Friday, 4 June 2021

शेवटचा दिस गोड व्हावा

|| श्री स्वामी समर्थ ||


खालील मंत्राचा जप अवश्य करावा .

अनायासेन मरणं  विना दैन्येन जीवनम् |

देहान्ते तव सानिध्यम देहि मे परमेश्वरम ||

भावार्थ :

अनायासेन मरणं  – give me death without pain – परमेश्वरा जेव्हा मला मृत्यू येयील तेव्हा मला कुठलाच त्रास नको होवूदे.

विना दैन्येन जीवनम् – grant me a life where I am not dependent on anyone – परमेश्वरा मला असे जीवन प्रदान कर कि मी कुठल्याच गोष्टीसाठी कुणावरही विसंबून राहायला नको . मला आत्मनिर्भर कर.

देहान्ते तव सानिध्यम – at death I see only you – माझ्या शेवटच्या क्षणी मला तुझे दर्शन होवूदे

देहि मे परमेश्वरम –please grant me these three wishes –  परमेश्वरा माझ्या ह्या इच्छा पूर्ण कर .

जो जन्मला आहे त्याचा मृत्यू अटळ आहे हे माहित असूनही आपण त्या शेवटच्या क्षणाला सामोरे जायला घाबरतो . आपले जसे जीवन आहे तसे ते सोडून जायचे हे आपल्याला मनातून मान्यच नसते . पण ते कधी ना कधी होणारच आहे. आपल्या सर्व आप्त स्वकीयांना  सोडून शेवटचा प्रवास फक्त आपल्यालाच करायचा आहे .  शेवटचा क्षण गोड व्हावा ह्यासाठी आयुष्यभर आपण प्रयत्नशील असले पाहिजे. आपली आजची कर्मे आपला उद्याचा दिवस लिहिणार आहेत . तसेच पुढील जन्मासाठी लागणारी पुण्याची शिदोरी सुद्धा आपल्याला इथून बरोबर  न्यायची आहे, त्याव्यतिरिक्त काहीही न्यायला परवानगी नाही.

ध्यान धारणा , नामस्मरण आपल्याला हळूहळू विरक्तीकडे नेतात आणि म्हणूनच त्याला अनन्य साधारण असे महत्वही आहे. विरक्त होणे म्हणजे भगवी वस्त्रे परिधान करून हिमालयात जाणे असा अर्थ इथे अभीप्रेत नसून प्रपंचात राहून विरक्त राहणे असा आहे. म्हणजे थोडक्यात सगळ्यात असूनही कश्यातच नसणे ,हे ज्याला जमले तो खरच जिंकला.

प्रपंचातून मन काढून घेवून परमार्थाकडे  वळवणे हेच त्यालाही अभिप्रेत आहे आणि म्हणूनच वरील मंत्र म्हणावा जेणेकरून  आपला शेवटचा प्रवास आणि क्षण आनंदात जायील कारण शेवटचा दिस गोड व्हावा ..याजसाठी केला होता अट्टाहास ..हेच अंतिम सत्य आहे.

अस्मिता

antarnad18@gmail.com

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment