|| श्री स्वामी समर्थ ||
आपल्या आयुष्यात प्रत्येक ग्रहाला त्याचा संपूर्ण प्रभाव आपल्यावर टाकण्यासाठी जो वेळ दिला आहे त्याला आपण “ महादशा “ म्हणतो. त्यात येतात त्या अंतर दशा आणि विदशा . आपल्या पत्रिकेत ग्रह जसा आहे , ज्या स्थितीत आहे त्याप्रमणे त्या ग्रहाची दशा फळ देताना दिसते. ह्याचाच अर्थ कुठलीही दशा हि संपूर्ण चांगली किंवा वाईट नसते . प्रत्येक दशा हि नेहमीच मिश्र परिणाम देणार .
शुक्राची दशा हि सर्वात अधिक कालावधीची म्हणजे २० वर्षाची असते. शुक्र हा नैसर्गिक शुभ ग्रह असून जीवनातील आनंदाचा , सकारात्मकता , निर्मितीचा कारक आहे. भटकंती , वैवाहिक सौख्य , आनंद उपभोगणे ह्या गोष्टी शुक्राकडे आहेत . मग ह्या दशेत काय होईल ? ह्या कालावधीत प्रामुख्याने खरेदी , पर्यटन , भेटीगाठी , उत्तम खाद्यपदार्थांची वेळोवेळी मिळणारी मेजवानी , त्यावर ताव मारणे , उंची अत्तरे , समारंभ अश्या अनेक गोष्टी आणि भौतिक किंवा स्वतःवर खर्च करण्यात , सुखासिनतेत जातील. मग ह्या सगळ्याचा परिणाम काय होईल , जीवन शैली जरा COMFORM ZONE मध्ये राहील , व्यायाम असेलच असे नाही , मज्जानु जिंदगी होईल , एशोआराम , व्यसने , आनंद ह्यामुळे आपण आपल्या स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करू आणि त्यातून मग मधुमेह सारखे आजार निर्माण होतील. सुखासीनता एका प्रमाणाबाहेर कधीही चांगली नसते. म्हणूनच अनेकदा शुक्राच्या दशा , अंतर दशा ह्यात व्यक्तीला मधुमेह झालेला बघायला मिळतो. शुक्र संपत्ती , धन , भौतिक सुखाच्या साधनांची बरसात करेल पण जीवन शैली बदलल्यामुळे होणारे आजार पण देयील. नेमके तिथेच आपल्याला जपायचे आहे .
प्रत्येक ग्रह हा वरती उल्लेख केल्यामुळे त्याची छाप आपल्या जीवनावर टाकतो , त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा ते आपल्या हातात आहे , शुक्राच्या दशेत आयुष्यात काहीतरी CREATIVE करता आले तर बघावे , त्यामुळे मेंदूही कार्यरत राहील...दशा कुठलीही असो स्वतःसाठी तासभर वेळ देणे आणि व्यायम करणे आवश्यक आहे हे वेगळे सांगायला नको.
शुक्राचा गोडवा थोडक्यात जपावा इतकेच सांगण्यासाठी हे दोन शब्द . आज शुक्राचेच पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आहे .
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment