|| श्री स्वामी समर्थ ||
नवमांश कुंडली हि लग्न कुंडलीचे सूक्ष्म स्वरूप आहे हे खरे असले आणि नवमांश पाहिल्याशिवाय फलादेशाला मूर्त स्वरूप येत नाही तरीही ह्या दोन्ही कुंडल्यांचा अभ्यास करताना अनेकांचा संभ्रम होतो हे पाहायला मिळते .
प्रत्येक राशीत सव्वा दोन नक्षत्रे येतात आणि प्रत्येक नक्षत्राला चार चरण म्हणजेच प्रत्येक राशीत आपल्याला 9 चरणे पाहायला मिळतात . उदा. मेष राशीत अश्विनी , भरणी आणि कृत्तिका हि 3 नक्षत्रे अनुक्रमे 4 4 1 अशी चरणे येतात . म्हणजेच आपल्याला 9 प्रकारची व्यक्तिमत्व फक्त मेष राशीतच पाहायला मिळतील. मेष राशीचे सर्व लोक खूप चिडणारे संताप करणारे लोक आहेत असे सरसकट विधान आपण नाही करू शकत. मेष राशीचा मंगळ धाडसी , आक्रमक स्वभावाचा ,भांडायला उठणारा , अति महत्वाकांक्षी आहे पण त्याचेही अनेक पेहलू आहेत .उदा. अश्विनी नक्षत्राच्या तृतीय चरणात बुध काम करतो म्हणून मेष (मंगळ ) + अश्विनी ( केतू ) + तृतीय चरण (बुध) हे समीकरण येते जे महत्वाकांक्षी + थोडे अध्यात्मिक + बुद्धिमान आहे. हा जातक शब्दांच्या कोट्या करण्यात हुशार असणारच .तसेच हुशार , देवावर श्रद्धा पण सतत देवदेव न करणारा आणि पैशाची गणिते मांडणारा बुद्धीच्या जोरावर अर्थार्जन करणारा असेल.
ह्याचा अर्थ असा कि हा जातक मेष राशीत अश्विनी नक्षत्रात पण तृतीय चरणात जन्माला आहे . तेव्हा म्हणताना मेष राशीत जन्मला आणि नवमांशात तो बुधाच्या मिथुन राशीत आहे असे म्हणणे अत्यंत चुकीचे ठरले आणि हेच अनेकदा म्हंटले जाते . जातकाची मेष रासच आहे ती त्याने सोडून मिथुनेत उडी नाही मारली . चंद्र हा मेष राशीतच आहे फक्त तो बुधाच्या तिसर्या नवमांशात आहे ज्याची तो प्रकर्षाने फळे देणार आहे त्यांनी रास बदलून तो बुधाच्या राशीत नाही गेला तर फक्त नवमांश बुधाचा आहे . ह्याचा सखोल अभ्यास झाला तर जातकाच्या व्यक्तिमत्वाचे कंगोरे समजतील.
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment