|| श्री स्वामी समर्थ ||
गाडीचा पहिला गिअर टाकला तर धीम्या गतीने गाडी पुढे जाते म्हणजेच हळूहळू जाते . आपल्या ग्रहमालिकेतील सर्वात धीम्या गतीने चालणारा ग्रह कुठला असेल तर “ शनी “ हाच आपला पहिला गिअर आहे. आपली कर्म चांगली नसतील तर आयुष्यातील प्रत्येक गोष्टीला खीळ लावणारा थोडक्यात आपल्या कामांची गती धीमी करणारा हा शनी आहे . गाडी जर वेगात हवी असेल तर मग चौथा पाचवा गिअर टाकावा लागतो , सगळ्यात जलद गतीने जाणारा ग्रह कुठला आहे तर “ चंद्र “ हाच आपल्या मनाच्या आणि आयुष्याच्या गाडीला वेग देणारा ग्रह आहे . गाडी मागे वळवायची असेल तर राहू केतू आहेतच . गाडी खूप उतावळे पणा करून खड्ड्यात घालणारा मंगळ आयुष्यात वेग हवा पण सीमित हवा हेच सुचवत असतो . तसेच निसर्ग सौंदर्य बघत प्रवासाचा आनंद घेणारा शुक्र जीवनाचे समीकरणच बदलून टाकतो . ज्योतिष हे आपल्या रोजच्या जीवनाशी अत्यंत निगडीत आहे , प्रत्येक क्षणी आपण ज्योतिष जगतच असतो. आपल्यापासून ते वेगळे नाही . रोजच्या जीवनातील साधी सोपी उदा पाहून हा अभ्यास सहज करता येयील , समजेल पटेल आणि आयुष्यभर लक्ष्यात सुद्धा राहील . सहमत ?
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment