Friday, 2 February 2024

अन्न हे पूर्णब्रम्ह – ज्योतिषीय दृष्टीकोण

 || श्री स्वामी समर्थ ||



आपण काम करत नाही तर आपले वितभर “ पोट “ काम करत असते . पोटामध्ये  पेटलेल्या यज्ञाला घास भरवून आत्मा शांत करणे ह्यासारखे म्हणजेच अन्नदानासारखे पुण्य दुसरे नाही. आपले शरीर ज्यावर पोसले जाते ते अन्न ज्याला शास्त्रात “ साक्षात परमेश्वर  म्हणजेच “ ब्रम्ह “ म्हंटलेले आहे. 


जन्मलेले बालक आईच्या देहावर स्तनपान करून आपला देह टिकवत वाढवत असते . आपण जे अन्न प्रश्न करतो त्यातून आपले व्यक्तिमत्व , विचार घडत असतात . प्रत्येक व्यक्तीला “ जिभेचे चोचले “ असतात आणि ते स्वाभाविक आहे. अनेकांना अनेक प्रकारची व्यंजने , पदार्थ पेय आवडतात . ह्या पदार्थांची आवड निवड आपल्यात अनुवांशिक असू शकते . आज ह्यावर प्रकाश टाकूया.


आपल्या देहातील प्रत्येक अवयव निसर्ग कुंडलीत प्रत्येक भावात  विभागलेला आहे . अन्न प्रश्न करणारे मुख , जिव्हा आणि चवी ह्याचा विचार पत्रिकेतील द्वितीय भावातून केला जातो . निसर्ग कुंडलीत इथे शुक्राची वृषभ राशी येते . शुक्र हा सर्व रसांचा कारक आहे. आपण कुठले आणि कश्या प्रकारचे अन्न प्राशन करणारा हे ह्या भावावरून तसेच येतील स्थित ग्रहांवरून समजते. 


शुक्र असेल तर आंबट , चंद्र असल्यास पातळ पदार्थांचे सेवन आवडेल तसेच फळांचे रस , बुध गुरु गोड खाण्याकडे विशेष कल राहील तर मंगळ जिभेवर तिखटाचा मारा करेल.रवी असल्यास राजासारखा आहार तर शनी शीळोपा म्हणजेच शिळे अन्न देयील. चंद्र गुरु सहभोजनाचा स्वादिष्ट पक्वांनाचा आस्वाद देतील. 

या भावातील पापग्रह विशेषता राहू मांसाहार , अपेय पान , तिखट भोजन पसंत करेल . मंगळ तिखट खाईल आणि बोलेल सुद्धा . धनस्थानातील पापग्रहांची मांदियाळी सुखाचा घास क्वचित देईल , अकारण भांडणे , अपशब्द , शाब्दिक चकमकी जेवणाच्या वेळी नाही झाले तरच नवल. 


दिवसभर आपण ह्या पोटासाठी कष्ट करतो , आणि ह्या कष्टातून मिळवलेली भाकरी सुखाचा आस्वाद घेत आपल्या कुटुंबां सोबत खाणे हाच तर खरा जीवनातील सर्वोच्च आनंद आहे . अन्न फुकट घालवू नका , अन्नाचा आणि अन्न शिजवणाऱ्या व्यक्तीचाही योग्य मान राखा . हॉटेल मधील वेटर पण मागाल ते आणून टेबलावर देयील . पण त्यात प्रेम नसते . आई हेच अन्न चमचाभर प्रेम आणि जीव ओतून करते म्हणून आईच्या हाताला चव असते . ह्या आईला जेवणापूर्वी निदान नमस्कार केलात तरी पुण्य पदरी पडेल. आपली लेकरे पोटभर जेवली कि आईचेही पोट आपोआप भरते .सहमत ???

प्रत्येक ग्रह समजला तर 12 भावातून त्याचा होणारा प्रवास कसा असेल ते सहज उलगडेल .


सौ. अस्मिता दीक्षित

संपर्क : 8104639230 


Wednesday, 24 January 2024

हृद्यस्पर्शी सांगता

 || श्री स्वामी समर्थ ||




गेले काही दिवस ठरवून स्वामींचा तारक मंत्र म्हणत होते . आज त्याची सांगता होती. कालपासून तब्येत बरीच नाही . आज चाफ्याची फुले महाराजांना वाहावी असे मनात आले पण आणायला कुणीही नाही , करायचे काय ? असो मनात विचार आला आपण आत्यंतिक ओढीने आणि मनापासून त्यांच्या सेवेत रुजू आहोत हीच त्यांची कृपा . त्यांना जे हवे ते आपल्या कडून करून घेतील . मानसपूजा करून त्यात चाफ्याची फुले महाराजांच्या चरणावर अर्पण करुया . असो. सकाळी पूजा झाली आणि फ्रीज मध्ये ठेवलेला स्टील चा डबा काढला. त्यात मी नेहमी चाफा ठेवते. उघडला त्यात चाफ्याची फुले होती . मला आठवले गेल्या गुरुवारी आणली होती. पण आश्चर्य म्हणजे आजच आणल्यासारखी टवटवीत ताजी होती . फुले पाहून इतका आनंद झाला डोळ्यातून पाणी यायला लागले आणि हात पण थरथरू लागले. फुले ताटात काढून ठेवली आणि मोजली ती बरोबर 11 फुले होती. हा आनंद शब्दात न मांडता येणारा आहे. मला बरे नाही आणि खाली जाता येत नाही पण महाराजांनी मनातली इच्छा पूर्ण केली . त्यांच्याकडे  पहिले तेव्हा ते आणि मी काय गप्पा झाल्या ते सांगू नाही शकणार ...गप्पा कसल्या नुसते अश्रूच अश्रू . महाराज आपल्या भक्तांच्या हृदयाच्या समीप असतात अगदी कायम , गरज असते तो त्यांना अंतर्मानापासून हाक मारण्याची . आपल्या जीवनात खूप मोठ्या आनंदाच्या मागे मागे धावायची किबहुना मोठ्या गोष्टीत आनंद मानायची खरच गरज नाही , रोजच्या जीवनातील लहानसहान गोष्टीत सुद्धा ओतप्रोत आनंद दडलेला आहे तोही चिरकाल टिकणारा . आजचा अनुभव मला महाराजांच्या अजूनच समीप घेवून गेला , श्रद्धा अजूनच दृढ झाली . शांत मनाने पूजा केली .वटवृक्षाखाली बसलेल्या महाराजांची मूर्ती माझ्या घरातच आता विराजमान आहे त्याच्यासमोर बसून नामस्मरण करत अक्कलकोट ला जाऊन आले आणि व्रताची सांगता केली . महाराजांना हात जोडले आणि निशब्द झाले. 


सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230 


Tuesday, 16 January 2024

दशा

                                                              || श्री स्वामी समर्थ ||

 

अनेकदा ग्रहस्थिती त्रासदायक असते जसे 5 12 भावांची दशा अंतर्दशा नोकरी साठी त्रासदायक स्थिती निर्माण करते . 5 हे षष्ठ भावाचे व्यय भाव . आता षष्ठ भाव म्हणजे काय day to day life . बरोबर ना? मग रोज आपण काय करतो तर ऑफिस मध्ये जातो अगदी नियमित ठरलेली 8.12 ची लोकल असते. पण अचानक पंचम भाव लागतो आणि आपल्या नित्याच्या दिनक्रमात बदल होतो . सुट्टी घेणे ऑफिसला न जावेसे वाटणे असे होते कारण पंचम हा षष्ठ भावाच्या कार्यात अडथळा आणतो. तसेच 12 वा भाव हा सुद्धा लग्नाचे म्हणजे जातकाचे स्वतःचे व्यय भाव . सर्वाचाच व्यय होणे. म्हणून आपण गमतीने 5 12 लागले कि VRS असे म्हणतो. माझ्या एका नातेवाईकांची नोकरीची शेवटची २ वर्ष राहिली होती आणि 5 12 लागले. मी त्यांना म्हंटले आता तुम्ही बहुतेक नोकरीतून स्वेच्छया निवृत्ती घेणार आणि मुलीकडे जाणार फिरायला परदेशी . किती चिडले माझ्यावर म्हणाले मला पूर्ण पेन्शन हवी आहे मी कश्याला सोडीन नोकरी . पुढील 5 मिनिटात मी माझे अखंड खानदान आणि ज्योतिष शास्त्र ह्यावर बरेच तोंडसुख घेतले . हा कसा रिकामटेकडया लोकांचा उद्योग वगैरे वगैरे .असो.

पुढील  महिन्यात त्यांचे बॉस बदलले आणि कुणीतरी खडूस माणूस (असे त्यांच्यामते) आला आणि त्यांना मस्त कामाला लावले.  7 वाजता घरी येणारा माणूस 9 वाजता घरी यायला लागला. बरे वय आता निवृत्तीकडे झुकलेले , दमायला लागले. परत ऑफिसमध्ये रोजच्या कटकटी वाढल्या . ह्या सर्वाला कंटाळून त्यांनी ६ महिन्यांनी म्हणजे निवृत्तीच्या आधीच दीड वर्ष
VRS घेतली . फंडाचा पैसा मिळाला , उभ्या आयुष्यात कुठे गेले नव्हते ते परदेशी स्थायिक असलेल्या लेकीकडे गेले . असो.

5 वा भाव म्हणजे संतान आणि मनोरंजन 12 म्हणजे भटकंती . ज्योतिष काय कुठलेही शास्त्र हे परिपूर्ण आहेच , सांगणारा जाणकार हवा हे मात्र नक्की . पण त्याही पुढे आपल्याला माहित नसेल तर गप्प राहावे उगीच कश्याला कुणाला नावे ठेवायची ? नसेल विश्वास सोडून द्यावे ह्या वादात कश्याला वेळ घालवायचा ? आयुष्यात वेळ सत्कारणी लावण्यासारख्या असंख्य गोष्टी आहेतच कि त्या कराव्यात ...सहमत ?

 

सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230






अवकाशातील ग्रह

 || श्री स्वामी समर्थ ||

 

अवकाशातील ग्रह हे सृष्टीतील जीवनावर परिणाम करत असतात . हे परिणाम आपल्या पूर्व सुकृताप्रमाणे बरे वाईट असू शकतात . पृथ्वीपासून लाखो मैल दूर असणारा चंद्र मानवी मनाचा कारक आहे आणि इतक्या दूर असूनही प्रचंड अश्या सागराला तो भरती ओहोटी आणू शकतो इतके सामर्थ्य त्यात आहे. ह्या चंद्राची ताकद वाढवायची असेल तर त्याची दाने अवश्य करावीत . मग इतक्या दूर असलेल्या ह्या ग्रहावर ह्या दानाचा परिणाम होतो का? तर अवश्य होतो. पण त्याहीपेक्षा त्या ग्रहाचा जप करणे सर्वार्थाने उत्तम .ग्रह दूर आहे कि जवळ हा प्रश्नच नाही तो दूरच आहे पण तरीही तो सामर्थ्यवान आहे आणि त्याचे आपल्यावरील वेळोवेळी होणारे परिणाम त्याच्या सामर्थ्याची अनुभूती देत असतात .

सौ. अस्मिता दीक्षित

संपर्क : 8104639230