Thursday, 15 July 2021

गण

 || श्री स्वामी समर्थ ||


देवगण – सत्वगुणी , सत्शील प्रवृत्ती , धर्म अनुष्ठान , ईश्वरनिष्ठा हे गुण असतात . अत्यंत साधी राहणी आणि मृदू हृदय असते. कुणालाही त्रास न देता आपले जीवन व्यतीत करणारी असतात . परमेश्वरावर श्रद्धा विश्वास असते . सात्विक वृत्ती असते. साधू संत , विद्वान माणसे हि ह्या गणाची असतात . कुठल्याही प्रसंगात धीराने वागणारी न घाबरता कुणालाही न दुखावता मार्ग काढणारी असतात . परोपकारी वृत्ती असते. देवगणी आणि  मनुष्य गणाच्या व्यक्तींचे एकमेकांशी पटते .पण ह्या लोकांचे राक्षसगण असणार्या लोकांशी पटत नाही.

अश्विनी , मृग , पुनर्वसू , पुष्य , हस्त , स्वाती , अनुराधा , श्रवण , रेवती.

मनुष्यगण –रजोगुण असतो . जगातील सर्व सुखांचे भोक्ते असतात पण धार्मिकतेचे पालन करणारी असतात . देवांचे करतील पण पोटात स्वार्थ असतो. संकटाच्या समयी दुसर्याकडून मदत घेतील अगदीच असह्य झाले तर आत्महत्या सुद्धा करू शकतात . सहनशीलता कमी असते . देवगणाच्या लोकांशी जमवून घेतील पण राक्षस गणाशी पटणे कठीण ,वाद होतात . 

भरणी , रोहिणी ,आर्द्रा , पूर्वा , उत्तरा , पूर्वाषाढा , उत्तराषाढा , पूर्वा भाद्रपदा , उत्तरा भाद्रपदा .

राक्षसगण- तमोगुण असतो . उच्च प्रतीची महत्वाकांक्षा कारण हाव असते. संपत्तीच्या पदाचा हव्यास , कामुकता अधिक .कुठलाही सरळ मार्ग न घेता वाकड्यात शिरणे हा त्यांचा स्वभाव असतो. कायद्याचे पालन न करणे ,कुरापती उकरून काढणे ,कुळाला बट्टा लागेल असे काम करणे. मारामार्या , भांडणे, स्वार्थासाठी चोरी दरोडे . संपत्तीचा ह्रास करतात . व्यसनी असतात . धाडस आणि कर्तुत्व देखील असते त्यामुळे प्रसंगात घाबरणार नाहीत मार्ग काढतील. ह्या लोकांची इंटूशन पॉवर उत्तम असते. मनुष्य गणाला मानतात ,प्रसंगी वादविवाद सुद्धा करतील. देव गणाशी पटणे कठीण . मनुष्य गणाला ते धाकात ठेवण्याचा प्रयत्न करतात ,काही प्रमाणात त्यांना यश मिळते. देवगणला काहीच करू शकत नाहीत . केलेच तर त्यांचाच विनाश होतो.

राक्षसगण काय किंवा एखादी व्यक्ती काय संपूर्णपणे वाईट किंवा चांगली नसते. प्रत्येक व्यक्ती प्रसंगानुरूप वागत असते. पूर्वीच्याकाळी राक्षसगणी मुलगी नको असे पण आत्ताच्या कलियुगात ह्या संकल्पना, तत्वे मोडीत निघाली आहेत. राक्षसगणी मुलगी असेल तर सकाळचे घरातील सर्व कामे करून कार्यालय गाठेल आणि संध्याकाळी पुन्हा घरी येवून मुलांचा अभ्यास ,स्वयंपाक आल्यागेलेल्याचे करेल. वेळप्रसंगी आरे ला कारे सुद्धा करेल. आपल्या हक्कांसाठी भांडेल सुद्धा पण त्यात काहीच गैर नाही. पूर्वीच्याकाळी एकत्र कुटुंब होती. मुलींनी डोक्यावरचा पदर ढळू न देता कामे करावी ,सासू सासरे आणि घरातील मोठ्यांचे ऐकावे आदर द्यावा हीच अपेक्षा होती किबहुना त्यांना तसेच बाळकडू पाजले जात असे. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब असे आणि 5-50  माणसांचे घर असे त्यामुळे अश्या घरात राक्षसगाणी मुलगी नको असे. पण बदलत्या काळानुसार सगळ्याच संकल्पना आणि गरजा बदलल्या आहेत. कलियुगात नवर्याच्या बरोबरीने मोठमोठ्या पदावर काम करणाऱ्या आणि त्याच बरोबर घराचा संसाराचा गाडा उत्तमपणे ओढणाऱ्या स्त्रिया आहेत . बाहेरील कामे करत असल्या तरी घरातील जबाबदार्यांचे उत्तम पालन करणाऱ्या आहेत.

कृत्तिका आश्लेषा मघा चित्रा विशाखा जेष्ठा मूळ धनिष्ठा शततारका . 

ह्यातील आश्लेषा विशाखा धनिष्ठा कठोर आहेत .मघा मूळ कर्तुत्ववान असतात .हि नक्षत्रे मोठी योग्यताही देतात . जेष्ठा हे क्रूर नक्षत्र असून खुनशी आहे . आपले हेतू कुणालाही सांगणार नाहीत , खुनशी स्वभाव ,दुष्टपणा ,सूडबुद्धी असते.

अस्मिता

#अंतर्नाद#देवगण#मनुष्यगण#राक्षसगण#नक्षत्र#सत्वगुण#रजोगुण#तमोगुण#फलादेश

  


No comments:

Post a Comment