|| श्री स्वामी समर्थ ||
ज्योतिष शास्त्रात असंख्य योग आहेत . ग्रहांची फळे तेव्हाच मिळतात जेव्हा त्या ग्रहांचे दुसर्या ग्रहांशी योग होतात . मग ते पाप ग्रह असोत अथवा शुभ ग्रह . आज आपण ह्या योगांच्या शृंखलेतील “ शकट “ योग कसा निर्माण होतो ते पाहू. हा योग चंद्र आणि गुरूमुळे होतो. काल पुरुषाच्या कुंडलीत चतुर्थ भावाचा कारक चंद्र असून भाग्य भाव गुरु कडे आहे . ह्या दोन भावांचे स्वामी एकमेकांपासून जर ६ ८ १२ ह्या भावात स्थित असतील तर ह्या योगाची निर्मिती होते . फलदीपिका , सर्वार्थ चिंतामणी , जातक पारिजात ह्या ग्रंथातून आपल्याला ह्या योगाबद्दल अधिक माहिती मिळेल . ह्या योगामुळे आयुष्यात अनेक चढ उतार बघायला मिळतात , स्थिरता येत नाही .
चंद्रापासून गुरु ६
ला ८ वा किंवा १२ वा असेल तेव्हा ह्या योगाची निर्मिती होते. चंद्र गुरूच्या
केंद्रात आला तर शकट योग भंग होतो . चंद्र किंवा गुरु स्वराशीत , उच्च राशीत असतील
तरीही शकट योगाची अनुचित फळे मिळत नाहीत .चंद्र किंवा गुरु केंद्रात असेल स्वराशीचा , उच्चीचा
असेल तरी हा योग निष्फळ ठरतो. त्याचप्रमाणे मंगळाची दृष्टी चंद्रावर असेल तरी शकट
योग निष्फळ ठरतो. हा योग दोन्ही ग्रहांच्या अंशावर अवलंबून असून लग्नावर अवलंबून
नाही . 15 अंशापेक्षा अधिक अंशाचा फरक दोघात असेल तर हा निष्फळ ठरणार . शकट योगात
व्यक्तीला भाग्य साथ देत नाही असे अनेक पत्रिकांचा अभ्यास केल्यावर निदर्शनास येते
. ह्या योगाबद्दल अजूनही बराच लिहिता
येयील तूर्तास इथेच थांबते .
सौ. अस्मिता
दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment