|| श्री स्वामी समर्थ ||
अनेकदा 28 32 गुण जुळले तरी विवाह होत नाही किबहुना जाणकार ज्योतिषी त्याला परवानगी नाकारेल ह्याची काय कारणे असू शकतील त्याचे थोडक्यात विवेचन करण्याचा प्रयत्न करत आहे.
कालच एका मुलासाठी स्थळ सांगून आले होते , वडील पत्रिका घेवून आले. 28 गुण जुळत होते म्हणून फार आशेने मला अनेक प्रश्न विचारत होते जणूकाही आता लग्नाचा मुहूर्त काढणेच बाकी होते . पण इतके सगळे सोपे असते तर अजून काय हवे होते .
गुण जुळले म्हणजे पूर्णविराम द्यायचा का तर अर्थात नाही , प्रत्येक ग्रहाचा नवमांश पहिला पाहिजे , धन चतुर्थ आणि दोघांच्याही वैचारिक बैठकीसाठी लग्न जुळते कि नाही ते पहिले पाहिजे. मुलीचे आणि मुलाचे लग्न जुळत नव्हते त्यामुळे तिथूनच तू तू मै मै होणार हे निश्चित . चतुर्थ भाव बिघडलेला , कुटुंब संसार टिकवण्या कडे कल असणार नाही . अग्निराशीत ग्रहांची भाऊगर्दी म्हणजे प्रचंड आत्मविश्वास , महत्वाकांक्षा आणि आरे ला कारे करणारच . त्यात पंचम भाव बिघडलेला , मुले होण्याची शक्यता कमी. त्याचे कारण मुळातच दोघांमध्ये जिथे प्रेम भावना फुलणार नाही तिथे मुले कशी होतील. नेहमी पंचमाचे सुख बघायच्या आधी सप्तम भावाचे सुख पाहावे त्यावरून अनेक उत्तरे आपसूक मिळतात . शुक्र सिंहेचा त्यामुळे आकर्षक व्यक्तिमत्व पण तेव्हडे संसार करायला पुरत नसते , हा नवमांश मध्ये कन्या राशीत . चंद्र सुद्धा दोन्ही कडे बराच , उत्तम नाही .मुलीच्या पत्रिकेत विवाह योग नक्कीच आहे पण तो टिकवण्यासाठी लागणारी ग्रहस्थिती नव्हती. गुण म्हणजे सर्व काही नाही पुढेही खूप काही आहे त्याकडे गुण जुळतात म्हणून इतर बाबीकडे दुर्लक्ष केले तर पदरी निराशा येयील ह्यात शंका नाही .
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment