|| श्री स्वामी समर्थ ||
जलराशीत अग्नीतत्व सध्या मंगळाचे भ्रमण जल तत्वाच्या कर्क राशीतून होत आहे . गेल्या आठवड्यात एका जातकाची पत्रिका बघताना पाण्यापासून काळजी घ्या असे सांगितले होते . नळाचे पाणी चालू आणि गिझर सुद्धा चालू असताना पाण्यात हात घातल्यावर काय होणार , व्हायचे तेच झाले , पाण्यात विजेचा करंट होता . बेशुद्धावस्थेत दवाखान्यात न्यायची वेळ आली . मूळ पत्रिकेत सुद्धा मंगळा समोर हर्शल आहे . असो सगळ्यांनी काळजी घ्या , ऑफिसच्या सकाळच्या घाईत आपण आणि आपल्या मुलांवर सुद्धा अश्या प्रसंगांना सामोरे जाण्याची वेळ येवू शकते . सतर्कतेचा इशारा म्हणून हा लेखन प्रपंच . तसेही आयुष्यात प्रत्येक वेळी जो सावध राहील तोच तरेल. आता कुणी म्हणेल अपघात घडायचे योग असतील तर ते होणारच हे काही शहाणपण नाही. परीक्षेत पेपर कठीण तेव्हाच जातो जेव्हा आपण अभ्यास करत नाही ...एखादी गोष्ट घडणार असेल तरी आपण सावधानता बाळगली तर त्याचा दाह निश्चित कमी होवू शकतो .
परवा एका स्त्रीचे वीस लाख सोशल मिडीयाच्या भुलभुलय्यात गेले. ते कधी मिळतील हा प्रश्न म्हंटले मिळणार नाहीत . इतक्या शिकलेल्या आणि प्रगत युगातील लोक असे कसे फसू शकतात हा प्रश्न आहे . पैसा सगळेच मिळवतात पण तो टिकवता येणे हे खरे कौशल्य आहे . मी म्हंटले गेल्या कित्येक जन्मातील तुमचे हे देणे होते असे समजा . अनेकदा मानसिक त्रास हेच आपले भोग असतात आणि ते भोगूनच संपवायचे असतात , कमी वेळात अधिक पैसे मिळवण्याचे डोहाळे अनेकांना लागतात पण दुर्दैवाने त्याची परिणीती अशी होते , अजूनही पुढे फसवणुकीचे योग आहेत तेव्हा सतर्क राहा . ह्याला काहीही उपाय नाही .
मुळात आपण काही काम करत असताना मोबायील हातात घ्यायचाच कश्याला . राहू आपण बेसावध आहोत तीच वेळ साधतो हे नव्याने सांगायला नको . इतके पैसे कमवायला एखाद्या व्यक्तीला संपूर्ण आयुष्य खर्ची घालायला लागेल . आज आपण अत्याधुनिक युगात आपल्याच गरजा अनेक माध्यमांचा उपयोग करून जसे gpay नेट वाढवून ठेवल्या आहेत पण प्रत्येक गोष्टीला दोन बाजूही आहेत . असो .
स्वयपाक घर , गिझर , इस्त्री , ग्यास ह्या अनेक गोष्टी हाताळताना सावध राहा घाई नडते . स्वयपाक घरातील सुरी कात्री विळी जपून वापरा नेहमीच . भाजणे , कापणे हे मंगळा कडे आहे.
आपण स्वतः काळजी घ्या आणि इतरानाही घ्यायला सांगा .
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment