|| श्री स्वामी समर्थ ||
गौतम बुद्धांच्याकडे एक माणूस आला आणि म्हणाला तुमच्या मार्गात मी आलो आपल्या विचारांचे अनुकरण केले तर मला काय मिळणार ? महादेवाची , विष्णूची पूजा करून त्यांचे भक्त गोलोकात , शिवलोकात जातात मग मला काय प्राप्ती होणार ते सांगा . बुद्ध म्हणाले कि मी कुठलेही आश्वासन देवू शकणार नाही . समोर एक दिवा तेवत होता तो त्यांनी हातानेच विझवला आणि म्हणाले हेच मिळेल तुला. तेव्हा तो माणूस म्हणाला , मला अंधकार मिळणार का ? मग मी कश्याला तुमचा मार्ग स्वीकारू ? त्यावर गौतम बुद्ध म्हणाले कश्याला हवा तुम्हाला दुसर्याने दिलेला प्रकाश , तुम्ही स्वयं प्रकाशित व्हा. तुमच्या तेजाने , वाणीने दुसर्यांचे जीवन प्रकाशमय होवूदे . प्रत्येक गोष्टीसाठी सतत दुसर्यावर अवलंबून का राहता ? स्वतःचे निर्णय स्वतः घ्या , आत्मनिर्भर व्हा , ज्ञान मिळवा आणि इतरानाही द्या . सर्वांची आयुष्य तेजोमय करा .
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment