Wednesday, 16 April 2025

कुंडलीतील पंच तत्वांची तर्कशुद्ध मांडणी

 || श्री स्वामी समर्थ ||



पंचतत्वाशी आपली सर्वांची नाळ जोडली गेलेली आहे. त्यांची वेगळी ओळख करून न देता सरळ विषय मांडते. आपल्या ऋषी मुनींनी निसर्ग कुंडली अतिशय अभ्यासपूर्वक मांडली आहे .त्यातील पंचतत्व अभ्यासण्या सारखी आहे. स्मुक्ष अभ्यास केला तर लक्ष्यात येते कि अग्नी च्या समोर वायू तत्व आले आहे. अग्नीसाठी प्राणवायू लागतो आणि म्हणूनच अग्नीसमोर वायू आहे . पण हा वायू प्रमाणबद्ध असला पाहिजे , अतिरेक उपयोगी नाही अन्यथा अग्नी भडकू शकतो .


जल तत्वासमोर पृथ्वी तत्व आहे. कोरडी माती कसलाच आकार घेवू शकणार नाही . मातीचे भांडे बनवायचे तर जल हवेच इतकी साधी सोपी रचना आहे. तसेच जल धरून ठेवायला सुद्धा पृथ्वी तत्व लागते. म्हणूनच त्यांच्या राशी एकमेकांसमोर . केंद्रातील सर्व स्थाने अति महत्वाची आणि आपल्या आयुष्याचा तो आधार आहे तिथे चारही तत्व आहेत अशी तर्कशुद्ध रचना आपल्या कुंडलीची आहे. कुंडलीचा सखोल अभ्यास त्यातील अनेक गोष्टीतील तर्क उलगडून दाखवतो . केंद्रातील स्थानांमध्ये चर तत्व आहे . जन्माला आल्यावर तिथेच थांबून न राहता शरीर बुद्ध मन सगळ्यात वाढ अपेक्षित आहे . चतुर्थ भाव म्हणजे सुखस्थान , प्राथमिक शिक्षण , वास्तू ह्या सर्वात वाढ किंवा अधिक चांगला बदल झाला पाहिजे . सप्तम भावात अर्धांगिनी ,नवीन नाते उमलू पाहणारे हे स्थान , नवीन नाते अनेक अपेक्षा घेवून बहरणारे हे स्थान त्यामुळे सर्वांगीण प्रगती इथे अपेक्षित आहे. सरतेशेवटी दशम भाव , कायम तोच पगार असेल तर कसे निभावणार  नाही का. हुद्दा , दर्जा , सामाजिक पत उंचावण्यासाठी इथे अर्थार्जनाचा लेख सुद्धा उंचावला पाहिजे . थोडक्यात ह्या चारही स्थानात असलेली कार्य हि दिवसागणिक बदलत जाणारी यशाची निर्मिती करून आयुष्याचा आलेख उंचावणारी आहेत म्हणून इथे चर तत्वाच्या राशी ज्या माणसाला सतत कार्यरत ठेवतात , पुढे पुढे नेत राहतात त्याचे अधिष्ठान आलेले आहे .


आयुष्याच्या जवळजवळ मध्यापर्यंत येणारी स्थाने आणि त्यांच्या राशी बघा . आयुष्याचा उपभोग घेणारा शुक्र आणि आर्थिक नियोजन करणारा बुध त्याच्या राशी तिथे आहेत . संसार सुखाचा होण्यासाठी लागणारा शुक्राचा अविष्कार तारुण्यात आलेला दिसतो . त्याआधी शिक्षण आणि पोटासाठी अर्थार्जन बुध देत आहे . मुलीचा बाप मुलगा आपल्या लेकीचे पोट हा कसे भरणार ते पाहणारच कि . जीवनात पन्नाशी नंतर असतो तो वानप्रस्थाश्रम त्यामुळे ९ १० ११ १२ ह्या राशी विरक्ती आणणाऱ्या आणि मोक्षाकडे वाटचाल करायला लावणाऱ्या दोन महत्वाच्या ग्रहांच्या आहेत आणि ते म्हणजे गुरु आणि शनी .आपण आयुष्याच्या संध्याकाळीच काही गोष्टी सोडून देवू शकतो अर्थात तेही अध्यात्माचा पाया जीवनात भक्कम असेल तर अन्यथा नाहीच . सगळे कवटाळून बसतो एखादी साडी विरली तरी ती कुणाची तरी आठवण म्हणून देऊन टाकण्याची वृत्ती आपली नसते . आठवण कसली त्यापेक्षा कुणीतरी ती चार वेळा नेसेल तरी .असो .  वय झाले कि माणसाने प्रपंचातून लक्ष्य काढून प्रभूच्या चरणी मन , चित्त गुंतवावे हेच ह्या कुंडलीच्या मांडणीतून सिद्ध होते . 

लग्न भावात वृश्चिक हि राशी नसून चर तत्वाची मेष राशी आहे. लहान बाळ जन्म झाल्यावर तसेच तेव्हडेच राहते का? नाही हातापायाची सायकल हाच त्याचा व्यायाम पण पालथे पडायला शिकते आणि हळू हळू मोठे होत जाते कारण हाच आयुष्याचा नियम आहे . एका जागी न थांबता सतत पुढे जात राहिले पाहिजे . 

चतुर्थात येणारी कर्क राशी तिथे आपले सुखस्थान आणि माता . आई म्हणजेच घर हे आपले समीकरण आहे . मातेशिवाय घर असूच शकत नाही हे सर्वश्रुत आहे. आईचा मायेचा हात आपल्या लेकरांवरून आणि घरावरून फिरल्या शिवाय घराला घरपण नाही हे त्रिवार सत्य आहे. ह्याचप्रमाणे प्रत्येक ग्रह आणि स्थानाची महती इथे आहे आणि त्याच्यामागे तर्क हा आहेच जसे लग्न हे रूप दर्शवते आणि रूप अग्नी प्रकाशात आणतो म्हणून तिथे मंगळाची अग्नी तत्वाची मेष राशी आहे. द्वितीय भाव हा कुटुंबाचा आहे अर्थात कुटुंब संस्था टिकवायची असते , कुटुंबातील एकमेकांना धरून ठेवूनच संसाराची गाडी पुढे न्यावी लागते म्हणून तिथे पृथ्वी तत्वाची स्थिर गोडवा जपणारी वृषभ राशी आहे. शुक्र हा सुद्धा जल तत्वाचा आहे. इथे मनाचा चंद्र उच्च होतो.  संसारात मन नसेल तर सर्व फोल आहे. 

बुध शुक्र शनी हे त्यांच्या लग्नाला शुभ होतात तसेच रवी चंद्र मंगळ गुरु हे त्यांच्या लग्नाला शुभत्व देतात . कोण स्थानांचे स्वामीही एकमेकांचे मित्र असतात.

बुध हा पृथ्वी तत्व दर्शवतो आणि त्याच्या कडे गंध आहे. गंध आणि श्वास आपण नाकाने घेतो . नाकाला दोन नाकपुड्या आहेत कारण श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे जसे आपण प्राणायमात करतो. बुध हा द्विस्वभावी राशीचा आहे. म्हणून तिथे श्वास घेणे आणि सोडणे हि क्रिया होते. बुधाकडे गंध आहे आणि बुधाकडे त्वचाही आहे.  त्वचेला शिद्र( pores)  असतात ज्यामधून घाम बाहेर फेकला जातो. जर घामाचा उग्र वास असेल तर कुठेतरी शनी सुद्धा बिघडलेला असतो. आपल्या शरीरावर त्वचेचे आवरण आहे म्हणून आपल्या देहाला सुंदरता आणि आकार उकार आहे . 

पोटात आलेल्या अन्नाचे पचन नीट होण्यासाठी षष्ठ भावात सुद्धा पृथ्वी तत्वाच्या बुधाची कन्या राशी आहे. शरीराला आवश्यक घटक जवळ ठेवून इतर बाहेर टाकून देणे हि क्रिया असल्यामुळे इथे कन्या हि द्विस्वभावी राशी आहे. 

कुठल्याही पत्रिकेतील फलादेश पाहणे तेव्हाच शक्य होईल जेव्हा ह्या मुलभूत गोष्टी आपल्याला नीट समजतील. आपला देह सुद्धा एक दिवस पंच तत्त्वातच विलीन होणार आहे.  

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230.


Saturday, 12 April 2025

रामभक्त

|| श्री स्वामी समर्थ ||


एकदा श्री कृष्णाच्या मनात आले सुदर्शन ( चक्र ) आणि गरुड ( वाहन ) ह्यांना त्यांच्या शक्तीचा अहंकार झालेला आहे. त्यांना त्यांची  चूक समजण्यासाठी त्यांनी एक युक्ती केली . गरुडाला सांगितले कि जा अमुक अमुक ठिकाणी अंजनीपुत्र बसलेले आहेत त्यांना सांग मी बोलावले आहे. गरुडाने आज्ञा प्रमाणम म्हणून लगेच प्रस्थान केले आणि हनुमानाच्या समोर उभे ठाकले . श्री हनुमानाचे प्रचंड तेज पाहून त्यांचे नेत्र दिपून गेले. त्यांनी कृष्णाचा निरोप त्यांना सांगितला आणि म्हणाले कि त्यांनी तुम्हाला बोलावले आहे. तेव्हा हनुमान उत्तरले मी तर एक सामान्य रामभक्त आहे माझ्याकडे त्यांचे  असे काय काम असणार आहे ? त्यांनी येण्यास नकार दिला तेव्हा गरुडाने त्यांना दटावत म्हंटले नाही आलात तर मी तुम्हाला बंदी करून घेवून जाईन. हे ऐकल्यावर हनुमान शांत राहिले . मनात रामाचा जप चालू होता त्यांनी समोर असलेल्या गरुडाला आपल्या शेपटीने विळखा घातला आणि गरुडालाच बंदी करून टाकले. 

काही वेळाने गरुड परतलेला नाही हे लक्ष्यात आल्यावर कृष्णाने सुदर्शनास बोलावून सांगितले कि हनुमाना कडे जा आणि त्याला सांग रामाने तुला बोलावले आहे . कृष्णाचा निरोप सांगताच हनुमान सद्गदित झाले , प्रत्यक्ष रामाने माझी आठवण काढली आहे हे ऐकून त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. परंतु सुदर्षणाचा एकंदरीत अविर्भाव पाहून हनुमानाने त्याला आपले रौद्र रूप दाखवले आणि त्याला चिमटीत पकडून आपल्या दाढेत बंदिस्त केले आणि  तात्काळ क्षणाचाही विलंब न करता हनुमान कृष्णासमोर उभे ठाकले आणि नतमस्तक झाले. कृष्णाने रामाचा अवतार घेतला होता त्यामुळे हनुमानाला कृष्णातील फक्त रामच दिसत होता . कृष्णाने त्याला आलिंगन देत म्हंटले गेल्या जन्मी मी तुझा राम असलो तरी ह्या जन्मात मी कृष्ण आहे. हनुमान भारावले आणि म्हणाले जन्मोजन्मीचे हे आपले नाते आहे . आपण कुठल्याही रुपात आलात तरी माझी भक्ती तिळभर सुद्धा कमी होणार नाही . आपण माझी आठवण काढलीत ह्यातच सर्व आले . आपल्याला शतशः प्रणाम. श्रीकृष्ण सुद्धा हनुमानाच्या भक्तीने भारावून गेले . सुदर्शन कुठे आहे हे विचारताच हनुमानाने आपल्या दाढेतून  सुदर्शनाला काढून कृष्णासमोर ठेवले. कृष्णाने स्मित केले आणि सुदर्शन सुद्धा काय समजायचे ते समजले.

गरुड परत आल्यावर सुदर्शनाला म्हणाले कि हनुमान हा बलशाली आहे त्याच्यापासून दूर राहा , तो कधीही इथे येवू शकतो. हे ऐकल्यावर सुदर्शनाने हनुमान कृष्णाच्या दर्शनाला येवून गेले सुद्धा हे सांगितले. दोघेही मनोमन वरमले .असामान्य शक्ती बळ असलेल्या हनुमानासमोर आपण किती खुजे आहोत हे समजल्यावर त्यांचा अहंकार भुई सपाट झाला. इतके बळ तेज असूनही हनुमान किती संयमित , निष्ठावान , श्रद्धावान आहेत आणि रामासमोर नतमस्तक आहेत हे पाहून आपल्यातील उणिवांची जाणीव त्यांना झाली . 

आपण आपल्या कुठल्याही गुणांचा अहंकार करू नये कारण आपला बाप आपल्या आधीच त्या विधात्याने जन्माला घातलेला असतो. भक्तीचा सुद्धा अहंकार नसावा. निरपेक्ष भाव मनी ठेवून केलेली श्रद्धायुक्त सेवा फळ देतेच . आपण ज्याची भक्ती करतो त्या देवावर आपल्याला फळ कधी द्यायचे ते सर्वस्वी अवलंबून असते . त्यामुळे मी इतके करतो , असे अनुष्ठान केले , इतक्या प्रदक्षिणा घातल्या ह्याची मोजदात करणे भक्ताने सोडून दिले पाहिजे. आपण सेवा करत रहायची तीही अखेरच्या श्वासापर्यंत पुढे आपले जीवन कसे असणार आहे ते सर्वस्वी आपल्या अराध्याच्या हाती आहे. 

त्याच्या कामात आपण ढवळा ढवळ करू नये. आपण आपले काम करावे त्याला त्याचे करू द्यावे .

आज हनुमान जयंती . कलियुगात राहू केतू ह्यांनी जग जवळ आणले आहे , तंत्रज्ञानाने इतकी प्रगती केली आहे पण माणसाला त्याचा अहंकार झालेला आहे. सगळे आहे पण मनाची शांतता कुठेतरी ह्या जीवघेण्या स्पर्धेत हरवत चाललेली आहे . गोळी घेतल्याशिवाय झोप येत नाही आणि कितीही पैसा मिळवला तरी समाधान नाही . 

जीवघेण्या स्पर्धेत आपण अनेकदा आपले कुलाचार , धर्म , रूढी परंपरा विसरून जातो किबहुना त्यांना दुय्यम समजतो . वेळ नाही हि सबब आहे ती बाजूला ठेवून आपल्या पुढील पिढीलाही हा वारसा देणे हे आपले कर्तव्य आहे. 

आज “ अजून हवे अजून हवे “ हे त्या मारुतीरायाच्या चरणी समर्पित करूया . खरतर काहीच मागायचे नाही पण अगदी मागायचे झालेच तर “ हनुमाना तुझ्या सारखा निस्सीम भक्त कर “ हे तर आपण नक्कीच मागू शकतो. हनुमानाकडून निस्सीम भक्ती , निखळ प्रेम आणि भक्तीत असणारे सातत्य जर आपण घेतले तर आयुष्य एका वेगळ्याच उंचीवर जाईल ह्यात दुमत नसावे. 

ओं शं शनैश्चराय नमः

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230





   


Friday, 11 April 2025

अंतरात्मा गुरुतुल्य

 || श्री स्वामी समर्थ ||


आजकाल प्रत्येकाच्या ओठी गुरु हे नाव येतेच येते . कलियुगात संकटे गळ्यापर्यंत आली कि मनुष्य कुठल्यातरी शक्तीचा आधार घेतो आणि त्यास शरण जावून नतमस्तक होतो . आजच्या इंस्तंट च्या जमान्यात प्रत्येकाचा संयम संपलेला आहे किंवा संपत चाललेला आहे. पुढील गाडी सिग्नल ला दोन क्षण उभी राहिली कि मागून सगळ्यांचे होर्न चालू होतात . सगळे मनात आले कि लगेच व्हावे असे होत नसते . संयमाचा उगम हा नामातून होत असतो .

विवाहासाठी स्थळ शोधायला सुरवात केली कि जेव्हा काही काळ लोटतो आणि विवाह जमत नाही तेव्हा मुलांचाच  काय पालकांचाही संयम सुटतो आणि त्याचे काळजीत रुपांतर होते . आपल्या अपत्याचा विवाह होणार कि नाही हि एक अनामिक भीती मनाला ग्रासू लागते . आपण देवी देवता नाही आपला संयम सुटणे हे विशेष नाही. असो. 

आजकाल एक सर्वसाधारण प्रश्न विचारला जातो कि साधना कशी करावी ह्यासाठी मार्गदर्शन करा. खरे सांगू का ? हे प्रश्न न मी कधी कुणाला विचारले आणि कुणी विचारावे असेही वाटत नाही. अनेकदा आपण हे करू का ते करू ह्यात गुंतून राहतो. सगळ्यात प्रथम त्यातून बाहेर यावे. सकाळी आपले प्रातःविधी उरकले कि देव्हार्यातील आपल्या कुलस्वामिनीला हळद कुंकू वाहून दिवसाची सुरवात करावी . मनोभावे नमस्कार करून देवीचा जप , श्रीसूक्त जे काही म्हणता येयील ते म्हणावे. आपल्या कुल्स्वमिनीची उपासना केल्या नंतरच पुढील उपासना जसे इष्ट गुरूंचा जप , पोथी वाचन करावे. 

जे काही करू त्यात बदल नको, जे करू ते आत्मिक समाधानाची अनुभूती देणारे असले पाहिजे. आज सी बाबा उद्या शंकर महाराज असे गुरु बदलू नयेत. गुरुतत्व समजणे महत्वाचे आहेत . प्रत्येक मुलाची आह वेगळी पण तिची शिकवण एकाच असते त्याप्रमाणे गुरूंची नावे वेगवेगळी असली तरी गुरु हे एक तत्व आहे. माणसातील देव ओअल्खुन त्याच्यासमोर नतमस्तक व्हा हेच ते सांगत असते.आपण आपल्या कुवतीप्रमाणे आणि हव्यासाप्रमाणे त्यांची सेवा करणे अपेक्षित नाही . कुठल्याही अपेक्षेविरहित आत्यंतिक ओढीने प्रेमाने घेतलेले त्यांचे नाव निश्चित त्यांच्या पर्यंत पोहोचणार . 

गुरु हा आपल्या जीवनाचा मोठा आधार आहे. बघा कुटुंबात नेहमी आपल्यापेक्षा मोठी माणसे असली कि आपल्याला काळजी नसते पण जेव्हा कालांतराने आपणच कुटुंबात मोठे होतो तेव्हा किती फरक पडतो . वट वृक्षाखाली बागडणे आणि स्वतः वृक्षच होणे ह्यात फरक आहेच. कुटुंब प्रमुख म्हंटले कि जबाबदारी आली . असो.

गुरुतत्व समजणे सोपे नाही त्यासाठी षडरीपुंची आहुती द्यावी लागते . अनेक अपमान सहन करून आयुष्यात मार्गक्रमण करायला लागते . दुर्दम्य इच्छाशक्ती लागते तेव्हा कुठे निभाव लागतो . ऊन वर पाऊस काहीही असो नित्याची साधना नित्य करत राहणे हे सोपे नाही. पण जसजसे भक्ती वाढते अनुभूती येते त्याबरोबर मनातील आशा पल्लवित होतात आणि नामस्मरणाची अवीट गोडी लागते . नामाचे महत्व समजू लागते आणि त्याचे जीवनातील अनन्य साधारण महत्व सुद्धा . सारखे मी मी माझे माझे  कमी होते आणि समाजासाठी इतरांसाठी जगण्याची प्रेरणा मिळते . 

गुरु हि व्यक्ती नसून तत्व आहे आणि त्याप्रती सन्मान , आदर आपल्या मनी असला तरच ते ग्रहण होईल. आपल्या पत्रिकेतील गुरु सुस्थितीत असेल तर आयुष्यात कितीही संकटे चढ उतार आले तरी त्यातून सुरक्षित गुरूच आपल्याला काढू शकतात . आता सर्व संपले असे वाटत असतानाच पुन्हा जीवन सुरु होते ते गुरु मुळेच. जीवनातील ज्ञानाचा स्त्रोत गुरूकडे आहे आणि ते ज्ञानामृत मिळणे हे आपले परमभाग्य आहे. 

मी साधना कशी करू हे विचारण्याचा प्रश्नच येत नाही . मुळात मला नाम घ्यावेसे वाटत आहे हा विचार सद्गुरू कृपेशिवाय मनात येवूच शकत नाही .त्यामुळे जेव्हा मनाची अशी अवस्था होते तेव्हा नामस्मरण सुरु करावे. कसे किती कुठे ह्या बंधनात नाम कधीच नसते. आपल्या श्वासागणिक नाम घेता आले पाहिजे जे अर्थात हळूहळू होत जाते. आपली इच्छाशक्ती , आपली गुरूंच्या प्रती असणारी भावना प्रेम जितके खोल तितके नामाची खोली अधिक. 

कुणी किती नाम घ्यायचे ते ज्या देवतेचे तुम्ही नाम घेत आहात तीच ठरवते आणि त्याप्रमाणे तुमचीकडून ते करवून सुद्धा घेते. एक वेळ अशी येते कि आपण नामाशिवाय राहू शकत नाही .

तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम ...हि अवस्था यायला वेळ लागत नाही आणि परमार्थाच्या मार्गावर आपण चालायला लागतो . नाम आपल्याला संयमित करते .मन शांत होते . नाम सकारात्मकता देते , शरीरातील ७ चक्रांचे शुद्धीकरण होते आणि संकटांशी लढण्याचे बळ मिळते. नाम हे जीवनातील जादूच्या कांडी सारखे काम करते . नामाची महती ते घेतल्याशिवाय समजणार नाही. 

आपण घेत असलेले नाम किंवा मंत्र हा गुरूंच्या आज्ञेशिवाय सिद्ध होत नसतो . मंत्राचे विलक्षण परिणाम अनुभवायला येणे हेही त्यांच्याच हाती असते. आपण मनापासून नाम घ्यायचे मंत्र म्हणायचे फळ कधी द्यायचे ते गुरु ठरवणार .

सगळ्यात मोठा गुरु म्हणजे आपला अंतरात्मा आपला आतला आवाज आपले मन काहीही म्हणा. अनेकदा आपण म्हणतो तुझा आतला आवाज काय सांगतो ते ऐक आणि तेच गुरुचे सूक्ष्म रुप आहे. गुरु आपल्या अवती भवतीच आहे , आपलाच एक भाग आहे त्याला अन्य कुठे शोधायची गरजच नाही. गुरु हे आपले कवच आहे . हा नैसर्गिक शुभग्रह आहे. 

आपल्या आयुष्यात असलेल्या सर्व गुरुतुल्य व्यक्तींच्या बाबत सद्भावना , सद्विचार , कृतज्ञता असली पाहिजे तरच गुरु आपले कवच बनतील अन्यथा नाही . अनेकदा पत्रिकेत गुरु इतका बिघडतो कि व्यक्तीला नैतिक , अनैतिकता , चागले वाईट कश्याचेही भान राहत नाही .

उपासना आपल्यासाठी आहे हे लक्ष्यात असुदे . आपण उपासनेसाठी नाही . उपासना आपले आयुष्य समृद्ध करते . जिथे राम तिथे राम आणि राम आपल्या अंतरात्म्याशी एकरूप होण्यासाठीच उपासना आहे . 

आज हनुमान जयंती . हनुमानाची सेवा ज्याला आज कलियुगात पर्याय नाही . राहू शनी ह्यांना हनुमान चालीसा हा उपाय सर्वश्रेष्ठ आहे . रामाचा जप करून हनुमान चालीसा नित्य म्हंटली तर आश्चर्यकारक परिणाम आणि अनुभूती मिळते . कुठलाही विचार न करता आजपासून हनुमान चालीसा , शनीचा जप अखंड करा त्याआधी आपल्या कुल्स्वमिनीचा जप आणि सद्गुरू स्वामी समर्थांचा जप .आयुष्य बदलून जायील. प्रत्येक गोष्टीत मार्ग मिळेल , प्रत्येक पहाट सुखाची असेल . शनी प्रत्येक गोष्ट विलंब करतो पण देणार नाही असे कधीच म्हणत नाही . तेव्हा संयम शिकवतोय ते आपल्याला हे समजले तरी पुरे आणि प्रतीक्षेनंतर चा प्रत्येक क्षण मात्र आनंद सौख्य भरभराट घेवून येणार आहे ...

आज शनीला तेलाच अभिषेक आणि इतर गोष्टी करायच्याच पण त्याही पेक्षा सर्वात महत्वाचे म्हणजे शनीच्या पायावर आपला अहंकार समर्पित करायचा . अहंकार हा “ दागिना “ आयुष्याची माती करतो आणि ज्याला ज्याला माज अहंकार आहे त्याला शनीची अत्यंत निर्घुण शिक्षा झाल्याशिवाय राहत नाही . आता प्रत्येकाने ठरवायचे आज काय समर्पित करायचे , काय घ्यायचे आणि काय सोडून द्यायचे .

ओं शं शनैश्चराय नमः

सौ. अस्मिता दीक्षित 
संपर्क : 8104639230


Tuesday, 8 April 2025

बुध

 || श्री स्वामी समर्थ ||

बुध हा पृथ्वी तत्व दर्शवतो आणि त्याच्या कडे गंध आहे. गंध आणि श्वास आपण नाकाने घेतो . नाकाला दोन नाकपुड्या आहेत कारण श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे जसे आपण प्राणायमात करतो. बुध हा द्विस्वभावी राशीचा आहे. म्हणून तिथे श्वास घेणे आणि सोडणे हि क्रिया होते. बुधाकडे गंध आहे आणि बुधाकडे त्वचाही आहे.  त्वचेला शिद्र( pores)  असतात ज्यामधून घाम बाहेर फेकला जातो. जर घामाचा उग्र वास असेल तर कुठेतरी शनी सुद्धा बिघडलेला असतो. आपल्या शरीरावर त्वचेचे आवरण आहे म्हणून आपल्या देहाला सुंदरता आणि आकार उकार आहे . 

पोटात आलेल्या अन्नाचे पचन नीट होण्यासाठी षष्ठ भावात सुद्धा पृथ्वी तत्वाच्या बुधाची कन्या राशी आहे. शरीराला आवश्यक घटक जवळ ठेवून इतर बाहेर टाकून देणे हि क्रिया असल्यामुळे इथे कन्या हि द्विस्वभावी राशी आहे. 

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230.