|| श्री स्वामी समर्थ ||
आपण शाळेत शिकलो आहोत कि विषुवृत्त हे पृथ्वीचे दोन समान भाग करते त्यातील प्रत्येक भागाला आपण “ गोलार्ध “ म्हणतो . अगदी त्याच प्रमाणे जर पत्रिकेचे दोन भाग केले तर प्रत्येक भाग हा ६ भावांचा असेल ज्याला आपण “ गोलार्ध म्हणू.
सूर्य हा पूर्व क्षितिजावर सकाळी ६ च्या दरम्यान उगवतो . स्थानाप्रमाणे काही वेळ पुढे मागे होते . म्हणजे प्रथम स्थानावर रविचे राज्य आहे . पूर्वी क्षितिजावर रवीचा उदय होताना असलेली राशी आपली लग्न राशी असते आणि ज्यांचा जन्म सकाळी अंदाजे ६ ते ८ मध्ये झालेला आहे त्यांच्या पत्रिकेत रवी प्रथम म्हणजेच लग्न भावात असतो . पुढे सकाळी ८ ते १० ह्या वेळेत जन्मलेल्या व्यक्तींच्या पत्रिकेत रवी व्यय भावात स्थित असेल . तसेच १० ते १२ लाभ भावात येयील . अश्या प्रकारे संध्याकाळचे ६ ते ८ हे सप्तम भावात येतील आणि ह्या काळात जन्म झालेल्या बालकाच्या पत्रिकेत रवी सप्तम भावात येयील. म्हणून लग्न भावापासून सप्तम भावापर्यंत उदित गोलार्ध ( काही ग्रंथात ह्या भावाचा अर्धा भाग धरलेला आहे अंशां प्रमाणे ) आणि सप्तम भाव ( अर्धा ) ते धन भावापर्यंत अनुदित गोलार्ध असतो.
प्रत्येक गोलार्धातील ग्रह आयुष्यावर विशिष्ठ परिणाम करताना दिसतात. उदित गोलार्धातील ग्रह आत्मविश्वास किंवा उत्तम मनोबल , सकारात्मक विचारसरणी देतील , संकटातून मार्ग काढतील , जिद्द उमेद आणि आयुष्यातील प्रत्येक वळणावर संधी देतील . अनुदित गोलार्ध व्यक्तीला मनाप्रमाणे संधी न मिळाल्याने थोडी पिछे हाट देते तसेच थोडी निराशा , औदासिंन्य देयील. कुणाच्याही विचारांनी हाबी होणार्या ह्या व्यक्ती असतात .
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment