|| श्री स्वामी समर्थ ||
प्रत्येक व्यक्तीमध्ये एक आत्मिक शक्ती असते . ती जागृत करून त्याचा सदुपयोग करता आला पाहिजे ह्या साठी दुर्वास ऋषींनी निसर्ग कुंडलीची रचना केली . ज्योतिष शास्त्राचा आत्मा म्हणजे हि कुंडली . प्रत्येक भावाला वेगळा शरीराचा भाग आणि विचार दिला आहे.
कुंडली मध्ये रवी चंद्राला अनन्य साधारण महत्व आहे. ह्या २ राजराशी मानल्या जातात . त्यांना एकेक भाव दिला आहे ,इतर राशींना २ भाव दिले आहेत . कर्क रास चतुर्थात आहे ,त्यावरून आई आणि रविवरून वडीलांचा बोध होतो.
निसर्ग कुंडली मेष लग्नाचीच का? तर इथूनच आपल्या आयुष्याची सुरवात होते. जन्माला आल्यावर जीवन जगायला लागणारी शक्ती प्रदान करणारा ग्रह मंगळ म्हणून इथे मेष रास कार्यरत आहे. मंगळ हा सेनापती आहे. प्रथम स्थान म्हणजे आपले व्यक्तिमत्व आणि आपले जीवन नियंत्रित राहावे म्हणून मंगळा सारखा सेनापतीच हवा.
पंचमात रवीची राशी येते आणि चतुर्थात आई ची कर्क राशी. म्हणजे रवीच्या व्ययात चंद्र . पूर्वीपासूनच स्त्रीला कमी महत्व दिले गेलेले आहे. रवीने कोण स्थानातील एक स्थान घेतले आहे व चंद्राला केंद्रातील स्थान आहे. असे असले तरीही मेष लग्नापासून पहिले स्थान हे चतुर्थ येते मग पंचम . म्हणजेच आईला पहिला मान दिला आहे. मातृ देवोभव प्रथम म्हंटले जाते. आई आपल्याला सर्वात वंदनीय आहे.
आपले पहिले घर आपले स्वतःचे म्हणजे मातेचे गर्भाशय आहे. आपले शरीर हे पंचमहाभूतानी बनलेले आहे आणि आईच्या गर्भात सुद्धा हि पंचमहाभूते आहेतच कि.
गर्भ धारण करण्यापासून ते मुलाला जन्म देण्यापर्यंत सगळे काम हे आईचेच आहे. मुलांना जन्म दिला म्हणजे संपते का तर नाही पुढे त्यांच्यावर संस्कार करणे त्यांना माणूस म्हणून घडवणे ,त्यांना मोठे करणे आणि शेवटपर्यंत त्यांची काळजी करत राहणे म्हणून प्रथमतः मातृदेवो भव. मुले हीच आईचे विश्व असतात .
कर्क आणि सिंह ह्या राशींच्या समोर शनिच्याच २ राशी येतात .शनी हा कर्माचा कारक ग्रह आहे. मातापित्यांच्या पैकी एकजण जरी कर्तव्यामध्ये कमी पडला तर संसाराची कशी फरफट होते ते आपल्याला माहित आहे.
शनी हा आपल्या कर्माचा हिशोब ठेवतो. आपण मेल्यावर आपली फाईल चित्रगुप्ताकडे जाते आणि तो ठरवतो कि आपल्याला पुढील जन्म कसा द्यायचा. आपले रोजचे जगणे हि सुद्धा एक पूजाच असली पाहिजे. आयुष्य उत्कटतेने जगा. कसलाही हव्यास नको.
रवी आत्मा आहे तर चंद्र मन आहे . मेष लग्न मंगळाचे आहे . मंगळ हा सेनापती आहे आणि लग्नात आपला जन्म तर अष्टमात आपला मृत्यू आहे . दोन्ही ठिकाणी मंगळ च आहे. म्हणजे जन्माला आल्यापासूनच आपली मृत्यूकडे वाटचाल आहे. मी माझ जे सगळे फोल आहे हे सांगणारे अष्टम स्थान आहे. कधीतरी आपण मरणारच आहोत हे सांगणारा मंगळ आहे.
मोक्ष त्रिकोणाचे दुसरे स्थान हे अष्टम स्थान आहे. जगण्याचा अर्थ हा अध्यात्माशिवाय कळत नाही .अष्टम स्थान हे मोक्ष त्रिकोणातील मध्य आहे आणि इथे तुमची वृत्ती स्थिर झाली पाहिजे हे सांगणारा मंगळ आहे.
दोन्ही बुधाच्या राशीसमोर गुरूची राशी आहे . व्यवहार करताना देवाचा विसर पडू नये हा उद्देश असावा . बुध हा अवखळ आहे त्याच्या अवखळ पणाला नितीमत्ता रुजवणारा, सत्सत विवेक बुद्धी शिकवणारा गुरु आहे.
मंगळ आणि शुक्रात आकर्षण आहे. मंगळ म्हणजे वासना आणि शुक्र म्हणजे सौंदर्य . म्हणून प्रथम आणि सप्तम स्थान एकमेकांसमोर आहेत.
लाभ स्थान काय सांगते तर आयुष्यात मिळणारे लाभ हे आपल्या कर्मावर अवलंबून आहेत . काम त्रिकोणाची सुरवात होते ती मिथुन राशीने . षष्ठ स्थानात उत्तम बुद्धिमत्ता आणि परिपक्वतेची किनार असलेली कन्या रास .
बुधाच्या समोर गुरूच्या राशी येतात म्हणजे आयुष्यात घेतलेला कुठलाही निर्णय हा शांतपणे विचारपूर्वक घेतला पाहिजे म्हणून गुरु महाराज समोर आहेत . धनु राशी पूर्व संचित सांगते तर मीन रास गुरु चरणांवर नतमस्तक व्हायला शिकवते.
शुक्राच्या राशी एक धन स्थानात तर एक सप्तमात . आपली वाणी गोड असेल तर आयुष्यात आपण चार माणसे जोडू शकतो. दुसरी शुक्राची रास सप्तमात येते . विवाहानंतर नवीन नाते बहरते फुलते पण ते असंख्य अपेक्षा घेवून येते. ह्या बहरू पाहणाऱ्या नात्यासोबत आधीची असंख्य नातीसुद्धा असतातच आणि म्हणूनच ती सर्व टिकवताना मनाचा कृतींचा समतोल साधावा लागतो.
निसर्ग कुंडली हा आपल्या शास्त्राचा पायाच आहे. प्रत्येक स्थान हे दुसर्याशी हातात हात घालून फुलत बहरत असते. प्रत्येक स्थानाचे असे एक वेगळेपण आहे वैशिष्ठ आहे , ते आपल्या जीवनात काहीना काही देत असते म्हणून ह्या सर्व स्थानांना अनन्य साधारण असे महत्व आहे.
प्रथम स्थान म्हणजे आपण स्वतः आणि पंचम म्हणजे आपली संतती . जसे आपले भाग्यस्थान हे नवमस्थान . प्रत्येक गोष्टीत भाग्याची साथ असायला लागते अगदी तसेच पंचमाचे भाग्य हे प्रथम स्थान म्हणजे आपण स्वतःच. याचाच अर्थ आपल्या संततीचे भाग्य घडवण्यात आपला सिंहाचा वाटा असतो. आणि हे स्थान सुद्धा धर्म त्रिकोणातील पहिले स्थान आहे म्हणून आपले आपल्या मुलासाठीही काही कर्तव्य असतेच. धन स्थानाचे भाग्य हे कर्म स्थान आणि कर्म स्थानाचे धन स्थान हे लाभ स्थान . आपले कर्म आपल्याला आयुष्यातील सर्व धन आणि लाभ मिळवून देते .
प्रथम स्थानापासून सुरु झालेला जीवन प्रवास निसर्ग कुंडलीत धर्म अर्थ काम आणि मोक्ष ह्या त्रिकोणातून फिरून मोक्षाकडे जाण्यासाठी आसुसलेला असतो . खरतर मोक्षाकडे जायचे ह्या हेतूनेच आपण जन्म घेतलेला असतो. मोक्ष मिळवणे हाच खरा आपल्या जन्माचा उद्देश असतो. पण कालांतराने आपण अर्थ आणि काम त्रिकोणात अडकतो आणि आपला मोक्षाकडे जाण्याचा मार्ग थोडासा भरकटतो.
आपल्या जीवनात आपण चारही पुरुषार्थ खर्या अर्थाने उपभोगले तरच आपण अंतर्मनाने तृप्ततेने ह्या जीवनातून मुक्त होवून नवीन काया धारण करून पुनश्च हरिओम करू शकतो.
अस्मिता
#अंतर्नाद#निसर्गकुंडली#कालपुरुषाचीकुंडली#12भाव#धर्म#अर्थ#काम#मोक्ष#जीवनाचा उद्देश
जीवन कशी जगायीची तेच परीपूर्ण अर्थसमझवले,ज्यतीष्य् शास्त्रा च आत एक कूटूंबत आहे समझवायीच पद्धत खूप खूप सूंदर आहे.तूम्हला मी������करते.
ReplyDelete