||श्री स्वामी समर्थ ||
आज गुरुवार आणि शनी जयंती असा योग आहे. शनी आणि गुरु हे ग्रहमालीकेतील बलाढ्य ग्रह आहेत. इतर ग्रहांपेक्षाही ह्या दोघांचे आपल्या जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. ज्ञानाचा महासागर म्हणजे गुरु , त्याच्याकडे संचय आहे. पण आपण चांगल्या गोष्टींचा संचय केला तरच फायदा अन्यथा सर्व व्यर्थ आहे. गुरूंचे आपल्या जीवनातील महत्व अबाधित आहे. गुरु ज्ञानप्राप्ती करून देयील तर शनी सचोटी , कष्टसाध्य आयुष्य देयील. शनी परीक्षेशिवाय काहीच देत नाही .प्रत्येक गोष्टीत विलंब करणारा हा शनी देयील ते कायमस्वरूपी पण त्याची किंमत समजल्याशिवाय नाही ,कारण दान हे सत्पात्रीच असले पाहिजे .जीवनातील भोग भोगताना कुठेतरी थांबायला हवे ,आत्मपरीक्षण करायला हवे आणि अध्यात्म मार्गाची कास धरायला हवी हे सांगणारा शनी आहे . शनी हा शिस्तप्रिय , कायद्याने चालणारा आणि तुमच्या कर्माची फळे देणारा आहे. त्यामुळे जसे तुमचे कर्म तसे फळ. तुम्ही वाईट कर्म केलेत तर शनी वही पेन घेवून बसलाच आहे.
आपण सर्वांनी शनीला अगदी व्हिलन केला आहे. पण खरतर त्याच्या सारख्या क्षमतेचा दुसरा ग्रह नाही. तो दाता आहे आणि द्यायला लागला तर तो गुरूलाही मागे टाकेल असा आहे. अष्टम स्थानातील शनी आयुष्य वृद्धी करतो ,असे असेल तर तो दिलेला वेळ सत्कारणी लावणे हेही आपल्याच हाती नाही का.
शनीचा जप , पोथी पुराणे काहीही करू नका पण त्याच्या तत्वाने वागा तर आपले कल्याण होयील हे निर्विवाद सत्य आहे. त्याने घालून दिलेल्या लक्ष्मण रेषांचे पालन करा , शनीला काय आवडते तर लीनता , नम्रता . चतुर्थ श्रेणीच्या लोकांची सेवा करा . हा सेवाभाव आयुष्यातील सर्वांप्रती विशेषतः वयस्कर लोकांसाठी मनी असला पाहिजे . कुणालाही कमी लेखू नका आणि आपल्या श्रीमंतीच्या बढाया तर अजिबात नको. शिक्षण , पैसा , रूप ,ऐश्वर्य क्षणात काढून रावाचा रंक करणाऱ्या शनिदेवांचे अस्तित्व आपल्या आतच आहेत ह्याचे भान ठेवा . आपल्या पत्रिकेत निचीचा किंवा उच्चीचा शनी का आहे ह्याचा विचार करा . ग्रह असेच येवून बसले नाहीत आपल्या पत्रिकेत तर त्याची नाळ आपल्या गत जन्माशी आहे नक्कीच आहे. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे आपण जरा काही झाले कि ताठ मान होते आपली. क्षणिक यशाने अहंकाराचा वारा लागतो आपल्याला आणि तोच अधोगती करतो. आपल्या शरीरातून आत्मा निघून गेल्यावर आपल्याला नावाने सुद्धा हाक मारली जात नाही कारण आपले अस्तित्वच संपते. आपल्या शरीराला “ बॉडी आली का” असे संबोधले जाते. श्वास असणे आणि नसणे ह्यात जीवन मृत्यू इतकेच अंतर आहे. ह्या अखंड ब्रम्हांडात धुळी कणा इतकेही महत्व नाही आपल्याला. ना पाऊस पाडू शकत ना थांबवू शकत , मानवाने इतकी प्रगती केली अगदी दुसर्या ग्रहापर्यंत गेला पण त्याला आजही रक्त तयार करता येत नाही. एखाद्याला जगवता येत नाही . जन्म मृत्यू काहीच आपल्या हातात नाही .देवाने त्याचे सगळेच पत्ते आपल्याला दिले नाहीत तर त्याच्याही कडे काही ठेवले आहेत म्हणून आपल्याला त्याची किंमत आहे. नाहीतर तुमच्या घरात माझा आणि माझ्या घरात तुमचा फोटो लागला असता. आयुष्य जगताना त्याचे भान ठेवले पाहिजे . शेवटी दोन हस्तक आणि एक मस्तक आपल्याला त्यालाच जोडायचे आहेत हे सत्य आहे.
आज शनी जयंती आहे. शनीच्या चौकटीत , त्याच्या राजमार्गाने जाताना त्याला अभिप्रेत असणार्या गोष्टी केल्या तर जीवन सुसह्य होयील. म्हणजे करायचे तरी काय ? तर स्वतःभोवती आरत्या ओवाळणे बंद करा .भाऊबंदकी , कुटील नीती , राजकारण ,व्यसने , पैशाचा लोभ .२४ तास मी मी मी मी हे केले मी ते केले मी घरासाठी इतके केले ...संपतच नाही आपले..जसे काही अखंड विश्वाचा कारभार आपल्यामुळेच आहे ..मी ला दूर करा आणि “ त्यांनी करून घेतले ” हे शब्द ओठात रुजवायचा प्रयत्न करा . फुकटचा किंवा दुसर्याचे ओरबाडून घेतलेला पैसा कधीच लाभत नाही. आपण कष्ट केलेलाच पैसा आपल्याला लाभणार आणि सुखाची शांत झोप सुद्धा देणार आहे .आई वडिलांच्या वारसाहक्कात जसा मुलांचा वाटा असतो तसा त्यांच्या पापपुण्यात सुद्धा . आईवडिलांच्या जीवावर किती काळ राहणार ? आपले स्वतःचे विश्व कधी निर्माण करणार ?
म्हणूनच शनी पत्रिकेत दशम स्थानातच अधिराज्य करतो . तिथे आपण आपले गुडघे बघतो . उत्तम कर्म केलेत तर नीट गुडघ्यावर उभे राहता येयील आणि समोर सुख स्थानातील शांत झोप मिळेल आणि आयुष्यातील लाभ निर्भेळ आनंद देतील.
शेवटी आपण कोण हो ? करता करवता तोच आहे. शनीला अहंकार अजिबात आवडत नाही आणि हा “ मी “ आपल्याला अहंकाराची द्वारे खुली करून देतो. त्याची कवाडे आधी कायमची बंद झाली पाहिजेत .कुणाला लुबाडू नका , खोटे तर नकोच ,आयुष्य खरेपणाने कायद्याने जगा आणि अहंकाराला तिलांजली द्या. ताठपणा सोडून लव्हाळ्या सारखे झालात तर जीवन आनंदमय होयील हे नक्की. जो नम्र आहे,लीन आहे तो जगावर राज्य करेल .
शनी हा आपल्या कर्मांचा आरसा आपल्यासमोर धरतो आणि त्याप्रमाणे फळ प्रदान करतो. शनी हा विरक्त आहे पण भावनाशुन्य नाही ,त्यालाही पाझर फुटतो .
चला तर मग आजपासून खरेपणा , सचोटी आणि अखंड कष्ट ह्यानेच आपण आपल्या शनी महाराजांना आपलेसे करण्याचा निर्धार करुया . बसेल हरी तर देयील खाटल्यावरी हे म्हणण्याचे दिवस कधीच नव्हते . स्वामी पण हेच सांगतात कि आळशी माणसाचे तोंड सुद्धा बघू नये.
आपल्या श्वासावर अधिराज्य शनी चे आहे. आपल्याला किती श्वास द्यायचे , आपल्याला Ventilator वरती कधी न्यायचे आणि घरी कधी आणायचे ,आपल्या श्वासाचे बटन कधी दाबायचे हे सर्व शनी ठरवतो ,. आपल्या जीवनातील त्याचे स्थान आणि महत्व हे अबाधित आहे पण आपण त्याला पापग्रह म्हणतो त्याच्याशी मैत्री करायला जात नाही ,त्याला काय सांगायचे आहे ते समजून पण घेत नाही आणि शेवटी विनाश ओढवून घेतो . इतके सर्व होवून त्याच्यावरच खापर फोडतो.
आज सिंहालोकन करुया , कसे आणि कुठल्या वाटेवर जीवन जगायचे त्याचा शांतपणे विचार करुया आणि ते समृद्ध करण्यासाठी शनी महाराजांनी घालून दिलेल्या कडक नियमांचे पालन करुया ....हाच कर्माचा सिद्धांत आहे आणि तो थोड्या कडक पणे शिकवणाऱ्या ह्या आपल्या शनी आणि गुरु ह्या दोघांसमोर नतमस्तक होवुया .
आज शनी महाराजांसमोर अनन्यभावे ,मनाच्या गाभ्यापासून शरणागत होवुया तरच जीवनाचे सार्थक होईल .
ह्या लेखांच्या माध्यमातून शनी आणि गुरु ह्या दोन्ही ग्रहांची सेवा मला अखेरच्या श्वासापर्यंत करता यावी हीच त्या दोघांच्याही चरणी माझी प्रार्थना वजा विनंती आहे. अनन्यभावे मी ह्या दोघांसमोर नतमस्तक आहे.
ओं शं शनैश्चराय नमः.
श्री स्वामी समर्थ
अस्मिता
antarnad18@gmail.com
.
शं शनैश्चराय नमः जय श्रीराम बजरंग बली की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏💐 फारच उत्तम लेख. धन्यवाद
ReplyDeleteKhup chaan lihile aahe Dear Ma'm ....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ReplyDeleteApratim
ReplyDeleteखूप छान लेख👌👌श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
ReplyDeleteखूप छान लेख👌👌श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
ReplyDeleteखूप छान लेख👌👌श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
ReplyDeleteखूप छान लेख👌👌श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
ReplyDeleteखूप छान लेख👌👌श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
ReplyDelete