|| श्री स्वामी समर्थ ||
Learn To Share |
प्रत्यक्ष आयुष्यात आपल्याला ह्याची कितीतरी उदा. मिळतील. आपल्याकडे सणावारी कितीतरी मिठाई येते .कधीतरी ती खाण्यायोग्य राहत नाही मग फेकून द्यावी लागते .पण आपण कुणाला ती देत नाही. अर्थात अपवाद आहेत नाही असे नाही .आपली सख्खी भावंडे अगदी जिवाभावाची असतात . पण आईने आपल्या बहिणीला गुंजभर सोने जास्ती दिले तर ते आपल्याला रुचत नाही .एका क्षणात आई आणि बहिण “ब्याड बुकात ” जातात. प्रत्येक गोष्टीत जरा काही कमीजास्त झाले कि आपला पापड मोडलाच म्हणून समजा.
आपला संचय करणे आणि कुणाला काहीही न देणे किबहुना मिळू न देणे हा कद्रूपणा आपल्याला भविष्यात भोवतोच. आपल्या आईवडिलांच्या संपत्तीतला वाटा आपल्याला कसा जास्ती मिळेल ह्यासाठी आपण सतर्क असतो. त्यात एखादा भाऊ किंवा बहिण खूपच श्रीमंत असतील तर ते ह्याकडे दुर्लक्ष करतील कारण त्यांच्याकडे आधीच खूप असते , कधीकधी ह्यापेक्षा वेगळेही अनुभव येतात .पैसा सर्व नातीगोती विसरायला लावतो .
“Sharing & Caring ” हे कधीकधी नुसते शब्दच राहतात . आज आपण विचार करुया आपण किती गोष्टी लहानपणापासून share केल्या आहेत . आजकाल तर आपण आपली सुख्दुक्ख सुद्धा Share करत नाही . FB वर 5000 मित्रयादी पण बोलायाल कुणी नाही, हि पण त्याची एक ऋण बाजू आहे. कुणाला काही द्यावेसे वाटू नये हा स्वभावातील मोठा दोष म्हंटला महिजे, ज्याला आपण “ स्वार्थी ,कद्रू ” काहीही म्हणूया .
आपण कुठे परदेशी गेलो तर तेथील चांगले अनुभव , पाहिलेल्या प्रेक्षणीय स्थळांविषयी माहिती आपण फार मोजक्याच मंडळींसोबत share करू शकतो. एकतर ज्यांना ह्याची जाण आहे, किवा अनुभव ऐकावेसे वाटतात ,सतत भटकणारी मंडळी ,हे सर्व आपले कुतूहलाने ऐकतील. पण त्यातील काही “ काय परदेशी कुणी जात नाही का? आमचे जावई परदेशातच आहेत कि .कसल्या इतक्या परदेशातील गमजा सांगतात .” असे म्हणणारेही आहेत. त्यामुळे sharing करायची इच्छा असून तशी माणसे म्हणजे श्रोतृगण मिळणे ह्याला अहो भाग्य लागते ,म्हंटले तर वावगे ठरू नये.
कुठेही बाहेर गेलो तर आपल्याच सख्या सग्यासोयर्यांना तिथून साधे चॉकलेट सुद्धा आणू नये अशी वेगळ्याच मातीची बनलेली माणसे सुद्धा आहेत बरे. एकतर मनात दुसर्याबद्दल द्वेष ,तिरस्कार ,फक्त वरवर गोड बोलणे त्यामुळे काही न देण्याची वृत्ती बळावते किंवा समोरचाही गेला होता त्याने कुठे काय आणले आम्हाला ? म्हणून द्यायचे नाही हेही कारण असते . नाहीतर परदेशी काय आम्ही दुसर्यांना भेटवस्तू आणायला जातो का ? इथपासून सुरवात. ह्यातील काही गोष्टी पटतात तर काही अजिबात नाही.
पूर्वी घरात खूप मुले असत ,एकत्र कुटुंब पद्धती असे,त्यामुळे आपोआपच वाटून खायची सवय असायची , पण आता तसे नाही . बदलत्या काळासोबत “ हम दो हमारा एक ” हि संकल्पना पाळेमुळे धरू पाहत आहे. ह्या सर्वच परिणाम म्हणजे आता घरटी एकेकेच मुल असल्याने “कुणासोबत sharing करणे ” आता दुरापास्त होत चालले आहे. जे आहे ते माझ्या एकट्याचेच हे मनी रुजले आहे. पूर्वी एकमेकांना आवर्जून देणे हे आपोआपच होत असे पण आता घरटी एकच मुल ,त्यामुळे त्यास कुणासोबत sharing करणे हि गोष्टच माहित नाही . sharing नुसते खाऊ , खेळण्याचे नाही तर मनातील विचारांचेही आहे. आईवडील दिवसभर नोकरीनिम्मित्त बाहेर आणि समवयीन भावंडे नाहीत त्यामुळे बोलणार कुणाशी ? मग दिवसभर eletronic माध्यमात डोके खुपसून बसणे .असो . इलेक्ट्रोनिक म्हणजे तंत्रज्ञानाचा विषय आला म्हणून फेसबुकाचा उल्लेख इथे आवर्जून करावासा वाटतो. फेसबुकवर टीका करणारे अनेक आहेत पण इथे आपल्याला अनेक चांगले मित्र मैत्रीनीही मिळाले आहेत ज्यांच्याशी आपण share करू शकतो. आपल्या आयुष्यातील मैत्रीच्या रिकाम्या जागा येथील अनेकांनी भरून काढून आपले आणि त्यांचेही आयुष्य समृद्ध केले आहे.
आपल्या सोसायटीत कुणी निवर्तला तर त्याची बातमी शेजारच्यालाही न सांगणे इथवर मजल आहे आजवर . ह्यामागे मत्सर आणि समोरच्याची प्रगती न पहावणे आणि त्यातून निर्माण होणारा द्वेष कारणीभूत असतो. प्रत्येक गोष्टीला कारण असतेच .
पण ह्या उलट काही मंडळींच्या रक्तातच sharing असते . घरात कधी वेगळा पदार्थ केला तरी चव पाहायला शेजारी देतील. एखादी घरातील चांगली बातमी ,पाहिलेले चांगले प्रदर्शन आणि त्याचे अनुभव, चांगल्या पुस्तकाबद्दल चर्चा , Amazon वरून मागवलेली एखादी वस्तू ,सोन्याचा केलेला दागिना अनेक चांगल्या गोष्टी share करणारे सुद्धा लोक आपल्या आजूबाजूला असतात . त्यांचा स्वभाव मोकळा असतो , देवाने दिलेल्या समृद्ध आयुष्याचा आनंदाने आस्वाद घेत असतात .आयुष्यात तृप्त समाधानी असतात त्यामुळे न कुणाबद्दल द्वेष ना मत्सर ,भावूबंदकि नाही आणि कसला मोहही नाही. अश्या लोकांचे मन , विचार स्वछ्य असतात . आपल्या गोष्टी कुणाला सांगितल्या तर समोरच्याची दृष्ट लागेल अश्या अर्थिन , बेसलेस, फालतू गोष्टी त्यांच्या घ्यानिमानी सुद्धा येत नाही. मोकळेपणाने sharing करणारे ,आतबाहेर काहीच नसणारे लोक असतात. त्यांचे आयुष्य निरखून पहिले तर लक्ष्यात येयील त्यांच्या समाधानी आयुष्याचे “गुपित ” . मनात कसलेही कल्पविकल्प न ठेवता मस्त आनंदात जगणारे हे लोक सदैव हसतमुख असतात , त्यांना काहीच कमी पडत नाही ह्याचे कारण “ Sharing ”. अश्या व्यक्तींना कमीतकमी आजार असतात .कारण हृद्य आणि मन स्वछ्य.
प्रत्येक वेळी एखादी गोष्टच share केली पाहिजे असे नाही ,आपले ज्ञान , आपले चांगले वाचन , आपला अनुभव , कितीतरी गोष्टी आपण share करू शकतो . आजकल “whatsapp university ”वरती कुणी निवर्तला , कोण जन्माला , आरोग्य टिप्स , घरगुती उत्पादनांची माहिती ,एक न दोन अनेक गोष्टी share केल्या जातात हे आपण पाहतो. कधीकधी बातमी तपासून न पाहता केलेले sharing अंगाशीही येवू शकते .आलेला मेसेज पुढे पाठवण्याच्या घाईत आपण त्याची सत्यता तपासूनही पाहत नाही . पण तरीही हे sharing इतके instant असते कि कुठे सकाळी दुर्घटना झाली तर पुढील ५ मिनिटात ती जनमानसात पसरायला वेळ लागत नाही. कधीकधी ते फायद्याचे असते जसे पावसामुळे ट्रेन बंद आहेत हे समजले कि घरातून निघायलाच नको . ह्या sharing मुळे योग्य वेळी योग्य मदत होते.
काय Share करावे हेही महत्वाचे . नको ते Gossip ,नको त्या बातम्या (ज्याचे आपण साक्षीदार नाही आणि त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्या आयुष्याशी संबंध हि नाही )share करणे हा गुन्हाच नाही तर ते पाप ठरू शकते . त्यात एखाद्याच्या चारित्र्याबद्दल बोलणे हे म्हणजे परमेश्वरी शिक्षेस पात्र असणारे गुन्हे आहेत . Sharing चे फायदेहि आहेत आणि तोटेही म्हणून ते डोळसपणेच केले पाहिजे. पण sharing केल्याने दुरोजा मिळतो तो “ व्यक्त ” होण्यास आणि आज त्याची गरज सर्वाधिक आहे. आपण काढलेले सुरेख चित्र , गायलेले गाणे , लिहिलेले लेख ,प्रवासवर्णने , आपण केलेली स्वयपाकघरातील पाककृती , आपला लग्नाचा 25 वाढदिवस,घरातील जेष्ठांचे सहस्त्रचंद्रदर्शन , आपली भटकंती ,अनुभव , ताज्या घडामोडींबद्दलचे आपले विचार ,सर्व काही आपण आज ट्विटर ,फेसबुकासारख्या माध्यमातून Sharing करून Sharing चे समाधान मिळवू शकतो. इतरांनी केलेल्या sharing वरून शिकतोहि. गेले कित्येक महिने धुमाकूळ घालणाऱ्या Covid च्या चांगल्या वाईट बातम्या अनेकांनी share केल्या. ज्यांना हा आजार झाला त्यांनी फेसबुकवर आपले चांगले वाईट अनुभव लिहून जनजागृती केली ,लोकांची भीती घालवण्यास हे sharing निश्चितच पूरक ठरले.ज्यांना covid झाला ,त्यांना अनेकांनी फेसबुक सारख्या platform च्या माध्यमातून धीर दिला आणि पुन्हा उभे राहायची प्रेरणा दिली.
आज तंत्रज्ञानाने जग अगदी जवळ आले आहे. आपण आपले ज्ञान ,अनुभव share करून आपले आयुष्य समृद्धच करत असतो कारण शेवटी “ Sharing Leads To Prosperity ”.
चला तर मग अश्या ह्या Sharing चा अनुभव घेवूया आणि देवूया आणि आपले आणि इतरांचेही आयुष्य समृद्ध करुया. तुमचा आमचा हा Sharing चा प्रवास सुखद व्हावा हीच सदिच्छा.
अस्मिता
छान लेख!
ReplyDeleteखुप सुंदर शब्दात जीवनातील वास्तव समाजासमोर मांडले आहे.अशा गोष्टींची लोकांना जाणीव करून देणे ही काळाची गरज आहे आणि ती तुम्ही अगदी समर्थपणे करून दिली आहे.खूप छान.
ReplyDelete