Saturday, 6 February 2021

 || श्री स्वामी समर्थ ||




महत्त्व विष्णू सहस्त्र नामाचे  विष्णुसहस्रनामाने आपल्या सर्व ग्रहपीडा, शत्रुपीडा, वास्तुदोष, पितृदोष, स्वभावदोष नाहीसे होतात.विघ्ने, संकटे दूर पळतात.

१)दर बुधवारी ४वेळा विष्णुसहस्रनाम म्हटले तर आपल्या सर्व पितराना सद्गति मिळते.

२)नियमित रोज १२वेळा विष्णुसहस्रनाम ६ महिने म्हटले तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होते इहलोकी कीर्ती व मोक्ष प्राप्त होतो,म्हणजेच भुक्ति व मुक्ती दोन्ही प्राप्त होतात.

३) १५,००० वेळा विष्णुसहस्रनाम म्हटले तर एक विष्णुयाग केल्याचे फळ मिळते असे पू.श्रीडोंगरे महाराज विरचित भागवतात लिहिले आहे.

४)एकादशीच्या रात्री १२वाजता स्नान करून विष्णुपुढे(राम/बालाजी/पांडुरंग/कृष्ण,फक्त नृसिंह नको)तुपाचा दिवा व उदबत्ती लावून विष्णुसहस्रनामाचे १२ पाठ १२एकादशीना केले तर साक्षात भगवंताचे दर्शन होते .

५)४०दिवसांच्या रोज १२वेळा नियमित पठनाने अशक्य गोष्टी शक्य होतात.

६)सहस्र तुलसीपत्रानी सहस्रनामानी अर्चन अथवा हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव येतात.

७)बालकृष्णाला  तुलसी अर्चन करून मुलांकडून रोज एकदा विष्णुसहस्रनाम म्हणवून घेतले तर त्यांचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते,ती तुळशीची पाने त्यांनी चावून खाल्ली तर त्यांची बुद्धी तेजस्वी होण्यास मदत होते.

८)वास्तु दोष जाण्या करिता रोज तीन पाठ आठवडाभर करावेत,याची सुरुवात बुधवारीच करावी.तुपाचा दिवा व उदबत्ती ही लावावीच.

९)बाहेरच्या त्रास असेल संतती मतिमंद-गतिमंद असेल तर अशा व्यक्तीला रोज सकाळ-संध्याकाळ श्रीविष्णुसहस्रनामाचे पाठ ऐकवावेत.

१०)घरामधे कोणी व्याधिग्रस्त असेल तर विष्णुसहस्रनामाच्या पठनाने व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभे राहते.

११)श्रीविष्णु मंदिरात बसून जो कोणी या स्तोत्राचा पाठ करतो,त्याचे सर्व अहित नाहीसे होते,त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टीचा परिहार होतो.

१२)विष्णुसहस्रनामासाठी जो रुद्रशाप विमोचन विधी दिला आहे त्याच्या ऐवजी विष्णुसहस्रनामाच्या आधी व शेवटी ३ वेळा ॐ नम: शिवाय आणि ३ वेळा ॐ नमो भगवते वासुदेवाय असा जप करावा.

१२)श्रीविष्णुसहस्रनामाच्या फलश्रुतीत असे म्हटले आहे की,जो या स्तोत्राचे पठन करेल त्याने दिली पाहिजेत अशी सर्व दाने दिली आहेत आणि केल्या पाहिजेत अशा सर्व देवांचे पूजन केले आहे.

१३)पिंपळाच्या पारावर बसून विष्णुचे ध्यान करीत जो विष्णुसहस्रनामाचे पाठ करतो, त्याची शतकोटी कल्पांमधील साचलेली पातके हळू हळू नष्ट होतात.

१४)शिवालयात, तुलसीवनात बसून जो रोज विष्णुसहस्रनामाचे पाठ करतो,त्याला कोट्यवधी गायी दान दिल्याचे फल प्राप्त होते आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो असे चक्रपाणीचे वचन आहे.

१५)श्रीविष्णु यांच्या अच्युत, अनंत, गोविंद या तीन नावानी कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो.

१६)आपल्याला कुठल्याही कामासाठी घरातून बाहेर पडायचे असेल तर,तेव्हा उंबरठ्याबाहेर उजवे पाउल ठेवण्या आधी मनातल्या मनात ४वेळा नारायण, नारायण,नारायण नारायण असे नाम घ्यावे...

ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
श्री गुरुदेव दत्त


संग्रहित 

अस्मिता

Friday, 5 February 2021

परतफेड

 || श्री स्वामी समर्थ ||


आपण हा जो मनुष्य जन्म घेतलाय, तो आपल्या अपेक्षांपूर्तीं करिता नाही किंवा नसावा.. कारण  आयुष्यात आपण नेहमी दुसऱ्यांकडूनच अपेक्षा ठेवत असतो आणि बऱ्याचदा त्या पूर्ण होत नाहीत.. त्या मुळे उरतात त्या फक्त जाळणाऱ्या व्यथा..!"

"माझ्या मते हा जन्म आपल्या अपेक्षांपूर्तीं करिता नाहीच आहे, तर हा आहे कुठे तरी, केव्हा तरी राहुन गेलेल्या दुसऱ्यांच्या परतफेडीसाठी..."

जसं तुमचा आयुष्यात अचानक जोडीदार हे जग सोडून गेला, तुम्ही त्यांचा संसार पूर्ण केलात, तुम्ही त्यांचा संसार पूर्ण करण्याकरिता हा जन्म घेतला, ह्याचा अर्थ कोणत्यातरी एका जन्माची परतफेड तुमच्या कडुन झाली.. तो अकाउंट तुमचा संपला..! आता ह्याच दृष्टिकोनातून आयुष्यातील सगळ्या लहान मोठ्या घटनांकडे पाहण्याचा प्रयत्न करा..,

मुलगा आणि सून तुमच्याशी बोलत नाहीत किंवा आपली लाडकी लेकीने तुमच्या मनाविरुद्ध जाऊन परस्पर लग्न केले ही सुध्दा तुम्ही कोणतीतरी परतफेड करत आहात.. परतफेडीचा हा हिशोब ह्या जन्मात संपवल्याशिवाय तुम्हांला मरण नाही. तेंव्हा मनातल्या मनांत सुद्धा परमेश्वराला उद्देशून "तु मला का जगवलंस..?" हा प्रश्न विचारू नका. जे झाले ते चांगले झाले,जे होईल ते चांगले होईल असा दृष्टिकोन ठेवून सकारात्मक जिवन जगा व इतरांना प्रेरणा द्या.

कुठलीही व्यक्ती असो ती तुमच्याशी विचित्र वागली. तुमचा अपमान केला. तुमच्या कडे दुर्लक्ष केलं. तुमच्या उपकरांचं कोणाला विस्मरण झालं. "तेव्हा एकेक अकाउंट पूर्ण झाला असे समजा, आणि तसं आजपासून स्वतःला सांगायला लागा.

बँकेतली शिल्लक संपली की पासबुकावर,  'Account Closed..' असा शिक्का मारतात ना,  त्याप्रमाणे जेंव्हा एकांत मिळेल तेंव्हा आपले किती 'Account Closed' झाले, ह्याचा विचार करा आणि पासबुकं जाळून टाका. परतफेडीचा एक ही क्षण टाळू नका.

कदाचित सुरुवातीला तुम्हांला जड जाईल.. पण आपलं मन जेवढं बलदंड असतं ना, तेवढंच ते लवचिक पण असतं.

तेंव्हा मनाला सांगा."बाबा रे.. आयुष्यभर तुझं ऐकलं.. तुझ्या हुकमात राहिलो.. आता तुझी गुलामी मी सोडून देत आहे.. आजपासून तुला मी मुक्त केलं..!"

 हा प्रयोग करा. आणि किती खाती पटापट बंद होतायेत ह्याची प्रचिती घ्या.. मी सुद्धा उद्या तुम्हांला ओळख दाखवली नाही. तर तुमच्या पासबुकात माझी एकच entry होती असं समजा..

परमेश्वराला दोष देण्यापेक्षा फक्त. "परतफेड आणि परतफेड" हा एकच मंत्र ध्यानात ठेवा आणि बघा तुम्हाला तुमचे आयुष्य किती सुंदर वाटेल, तुमच्या आयुष्यातुन निगेटीव्हीटी कायमची निघुन जाईल.....

आपण जेव्हा सहन करतो, सहन करतो हे इतक्या वेळा म्हणतो  ह्याचा अर्थ आपण ते  काहीच सहन करत नाही तर उलट दुःख वाटत असतोन कारण जो जो सहन करतो  तो कधी बोलत नाही.

आज पासुन आपण सुध्दा आपल्या आयुष्यात कोणा कडुन अपेक्षाभंग करुन घेण्या ऐवजी फक्त "परतफेडीचं" आयुष्य जगायला सुरुवात करुन आयुष्य मजेत घालवुया..

संग्रहित

अस्मिता

Wednesday, 3 February 2021

प्रवास गुरुसोबतचा

 || श्री स्वामी समर्थ ||


गुरुविण कोण दाखवील वाट...

मागील जन्माची पुण्याई असेल तर योग्य वेळी सदगुरु आपणास आपोआप भेटतात..!  काहींना त्रास होतो. माणसाचे भोग संपत आले कि, सद्गुरूंचा पत्ता मिळतो..! काहींना अगोदर मिळतो, कारण त्यांचे मागील जन्माची पुण्याई असते..!  काहींना जाणीव पूर्वक मिळतो. तर काहींना अपघाताने  काहींना पत्ता मिळतो. पण त्यांचे मन तयार होत नाही..! काही जण येण्यास इच्छुक असतात. पण पाठीमागची काळजी चिंता , पाप हे येऊ येऊ देत नाही..! काही जण त्या पत्यावर येतात. पण त्या मार्गात अडथळे येतात..! काही जण भरकटतात. फसतात ,हि त्यांची परिक्षा असते..!  कारण त्यांचे भोग हे त्यांना पोहचू देत नाहीत. भोग संपत आले कि गुरु भेटतातच..!  

आधी करावी सेवा मग मिळतो मेवा. आधी करावी चाकरी मग मिळते सद्गुरूंची सेवेची भाकरी..!!   

आपल्या गुरूंवरील श्रध्दा,विश्वास ठाम ठेवा. कोणत्याही परिस्थिती मध्ये चुकीचा मार्ग अवलंब करू नका. भलत्याच वाटेला जाऊ नका. वेळ लागेल पण आपले गुरू आपले चांगलेच करतील हा विश्वास ठाम ठेवा
आणि शेवटी एक लक्षात ठेवा तुम्ही कोठेही जा काहीही उपाय करा पण या ब्रम्हांडनायकाच्या परवानगी शिवाय झाडाचे पान सुध्दा हालत नाही हे माञ लक्षात ठेवा.

मग पहा आपण काय करायचे ते भलत्या वाटेने जायचे की आपल्या गुरूंच्या वाटेने जायचे खरे पाहता गुरू शिवाय शिष्य नाही,  झोळी खप्परा शिवाय भिक्षा नाही, त्रिशूळ चिमट्या शिवाय शस्त्र नाही, कुबडी रूद्राक्ष माळ शिवाय साधना नाही, कपाळावर भस्म(विभूती) शिवाय संरक्षण नाही, सर्व इंद्रियांची ताकद पूर्ण एकवटुन सदगुरू मुखातून मिळालेल ज्ञान आपल्याला पेलता आल पाहिजे आणि मग त्याच कृतीत रूपांतरही करता आल पाहिजे. ध्यान या विषयावर आपण नुसतच ऐकत किंवा वाचत राहिलो तर त्याचा काही उपयोग नाही. जो ते ज्ञान प्रत्यक्ष कृतीत उतरवेल,त्यालाच त्याचा उपयोग होईल.ध्यान हे एक तप आहे. एका जागी एका वेळी कोणतही काम न करता शांत बसून राहण हे सगळ्यात मोठ तप आहे. एरवी मनुष्य चित्रपटगृहात् कित्येक तास काही काम न करता शांत बसु शकेल. परन्तु सिनेमा पाहणे  आणि ध्यान करण हयात मोठा फरक आहे. कोणी म्हणेल अहो मी तीन तास एका जागी बसून सिनेमा बघतो म्हणजे मी ध्यानच करतो. पण हे ध्यान नव्हे,कारण खऱ्या ध्यानात आपल्या समोर कोणतही चित्र निर्माण होत नाही किंवा कुठला आवाजही ऐकू येत नाही. म्हणजे काही 'नसण' हेच तिथे 'असत' आणि त्यालाच ध्यान म्हणतात. सुरुवातीच्या काळात प्रतीकावर आणि त्यानंतरच्या काळात प्रतिकाविना  घडू शकणार ध्यान आपल्याला अपेक्षित आहे आणि आवश्यकही आहे.

गुरुंची सेवा करणे, गुरुंनी दिलेली साधना "नित्यनेमाने" करणे, त्यामधे खंड पडता कामा नये, तसेच शक्यतो वेळ चुकवू नये, कारण आपण जसजशी साधना नेमाने करू लागतो, "गुरुदेव त्यावेळेला आपली वाट पाहात असतात". ही भावना एकदा का मनामधे रुजली की साधनेमधे सातत्य आपोआप येऊ लागते. आज झोप झाली नाही, आज बरं वाटत नाही म्हणून साधनेची वेळ चुकवू नये. अत्यंत महत्वाचं म्हणजे श्रेष्ठ गुरुंचे चरण आपल्याला मिळाले ही त्यांची आपल्याप्रती दयाभावना आहे हे लक्षात असू द्यावे. बाकी गुरुंची आपल्याकडून काहीच अपेक्षा नसते. भगवंताप्रती आपला भाव कसा दृढ होईल हेच ते पाहात असतात. आपल्या प्रापंचिक समस्या त्यांच्या चरणीं दृढ झाल्यावर आपोआपच मार्गी लागतात. त्यांना सांगायची गरजच लागत नाही, पण त्यांच्याविषयी तेवढी श्रद्धा आणि निष्ठा आपल्या मनात असली पाहिजे. आपल्याबरोबर ते असतातच, फक्त आपली श्रद्धा आणि निष्ठा ते सतत तपासून पाहातात. आपल्या आयुष्यात घडणा-या प्रत्येक प्रसंगी ते आपली परीक्षा पाहात असतात, आपली "निष्ठा" कुठे डळमळत तर नाही ना. त्यामुळे सदैव त्याचे स्मरण करून आयुष्यात घडणा-या प्रसंगांना सामोरे जावे. आपला सर्व भार आपल्या निष्ठेप्रमाणे ते घेतातच. फक्त आपलं आचरण, विचार यांना आपणच सांभाळायचं आहे..एक मात्र नक्की गुरुविण कोण दाखवील वाट.

संग्रहित 


अस्मिता


Tuesday, 2 February 2021

ब्राह्ममुहूर्त

 || श्री स्वामी समर्थ ||





 हा पहाटे ३.४५ ते ५.३० असा पावणे दोन तासाचा असतो. याला रात्रीचा चौथा प्रहर अथवा उत्तररात्र असेही म्हणतात. याकाळात अनेक गोष्टी अशा ‌घडत असतात ज्या दिवसभराच्या कामासाठी लागणारी ऊर्जा देत असतात.
या मुहूर्तावर उठल्याने आपणास एकाच वेळी नऊ फायदे मिळतात.

१) पहीला फायदा म्हणजे या काळात ओझोन हा वायू पृथ्वीच्या वातावरणाच्या सर्वात खालच्या थरात जास्त प्रमाणात आलेला असतो. या ओझोन मध्ये मानवास श्वसनासाठी आवश्यक असणारा प्राणवायू (आॅक्सिजन) मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे या काळात उठून उजवी नाकपुडी चालू करून दीर्घ श्वसन केले असता रक्तशुद्धी होते
रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण वाढल्याने हिमोग्लोबिन सुधारते. त्यामुळे ९० टक्के रोगांपासून मुक्ती मिळते.

२) दुसरा फायदा असा कि याकाळात मंद प्रकाश असतो डोळे उघडल्यावर एकदम लख्ख प्रकाश डोळ्यावर पडला तर काही काळ आपणास काहीच दिसत नाही. असे वारंवार होत राहीले तर डोळ्यांचे विकार जडतात व दृष्टी क्षीण होऊ शकते. तसे होऊ नये यासाठी तारका असेपर्यंत उठावे.

३) तिसरा फायदा म्हणजे या काळात पंचतत्वापॆकी वायूतत्व जास्त प्रमाणात कार्यरत असते व मानवी शरीरातील अपानवायू हा कार्यरत असतो. हा अपानवायू मलनिःसारण व शरीरशुद्धीचे कार्य करतो. हा वायू कार्यरत असताना मलबाहेर टाकण्याचे कार्य कोणताही जोर न लावता सहजतेने होऊ शकते. जोर लावावा लागल्यास हळूहळू मूळव्याध होण्याची शक्यता असते. त्यामुळे मूळव्याध होऊ नये व उत्तम शरीरशुद्धी व्हावी यासाठी याच काळात मलनिःसारण करावे. तसेच जैविक घड्याळाप्रमाणे याकाळात मोठ्या आतड्यामध्ये आपली ऊर्जा कार्यरत असते.

४) चौथा फायदा म्हणजे आपल्या शरीरात , दिवसभरात जमा झालेली घाण नऊ ठिकाणाहून बाहेर पडत असते.
या नऊ ठिकाणांना नवद्वार म्हणतात. ती नऊ द्वारे पुढीलप्रमाणे :  दोन डोळे, दोन नाकपुड्या, दोन कान, एक तोंड, एक शिश्नद्वार व एक गुदद्वार. या नऊ ठिकाणी रात्री शरीरातील घाण जमा होते. त्या घाणीत अनेक जीवाणू विषाणू असतात जे रोग उत्पन्न करू शकतात. या जीवाणू विषाणूंना सूर्यप्रकाश मिळाल्यास त्यांची फार मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते व आपण रोगास बळी पडू शकतो.  हे होऊ नये यासाठी ब्राह्ममुहूर्तावर उठून ही घाण शरीराबाहेर काढून टाकली पाहिजे.

५) पाचवा फायदा म्हणजे सूर्योदयाच्या आधी ब्राह्ममुहूर्तावर स्नान केल्यास त्वचेची रंध्रे मोकळी होतात. त्यामुळे शुद्ध हवा आत शोषली जाऊन सर्व अवयवांना शुद्ध प्राणवायू मिळाल्याने संपूर्ण शरिर दिवसभराच्या कामासाठी ताजेतवाने होते. दिवसभर काम केले तरी आपण एकदम फ्रेश राहतो.

६) सहावा फायदा म्हणजे याकाळात मेंदूमधील स्मरणशक्ती केंद्र व इतर केंद्रे असतात ती जागृत असतात. याकाळात विद्याध्ययन केल्यास इतर वेळेपेक्षा जास्त काळ स्मरणात राहते. तसेच याकाळात ॐकार जप केल्यास मेंदूमधील स्मरणशक्ती केंद्र तसेच इतर शक्ती केंद्रे जागृत होतात.

७) सातवा फायदा म्हणजे सूर्योदयावेळी अनेक प्रकारच्या आरोग्यदायी लहरी वातावरणात सूर्यकिरणांद्वारे येत असतात. त्या आपल्या त्वचेद्वारे शोषल्या जातात पण त्वचेची रंध्रे मोकळी असतील तर ते शोषले जातात.
त्यासाठी ब्राह्ममुहुर्तावर उठून शरीर शुद्धी केली पाहिजे.

८) या काळात आपण ॐ मंत्र जप साधना केल्यास सप्तचक्र जागृत होतात, कारण या मुहूर्तावर वातावरण शुद्ध असल्याने जास्त प्रमाणात कंपने निर्माण होतात व या कंपनांद्वारे कुंडलिनी जागृती होते.

९) नववा फायदा म्हणजे या मुहूर्तावर अनेक पुण्यात्मे,  सिद्धात्मे हे परलोकातून पृथ्वीतलावर आलेले असतात. 
या पुण्यात्म्यांना, सिद्धात्म्यांना आपण साधनेद्वारे भेटू शकतो व उत्तम मार्गदर्शन मिळवू शकतो.

असे एकूण नऊ फायदे आपण एकाच वेळेस ब्राह्ममुहूर्तावर उठून स्नानादी कर्मे केल्याने मिळवू शकतो.

( संग्रहित )

अस्मिता