|| श्री स्वामी समर्थ ||
ज्या क्षणी आपण आपली इच्छा त्यांच्या इच्छेत विलीन करतो. तू जे करशील ते माझ्यासाठी योग्यच असेल ह्यावर दृढ विश्वास आणि निस्सीम श्रद्धा ठेवतो त्या क्षणापासून आपले आयुष्य बदलून जाते . मग मात्र कसलाही विचार नाही . आपल्यासाठी कुठली वेळ योग्य आहे ते त्यांनाच माहित आहे आणि त्या वेळेची वाट पाहणे इतकेच आपल्या हाती आहे. पी हळद हो गोरी हे अध्यात्मात नाही . संयम , पराकोटीचा विश्वास आणि उच्च कोटीची साधना , नामस्मरण ह्यामुळे आयुष्यातील सर्वांग सुंदर क्षण पदरात नक्कीच पडतात .
सौ . अस्मिता दीक्षित
No comments:
Post a Comment