||श्री स्वामी समर्थ ||
सख्यांनो तुमच्या कर्तृत्वाला सलाम |
आज घटस्थापना. शारदीय नवरात्र आरंभ होत आहे. माता दुर्गेचे पूजन करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो .
स्त्रीला सुद्धा देवीचेच स्वरूप मानले आहे . प्रत्येक
घरातील स्त्री हीच त्या घरातील खरी गृहलक्ष्मी आहे आणि तिचा योग्य तो सन्मान केला पाहिजे.
आपल्या कुळाची देवी म्हणजे आपली कुलस्वामिनी हिचे नित्य पूजन केले पाहिजे .
वर्षातून निदान एकदा तरी तिचे दर्शन घेतले पाहिजे पण आजकाल हे मनात असूनही
अनेकांना शक्य होत नाही. अश्यावेळी आपल्या घरात देवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन
म्हणजेच देवीच्या मूर्तीवर कुंकवाचा अभिषेक करून देवीची पूजा करून यथाशक्ती
दानधर्म करावा.
माझ्या आयुष्यात मला काही अत्यंत कर्तुत्ववान स्त्रिया
भेटल्या ज्यांनी आपल्या कष्टाने , मेहनतीने आपापल्या क्षेत्रात स्वतःचा एक वेगळा
ठसा उमटवला. त्यांची जिद्द , काहीतरी वेगळे करण्याची धडपड वाखाणण्याजोगी आहे हे
निश्चित . आज नवरात्रीच्या निम्मित्ताने आदिशक्तीचा गजर होत असताना अश्या
कर्तुत्वान महिलांच्या यशाचा आलेख आपल्यासमोर मांडताना मला विशेष आनंद होत आहे.
समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ह्या आपल्या सर्व मैत्रिणींची यशोगाथा
,फिनिक्स पक्ष्याप्रमाणे त्यांनी आकाशात घेतलेली उंचउंच झेप आणि त्यांनी करून
ठेवलेले आभाळाएवढे कार्यसमाजातील प्रत्येक स्थरातील स्त्रीला प्रेरणा देवून जायील
ह्यात कुठलीही शंका नाही.
आज एकविसाव्या शतकातील स्त्रीचा चेहरामोहरा पूर्ण बदलला आहे
, आपल्या कर्तुत्वाने अनेक उच्च पदांवर ती विराजमान आहे. स्त्रीचे वर्चस्व नाही
असे कुठलेही क्षेत्र नाही . हे सर्व करत असताना
मुलगी ,आई ,पत्नी ,सून ,वाहिनी ,नणंद ,भावजय , मैत्रीण अश्या अनेक
नात्यानाही ती न्याय देताना दिसते . पण खेड्यापाड्यातील स्त्रियांनी अजून सक्षम ,
साक्षर होण्याची गरज आहे आणि त्यासाठी अनेक सेवाभावी संस्थाही आपापल्या परीने
कार्य करत आहेत. इतके असूनही आज समाजातील काही वर्गात स्त्रियांचे शारीरिक ,
मानसिक , लैंगिक शोषण होताना दिसते. रोजच्या वर्तमानपत्रात स्त्रियांवरील अत्याचाराच्या बातम्या वाचताना
आपण खरच इतक्या प्रगत विश्वात राहत आहोत का ,असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
इतरांकडून मानाची अपेक्षा बाळगणारी स्त्री आज स्वतःच
स्त्रीची शत्रू झाली आहे का हाही एक प्रश्नच आहे . आपल्या स्त्रियांमध्ये सुद्धा
कुठे एकजूट आहे? समाजात वावरताना स्त्रीच दुसर्या स्त्रीचा दुस्वास , मत्सर , हेवा
करताना दिसते हे स्पष्ट चित्र आहे. कौटुंबिक समारंभात , हळदीकुंकू ,कुठलाही कार्यक्रम
असुदे एकमेकांची उणीदुणी काढणे , हेवेदावे करणे हे चालूच असते . लोकल च्या अर्ध्य
तासाच्या प्रवासात सुद्धा अगदी लहानसहान कारणांवरून भांडणे होत राहतात जणू काही
त्याशिवाय आपला दिवसच सुरु होत नाही. आपल्या कुटुंबात अनेक पिढ्यातील स्त्रिया
असतात आणि प्रत्येकीत काहीतरी वेगळेपण असते ,घेण्यासारखे गुणही असतात .आपण न
पटणार्या गोष्टी बाजूला सारून प्रत्येकीमधले चांगले गुण घेतले तर आपलेच आयुष्य
सुखकर होयील .
आज ह्या नवरात्रीच्या निम्मित्ताने आदिशक्तीचे पूजन करून
आपण ह्या सर्व वाईट गोष्टीना तिलांजली देवूया आणि आपल्या कुटुंबातील स्त्रिया
,आपल्या कार्यालयाच्या ठिकाणी असलेला स्त्रीवर्ग , आपल्या जिवाभावाच्या मैत्रिणी
ह्यांच्याशी नव्याने नाळ जोडुया .दुसर्याचा हेवा ,मत्सर करून आपले कधीच भले होत
नाही ,त्यामुळे एकमेकांसोबत आनंदाने जगण्याचा प्रयत्न करुया आणि हाच वारसा आपण
आपल्या नवीन पिढीतील लेकी सुनानांही सुपूर्द करुया.
पुढील काही लेखांमध्ये आपल्या काही कर्तुत्ववान मैत्रिणींच्या विषयी
जाणून घेवूया त्यांची यशोगाथा ...वाचू
आनंदे.
आपल्या सर्वाना नवरात्रीच्या भरभरून शुभेछ्या
अस्मिता
खुपच सुंदर शब्दांकन आणि कल्पना! स्त्री शक्तीचा जागर फक्त नवरात्रितच न होता क्षणोक्षणी झाला पाहिजे तरच कुटुंब गाव तालुका राज्य आणि देश सुधारेल. पर्यायाने स्त्री शक्तीवर होणारे आघात थांबतील व सर्वागिण विकास होऊन स्वतःची व देशाची प्रगती होईल. 🙏 🐚 🚩
ReplyDelete