|| श्री स्वामी समर्थ ||
शनी कुंभेत प्रवेश करत आहे. बर मग ??? कुंभ , मीन राशींची साडेसाती आता ....काय होणार ???? असले प्रश्न पडलेले मेसेज आणि फोन बघून थक्क व्हायला होते. याचा अर्थ आपण केलेल्या आणि करत असलेल्या साधनेवर आपला स्वतःचाच विश्वास नाही , हो ना? अहो शनी महाराजांनी त्यांचा मुक्काम कुंभ राशीत हलवला आहे. ते होणारच होते पुढे ते मीन राशीत प्रवेश करतील. पण ह्या सर्वच गोष्टींचा विचार आपण सकारात्मक भावनेने नाही का करू शकत ? शनी काय राक्षस आहे का? खाणार कि काय तुम्हाला .उलट आता धनु राशीची साडेसाती संपली आहे त्यांनी गेली 8 वर्षे कशी गेली त्याचा विचार करावा आणि कायकाय धडे मिळाले आहेत त्याचा परामर्श घ्यावा चिंतन मनन करावे आणि पुढील आयुष्य जगावे . शनी देवांची शिकवण पुढील आयुष्यात अमलात आणावी म्हणजे पुढे 30 वर्षांनी पुन्हा येणारी धनु राशीची साडेसाती त्यांना परमोच्च मोक्षाचा आनंद नक्कीच मिळवून देयील नाहीतर आहेच मग वेन्तिलेतर आणि आजारपणाची दुखाची मालिका.
कुंभ म्हणजे ज्ञानाचा घडा आहे. जितके ज्ञानाचे कण वेचता येतील तितके पुढील अडीच वर्षात सगळ्यांनी वेचावेत . हे दिवस पुन्हा 30 वर्ष येणार नाहीत.
प्रत्येक गोष्टीचा वाईटच विचार का करायचा ? शनी मित्र आहे आपला , दाराची बेल वाजवत आहे त्याचे आत्यंतिक आनंदाने स्वागत करा कारण आता त्याचे वास्तव्य आपल्याच घरात पुढे अडीच वर्ष आहे. त्याच्या मनासारखे सचोटीने वागा , थोर्या मोठ्या व्यक्तींचा मान ठेवा , उपासना वाढवा , नामस्मरण वाढवा , लई वेळ असतो आपल्याला , नसेल तर तो आता काढावा लागेल आपल्याच स्वार्थासाठी , दान धर्म करा , सर्वात मुख्य स्वतःला लई शाने समजणे बंद करा , इतर लोक मूर्ख नाहीत ,फक्त तुम्हालाच मेंदू नाही इतरानाही आहे , सर्वाना बरोबर घेवून जायचा प्रयत्न करा . आणि हो कष्टाला अजिबात घाबरू नका , इतके कष्ट करा कि रात्री शांत झोप लागेल पडल्या पडल्या , आपल्या कर्तव्यात चुकू नका . इतके सर्व केल्यावर मग शनी कुंभेत आहे कि अजून कुठे तुम्हाला काय करायचे आहे. आपल्या हातात आहे ते करायचे ते म्हणजे उत्तम कर्म आणि निष्काम उपासना ....स्वतःही घाबरायचे आणि इतरानाही घाबरवायचे हे उद्योग बंद करा. शनी काहीही करणार नाही पण तुमचे नकारात्मक विचार तुम्हाला आजारपण देतील ..मानसिक आणि पुढे शारीरिक सुद्धा .
शनीचे स्वागत हात पसरून आनंदाने मनापासून करा . साडेसाती हि आयुष्यातील मोठी संधी आहे आणि ती सुद्धा सकारात्मक . कुंभ मीन मकर राशी चे लोक भाग्यवान आहेत कारण शनी त्यांना जीवनाची खरी ओळख करून देण्यासाठी येत आहे. हा माझा तो आपला कोण किती जवळ आहे ते कळेल आता .
साडेसाती तुम्हाला तुमची जागा दाखवेल , किती क्षणभंगुर अस्तित्व आहे आपले आणि माज किती आपल्याला जसे काही अखंड विश्वाचा कारभार आपल्याच खांद्यावर आहे . उद्या आपण गेलो तर 2 क्षण सुद्धा कुणी टिपे गाळणार नाही हे पक्के लक्ष्यात ठेवा .आपले काम झाले कि आपण इथून जाणार हे सत्य आहे ते स्वीकारा ....शनी कुंभेत...साडेसातीची भीती बाळगू नका. शनी मित्र आहे व्हिलन करू नका त्याला...कष्ट करणार्याची ओंजळ सुखाने भरतील शनी महाराज , परदेश गमन , विवाह , वास्तू योग ,संतती सर्व काही प्रदान करतील फक्त जमिनीवरून चाला...इतकच .
सौ . अस्मिता दीक्षित
संपर्क 8104639230
No comments:
Post a Comment