|| श्री स्वामी समर्थ ||
17 जानेवारी 2023 रोजी शनी महाराजांनी आपली मकर राशी सोडून कुंभ राशीत प्रवेश केला आहे . आज शनी महाराजांबद्दल अधिक काही जाणून घेण्याचा प्रयत्न करुया . आयुष्यात अनेक चढ उतार असतात आणि अनेक चांगले वाईट प्रसंग सुद्धा घडत असतात . अनेकदा हे वाईट प्रसंग साडेसाती नसताना किंवा शनीची दशा , पनवती नसताना सुद्धा घडतात पण तरीही काहीही झाले कि शनीवार खापर फोडणे हा मनुष्य स्वभाव आहे. शनीला व्हिलन करून ठेवले आहे आपण .असो .
शनीचे बलाबल पत्रिकेत चांगले असेल तर आजार दुक्ख संकटांचे प्रमाण कमी असते. शनी कमजोर असेल तर संकटांची मालिका जीवनात असतेच . आपल्या अनेक वाईट कर्मांची फळे आपल्याला शनिच्याच दशेत , साडेसातीत भोगायला लागतात .शनी राहू पत्रिकेत एकटेच असलेले बरे कारण त्यांची कुठल्याच ग्रहासोबतची युती शुभ फळे प्रदान करत नाही . शनीला 3 दृष्ट्या आहेत आणि ज्या भावावर त्याची दृष्टी पडेल त्या भावासंबंधी काहीतरी समस्या जीवनात असतेच असते .
शनी वायुतत्वाचा ग्रह आहे. कफ , पित्त आणि वात ह्या त्रिदोशातील वात शनीकडे आहे . म्हणूनच शनी जेव्हा पत्रिकेत active असतो तेव्हा प्राणायाम हा उत्तम उपाय असतो. ज्योतिष शास्त्र हे logic आहे तर्कशास्त्र , पटले पाहिजे . शरीरात वायूचे समान साम्राज्य आहे प्राण उदान अपान व्यान समान. शनी बिघडला तर शरीरातील वायूचे चलन वलन बिघडेल आणि वाताचे विकार होतील. शनी हाडांचाही कारक त्यामुळे हाडांची दुखणी , नर्वस सिस्टीम बिघडेल . शनी थंड ग्रह आहे म्हणून थंडीत वाताचे आजार डोके वर काढतात . शरीरातून वायू निघून गेला तर शरीर थंड पडते तोच शेवटचा क्षण असतो.
शनी विलंबाचा कारण आहे म्हणूनच शनी बिघडला असेल तर शरीरात रोग हळूहळू तग धरतात आणि दीर्घ मुदतीसाठी वास्तव्य करतात .शरीरात पायांची , किडनी किंवा लिव्हर चे दोष निर्माण झाले तर शनी कुठेतरी बिघडला आहे हे समजावे.शनी क्रोनिक आजार देतो जे शरीरात हळूहळू तग धरतात आणि पुढे कायमचे वास्तव्य करतात . अनेकदा ते आपल्या चुकीच्या जीवन पद्धतीमुळेही असतात.
एकांत प्रिय वाटणे, अंधारात बसून राहणे , विरक्ती ची भावना , कुणाशीही संवाद नको ,आयुष्यात आलेल्या अविश्वासू लोकांमुळे संघर्ष , वडिलोपार्जित संपत्तीवरून वाद , नशेची लत लागणे , वास्तव स्वीकारायचे धाडस नसणे , वजन कमी कमी होत जाणे , हे सर्व पत्रिकेतील शनी बिघडल्याचे सूचित करतात .
मंगळ शनीचा शत्रू आहे, त्यांच्यातून विस्तव सुद्धा जात नाही त्यामुळे मंगळाच्या राशी किंवा लग्नाला शनी चांगली फळे प्रदान करत नाही . आर्थरायसिस, गुडघ्यांच्या समस्या शनी बिघडला तर होतात . शरीरातील कल्शियम कमी होणे , हाडे ठिसूळ होणे , पार्किंगसन, कंपवात , विसरभोळेपणा , मलमूत्र व्यवस्थेत बिघाड , पोट साफ न होणे ,दातांचे आजार , हृदय विकार , पोटाचे आजार कारण अपान वायू पोटातच फिरतो. अन्न न पचणे हेच अनेक आजारांची सुरवात असते . म्हणूनच कपालभाती सारखा व्यायाम नित्य केल्यास पोटाचेच नाही तर संपूर्ण शरीरात वात व्यवस्थित फिरतो. शनी अपंगत्वाचा कारक आहे मग ते मनाचे असो अथवा शरीराचे . माणसाचे मन आधी आजारी होते मग शरीर . माणसाच्या मनाचे खच्चीकरण करणे हेच शनीचे काम आहे आणि हीच आपल्या पापांची शिक्षा सुद्धा .
सूर्यास्तानंतर शनीचा प्रभाव सुरु होतो. शनी रात्री बलवान असतो . पहाटेच्या वेळी शनी अधिक बलवान समजला जातो त्याच वेळी अनेकदा हृदय विकार किंवा अन्य दुखणी अधिक होतात . साडेसाती किंवा शनीच्या महादशेत आपण केलेली सर्व पापे अनंत व्याधींच्या रुपात आपल्या समोर एकामागून एक येऊन उभी राहतात आणि आपण मानसिक दृष्टीने कोलमडून जातो . मी मी म्हणणारे आपण जो सांगेल तो उपाय करत सुटतो .जितक्या लवकर शनीचे अस्तित्व आणि त्याचे अबाधित असणारे महत्व आपण स्वीकारू तितके आयुष्य सुकर होयील हे निश्चित .
शनी ग्रहाच्या शांती साठी खालील उपाय करता येतील.
घरातील आणि अन्य वृद्धांची सेवा शुश्रुषा
शनीचा अखंड जप
हनुमान चालीसा पठण
मंगळवार ,शनिवार मारुतीचे दर्शन
कणकेचे दिवे 11 शनिवार चढत्या आणि 11 शनिवार उतरते मारुतीच्या मंदिरात लावणे
नियमित व्यायाम आणि प्राणायाम
अहंकाराचा त्याग करून लो प्रोफाईल जीवनपद्धतीचा अवलंब करणे
काळी छत्री दान करणे , अन्नदान करणे.
चतुर्थ श्रेणीच्या लोकांना आदराने वागणूक देणे
अपंगाना मदत
नित्य उपासना आपल्यातील असलेला अहं नष्ट करते.
करून बघा , केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे . शनी हेच अंतिम सत्य आहे हे विसरून चालणार नाही .
संकलन : सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment