|| श्री स्वामी समर्थ ||
आपल्या आयुष्यात आपल्या मुलांपासून आपल्याला सुख मिळणार का ? हा विचार प्रत्येक दांपत्य त्यांच्याही नकळत करतच असते. मुले आपल्याला अक्षता घेवून आम्हाला जन्माला घाला असे सांगायला आली म्हणून आपण त्यांना जन्माला घातले नाही तर तो आपल्या प्रेमातून फुललेल्या नवनिर्मितीचा आनंद आहे. आपल्या मुलांकडे आपल्या म्हातारपणाची काठी म्हणून न पाहता आपल्याला त्यांना उत्तम माणूस म्हणून घडवायचे आहे हाच सदविचार असला पाहिजे. काय वाटते ?
म्हातारपणी मुले सुना परदेशी निघून जातील मग आम्ही एकटे राहू हा विचार करून नका ,उलट परदेशी जावून तुम्ही दिलेल्या शिक्षणाचे मुलांनी चीज केले असा विचार करून त्यांचे पंखही कापू नका. इतकी उंच गरुड भरारी त्यांनी घ्यावी ह्यासाठी आपण आपल्या जीवाचे रान केले , आयुष्यभर झिजलो आपल्या अनेक इच्छा आकांक्षांना मुरड घातली .वेळप्रसंगी व्यक्तिगत आनंदसुद्धा बाजूला ठेवला आहे. मग आपणच लावलेले लहानसे रोपटे फुलताना बहरताना पाहताना शंका कुशंका कश्यासाठी मन कश्याला अधीर होत आहे आपले ? आपण आपले इतिकर्तव्य पूर्ण केले आणि त्याचा परमोच्च आनंद अनुभवता येणे हे तर आपले परम भाग्यच म्हंटले पाहिजे. असो विषयांतर नको.
आजकाल पालकांना मुलांचे प्रश्न भेडसावत असतात जसे मुले ऐकत नाहीत , व्यसनाधीनता , नोकरीत धरसोड , कुठे कसलीच बैठक नाही , घरात दुरावा , मनमोकळे वागणे बोलणे नाही . मुलांच्या मनात काय चालू आहे हे समजत नाही असाही सूर अनेकांचा असतो.
ह्या सगळ्यांची उत्तरे शोधण्यासाठी पालक आपल्याकडे त्यांच्या मुलांची पत्रिका घेवून येतात . पण ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे मुलांच्या नाही तर पालकांच्या स्वतःच्याच पत्रिकेत असतात . पालकांचे पंचम स्थान बिघडले असेल तर नक्कीच अपत्यसुखात कमतरता येते. पंचमेश चतुर्थात ,पंचमात राहूसारखा ग्रह ,अपत्यकारक गुरु पत्रिकेत बिघडलेला असेल तर, अश्या अनेक ग्रहयोगामुळे अपत्य सुख प्राप्त होत नाही .
मंडळी पंचमाचे भाग्य स्थान म्हणजे लग्न स्थान . पर्यायाने मुलांना घडवण्याचे महान कार्य नव्हे तर जबाबदारी आपलीच असते. येतंय ना लक्ष्यात ? सुज्ञास सांगणे न लगे.
अस्मिता
संपर्क : 8104639230
फेसबुक पेज : @yashasweejyotish
उपयोगी माहिती धन्यवाद
ReplyDelete