|| श्री स्वामी समर्थ ||
केतू हा विरक्त करणारा ग्रह आहे. केतू म्हणजे पूर्व जन्मातील सुख दुक्खाचे गाठोडे जे आपण ह्या जन्मात घेवून येतो . केतू म्हणजे कळसा वरील पताका , केतू मंगळा सारखी फळे देतो अश्या अनेक गोष्टी आपल्या वाचनात आहेत. ज्योतिष हे तर्क शास्त्र आहे . आपल्याला अनुभूती मिळाली कि नियम बरोबर लागला असे समजायला हरकत नाही .
केतू हा विरक्त करतो पण आपण विरक्त कुणापासून होतो ज्यांच्याशी आपण एके काळी खूप जवळचे असतो किंवा घट्ट मैत्री असते . ज्यांच्याशी खूप attached असतो त्यांच्यापासूनच दूर जातो म्हणजे विरक्त होतो .
परवा एक पत्रिका पाहताना हा अनुभव आला . तृतीय स्थान हे भावंडे आणि शेजारी . जातकाने शेजारी असो कि भावंड त्यांच्यासाठी आपले प्रेम पणाला लावले. माया केली . त्यांच्या सुखासाठी पदरचा पैसाही खर्च केला . पण तृतीयातील केतू वरून जेव्हा गोचर केतूचे भ्रमण झाले तेव्हा घडलेल्या अनेक घटनांतून ह्याच लोकांपासून जातक विरक्त झाला. आता त्याला त्यांची तोंडे सुद्धा पहावीशी वाटत नाहीत इतके बरेवाईट अनुभव जातकाला आले आणि शेवटी तृतीय भावातून दर्शवलेल्या व्यक्तीसापेक्ष संबंधातून तो विरक्त झाला.
एकेकाळी ज्यांच्याशिवाय पान हलत नव्हते त्यांची आज आठवण सुद्धा नकोशी वाटावी इतकी विरक्ती आज जातकाला केतूने दिलेली आहे. खरे सांगायचे ते हे सर्व लोक जातकाचे कधीच नव्हते पण ते समजायला वेळ यावी लागते . आधी attachment आणि शेवटी detachment. शेवटी काय तर आपले स्वतःचेच अनुभव आणि ग्रह आपल्याला वेळ आली कि फळे देत असतात , अनुभवांनी संपन्न करत असतात . प्रश्न अंतर्मुख होऊन विचार करण्याचा आहे इतकच . इथे तृतीयेश आणि तृतीय भावाचा कारक मंगळ ह्यांचाही विचार आवश्यक आहे. हाच अनुभव तृतीयेश किंवा तृतीय भावाचा कारक मंगळ बिघडला तरी सुद्धा येतो .
आपले अनुभव सुद्धा कळवा .
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
खुप छान माहिती केतु शनी , शनी चंद्र , केतु गुरू, ह्या युती मध्ये सुद्धा बहीण भावंडाना कडून त्रास झालेला दिसतो.
ReplyDelete