|| श्री स्वामी समर्थ ||
पत्रिकेत शनी कुठल्याही ग्रहासोबत नसेल आणि कमीतकमी ग्रहांच्या वर दृष्टी टाकत असेल तर उत्तम . शनीच्या नक्षत्रातील ग्रह सुद्धा परिणाम करतात ,वर्ग कुंडली मध्ये शनीची स्थिती कशी आहे ते तपासावे लागतेच . गुरु मध्ये जितके शुभत्व आहे तितकेच अशुभत्व शनीमध्ये आहे . कठल्याही ग्रहाचा परिणाम त्या ग्रहाच्या महादशा , अंतर्दशेत मिळतो. म्हणजेच त्या दशा अंतर्दशेत ते ग्रह फळे देण्यासाठी active होतात .मंगळ शनी युती दशम भावात फळ देयील पण संघर्ष पण करवेल कारण हे दोन्ही शत्रू आहेत . शुक्र शनी युती दशम भावात त्यामानाने सहज फळ देयील .
रवी शनी युती वडिलांशी पटणार नाही , सरकारशी अनबेन होयील कारण हे दोन्ही ग्रह एकमेकांना पूरक नाहीत . शनी चंद्र युती विषयोग मानला आहे . शनी मंद गतीने जाणारा तर चंद्र मनाचा कारक ,आत्ता इथे तर मग तिथे . चंद्र मनाचे स्वप्नांचे इमले बांधणारा तर शनी जीवनाचे वास्तव स्वीकारायला लावणारा आहे. म्हणून ह्या दोन अत्यंत भिन्न ग्रहांची युती चांगली फलित होताना दिसत नाही . हि युती कुठल्या राशीत होते आहे हेही महत्वाचे आहे . शुक्राच्या वृषभ राशीत हि युती चांगली फळे देयील. पण हीच युती वृश्चिकेत झाली तर मानसिक रित्या त्रासदायक होयील. डिप्रेशन वेडसर पणाची शक्यता . आता पत्रिकेत गुरूची दृष्टी असेल तर फरक पडेल. ह्या योगाला सन्यास योग सुद्धा म्हंटले आहे .
शनी मंगळ युती विस्फोटक आहे. ह्या दोघांमधून विस्तव सुद्धा जाणार नाही . शनी थंड तर मंगळ उद्रेक आहे. ज्वालामुखी आहे तप्त आहे. शनी निराशेकडे झुकणारा तर मंगळ Passion जोपासणारा . त्यामुळे आयुष्यात अनेकदा संघर्ष करावा लागतो . ह्या दोन ग्रहांची युती अपघात , घातपात दर्शवते. पायांचे त्रास विशेषतः गुडघ्याच्या खालच्या भागाला . मंगळ सर्जरीचा कारक आहे.
मंगळा कडे उतावीळ पणा आहे तर शनीकडे शांतपणे विचारपूर्वक निर्णय घेण्याची वृत्ती आहे. दोघेही एकमेकांच्या विरुद्ध स्वभावाचे. न्यायालयीन कामकाजात ,पुलिस , आर्मी मध्ये हि युती चांगले काम करेल कारण इथे भावनांपेक्षा कर्तव्याला अधिक महत्व आहे . कर्क राशीत हि युती फोल ठरेल इथे मंगळ निचीचा होयील आत्मविश्वास कमी आणि आजरपण होतील , मकर राशीत हीच युती चांगली फळे देयील. मकर राशीत मंगळ बांधकाम क्षेत्रात यश देयील.
शनी बुध युती .बुध बुद्धीचा कारक आणि शनी लॉजीकल आहे ,अनुभवी आहे त्यामुळे व्यक्ती प्रचंड विचारी तरी होयील किंवा दुसरे टोक गाठेल . कन्या राशीत हि युती उत्तम आणि मेष राशीत वाईट . आपल्या बुद्धीचा दुरुपयोग करतील .
बुध बुद्धीचा , वाणीचा तसेच व्यापाराचा कारक आहे आणि शनी बिघडला असेल तर चोरी ,पैशाची अफरातफरी करणारा . त्यामुळे हि युती चुकीच्या राशीत झाली तर मोठमोठाले फ्रोड , अफरातफरी , बुद्धी भ्रष्ट होते त्यामुळे हि युती असलेल्या लोकांनी सार्वजनिक कामात जिथे लोकांचा पैसा आहे तिथे अजिबात जाऊ नये . भ्रष्ट्राचाराचे आरोप लागतील. ह्या लोकांना बोलायचे असते वेगळे आणि बोलतात वेगळे. तोतरे बोलणे.
गुरु शनी योग हा एक विशेष अध्यात्मिक योग आहे . दोन्ही मोठे ग्रह आणि दोघांचाही जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टीकोण शिकवण एकच फक्त मार्ग वेगळे . शनी एक तपस्वी तर गुरु साधक .हे मिश्रण अफलातून म्हंटले पाहिजे. गुरु अनेक शास्त्रांच्या माध्यमातून शिकवण देयील तर शनी जीवनातील अनुभवातून आपल्याला प्रगल्भ करत जायील. दोघेही जीवनाची मुल्ये शिकवतील आणि जीवन एका वेगळ्याच उंचीवर नेणारी हि असामान्य युती आहे . असे लोक प्रगल्भ विचारांचे आणि विचारवंत असतात . हा योग धर्म आणि कर्माचा आहे. चुकीच्या राशीत हि युती झाली तर व्यक्ती बुद्धिवान न होता निर्बुद्ध होयील . गुरूच्या राशीत चांगले फळ मिळेल . डॉक्टर , समुपदेशक , ज्योतिषी ह्यांच्यासाठी हा योग चांगला .
भोगविलासाचा कारक शुक्रसोबतची शनीची युती शुक्राच्या गुणात न्यूनता आणेल. विवाहात विलंब आणि वैवाहिक सुखात कमतरता .शनी शुक्र युती तुळेत असेल तर व्यापारात यश मिळते.
शनी राहू युती हि चुकीच्या राशीत झाली तर त्रासदायक . पितृदोष हि युती निर्माण करते . तंत्र मंत्रासाठी हि युती चांगली .
शनी केतू युती गुरूच्या राशीमध्ये फळते . शनी केतू युतीला प्रेतशाप योग म्हंटले आहे. हि युती अष्टम भावात त्रास देणारच . चतुर्थ भावात व्यक्ती विरक्त होताना दिसेल.
प्रत्येक ग्रहाचा आपला स्वतःचा प्रभाव असतो ,दोन ग्रहांची युती होते तेव्हा त्याची फळे प्रकर्षाने मिळतात . दोन्ही ग्रहांची एनर्जी एकत्रपणे मिळते , चांगली आणि वाईट सुद्धा.
प्रत्येक ग्रह हा काहीतरी प्रयोजन ठेवूनच पत्रिकेत असतो , त्याची भाषा समजून घेणे हेच तर आपल्यासारख्या अभ्यासकांचे काम आहे. प्रत्येक पत्रिका एक वेगळे चालेंज असते आणि त्यासाठी अभ्यासाची खोलीही तितकीच सखोल लागते .अजून लिहिण्यासारखे खूप आहे पण तूर्तास इथेच थांबते .
संकलन : सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment