Sunday, 18 October 2020

 ||श्री स्वामी समर्थ ||


शरणागत दीनार्त परित्राण परायणे।
सर्वस्यार्तिहरे देवि नारायणी नमोऽस्तु ते॥


श्रावणातील कुठल्याही शुक्रवारी किंवा नवरात्रीच्या ९ दिवसापैकी कुठल्याही एका दिवशी जमल्यास अष्टमीला किंवा तुमच्या कुलस्वामिनीचा जो कुठला वार असेल त्या दिवशी देवीला कुंकुमार्चन करावे.

पूजेचे साहित्य : २ ताम्हने,हळदकुंकू ,विडा,सुपारी,५ फळे ,कापसाचे वस्त्र , पूजेस बसावयास आसन,अत्तर ,सर्व प्रकारची सुवासिक फुले,देवीस गजरा ,वेणी , निरंजन ,समई , सुटते पैसे ,धूप-दीप ,नेवैद्यास साखर घातलेले गोड दुध ,पेढे, घरी केलेला गोड पदार्थ आणि दुपारी महानैवेद्य. दिवसभर समई लावून ठेवावी.

पूजेस बसण्यापूर्वी घरातील मोठ्या मंडळीना नमस्कार करावा. धूतवस्त्र वेसावे. पुरुष पूजेस बसणार असतील तर जानवे घालावे. देवीची देव्हार्यातील मूर्ती एका ताम्हनात घेवून चौरांगावार किंवा पाटावर ठेवावि. तिला शुद्धोधकाने ,मग सुवासिक पाण्याने ,दुधाने आंघोळ घालून ,पुसून हळदकुंकू लावावे .फुलाने अत्तर लावावे , मग कुंकुमार्चनास सुरवात करावी.

कुंकुमार्चन म्हणजे काय ? तर देवीच्या मूर्तीवर कुंकवाने केलेला अभिषेक .काही ठिकाणी देवीच्या फक्त पायावर कुंकुमार्चन करण्याची प्रथा आहे. हा अभिषेक करत असताना देवीच्या जपाचा मंत्रजागर होणे आवश्यक आहे. ‘देवीचा जप करत एक-एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या मस्तकापर्यंत वहावे अथवा देवीचा नामाचे उच्चारण करत तिला कुंकवाने स्नान घालावे.

मूळ कार्यरत शक्तींतत्त्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झालेली असल्याने शक्तीतत्त्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात. कुंकवातून प्रक्षेपित होणार्या गंधलहरींच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्तीजतत्त्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्त्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक, तसेच देवीतत्त्वाला प्रसन्न करणार्या् गंधलहरींचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवीपूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे. मूळ शक्तीरतत्त्वाच्या बिजाचा गंध हाही कुंकवातून दरवळणार्याज सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते.

कुंकुमार्चन अभिषेक केलेले कुंकू लावून केला गेलेला जप आणि साधना अधिक एकाग्रतेने होते. कुंकुमार्चन घटाच्या ठिकाणी देवीचे रूप आहे, असा भाव ठेवून, घरी देवीच्या मूर्तीवर किंवा देवळात कुठेही करू शकतो. कुंकुमार्चन करण्यासाठी प्रत्यक्ष देवी समोर उभी आहे, असा भाव ठेवा. देवीचा नामजप करत एकाग्रतेने चिमूट-चिमूट कुंकू चरणांपासून मस्तकापर्यंत वहा. हि पूजा स्त्री /पुरुष कुणीही करू शकतात .ह्याला कसलेच बंधन नाही. काही ठिकाणी कुंकवाचे स्नान घालतात किंवा केवळ चरणांवर वहातात. देवीला लावलेले कुंकू भक्तीभावाने स्वतःला लावा. कुंकुमार्चनाने मूर्ती जागृत होऊन मूर्तीतील शक्तीतत्त्व कुंकवात येते आणि त्याचा आपणास लाभ होतो. आपली श्रद्धा जितकी जास्ती तितकी अनुभूती जास्ती.



बाजारात कुंकू मिळते .पूजेचे ,अभिषेकाचे कुंकू सांगावे .ते महाग आहे म्हणून साधे वापरू नये. हातावर खूप काळ रंग चिकटून रहाणारे रासायनिक पदार्थांचा अधिक वापर असणारे कुंकू वापरणे टाळा. कधी कधी कुंकू हे फारच लाल चुटुक असते आणि ते छान दिसते म्हणून बायका घेतात पण त्यात रसायने असतात .ते घेवू नये. रंगावर भुलून जावू नये.

कुंकुमार्चन करताना श्रीसूक्ताचा पाठ १५ वेळा करावा. १६ व्या वेळी संपूर्ण श्रीसूक्त म्हणून फलश्रुतीही म्हणावी म्हणजे श्रीसूक्ताचे 1 आवर्तन झाले. काही ठिकाणी सामुहिक रीतीने हि पूजा करतात. चंदनाची उदबत्ती मिळाली तर जरुर लावावी . सर्व पूजा झाल्यावर एका ताटात खण नारळ घेवून घरातल्या देवीची ओटी भरावी. डाळिंब मिळाले तर आणावे .देवीस ते फार प्रिय आहे. नवरात्रीचे ९ दिवस एका निरांजनात अगदी लहान कापूर घेवून तो प्रत्येक खोलीत जाळावा. घराला ४ खोल्या असतील तर प्रत्येक खोलीत ते निरंजन घेवून जावे आणि तिथे एक कापुराची वडी त्यात जाळावी .मग ते उचलून दुसरी खोलीत न्यावे आणि पुन्हा तेच करावे....याने घरात अत्यंत सकारात्मक उर्जा आणि लहरी निर्माण होतात .करून पहा..

तुम्हा सर्वाना देवीचा भरभरून आशीर्वाद मिळो हीच तिच्या चरणी प्रार्थना.

अस्मिता

लेख आवडल्यास खालील लिंक वर Click करून अभिप्राय नक्की द्या.

antarnad18.blogspot.in

Friday, 16 October 2020

नव्याने नाळ जोडुया ...स्त्री शक्तीचा सन्मान करुया

 ||श्री स्वामी समर्थ ||


सख्यांनो तुमच्या कर्तृत्वाला सलाम 


आज घटस्थापना. शारदीय नवरात्र आरंभ होत आहे. माता दुर्गेचे पूजन करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो .

स्त्रीला सुद्धा देवीचेच स्वरूप मानले आहे . प्रत्येक घरातील स्त्री हीच त्या घरातील खरी गृहलक्ष्मी आहे आणि तिचा योग्य तो सन्मान केला पाहिजे. आपल्या कुळाची देवी म्हणजे आपली कुलस्वामिनी हिचे नित्य पूजन केले पाहिजे . वर्षातून निदान एकदा तरी तिचे दर्शन घेतले पाहिजे पण आजकाल हे मनात असूनही अनेकांना शक्य होत नाही. अश्यावेळी आपल्या घरात देवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन म्हणजेच देवीच्या मूर्तीवर कुंकवाचा अभिषेक करून देवीची पूजा करून यथाशक्ती दानधर्म करावा.

माझ्या आयुष्यात मला काही अत्यंत कर्तुत्ववान स्त्रिया भेटल्या ज्यांनी आपल्या कष्टाने , मेहनतीने आपापल्या क्षेत्रात स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला. त्यांची जिद्द , काहीतरी वेगळे करण्याची धडपड वाखाणण्याजोगी आहे हे निश्चित . आज नवरात्रीच्या निम्मित्ताने आदिशक्तीचा गजर होत असताना अश्या कर्तुत्वान महिलांच्या यशाचा आलेख आपल्यासमोर मांडताना मला विशेष आनंद होत आहे. समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ह्या आपल्या सर्व मैत्रिणींची यशोगाथा ,फिनिक्स पक्ष्याप्रमाणे त्यांनी आकाशात घेतलेली उंचउंच झेप आणि त्यांनी करून ठेवलेले आभाळाएवढे कार्यसमाजातील प्रत्येक स्थरातील स्त्रीला प्रेरणा देवून जायील ह्यात कुठलीही शंका नाही.

आज एकविसाव्या शतकातील स्त्रीचा चेहरामोहरा पूर्ण बदलला आहे , आपल्या कर्तुत्वाने अनेक उच्च पदांवर ती विराजमान आहे. स्त्रीचे वर्चस्व नाही असे कुठलेही क्षेत्र नाही . हे सर्व करत असताना  मुलगी ,आई ,पत्नी ,सून ,वाहिनी ,नणंद ,भावजय , मैत्रीण अश्या अनेक नात्यानाही ती न्याय देताना दिसते . पण खेड्यापाड्यातील स्त्रियांनी अजून सक्षम , साक्षर होण्याची गरज आहे आणि त्यासाठी अनेक सेवाभावी संस्थाही आपापल्या परीने कार्य करत आहेत. इतके असूनही आज समाजातील काही वर्गात स्त्रियांचे शारीरिक , मानसिक , लैंगिक शोषण होताना दिसते. रोजच्या वर्तमानपत्रात  स्त्रियांवरील अत्याचाराच्या बातम्या वाचताना आपण खरच इतक्या प्रगत विश्वात राहत आहोत का ,असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

इतरांकडून मानाची अपेक्षा बाळगणारी स्त्री आज स्वतःच स्त्रीची शत्रू झाली आहे का हाही एक प्रश्नच आहे . आपल्या स्त्रियांमध्ये सुद्धा कुठे एकजूट आहे? समाजात वावरताना स्त्रीच दुसर्या स्त्रीचा दुस्वास , मत्सर , हेवा करताना दिसते हे स्पष्ट चित्र आहे. कौटुंबिक समारंभात , हळदीकुंकू ,कुठलाही कार्यक्रम असुदे एकमेकांची उणीदुणी काढणे , हेवेदावे करणे हे चालूच असते . लोकल च्या अर्ध्य तासाच्या प्रवासात सुद्धा अगदी लहानसहान कारणांवरून भांडणे होत राहतात जणू काही त्याशिवाय आपला दिवसच सुरु होत नाही. आपल्या कुटुंबात अनेक पिढ्यातील स्त्रिया असतात आणि प्रत्येकीत काहीतरी वेगळेपण असते ,घेण्यासारखे गुणही असतात .आपण न पटणार्या गोष्टी बाजूला सारून प्रत्येकीमधले चांगले गुण घेतले तर आपलेच आयुष्य सुखकर होयील .

आज ह्या नवरात्रीच्या निम्मित्ताने आदिशक्तीचे पूजन करून आपण ह्या सर्व वाईट गोष्टीना तिलांजली देवूया आणि आपल्या कुटुंबातील स्त्रिया ,आपल्या कार्यालयाच्या ठिकाणी असलेला स्त्रीवर्ग , आपल्या जिवाभावाच्या मैत्रिणी ह्यांच्याशी नव्याने नाळ जोडुया .दुसर्याचा हेवा ,मत्सर करून आपले कधीच भले होत नाही ,त्यामुळे एकमेकांसोबत आनंदाने जगण्याचा प्रयत्न करुया आणि हाच वारसा आपण आपल्या नवीन पिढीतील लेकी सुनानांही सुपूर्द करुया.

पुढील काही लेखांमध्ये आपल्या काही कर्तुत्ववान मैत्रिणींच्या विषयी जाणून घेवूया त्यांची यशोगाथा  ...वाचू आनंदे.


आपल्या सर्वाना नवरात्रीच्या भरभरून शुभेछ्या


अस्मिता

Antarnad18@gmail.com 

Thursday, 15 October 2020

ज्योतिष कार्यशाळेला मिळाला उदंड प्रतिसाद

|| श्री स्वामी समर्थ ||







नमस्कार ,


“ हसत खेळत ज्योतिष शिकूया ” ह्या 3 दिवसाच्या ज्योतिष कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद मिळाला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार . अनेक वयाच्या आणि समाजातील वेगवेगळ्या स्थरावरील लोकांनी ह्यात भाग घेवून शिकण्याला वयाची अट , बंधन नसते हे सिद्ध केले. झालेल्या परिसंवादामुळे विचारांची देवाणघेवाण झाली .पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार.

भविष्यात होणार्या कार्यशाळेला सुद्धा आपल्याकडून असाच प्रतिसाद मिळेल अशी आशा करते.

अस्मिता

Antarnad18@gmail.com

  

Friday, 2 October 2020

 || श्री स्वामी समर्थ ||



ज्योतिष कार्यशाळा ( ३ दिवस Online)

नमस्कार ,

आजवर माझ्या लेखनाला आपण भरभरून प्रतिसाद दिलात . प्रतिक्रिया , सूचना आणि थोरामोठ्यांचे आशीर्वाद मिळाले. ह्या सर्वातून मला प्रोत्चाहन मिळाले आणि चिरकाल टिकणारा ओंजळभर आनंद .

ज्योतिष शास्त्र हे शिकायला उभा जन्म अपुरा पडेल पण तरीही प्रत्येकाने निदान स्वतःपुरते जाणून घ्यावे . निदान स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची पत्रिका तरी काही प्रमाणात माहिती असावी ह्या उद्देशाने मी ३ दिवसांची ज्योतिष कार्यशाळा घेण्याचा विचार पक्का केला . सर्व परिपूर्ण होणार नाहीत पण आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि आयुष्यातील पुढील प्रवास सुखकर होईल हा विश्वास वाटतो . पत्रिका कशी पहायची ह्याचे मर्म समजेल . आपण अनेक Video ,पुस्तके  वाचतो पण योग्य वेळी योग्य प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही तर सर्व फोल आहे. ग्रह , नक्षत्रे , राशी त्यांचे स्वभाव , पत्रिकेतील त्यांची स्थाने , महादशा ह्या सर्वाचा एकत्रित अभ्यास आपल्याला आपल्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचवतो. तुम्हाला हि अनेक प्रश्न असतील . ह्या सर्वाचा अभ्यास करुया आणि सोडवूया आपले प्रश्न आपणच . माझ्या ह्या उपक्रमासाठी आपल्या शुभेछ्या आणि कार्यशाळेस प्रतिसाद द्याल हा विश्वास आहे.

दिलेल्या क्रमांकावर कृपया फोन करू नका हि विनंती.

फक्त “ Whatsapp Message ” करा आणि कुठली Batch हवी आहे ते लिहा. पुढील माहिती Whatsapp वर देण्यात येयील.


कार्यशाळा : Online Zoom App वर घेतली जायील.


अस्मिता


Antarnad18@gmail.com