||श्री स्वामी समर्थ ||
आपल्यावर पाश्चात्य देशातील अनेक गोष्टींचा पगडा आहे. तरीही त्यांच्या अनेक गोष्टी आपल्या संस्कृतीला न पेलवणाऱ्या आहेत. तिथे विवाहाच्या संकल्पनाच वेगळ्या आहेत आता आपल्याकडेही विवाह कश्यासाठी ? मुळात विवाहसंस्थेचे उद्दिष्ट काय हे लक्ष्यात घ्यायची गरजच उरलेली नाही असे चित्र समोर येते आहे. आजकालची तरुण पिढी विवाहा साठी फारशी उत्सुक नाही. म्हणूनच मुलमुलींची विवाहाची वय पुढे गेली आहेत .
पूर्वी मुलीचे लग्न झाले कि मुलीची “ दिल्या घरी तू सुखी राहा “ असे म्हणून पाठवणी होत असे. पण आता बदलत्या काळानुसार आईच मुलीला सांगते “ जमत नसेल तर सरळ निघून ये “ अर्थात ह्याला अनेक कंगोरे असतीलहि. पण पूर्वीच्याकाळी मुलीने विवाह झाल्यानंतर फक्त सणासुदीला माहेरी यायचे हीच प्रथा होती . तिने कायमचे माघारी परतणे हे कल्पनेबाहेरचे होते . असो
विवाह झालाच तर तो टिकवण्याकडे कल असला पाहिजे पण तेही आजकाल दिसत नाही उठ सुठ पापड मोडला कि घे घटस्फोट असेच काहीसे चित्र आहे आणि हे समाजाच्या आणि पुढील पिढीच्या भविष्याच्या दृष्टीने नक्कीच हिताचे नाही .
घटस्फोट घेणे हे फारसे विशेष न वाटणाऱ्या लोकांना त्याच्या परिणामांचा विचार सुद्धा करण्याची गरज वाटत नाही हि खेदाची गोष्ट आहे. मनात आले कि लगेच करून टाकायचे .
आपल्या संस्कृतीत विवाह संस्थेची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत आणि ती टिकवणे फुलवणे आणि त्याचे महत्व अबाधित ठेवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.
बरेच वेळा विवाहानंतर विभक्त होण्याची कारणे अत्यंत नाजूकही असू शकतात ज्याचा उल्लेख उघडपणे मुले आपल्या पालकांसमोर करत नाहीत .
विवाह विच्छेदासाठी पत्रिका जेव्हा येते तेव्हा विवाहाच्या संदर्भातील ग्रह ,भाव आणि योग हे बरेचदा खरी परिस्थितीकडे लक्ष वेधून घेतात .
वरवर सहज सोपी वाटणारी एखादी गोष्ट हि अभ्यासानंतर गंभीर असू शकते आणि ती म्हणजे दोघातील शरीरसुख किंवा लैंगिक आकर्षण . मुळातच “ त्या दोघांनी ” एकत्र येवून त्यांचा वंश वाढवण्यासाठी समाजाने दिलेली परवानगी म्हणजे “ विवाह “.
माणसाच्या अनेक गरजा आहेत त्यात मानसिक गरजेसोबत शारीरिक गरज सुद्धा आहे. मुळात त्या दोघात सौख्य नांदले पाहिजे . ती दोघे मनाने आणि शरीराने एकत्र आली कि त्यांच्या नात्यात गोडवा निर्माण होवून ते नाते आपोआपच बहरणार आहे .
त्यानंतर त्या दोघांचे कुटुंब , इतर आप्तेष्ठ आणि समाज आणि ह्यासाठी दिला पाहिजे तो पुरेसा वेळ . हल्ली सगळा इंस्तंट चा जमाना आहे. त्यामुळे संयम हा लोप पावलेला आहे. विवाहा सारख्या पवित्र बंधनाला आता कायद्याची झालर लागलेली दिसून येते.
त्या दोघांमधील वैवाहिक संबंधांचा विचार करताना आपल्याला वैवाहिक सुखाचा कारक ग्रह शुक्र ह्याचा सर्वप्रथम विचार केला पाहिजे . त्याखालोखाल गुरु चंद्र आणि रवी . स्त्रीच्या पत्रिकेत पतीकारक म्हणून रवी आणि मंगळ सुद्धा बघावा लागेल कारण मंगळ हा कामुकता देणारा ग्रह आहे.
पूर्वीच्या काळी मंगळाच्या पत्रिकेची धास्तीच घेतली जात असे पण आता तसे नाही. आत्ताचे जीवन हे धकाधकीचे आहे आणि ते जगायला लागते ती धमक ,जिद्द आणि धडाडी . सकाळी घरचे आवरून सर्वांचे डबे भरून ८ ची लोकल गाठून ,कार्यलयातील कामाचा ठीग उपसून पुन्हा संध्याकाळी थकून घरी आल्यावरही सकाळचाच पाढा पुन्हा गिरवायचा हे सोप्पे खचितच नाही. मुंबई पुणे नोकरी करणार्याही स्त्री पुरुष आहेत.
तेव्हा ह्या सर्वासाठी उमेद द्यायला मंगळा सारखा ग्रह पाहिजे जो धाडस शौर्य , उर्जा , शारीरिक शक्ती प्रदान करतो. मंगळाची मुलगी म्हणजे विवाहात अडचणी निर्माण करणारी हा इतकाच विचार करून चालणार नाही .मंगळाची मुलगी अरे ला कारे करणारी उद्धट म्हणून नको .पाहिजे तिथे तिने बोललेच पाहिजे हि आज काळाचीच गरज आहे. तात्पर्य काय तर जगण्यासाठी मंगळ हवाच .इतके साधे सोपे आहे ते .
त्या दोघांमध्ये प्रीतीचा बहार फुलवणारा शुक्र हा सुद्धा पत्रिकेत सळसळत्या उर्जेशिवाय व्यर्थ ठरेल. कॉलेज मध्ये एखाद्या मुलीला गुलाब द्यावा हि भावना मनात आणून देणारा शुक्र पण तो तिला द्यायचे धाडस देणारा हा मंगळ . तो नसेल तर एक दिवस तीच तिच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका त्याच्या हातात ठेवेल आणि त्याची सगळी स्वप्ने स्वप्नेच राहतील.
प्रत्येक चांगल्या गोष्टींसाठी गुरूंचा आशीर्वाद लागतो त्यामुळे गुरूचाही विचार व्हावा.
मंगळ हा कामुकता देणारा ग्रह आहे आणि तो लैंगिक उर्जेसाठी सुख प्रदान करण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे जर त्या दोघांमध्ये शारीरिक सुखाची उणीव राहत असेल तर नक्कीच मंगळ कमजोर असल्याचे प्रथमदर्शनी निदान आपण काढू शकतो . तसेच शुक्राचाही विचार अर्थात होणे गरजेचे आहेच .
पत्रिकेतील शुभ गुरु परस्परातील संबंध टिकवण्याकडे कल देयील. पण मंगळ खराब असेल तर दाम्पत्य जीवन हे लैंगिक संबंधांचा विचार करता अपूर्णच राहते आणि हेच सगळ्यात मुख्य कारण एकमेकांपासून विभक्त होण्याचे असू शकते.
आजही आपल्या समाजात आपल्या संस्कार, चालीरीती आणि परंपरा घरातील वडील धार्या मंडळींचा मान ठेवताना आमच्या शारीरिक संबंध आनंददायी नाहीत हे उघड बोलण्याचे धाडस मुले करत नाहीत . आमचे पटत नाही हे वरवरचे कारण सांगितले जाते आणि ते घरातील मंडळीना प्रचंड बुचकळ्यात टाकणारेही असते कारण वरकरणी सगळे छानच दिसत असते.
एखाद्याची प्रचंड कामुकता आणि दुसर्याला त्याबद्दल वाटणारी निरसता किंवा तितकी ओढ नसणे ह्या गोष्टी दोघानाही दोन टोकाला नेतात .एकाला अपरंपार सुख उपभोगायची इच्छा तर दुसर्याची शारीरिक दुर्बलता ह्याचा मेळ साधायचा तरी कसा..
थोडक्यात मंगळ चांगला नसेल तर वैवाहिक सुखाला ओहोटी लागते आणि पुढे त्याची परिणीती विभक्त राहण्यात होते .
बरेचदा घरातील मंडळींचा विचार , जबाबदार्या ह्यामुळे लग्न टिकते पण फक्त कागदावर ,मनाने ते कधीच दुरावलेले असतात किबहुना एक होताहोता राहिलेले असतात आणि मग अश्या वेळी आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी घराबाहेर काहीतरी शोधण्याचा विचार मनात येतो. थोडक्यात ह्या सर्व गोष्टींची सुरवात घरापासूनच झालेली असते. मग त्यातून मानसिक ताणताणाव आणि अनेक प्रकारची व्यसने नाही लागली तरच नवल.
म्हणूनच दोघांच्याही पत्रिका मिलन करताना मंगळाचा विचारही झाला पाहीजे.
अस्मिता
antarnad18.blogspot.com
#मंगळ#कामुकता#उग्रतामसिग्रह#उष्णतेचेविकार#विवाह#लैंगिकसुख#मंगळाचीपत्रिका
No comments:
Post a Comment