||श्री स्वामी समर्थ ||
नवग्रहातील महत्वाचा ग्रह म्हणजे “ शुक्र “ . आयुष्य – शुक्र = निरस ,उदास ,अरसिक आयुष्य असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही . शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु .त्यांचा मानही तितकाच मोठा. आपल्या आयुष्यातील आनंदाचा सौख्याचा आणि सगळ्या भौतिक, ऐहीक सुखाचा कारक म्हणजे शुक्र . शुक्र हा रसिक ग्रह आहे. जिथे जिथे आनंद आहे तिथे शुक्र आहेच .
शुक्र आपल्याला दैनंदिन जीवनात सुद्धा सतत भेटत राहतो .बघुया
१ गालावरची खळी म्हणजे शुक्र
२. प्रणयाचा कारक
३. काळ्याभोर केसांचा केशसंभार
४. उंची पेहराव , दागदागिने , वस्त्रे
५. अत्तरे
६. पार्टी , क्लब ,मॉल
७ ब्युटी पार्लर
८ वैवाहिक सुखाचा कारक ग्रह
९ पर्यटन
१० कला
लक्ष्यात येतेय का? बघा किती साध सोप्प आहे शुक्र समजणे , हो ना? रोज आपल्या अवतीभवती फिरणारा हा ग्रह शुभ ग्रह आहे. तसा प्रत्येक ग्रह हा पूर्णतः शुभ किंवा अशुभ नसतोच. शुक्र बिघडला तर वाईटच. कुठल्याही गोष्टी एका मर्यादेत असल्या तरच त्या चांगल्या असतात .
आज शुक्राचेच पूर्वाषाढा नक्षत्र चालू आहे.
चला तर तुम्हालाही शुक्र कुठेकुठे भेटू शकेल ते लिहा ..आपण अभ्यास करतोय त्यामुळे विचारांचे आदान प्रदान झालेच पाहिजे .
अस्मिता
संपर्क : 8104639230
फेसबुक पेज : @yashasweejyotish
No comments:
Post a Comment