|| श्री स्वामी समर्थ ||
नूतनवर्षाभिनंदन
“अंतर्नाद ” च्या सर्व वाचकांना चैत्र गुढी पाडव्याच्या खूप शुभेछ्या . गत वर्ष सरत आहे आणि आता नवीन वर्ष आभाळभरून आनंद सौख्य घेवून येत आहे . त्याचे तितक्याच जल्लोषात स्वागत करुया . मागचे सगळे विसरून पुन्हा नवीन स्वप्न पाहूया आणि ती पूर्ण होण्यासाठी अविश्रांत मेहनत करुया . नात्यांतील , मैत्रीतील वीण पुन्हा एकदा घट्ट करुया .
आनंदाची ,ध्येयाची ,नेत्रदीपक यशाची ,आरोग्यदायी गुढी उभारून पुन्हा एकदा सकारात्मतेकडे पाऊल टाकूया .आपल्या समोर अनेक आव्हाने आहेत त्यामुळे आता नवीन उमेदीने कामाला लागुया .
आपल्या सर्वाना हे नूतन वर्ष सौख्याचे , सर्वात मुख्य आरोग्याचे , स्वप्नपूर्तीचे आणि जीवनातील आनंद वृद्धिंगत करणारे जावूदे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
अस्मिता
#गुढीपाडवा#हिंदूसण#नवीनवर्ष#गुढीपूजन#पंचांगपूजन#सकारात्मक#ध्येय#स्वप्नपूर्ती
No comments:
Post a Comment