत्तिका नक्षत्र हे अग्नी चे नक्षत्र आहे. पहिल्यांदा कृत्तीकेपासून नक्षत्र आहेत असे वाटू लागले होते .
ब्राम्ह्तेज प्राप्त करायचे असेल , विद्या आराधना ध्येय साध्य करायचे असेल तर षडरीपुंवर ताबा मिळवायला पाहिजे .म्हणून पूर्वी विद्यार्थ्याला ज्ञान देत तेव्हा तो ब्रम्हचारी असे. त्याचे अध्ययन पूर्ण होवून मग तो गृहस्थाश्रमात जात असे म्हणजे पूर्ण अध्ययन झाल्यावर कमवून आपल्या कुटुंबाला चालवण्याची शक्ती मिळत असे .पूर्वी विशी विद्या आणि तिशी धन असे म्हंटले जात असे. 8 व्या वर्षी मुंज , 20 वर्षापर्यंत ज्ञानप्राप्ती आणि ३० वर्षापर्यंत मुलेबाळे म्हणजे सुधृढ संतती .त्यांनतर 50 पर्यंत भरण पोषण 50 पर्यंत आणि पुढे वानप्रस्थाश्रम .संसारातून निवृत्त. घरात राहायचे पण लक्ष्य द्यायचे नाही मार्गदर्शन करायचे .
सूर्य हा अग्नीचा तेजोगोल आहे, अग्नीचे प्रतिक आहे , आपला आत्मा निघून गेला कि शरीरातील आत्मा गेला आणि मग शरीर थंड पडते आणि तेव्हा आपण महाप्रवासाची वाटचाल करीत असतो . कृत्तिका म्हणजे अग्नी आणि तेज ह्याची आराधना केली तर आत्मशक्ती ,ब्रम्हतेज निर्माण होईल. कृत्तिका हे रविचे नक्षत्र असल्यामुळे त्याची उपासना फलदायी ठरतेच.
आपली सतसद विवेक बुद्धी जागृत ठेवून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी हे सांगणारा सूर्य आहे. अध्यात्म तेज प्राप्त करायचे असेल तर सूर्याची आराधना करावी . शुक्र जर कृत्तिकेत असेल तर वैवाहिक सुख मिळणार नाही पण अध्यात्मिक तेज मिळेल .कुठलाही ग्रह दिशा नक्षत्र वाईट नसते ,ते समजून घ्यायला पाहिजे . तशीच माणसेही वाईट नसतात .
सगळे ग्रह हे मनोवृत्ती शमन करणारे आमचे कल्याण करणारे आशीर्वाद करणारे आहेत म्हणून सगळ्या ग्रहांची प्रार्थना करणे आवश्यक आहे . नुसती भौतिक प्रार्थना नाही तर अध्यात्मिकता इथे अभिप्रेत आहे . अध्यात्मिक दृष्टीने आपण ह्या ग्रहांच्यात कसे एकरूप होऊ ,त्या ग्रहांना आपण कसे आत्मसात करू हा विचार केला पाहिजे .
साडेसाती आली कि मनुष्य लगेच घाबरतो ,आता शनी आपल्याला त्रास देयील ह्या विचारांनी त्रस्त होतो. पण कुठलाही ग्रह वाईट नाही . त्या त्या ग्रहाचे गुणधर्म स्वीकारले पाहिजेत आणि तस वागले तर काहीच वाईट होणार नाही .ह्यातील अध्यात्मिक अर्थ समजून घेणे आवश्यक आहे आणि तोच ज्योतिष शास्त्रात गर्भितार्थ आहे. सगळे ग्रह तुमचे कल्याण करायला आले आहेत कुणी तुमचे काहीच वाईट करण्याचा मानस ठेवून आले नाहीत . हे सगळे ग्रह तुमच्या कल्याणासाठी आकाशातून भ्रमण करत आहेत त्याचा तुम्ही कसा उपयोग करून घेवू शकता .ह्या ग्रहांना तुम्ही आपलेसे करा त्यांचा आदरसत्कार करा. तुमच्या घरी एखादा ऋषी किंवा मित्र आला तर प्रेमाने आपण निदान पाणी तरी विचारतो . आपण प्रेमाने त्याला खाऊ घातले तर त्याला आपल्याबद्दल आत्मीयता वाटेल आणि तो तुमच्याकडे प्रेमाने पाहिलं . ग्रहांचेही तसेच आहे . ते कुठल्या राशीला आले आहेत , आपल्याला किती त्रास होणार आहे. त्याची आराधना करा कारण हे सर्व ग्रह तुमच्या कल्याणासाठी ह्या नभो मंडळातून फिरत आहेत .
सामवेद हा गायन शास्त्राचे ज्ञान देणारा आहे तर यजुर्वेद, ऋग्वेद ह्यामध्ये कल्याणकारी मंत्र आहेत . अथर्ववेद हा जादूटोणा , जारणमारण करणारे मंत्र आहेत .
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी पण त्या क्षणात तुमच्या सगळ्या चित्तवृत्ती त्या देवातच विलीन झाल्या पाहिजेत . त्या क्षणी इतर कुठ्ल्याही क्षणाची जाणीव सुद्धा व्हायला नको. हे महतप्रयासानेच सध्या होऊ शकते .वाल्मिकी रामायण ह्या ग्रंथात सुद्धा नक्षत्रांबद्दल चे वर्णन केले आहे.
राजा दशरथा च्या पत्रिकेला श्रावण बाळाच्या माता पित्यांचा शाप लागला होता .पण त्याला पुत्र नव्हता त्यामुळे ह्या शापामुळे एक निश्चित झाले कि त्याला पुत्र होयील. आणि पुत्र झाला सुद्धा पण शाप खरा झाला आणि पुत्रापासून दुक्ख आणि वियोग झाला.
दशरथ राजाने रामाला सांगितले कि माझ्या जन्म नक्षत्रातून सूर्य मंगळ राहू हे पीडा देत आहेत . अनिष्ट योगात माझे जन्म नक्षत्र आहे . म्हणजेच त्याही वेळे हि नक्षत्रे होती.
अशी ग्रहस्थिती असते तेव्हा एकत्र मृत्यू होतो किंवा फार मोठी आपत्ती ,संकट येते . म्हणून सध्या माझा काळ चांगला नाही आणि म्हणून रामा तुला मला राज्याभिषेक करून गादिवर बसवायचे आहे .
वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला कारण अंगावर वारुळे झाली तरी शुद्ध नव्हती इतकी एकरूपता पाहिजे नामस्मरणात . नारदांना म्हणाला मी मरा मरा म्हणतो ..ते म्हणाले म्हण ...अंतर्यामी झाला आणि रामायण लिहिले.
तेव्हाही ज्योतिष शास्त्र होते आणि नक्षत्राच्या फलानुसार त्याचा विचार केला जात होता . पुष्य नक्षत्र ह्यावर राज्याभिषेक व्हावा हे ज्योतिषाने सुचवले म्हणून रामाचा राज्याभिषेक पुष्य नक्षत्रावर झाला.
नक्षत्रांचा उल्लेख वेदात आहे आणि आपण त्यांना देव मानतो. अध्यात्मिक पातळीवरून आपण त्याचा विचार करतो कारण हे खगोलीय तेजस्वी तारे आहेत . आपण जेव्हा ह्या नक्षत्रांच्या अधिपतींचा जप किंवा दान द्यायला सांगतो ह्याचा अर्थ आपण त्यांचा अध्यात्मिक पातळीवरून विचार करतो.
वेदांचा पाया अध्यात्मिकतेवर उभा आहे. वेदामध्ये आराधना , समर्पण , स्तोत्र , जप ,स्तुती आहे. प्रत्येक ग्रहाचे तसेच नक्षत्राचे स्तोत्र आहे . म्हणून ह्या नक्षत्रांचा आपल्याला भौगोलिक तसेच खगोलीय तसेच अध्यात्मिक दृष्टीने विचार करायला लागतो.
नक्षत्रांच्या जन्मांच्या काही पौराणिक कथासुद्धा आहेत त्यातूनही आपल्याला काही सध्या होते का ,नवा दृष्टीकोन मिळतो का हेही पाहायचे आहे.
नक्षत्र हा शब्द हा संस्कृत मधून आला आहे. संस्कृत तेव्हा बोलीभाषा होती . “ त्वं “ चा उच्चार करताना आपल्याला जिभेला जोर द्यावा लागतो तसेच बेंबीच्या देठापासून जोर द्यावा लागतो.
काही नक्षत्र आपल्या प्रकृतीवर , विचारांवर , मनावर परिणाम करतात आणि त्यानुसार आपल्या व्यक्तिमत्वाचा पिंड तयार होतो.
क्रमशः
संकलन : सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment