|| श्री स्वामी समर्थ ||
“लहानपणी आपण आणि आता आपली मुले सांगत असत आई आत्ताच्या आत्ता दे “आठवतंय ना? अगदी तशीच स्थिती प्रत्येक गोष्टीत आजकाल आपल्या सर्वांची झाली आहे . आजकाल सगळ्यांना सगळे लगेच हवे असते . संयम संपलाय ... घरी काही पदार्थ करू नका , बाहेर सगळे मिळतंय आणा खा आणि मोकळे व्हा. बदलत्या जगात जुन्या सर्वच गोष्टी हळूहळू विरून जात आहेत तरीही जुने ते सोने...आपले मोदक बघा पारंपारिक पदार्थ आहे . आहे का त्याला मोमो ची सर ? कधी येणारही नाही . मोदक ह्या नावामध्ये जे सौंदर्य आहे ते मोमो मध्ये कसे येणार ? असो. तर सांगायचे असे कि सगळ्यात शोर्टकट चालत नाहीत . उदा. अध्यात्मात शोर्टकट ला वाव सुद्धा नाही .
परमेश्वराला आपली गरज नाही आपल्याला आहे म्हणून आपण देवदेव करत असतो हे खरे आहे . मला देवाकडून काही नको असे नसते मोठ्या याद्या आहेत आपल्या . असो तर जे मनात आहे ते घेण्यासाठी आपण पूजा अर्चा देव धर्म जपतप करतो पण त्यात जीव ओतला नाही तर गजानन विजय सारखा ग्रंथ म्हणजे गोष्टीचे पुस्तक किंवा कादंबरी होईल. श्री गजानन विजय ग्रंथ महाराजांचे अस्तित्व दाखवणारा ग्रंथ आहे अर्थात तुमची तितकी निष्ठा हवी . दिवाळी अंक सारखा तो वाचलात तर कसे महाराज मदत करतील तुम्हाला ?
हे सर्व सांगण्याचे तसेच कारण आहे. मध्यंतरी एका बाईला काही उपाय सांगत असताना त्या म्हणाल्या हनुमान चालीसा youtube वर ऐकली तर चालेल का? मी म्हंटले का नाही चालेल कि सगळे चालतंय आपल्याला . पण मग असे करा भूक लागली कि वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचे फोटो video सुद्धा अगदी तसेच youtube वरती बघा. बघा ते पाहून पोट भरते आहे का . त्या मनोमन काय ते समजल्या .
पूर्वी होते का youtube? आपल्या लहानपणी शुभम करोति , मनाचे श्लोक , परवाजा , पाढे , अडीचकी दिडकी आपल्याकडून आईबाबा घोकंपट्टी करून पाठ करून हेत असे. आठवतंय का? थोडक्यात आपल्या मुखातून ते श्लोक म्हणण्याला सुद्धा काहीतरी अर्थ असल्याशिवाय का हे आपण म्हणत असू ? येतंय का लक्ष्यात ?
आपली वाणी सुस्पष्ट व्हावी , एका जागी बसण्याची सवय व्हावी , एकाग्रता वाढावी आणि आपण म्हणत असलेल्या श्लोकात आपले संपूर्ण लक्ष्य असावे जेणेकरून त्याची गोडी लागेल उच्चार स्पष्ट येतील आणि त्या देवतेची अखंड कृपा आपल्यावर होईल . स्वतः म्हणत असल्यामुळे ताठ बसायची सवय ( तेव्हा शेजारी मोबाईल नव्हते ते नशिबच आहे त्या पिढीचे ) , श्कोलांचा अर्थ समजून म्हणायची सवय लागायची आणि एकंदरीत मनाचे चित्ताचे शुद्धीकरण होत असे. इतके ढीगभर फायदे होते पण त्याही पेक्षा मोठा फायदा म्हणजे आपला आत्मा आणि मन एकचित्त ,स्थिर होत असे. आजकाल जे जरा काही झाले कि झाले मन अस्थिर असे तेव्हा होत नसे कारण मुळातच आजकाल लोकांना एका जागी दोन मिनिटे सुद्धा बसता येत नाही इतके मन राहुने चंचल केले आहे.
आता हा राहू कोण ? तर तो तुमचा मोबाईल , थोडक्यात सगळी हि आधुनिक इलेक्ट्रोनिक उपकरणे , त्या सर्वात आपण आजकाल आपले आयुष्य शोधायला लागलो आहोत , त्या शिवाय श्वास सुद्धा नाही बरे आपला अशी आजकाल वेळ आहे. असो . पूर्वीच्या काळी स्त्रिया भाजी निवडताना स्वयपाकघरातील कामे करताना ओव्या म्हणत श्कोल म्हणत त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध राहत असे , देवाचे नाव घेण्यासाठी वेगळा असा वेळ काढण्याची गरजच निर्माण होत नसे पण आता स्त्रिया स्वयपाक करताना कानात ते यंत्र घालून ऐकत स्वयपाक करतात . असो . तर हे सर्व वेद रुचा स्वतः तोंडाने म्हणणे हे सर्वार्थ प्रगतीचे लक्षण मानले जाते कारण ह्यामुळे आपल्या मनाची आत्म्याची शुद्धीक्रिया म्हणजे आजकालच्या भाषेत आपला “ Aura Clean “ होतो , आपला “ Aura “ सकारात्मक होण्यास मदत होते आणि मग कुठल्याही परीस्थित आपण न डगमगता मन विचलित होवू न देता सामोरे जावू शकतो . थोडक्यात एकाग्रतेने मन सुद्धा खंबीर होते आणि खंबीर मन योग्य स्थितीत योग्य विचार करू शकते . ह्या सर्वासाठी आपल्याला हे श्लोक मग ते श्री सुक्त असो अथवा अथर्व शीर्ष असो . रामरक्षा असो अथवा हनुमान चालीसा असो आपल्याला ते स्वताहून म्हणायचे आहे . आधी ऐका कुणाकडून त्याचा अर्थ समजून घ्या , आजकाल सगळे गुगल वर आहे. अर्थ श्लोक , उच्चार समजून म्हणा , तालासुरात म्हणा जेणेकरून आपल्यालाही ऐकायला आवडेल आणि गोडी लागेल . शब्द स्वर रुचा चुकल्या तरी चालतील , चुकत चुकत येयील पण येयील आणि ह्या प्रयत्नांना यश जेव्हा येयील तेव्हा गगनात आनंद मावणार नाही कारण ज्या देवतेचे करता ती तुमच्यावर प्रसन्न होवून आपल्याला आशीर्वाद देणार हे नक्की.
म्हणूनच अध्यात्मात शॉटकट नाहीत . प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते , कलियुग आहे आणि कित्येक जन्माच्या पापांचा हिशोब चुकता करायचा आहे , त्यामुळे एक माळ करून काहीही होणार नाही. एका माळेने सुरवात करा पण पुढे हा जप वाढवत न्या. खाताना विचारतो का? किती बटाटे वडे खावू ? ते जसे अमर्यादित आहे तसेच जे अध्यात्म कराल तेही तसेच असुद्या .
परमेश्वर द्यायलाच बसला आहे , आपण त्याच्या दृष्टीक्षेपात आलो कि तो आपल्याला देणारच हा विश्वास ठेवा . दृष्टीक्षेपात कसे येणार , मनापासून नामस्मरण केल्यामुळे , पटतंय का ?
बघा जीवनात सगळीकडे शोर्टकट नाहीत , निसर्ग सुद्धा हेच शिकवतो आपल्याला. त्याचे उत्तम उदा म्हणजे , बाळाचा जन्म नऊ महिने नऊ दिवस , तिथे आपले काहीही चालत नाही .ज्याला जितका वेळ लागणार तो लागणार त्यात आपले विज्ञान उपयोगाचे नाही . निसर्ग आपल्या जीवनाचा जसा भाग आहे तसेच अध्यात्म आणि ज्योतिष सुद्धा हेच सांगण्यासाठी हा लेखन प्रपंच .
कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वाना खूप शुभेछ्या . चांदोमामा फक्त आमच्याच जीवनात नाही तर संपूर्ण जगात , विश्वास तुझ्या शीतल चांदण्याने शांतता नांदूदे अशी विश्व प्रार्थना करुया .
श्री स्वामी समर्थ
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क 8104639230
No comments:
Post a Comment