|| श्री स्वामी समर्थ ||
उत्तम शिक्षक मिळणे हे जसे विद्यार्थ्यांचे भाग्य असते , तसेच उत्तम विद्यार्थी मिळायला सुद्धा नशिबाची साथ लागते . आजवर माझ्या "हसत खेळत ज्योतिष शिकूया " ह्या कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद लाभला पण त्याही पेक्षा उत्तम जिज्ञासू , संशोधन करणारे , ह्या शास्त्राचा सन्मान करणारे ,वाढवणारे आणि शिकण्याचा वसा घेणारे एकापेक्षा एक उत्तम, वेगवेगळ्या वयोगटाचे आणि अनेक उत्तम क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे विद्यार्थी ह्या कार्यशाळेला लाभले हि केवळ स्वमिकृपाच आहे ,नाही का?
ह्या सर्वांमुळे माझाही उत्चाह दुपटीने वाढला . त्यांना शिकवताना माझेही ज्ञान वृद्धिंगत झाले. ज्ञान फुकट दिले तर त्याची किंमत नसते हे बाळकडू माझ्या गुरूंकडून मिळाले त्यामुळे आजकालच्या कोविड च्या स्थितीचे भान ठेवून मानधन घेतले . आजवर घेतलेली प्रत्येक कार्यशाळा खरोखरच हसतखेळत झाली हि परमेश्वर कृपाच म्हणायची .
अगदी कमी काळात उत्तम गृहपाठ आणि शिकण्याची कास ह्यामुळे ह्या कार्यशाळेला एका कुटुंबाचे स्वरूप आले आहे. रोज त्यात नवीन नवीन सदस्याची भर पडत आहे .
तुम्हा सर्वांच्या पाठींब्यामुळे मी हि वाटचाल करू शकले आणि पुढेही करीन म्हणून कृतज्ञतेचे हे २ शब्द ,इतकच .
आपला पाठींबा असाच राहूदे हि सद्गुरू चरणी प्रार्थना.
अस्मिता
Bravo, keep up the good work
ReplyDeleteBest teacher with thoroughly knowledge and teach us in healthy manners.allthe best madam ������
ReplyDelete