Friday, 9 April 2021

सामान्यातील “ असामान्य ”

|| श्री स्वामी समर्थ ||

श्री. उज्ज्वल पावले 


साल २०२० सुरु झाले आणि करोनाचे जगभरात थैमान सुरु झाले. कुणालाही न जुमानता त्याने आपल्या सर्वाना घरात बंदिस्त केले. इतका मोठा विश्वसंहार होईल असे वाटलेच नव्हते. नोकरी व्यवसाय, संपूर्ण अर्थचक्र जणू स्तब्ध झाले. अचानक आलेल्या ह्या संकटाने भांबावून गेलेल्या तुम्हा आम्हाला हे सर्व पचवणे खचितच सोपे नव्हते.

ह्या सर्वावर काळ हे एकच औषध होते हे खरे असले तरी हा काळ जाता जात नव्हता. प्रत्येकाच्या मनात नकारात्मक विचारांच्या लहरी अधिराज्य करू लागल्या होत्या. अशा ह्या काळात जेव्हा काहीच वेगळे घडणे अपेक्षित नव्हते तेव्हा झूम ॲपवरील “वेदचक्षु व्याख्यानमालेने” सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

प्रतिदिन वेगवेगळ्या विषयांवरील व्याख्याने घेवून येणारी ही संकल्पना जनमानसात काही काळातच प्रसिद्धीच्या शिखरावर गेली. दिवसातील २ तास तरी मनाला स्पर्शून जाणारे आणि त्यावर चिंतन मनन करायला लावणारे असंख्य विषय ही ह्या व्याख्यानमालेची खासियत होती.पुन्हा रुटीन सुरु होयीपर्यंत, मरगळ झटकून, मनाला पुन्हा उभारी देण्यात यशस्वी झाली. 

हा उपक्रम यशस्वीपणे राबवणारे आणि ह्या सर्वाचे करते करवते श्री. उज्ज्वल पावले ह्यांच्याशी ह्याबाबत दिलखुलास चर्चा करायला मिळणे हे मी माझे भाग्य समजते. आज माझ्या ब्लॉगवरील "मला भावलेले व्यक्तिमत्व" ह्या सदरात सरांविषयी लिहिताना अत्यानंद होत आहे. 

वेदांग ज्योतिष शास्त्रात "एम. ए." तसेच वास्तुसंबंधी पदवी प्राप्त केलेल्या उज्ज्वल सरांचे बालपण पैठण येथे गेले. संस्कृतीचा वारसा लाभलेल्या पैठण येथील अध्यात्मिक वातावरणाचा परिणाम त्यांच्या मनावर झाला आणि ह्या विषयाची गोडी,ओढ निर्माण झाली. पुढे काही काळ नोकरीच्या निम्मित्ताने त्यांचे मॉरिशस इथे वास्तव्य झाले. भारतात परतल्यावर त्यांनी एक वेगळी वाट निवडली.

लहानपणापासून गूढ शास्त्राबद्दल कुतूहल आणि आकर्षण असल्यामुळे ह्यातच सखोल अभ्यास करण्याचा त्यांनी मानस केला आणि अनुषंगाने ज्योतिष्यादी विषयांकरिता सहाय्यक असे सॉफ्टवेअर वितरक व विक्रेता म्हणून स्वत:चा व्यवसाय सुरू केला.

एखाद्याला हे सॉफ्टवेअर विकताना किंवा त्याबद्दल माहिती देताना आपल्यालाही त्या विषयाची सखोल माहिती असणे आवश्यक असते. ह्या जाणीवेने त्यांनी ज्योतिष शास्त्राचे शास्त्रशुद्ध धडे गिरवण्याचे ठरविले.

पूर्वसुकृत चांगले म्हणून त्यांना गुरुवर्य श्री.यशवंत मग्गीरवार, डॉ. सौ. चंद्रकला जोशी, श्री. रवींद्र रांजणीकर, डॉ. श्री विजय इंगळे, श्री विवेक दीक्षित, सौ. विद्या सांगवीकर, डॉ. श्री. रमेश परोपकारी, सौ. राजश्री मुंदडा, श्री. विश्वनाथ कावळे, सौ. चित्रा पांडे, डॉ. श्री. मधुकर कोनार्डे, डॉ. श्री वैभव देशमुख यांच्यासारख्या ज्योतिष शास्त्रातील विद्यमान व्यक्ती गुरूवर्य म्हणून लाभल्या आणि पुढे व्यासंग वाढत गेला. 

आज पूर्ण वेळ उज्ज्वल सर ह्याच क्षेत्रात काम करीत आहेत. अनेक क्षेत्रात कामे केली पण ह्या क्षेत्रातील काम मला मिळणाऱ्या पैशांपेक्षाही कितीतरी पटीने अधिक आनंद आणि समाधान देत आहे ह्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला.

श्री. अतुलकुमार कुलकर्णी, श्री. अभयशास्त्री सोनवणे ह्या सहकाऱ्यांसोबत त्यांनी ह्या विषयावरील अनेक कार्यशाळा आयोजित केल्या आहेत.

कुठलेही काम करायचे तर अंतःकरणापासून! आणि द्यायचे तर भरभरून! हे तत्त्व त्यांनी कायम जोपासले. स्वतःला आणि इतरानांही त्यातून ज्ञानप्राप्ती आणि समाधान मिळेल ह्याकडे त्यांचा कटाक्ष कायम असतो.

लॉक डाऊनच्या काळात झूम च्या माध्यमातून सुरुवातीला सॉफ्टवेअरच्या डेमो करिता काम करण्याचे त्यांनी ठरविले. ज्योतिष शास्त्राचे अभ्यासक असल्यामुळे बरेच वेळा उज्ज्वल सर व्याख्यान, अधिवेशनाला जात पण तेथील वक्त्यांना आपला विषय मांडण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसे. हे त्यांच्या लक्षात आले. त्याची खंत त्यांना सतत होती. आपण ह्यासाठी काही करू शकतो का? अशा अनेक वक्त्यांना त्यांच्या विषयावर उत्स्फुर्तपणे बोलता यावे आणि विषयाचे इतरांना सखोल ज्ञान व्हावे या कल्पनेतून "वेदचक्षु व्याख्यानमाला" ह्या व्यासपीठाची निर्मिती झाली आणि एका वेगळ्याच पण अभूतपूर्व अशा पर्वाला सुरवात झाली. 

ॲडव्होकेट सौ. सुनिता पागे मॅडम यांच्या व्याख्यानाने ३ जून पासून सुरु झालेली ही व्याख्यानमाला १५ सप्टेंबरच्या गुरूवर्या श्री. श्रीराम भट यांच्या व्याख्यानापर्यंत अविरत सुरु राहिली. ह्या १०१ व्याख्यानांच्या संकल्प पूर्तीस अनेक थोरामोठ्यांचे आशिर्वाद लाभले, ज्योतिष शास्त्रातील अनेक नामवंत, दिग्ग्ज्ज मंडळींनी इथे हजेरी लावली. तसेच यामध्ये ज्योतिष शास्त्राची आवड असणाऱ्या हौशी आणि व्यासंगी अशा सर्वांनीच मोठ्या संखेने भरभरून प्रतिसाद दिला.

येथील संवाद, परिसंवाद, विचारांचे आदानप्रदान ह्यामुळे यात एक वेगळीच रंगत आली. सर्वप्रथम एका आठवड्याचे आयोजन करावे ह्या हेतूने सुरूवात केली होती. पण एकंदरीत मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे पुढे त्यात १०१ व्याख्यानांची पुष्पे कधी गुंफली गेली हे समजलेच नाही.

अल्पावधीत लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान झालेल्या ह्या व्याख्यामालेने अनेक विक्रम मोडले आहेत. उद्या कुठल्या विषयावर व्याख्यान होणार ह्याची उत्कंठा रोज वाढत गेली. ह्या क्षेत्रातील अनेक उत्तम अभ्यासकांना त्यांचे विचार, त्यांनी केलेले संशोधन इतर अभ्यासकांपुढे मांडण्यासाठी ही सुवर्ण संधी होती आणि त्यांनी त्याचे अक्षरशः चीज केले. 

फल ज्योतिष, KP, अंकशास्त्र, अष्टकवर्ग, रमल शास्त्र, वास्तुशास्त्र इ. विषय इथे समाविष्ट झाले. पुढे लोकाग्रहास्तव ह्या विषयावरील प्रशिक्षण देण्यासाठी अनेक ऑनलाईन कार्यशाळाही झाल्या. ज्याला उदंड प्रतिसाद लाभला.

त्यांच्या या अभूतपूर्व कार्याची दखल घेत मराठी ज्योतिषी मंडळाने सर्वप्रथम त्यांना "ई-ज्योतिष प्रचारक" हा पुरस्कार जाहीर केला.

बृहन महाराष्ट्र ज्योतिषी मंडळ या संस्थेने "कार्यगौरव पुरस्कार" देऊन त्यांना सन्मानित केले.

तसेच २४ नोव्हेंबर, २०२० या त्यांच्या ५५ व्या वाढदिवशी सौ. मुग्धा सारंग रानडे यांच्या आदिशक्ती वास्तु ज्योतिष, नाशिक या संस्थेने "ज्योतिष कृतज्ञता मानपत्र" देऊन त्यांचा गौरव केला. याच दिवशी अथर्व ॲस्ट्रॉलॉजी ऑफिसचे संस्थापक श्री. अतुलकुमार कुलकर्णी, व श्री. अभयशास्त्री सोनवणे यांनी संयुक्तपणे "ज्योतिर्मयी ज्योतिषी" असे स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला. श्री. सौरभ नाफडे, पुणे यांनी "विशेष रोख पारितोषिक" देऊन त्यांच्या कार्याची दखल घेतली.

२६ जानेवारी, २०२१ रोजी सेलिब्रिटी स्टार ॲस्ट्रॉलॉजर सौ. जयश्री बेलसरे यांनी " मानपत्र आणि रोख ₹४०००" चे विशेष पारितोषिक समारंभ पूर्वक देऊन त्यांच्या कार्याचा बहुमान केला.

ह्या यशाचे सर्व श्रेय उज्ज्वल सर आपल्या सर्व टिम ला देतात तसेच ज्यांनी ह्या व्याख्यानमालेला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदत केली आणि ही संकल्पना पूर्तीस नेण्यासाठी अविश्रांत मेहनत केली त्या सर्वांचे ते मनापासून ऋणी आहेत. मी फक्त निमित्त आहे असे विनम्रपणे सांगताना ते पुढे म्हणाले की, संघटित होऊन कोणतेही काम अधिक चांगल्या रितीने परिपूर्ण होऊ शकते. 

विविध देशातून ह्या व्याख्यानमालेची लोकप्रियता वाढली असून अमेरिकेतूनही काही ऑनलाईन व्याख्यानं यशस्वीपणे आयोजित केली आहेत. त्यामुळे वेदचक्षु व्याख्यानमाला खऱ्या अर्थाने ग्लोबल झाली असून लोकांच्याही अपेक्षा खूप वाढल्या आहेत. अनेक स्वयंसेवक उत्स्फूर्तपणे आपले योगदान त्यात देत आहेत. सौ. मुग्धा सारंग रानडे, नाशिक, श्री. सौरभ नाफडे, पुणे, सौ. माया कोटीवाले, पुणे, सौ. सुषमा नलावडे, ठाणे यांचा उल्लेख आवर्जून त्यांनी केला. विषयाची निवड करणे त्यासाठी त्यातील तज्ञ वक्त्यांची निवड करून त्यांच्याशी संपर्क करणे, व्याख्यानाची तारीख, वेळ निश्चित करणे; एक ना दोन अशा अनेक गोष्टींची जुळवाजुळवी करणे खचितच सोपे नाही.पण वेदचक्षु च्या संपूर्ण टिमने उज्ज्वल सरांच्या नेतृत्वाखाली हे शिवधनुष्य लिलया पेलले आहे. ह्यासाठी त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.

मंडळी, ह्यासाठी आपले पूर्वसुकृत सुद्धा तितकेच चांगले असावे लागते, चांगल्या विचारांना मूर्त स्वरूप मिळणे आणि ती संकल्पना प्रत्यक्षात उतरवायला लागणारी सक्षम टिम लाभणे हे देखील एक भाग्यच आहे नाही का?

वेदचक्षुचा मेडिकल, आयुर्वेद आणि इतरही तत्सम क्षेत्रे ह्या विषयावरील व्याख्यानांचे आयोजन करण्याचा मानस आहे हे सांगताना उज्ज्वल सर म्हणाले अनेकांकडून ह्यासाठी असंख्य सूचनाही येत आहेत, ह्या सर्वाचा विचार आम्ही निश्चितच करत आहोत.

मंडळी २०२० सालाने आपल्या आयुष्याला अगदी अनपेक्षित कलाटणी दिली. अनेकांनी आपले आप्तेष्ट गमावले. तर अनेकांनी आपल्या नोकऱ्या. उद्योगधंदे बंद झाले आणि अर्थचक्रच जणू थांबले. ह्या काळात माणूस माणसाचा दुश्मन झाला, भविष्याच्या काळजीने अनेकांना घेरले आणि संपूर्ण समाजाचीच मानसिकता बिघडली. दिवसेंदिवस घरात करायचे तरी काय आणि वेगळे काही करायला मनाची उमेदही नव्हती, अशा वेळी 

"वेदचक्षु व्याख्यानमालेने" काही अंशी का होईना, लोकांना काही काळ एका वेगळ्या विश्वात नेले, त्याच त्याच विचारांपासून परावृत्त केले. रिकाम्या डोक्याला काहीतरी चालना मिळाली. ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. उज्ज्वल सरांनी ज्ञानदानाचा यज्ञ पेटवला आणि करोनाच्या संकटापासून काही क्षण तरी सर्वाना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.

रिकाम्या वेळेचा खऱ्या अर्थाने सदुपयोग झाला. माननीय डॉ. श्री. यशवंत मग्गीरवार, श्री. व. दा. भट सर, श्री. दादा शेवाळे, श्री. उदयराज साने, सौ. सुनिता साने, श्री. सिद्धेश्वर मारटकर, श्री. नारायण सुखटणकर, डॉ. निलेश बी. कुलकर्णी, सौ. जयश्री बेलसरे, श्री. विजय जकातदार, श्री. नंदकिशोर जकातदार, सौ. शिल्पा अग्निहोत्री, श्री. प्रदीप पंडित, प्रा. सौ. स्मिता गिरी, सौ. सविता महाडिक, श्रीमती रजनी साबदे, डॉ. सौ. चंद्रकला जोशी, डॉ. श्री. विजय इंगळे, डॉ. श्री. रमेश परोपकारी, सौ. राजश्री मुंदडा, सौ. विद्या सांगवीकर, श्री. अविनाश मग्गीरवार, अशा अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभल्यामुळे आणि त्यांचे विचार ऐकायला मिळाल्यामुळे ह्या व्याख्यानमालेला जणू चार चांद लागले. 

आज जनमानसात प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या "वेदचक्षु" व्याख्यानमालेकडून लोकांच्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढत आहेत. पुढेही विविध विषयावरील अत्यंत दर्जेदार अशी व्याख्याने आपल्या सर्वांनाच ऐकायला मिळतील ह्याबद्दल शंकाच नाही. ह्याबद्दल अधिक माहिती देताना ते म्हणाले कि मोफत व सशुल्क मिळून आतापर्यंत एकूण सुमारे ५०० हून अधिक कार्यक्रमांची नोंद आहे. तसेच १०१ कार्यशाळांचा संकल्प आहे. त्यापैकी ३० कार्यशाळा झाल्या आहेत. सर्व संस्थांचे सहकार्य लाभल्यास १०१ अधिवेशनंही किमान महाराष्ट्रभर घ्यावेत, असाही त्यांचा मानस आहे. 

आपल्याला ज्या गोष्टीची आवड आहे त्या क्षेत्रात काम करायला मिळणे यासारखे सौभाग्य ते काय? ज्योतिष शास्त्रासारख्या क्षेत्रात काम करायला मिळाल्याचा आनंद उज्ज्वल सर संपूर्णतः उपभोगत आहेत ज्यामध्ये त्यांना आत्यंतिक समाधानही लाभत आहे. अनेकांकडून ही विद्या अवगत करूनही आज स्वतःला विद्यार्थीच समजतात. आणि प्रत्येकाकडून काही ना काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतात.

ह्या सर्वासोबत ज्योतीषांसाठी अद्ययावत Software विक्रीचे काम सुद्ध ते करत आहेत. हे Software विकताना त्यातील ज्योतिष शास्त्र स्वतःला अवगत असावे म्हणूनच त्यांनी ह्या शास्त्राचे धडे गिरवले.

आज भारतातील बहुतेक सर्वच सॉफ्टवेअर कंपन्यांची डिलर/डिस्ट्रीब्युटरशीप त्यांच्याकडे आहे परंतु २०-२१ वर्षांपूर्वी अर्थात सुरूवातीला हे एक मोठे आव्हान होते. अशा प्रकारे लीगल सॉफ्टवेआर तेव्हा कुणी विकत घेत नसत. कारण बहुतेकजन अज्ञानापोटी पायरेटेड कॉपीचा वापर करीत. आज उज्ज्वल सर ह्या क्षेत्रातील लायसंस सॉफ्टवेअर्सची विक्री करणारे कदाचित एकमेव पूर्णवेळ ज्योतिषी तसेच ट्रेंडसेटर असावेत. ज्यांचा ज्योतिष शास्त्राचा सखोल अभ्यास तसेच सॉफ्टवेअर, टेक्नॉलॉजीची संपूर्ण माहिती आहे. कोणते सॉफ्टवेअर कसे वापरायचे त्याची तंत्रशुद्ध माहिती, त्यातील बारकावे ग्राहकांना देत असतात त्यामुळे ग्राहकांना पत्रिका बनवताना त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने करता येतो.

प्रत्येक गोष्ट अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने करण्याकडे सदैव कल असणाऱ्या उज्ज्वल सरांनी "वेदचक्षु" ला एखाद्या नवजात शिशुसारखेच वाढवले आहे असे म्हंटले तर वावगे ठरू नये. 

"ईश्वरेच्छा, ईश्वरकृपा, समस्त गुरूजनांचे आशिर्वाद, आप्तेष्ट, मित्रमंडळी यांच्या शुभेच्छा तसेच उत्सुकता असलेले ज्ञानपिपासू श्रोते, दर्शक यामुळे हे शक्य झालं असे मी समजतो." अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली. अजूनही अनेक विषय आणि अनेक क्षेत्रं आहेत तसेच मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषेतून फलादेशाची तयारी करून, मराठी ज्योतिषी सक्षम व्हावा यांकरिता व्यापक प्रयत्न सुरू आहेत हे देखील त्यांनी नमूद केले.

वेदचक्षु सारख्या सन्माननीय व्यासपीठाची निर्मिती करून अनेक अभ्यासकांना त्यांनी पुढे येण्याची संधी दिली. ह्या क्षेत्रातील अनेक जाणकार नावारूपाला आले आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचले.

कोरोनाच्या अत्यंत कठीण काळात लोकांना चांगला विचार देऊन त्यात गुंतवून ठेवण्यात आणि सकारात्मकता रुजवण्यात "वेदचक्षु व्याख्यानमालेच्या" माध्यमातून उज्ज्वल सरांनी केलेला प्रयत्न अत्यंत स्तुत्य आहे. 

वेद्चक्षुचा प्रवास असाच अविरत चालू राहू दे हीच देवाजवळ प्रार्थना! तसेच उज्ज्वल सरांनी त्यांचा बहुमुल्य वेळ आपल्याला दिला ह्याबद्दल आपल्या सर्वांतर्फे त्यांचे मनापासून आभार!

आपण स्वतःसाठी नेहमीच जगतो. पण इतरांसाठी जगणारी, स्वार्थ परमार्थाच्या ही पलीकडे जाऊन, इतरांना काहीतरी देऊ पाहणाऱ्या व्यक्ती फारच विरळ असतात. उज्ज्वल सर त्यापैकीच एक आहेत! शांत मुद्रा आणि धीरगंभीर व्यक्तिमत्त्व, विद्वत्तेचे तेज असूनही अहंकाराचा कुठेही लवलेश नसल्यामुळे ते समोरच्याला आपलेसे करतात!

अशा गुरुतुल्य व्यक्तीच्या कार्याबद्दल माझ्या ब्लॉग वर लिहिताना मला मनापासून आनंद होतो आहे!

आपल्या सारख्या सामान्य माणसातच अशी "असामान्य व्यक्तिमत्त्व" असतात. आगामी नूतन संवत्सर उज्ज्वल सरांना आनंदाचे, सौख्याचे, भरभराटीचे आणि त्यांनी योजलेल्या सर्व संकल्पनांच्या पूर्तीचे जाऊ दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना! इतरांसाठी सतत काहीतरी करण्याचा मानस ऊराशी असलेल्या श्री. उज्ज्वल पावले सरांच्या ह्या "ज्ञानयज्ञा" ची गिनीज बुकात नोंद व्हावी हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना.


अस्मिता

लेख आवडला तर  अभिप्राय लिहायला विसरू नका.

antarnad18@gmail.com

 

#antarnad#vedchakshuvyakhyanmala#ujjvalpawale#astrology#jyotishktta#dnyanyadnya#limkabookofrecord#guinnessbook#licencesoftware#astrocomp#kismat#astrooffice

 #अंतर्नाद#वेदचक्षुव्याख्यानमाला#उज्ज्वलपावले#ज्योतिषशास्त्र#ज्योतिषकट्टा#ज्ञानयज्ञ#लिमकाबुकऑफरेकोर्ड#गिनीजबुक#लायसन्ससोफ्टवेअर#किस्मत

 

 

  

14 comments:

  1. Khup Chan lihile aahe Madam.Vedchakshu mule barich navin mahiti milali.

    ReplyDelete
  2. अभूतपूर्व अशी कामगिरी वेधचक्षू तर्फ सरांनी केलेली आहे आमच्यासारख्या बरेच अभ्यासकांना याचा खूपच ज्योतिष शास्त्र शिकण्यासाठी उपयोग झाला आहे पावले सरांचे आणि मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद आभार

    ReplyDelete
  3. पावले सरांच्या कार्याचा अप्रतिम कार्यगौरव करणार लेखन धन्यवाद
    अभिनंदन

    ReplyDelete
  4. खूपच स्तुत्य कार्यक्रम! कोरोनाच्या भयग्रस्त वातावरणात, ज्योतिष प्रेमींना खिळवून ठेवण्याचे काम अतिशय सुसंगत पणे नियमबध्धतेने केले.अतिशय स्तुत्य कार्यक्रम! त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे खूप अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद!

    ReplyDelete
  5. Really appreciate sir .. wish you all the best . For everything.. तुमच्या बद्दल माहिती वाचून फार बरे वाटले पुन्हा एकदा भावी आयुष्यात निश्चित प्रगती होईल ।। धन्यवाद सर ।।

    ReplyDelete
  6. लेखाशी पूर्णतया सहमत आहे,सरांच्या व्याख्यानांच्या उपक्रमामुळे locked down खूपच सुसह्य झाला, कधी ऐकायला मिळाली नसती अशी माहिती रोज मिळाली आणि ती सुद्धा मोफत,सरांचे आम्ही खूपच रूनी राहू

    ReplyDelete
  7. सुप्रिया भारस्वाडकर9 April 2021 at 09:55

    खूप छान लिहिलंय

    ReplyDelete
  8. पावले सऱ्यांचा कार्याचा अप्रतिम लेख आहे व सरांचे कार्य फार मोठे आहे

    ReplyDelete
  9. आदरणीय पावले सरांमुळे ज्योतिष विश्वातील नवीन संकल्पना , वेगवेगळे अनुभव, विषय समजले, वेदचक्षु व सक्षम ज्योतिषी या दोन्ही ग्रुप मधून सरांकडून व वर्ग गुरूंकडून (सौरभ नाफडे सर, मुग्धा रानडे मॅडम, इंदुलकर मॅडम, अतुल कुलकर्णी सर) सखोल अभ्यास व विचार कळाले,या बद्दल खूप आभारी आहे.
    माझ्या या ज्योतिष विश्वातील प्रत्येक कार्यात या ज्ञानाचा प्रसार, वापर करून ,मी नक्कीच माझ्या कडे येणाऱ्या क्लाएंट ला उत्तम प्रकारे मार्गदर्शन करेन .
    धन्यवाद सर

    श्री अमित देशपांडे,
    कमलाकर ज्योतिष कार्यालय, संगमनेर
    संपर्क-02425222241

    ReplyDelete
  10. Thank you sir 🙏
    Chef Hansa Manoj Karia
    9769457788

    ReplyDelete
  11. श्री पावले सर म्हणजे ज्योतिष शास्रा मधील खूप मोठे व्यक्तिमत्त्व आहे । त्यांच्या कडे असलेले सॉफ्टवेअर म्हणजे अल्लउद्दीन चा चिराग आहे । त्यांनी हाती घेतलेले कार्य प्रशंसनीय व उल्लेखनीय आहे । त्यांच्या या प्रयत्ना मुळे ज्योतिषशास्त्रा ला खूप चांगले भवितव्य आहे । धन्यवाद ।।
    विजय शेराल, औरंगाबाद

    ReplyDelete
  12. उज्वल सरांना त्यांनी हाती घेतलेल्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा....

    ReplyDelete
  13. 💯🙏Pawale Sir Hat's off to Your unconditional guidance devotion dedication kind and kindness. All of us are very very Grateful and proud of You Sir. God always bless You. Gratitude Gratitude Gratitude to You and Universe also. Regards 💯👌👍🙏💐🌹

    ReplyDelete
  14. खरंच, उज्वल पावले सर म्हणजे कोरोना काळात आलेल्या अंधाऱ्या जंगलात सापडलेली एक उज्वल वाटच म्हणावी . आमच्यासारख्या नविन ज्योतिष अभ्यासकांना ती वाट सापडली हे ही आमचे भाग्यच. आम्हाला आमचा अभ्यास घरबसल्या सुरु ठेवता आलाआणि अनेक व्याख्यानांचा लाभ घेतला.

    ReplyDelete