|| श्री स्वामी समर्थ ||
निसर्ग कुंडली म्हणजेच कालपुरुषाची कुंडली किंवा ज्याला आपण ठोकळा कुंडली म्हणतो. त्यावरून अनेक गोष्टींचा विचार केला जातो. इथे असणारे १२ भाव आणि त्यातील ग्रह, राशी आणि नक्षत्रे आपल्या गत जन्माशी संधान साधतात . हि कुंडली आपल्या संपूर्ण आयुष्याचा ,कर्माचा लेखाजोखा मांडते. आपला जन्म कुठल्या कुटुंबात झाला , त्यातील गुणदोष , आपल्या जन्माचे रहस्य ,आपली कर्तव्ये, आपली भावंडे ,आप्त स्वकीय , शेजारी त्यांच्याशी असणारे आपले भावनिक संबंध ह्यातून व्यक्त होतात.
आपला शैक्षणिक दर्जा ,बुद्धिमत्ता , विद्वत्ता , ज्ञान ग्रहण करण्याची आणि देण्याची क्षमता , अध्यात्मिक ओढ , साधनेची बैठक , समाजातील वावर , मानसन्मान , पद प्रतिष्ठा ,अर्थार्जन ह्याचा परामर्श इथे आहे. आपले सहजीवन , त्यातील ओलावा , प्रेम ,मुलांचे सुख ,आजारपण , कर्ज ,वृद्धापकाळ एक ना दोन अगदी सगळ्या सगळ्याचा मागोवा घेणारी हि निसर्ग कुंडली खरच अद्भुत म्हंटली पाहिजे.
एका कुंडलीवरून माणसाच्या टाळूपासून ते पावलापर्यंत च्या शरीराचा तसेच त्याच्या आवडीनिवडी , जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन , विचारांचा वेग , संकटांवर मात करण्याची क्षमता , शत्रुत्व आणि मित्र अनेक गोष्टींवर दृष्टीक्षेप टाकता येतो. मनुष्याची नाळ निसर्गाशी किती घट्ट जुळली आहे हेच जणू हा अभ्यास दाखवत असतो आणि म्हणूनच प्रत्येक कुंडलीचे विवेचन करताना लग्न कुंडलीचा वरवरचा नाही तर सखोल अभ्यास महत्वाचा आहे. कुंडलीचा अभ्यास करताना आपण स्वतःच्याच कुंडलीकडे त्रयस्थाच्या ( जमणे अवघड, पण जमवायचे ) दृष्टीने बघितले तर त्यातील मर्म लवकर उमगेल . एखादा ग्रह फलीतापर्यंत नेणार नाही त्यासाठी अनेक ग्रहयोग , भाव ,दशा अश्या अनेक गोष्टींचा एकत्रित विचार व्हावा लागतो. म्हणूनच वाटते कि निसर्ग कुंडली म्हणजे ब्रम्हांडच आहे. ज्यात पंचमहाभूते सामावली आहेत .
ज्योतिष शास्त्र क्षणभर बाजूला ठेवून आपण आपल्याच आयुष्याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पहिले तर अनेक प्रश्नांच्या उत्तरापर्यंत आपण स्वतःच पोहोचू शकतो. आपल्या मुलांपासून सुख नाही ह्याचे उत्तर आपण आपल्या आई वडिलांशी कसे वागलो आहोत ह्यात दडलेले आहे. येतंय ना लक्ष्यात .सहज सोपे आहे अगदी.
अस्मिता
संपर्क : 8104639230
फेसबुक पेज : @yashasweejyotish
No comments:
Post a Comment