||श्री स्वामी समर्थ ||
आज संपूर्ण विश्वात करोना चे थैमान चालूच आहे. प्रत्येक राष्ट्र देश जिल्हा आणि प्रत्येक माणूस आपापल्या परीने त्याच्याशी दोन हात करत आहे . अश्या वेळी शेगाव संस्थानाने केलेली लक्षणीय कामगिरी नजरेआड करूच शकत नाही .
शेगाव संस्थानाचे सर्वेसर्वा श्री भाऊसाहेब पाटील ह्यांनी अध्यात्मात कितीही उंची गाठली तरी पाय कसे जमिनीवर ठेवायचे आणि त्याचे भान कधीही सुटू द्यायचे नाही ह्याची शकवण दिली . आपला जन्म हा सेवेसाठी आहे आणि आपण महाराज व्हायला जायचे नाही हे विचार मनात रुजवले. भाऊ ना भेटल्याशिवाय मी आजवर कशीच शेगाव सोडले नाही . त्यांचे माझ्या आयुष्यात प्रचंड योगदान आहे. अध्यात्म काय आहे हे त्यांनी मला समजावून सांगितले. ह्या शक्ती आपल्या आकलनाच्याही बाहेर आहेत हे त्यांचे नेहमीच सांगणे असते. भाऊ हि महाराजांशी प्रत्यक्ष संवाद साधणारी व्यक्ती आहे आणि त्यांचे आशीर्वाद मला लाभले आहेत हे मी माझे परमभाग्य समजते . शेगाव मधील समाधी मंदिराचे काम झाले आणि भुयाराचे रुंदीकरण झाले तेव्हा मी शेगावला गेले होते . वरून खाली येणाऱ्या पायर्यांवरून महाराजांपर्यंत येयीपर्यंत खूप वेळ महाराज दिसत आणि डोळेभरून दर्शन होई. भाऊना भेटल्यावर हे सांगितले त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तराने मी खरच भारावून गेले . ते म्हणाले अग पहिल्या पायरीवरून महाराजांच्या चरणाशी येयीपर्यंत आपली एक माळ होते बघ. माझ्या तर हे घ्यानात सुद्धा आले नव्हते . प्रत्येक क्षण महाराजांच्या सेवेत आणि त्यांच्यासाठी जगणारे भाऊ पाहिले कि समजते सेवा म्हणजे काय आणि ती कशी करायची असते.
भाऊनी आपले सर्वस्व शेगाव संस्थानाला वाहिले आहे . त्यांच्यासारख्या सर्वार्थाने योग्य असणार्या व्यक्तीची निवड त्या पदावर करणारे दुसरे तिसरे कुणी नसून प्रत्यक्ष महाराज आहेत हे वेगळे सांगायला नको.
एकदा गजानन विजय पोथी उचलली कि आपण महाराजांचे झालोच म्हणून समजा . मग आपण त्यांना सोडले तरी महाराज आपला हात कधीच सोडत नाहीत . हीच शिकवण ते आपल्याला प्रत्यक्ष आयुष्यात देत असतात . एखाद्याला आपला म्हंटले कि त्याच्या गुण दोषासकट त्याला स्वीकारले पाहिजे.
महाराज म्हंटले कि मला किती लिहू आणि किती नको असे होवून जाते . मला माझ्या आयुष्यात श्री भाऊ साहेब पाटील , सासूबाई कै.उषाताई आपटे , माझे ज्योतिष शास्त्रातील पहिले गुरु कै. वसंतराव गोगटे , डहाणूचे दादा पवार अशी गुरुतुल्य व्यक्तिमत्वे गुरु म्हणून , मार्गदर्शक म्हणून लाभली हे माझे परमभाग्य आहे.
अध्यात्म हि तर जगण्याची कला आहे , ह्याचे धडे मी ह्यांच्याबरोबर गिरवले. आपल्या प्रत्येक शब्दावर , कृतीवर महाराजांची करडी नजर आहे ह्याचा विसर आपण कधीच पडू देवू नये.
आज करोनाच्या संकटात सुद्धा भाऊंच्या नेतृत्वाखाली शेगाव मध्ये आयसोलेशन साठी 500 बेड तयार आहेत , रोज जेवणाच्या 2000 डब्यांची सोय झाली आहे. ह्या गोष्टीची जाहिरात तर सोडाच कुठे उल्लेखही नाही. आपण फक्त कर्म करत राहायचे हि भाऊंची शिकवण दुसरे काय .
आज हे फोटो पाहिले आणि लिहिल्याशिवाय राहवले नाही .खरच आपल्याला तारणारे आपले गुरूच आहेत ह्याची पदोपदी प्रचिती येतच. करोनाच्या संकटातून सुद्धा तेच आपल्याला तारतील हा आपला विश्वास अभेद्य असुदे .
म्हणूनच भक्त म्हणतात ना “ तुही बिगाडे , तुही सवारे “
अस्मिता
antarnad18@gmail.com
#antarnad#shegaon#buldhana#shivshankarpatil#adhyatm#spiritualpower#guru#inspiration
#antarnad #शेगाव#बुलढाणा जिल्हा#शिवशंकरपाटील#विश्वस्थशेगावसंस्थान#अध्यात्म#गुरु
भाऊसाहेब पाटील यांना आदरपूर्वक नमस्कार. शेगाव संस्थान एक आदर्श संस्थान आहे. गजानन महाराज की जय.
ReplyDelete