|| श्री स्वामी समर्थ ||
वैवाहिक सुखाचा मुख्य कारक ग्रह आहे “ शुक्र “. पत्रिकेत शुक्राची स्थिती काळजीपूर्वक तपासून पहावी लागते . शुक्र हा जीवनातील सर्व सुखाचे आगर आणि आनंदाचा स्त्रोत आहे . निसर्ग कुंडलीमध्ये शुक्राची तूळ राशी हि सप्तम भावात येते जे वैवाहिक सौख्य आणि मनोमिलनाचे मुख्य स्थान आहे. तूळ राशीचे बोध चिन्ह “ तराजू “ आहे. म्हणजे विवाह पूर्वी जोडलेली असंख्य नाती आणि आता नवीन गुंफलेले प्रेमाचे धागे ह्या दोघांचीही उत्तम सांगड घालता आली पाहिजे असेच जणू हे चिन्ह सुचवत आहे. नवीन नाते जोडले म्हणून पूर्वी आयुष्यभर जोडलेल्या सर्वच नात्यांचा विसर पडता उपयोगी नाही ह्याचे भान राहावे म्हणून हा तराजू आहे.
शुक्र हा जलतत्वाचा रसिक ग्रह आहे . रस आहे म्हणून भावनांचा अविष्कार आहे. मोक्षाच्या सर्व राशी जलतत्वाच्या आहेत कारण जल म्हणजेच भावना. आनंद होवूदे किंवा दुक्ख डोळ्यातून पाणी म्हणजेच जल येते. भावना असतात प्रेम असते म्हणूनच ते दोघे एकरूप होत असतात . झाडाला सुद्धा पाणी घातल्याशिवाय ते बहरत नाही . शुक्र हा पुरुषांच्या पत्रिकेत विर्याचा कारक मानलेला आहे त्यामुळे संतती च्या दृष्टीने तो अभ्यासावा लागतो. दोघांतील फुलणारा प्रणय शुक्रच दर्शवतो . शुक्र सिंह राशीत आणि सिंह नवमांशा मध्ये असेल तर विवाह होत सुद्धा नाही आणि झालाच तर टिकण्याची शक्यता धूसर असते . शुक्र केतूच्या नक्षत्रात त्याचे सर्व गुण हरवून बसतो . बुधाच्याही राशीत शुक्र फुलत नाही. बुधाच्या कन्या च्या चिकित्सक राशीत शुक्र नीचत्व पावतो तर मीन राशीत उच्चत्व पण मीन राशीत २६ अंशापुढे तो गंड योगात जातो. कृत्तिका , मूळ , मघा , आश्लेषा ह्या नक्षत्रातील शुक्र फळे देताना दिसत नाही.
शुक्र हा विवाहाचा कारक ग्रह आहे. शुक्र शुभ स्थानात असेल , सप्तमात शुभ ग्रह ( शुक्र, चंद्र, बुध) असेल तर विवाह लवकर होतो. 2, 7, 11 स्थानातील ग्रहांच्या दशा, अंर्तदशेत विवाह होतो किंवा सप्तमाशी संबधित ग्रहांच्या दशा अंर्तदशेत विवाह होतो. शनि-शुक्र युति, चंद्र -शनि युति, पंचमात शनि, सप्तमात पापग्रह( मंगळ, शनि, हर्षल). गुरू किंवा शुक्र कमजोर असेल तर विवाहास विलंब होतो .
सप्तमेश अशुभ स्थानात, सप्तमेश 6, 8, 12 स्थानात अस्त. चंद्र शुक्र युति. सप्तमात मंगळ, शनी, शुक्र पापग्रहाबरोबर पंचम किंवा नवम स्थानात, शुक्र , बुध, शनी हे नीच राशीत असतील त्यांचा विवाह होत नाही किंवा विवाहास खूप अडचणी येतात.
शुक्र आणि सप्तमेशावरील कुयोग, ६ ८ १२ चे स्वामी , शत्रू ग्रह, पापग्रह यांच्याशी शुक्राची युती त्रासदायक असते . सप्तमातील हर्शल, नेपच्यून हे ग्रह तसेच शनी-मंगळ, शनी-राहू, शनी-केतू आदी युतीयोग पडताळून पाहावेत. या अनुषंगाने शुक्र आणि सप्तमेशाला लाभलेले स्थान महत्वाचे असते त्रिक स्थानी कुयोग असले तर तीव्रता अधिक वाढू शकते.
सप्तम भाव पापकर्तरी योगात आणि अश्यावेळी वैवाहिक सुखाचा कारक शुक्र बिघडलेला असेल तर जोडीदाराचा विरह सोसावा लागतो. पुरुषांच्या पत्रिकेत वैवाहिक सुख बघताना शुक्राचा विचार करावा लागतो. स्त्री पत्रिकेत शुक्र स्त्रीची आर्थिक स्थर दर्शवतो .पुरुष पत्रिकेत शुक्र जर २ ३ ७ ११ ह्या स्थानात अत्यंत शुभ असतो . पुरुष पत्रिकेत शुक्र जर १ १० ८ १२ ह्या राशीत असेल तर वाईट फळे देत नाही . ६ ९ राशीत असेल तर वाईट फळे देतो . स्त्री च्या पत्रिकेत मंगळ हा गुरुसोबत किंवा दृष्ट असता उत्तम वैवाहिक सुख मिळते . शुक्र हा पुरुष पत्रिकेत शानिसोबत असल्यास चांगला .शनी हा नैतिकता जपणारा असल्यामुळे अधपतन होऊ देत नाही .
प्रथम भावात असलेले हर्शल नेप प्लुटो सारखे ग्रह सप्तम भावावर दृष्टी टाकतात त्यामुळे सुद्धा वैवाहिक सुख नष्ट होते . सप्तम भावातील हर्शल नेप विवाहात हमखास गूढता आणि फसवणूक . त्यात लग्नेश ह्या दोन ग्रहांच्या सोबत असेल तर नक्कीच असे परिणाम आढळून येताना दिसतात . हर्शल हा विवाहसंस्था रूढी मनात नाही त्यामुळे हर्षल शुक्र युती हि live in relation मध्ये राहणारी आहे. विवाहबंधन त्यांना नकोसे वाटत असते . सप्तम भावातील वक्री हर्शल अनेकदा विवाहच देत नाही त्याचप्रमाणे प्लुटो सुद्धा सकारात्मक फळे देताना दिसत नाही .
निसर्ग कुंडलीमध्ये द्वितीयस्थान म्हणजे धनलक्ष्मी आणि सप्तम स्थान म्हणजे गृहलक्ष्मी .ह्या दोन्ही स्थानात शुक्र उत्तम फळे देतो . कुंडलीमध्ये सप्तम स्थानात नीच राशीत म्हणजे मेष राशीत शनी आणि शुक्र जर कन्या राशीत असेल तर अश्या व्यक्ती जोडीदाराशी एकनिष्ठ नसतात .सप्तम स्थांनात मंगळ शुक्र , शनी गुरु , शनी शुक्र , शुक्र राहू असता हा योग चांगला नाहीच पण अश्यावेळी गुरु कुठे आहे ते बघणेही आवश्यक आहे. गुरूची दृष्टी अमृततुल्य आहे.
शुक्र जर मंगळाच्या मेष किंवा वृश्चिक राशीत नसेल आणि त्यावर शनीची दृष्टी असेल किंवा शुक्र शनीच्या मकर किंवा कुंभ राशीत असेल आणि त्यावर मंगळाची दृष्टी असेल तर हे योग अभ्यासावे लागतात . त्याचप्रमाणे ह्या योगांची नवमांश मधेही काय स्थिती आहे तेही पाहावे लागते .
शुक्र हा पत्रिकेत अस्तंगत किंवा वक्री स्तंभी असणे हेसुद्धा वैवाहिक सुखाची हानी करताना दिसते . शुक्र केतू युती हि विरक्ती देणारी तर शुक्र राहू युती हि संसारिक सुखाची ग्वाही न देणारी आहे. शुक्र राहू परजातीत विवाह देतो . राहू आला कि फसवणूक आलीच , अनेकदा तीही अनुभवायला मिळते. त्यासोबत पत्रिकेतील मंगळ पण बिघडला असेल तर वयात आलेल्या मुलांवर पालकांनी लक्ष्य ठेवावे.
स्त्री पत्रिकेत मीन राशीचा शुक्र हा मानमरातब ,उत्तम राहणी ,उत्तम वैभव सुख प्रदान करतो .गुरु हा त्यागाचा कारक आहे आणि शुक्र हा उपभोगाचा कारक आहे. उपभोगा आणि मुक्त व्हा हे त्याला वाटते . स्त्री पुरुष समानता कितीही म्हंटली तरी निसर्गानेच दोघांना वेगवेगळे केले आहे आणि त्यांच्याकडून संसारातील अपेक्षाही तश्याच आहेत .
नवमांश कुंडलीत चतुर्थ भावात शुभग्रह असतील आणि ते लग्न कुंडलीतील त्रिक भावांचे कार्येश नसतील तर वैवाहिक सुख चांगले मिळते . शुक्र नेप युती सुद्धा जर पत्रिकेत बिघडली असेल तर संसार सुख देत नाही . नेप हा गूढ ग्रह आहे आणि अश्यावेळी संसारात गोडी ओढ राहत नाही . अनेकदा गुरु केतू युती सुद्धा संसारात न्यूनता दर्शवते.
आज आपण वैवाहिक सुखाचा कारक ग्रह शुक्र ह्यासंबंधी जाणून घेतले. वैवाहिक सुखाचा कारक ग्रह शुक्र असल्यामुळे त्याच्या अनुषंगाने येणारे सर्वच योग तपासून पाहावे हे सांगण्यासाठी हा लेखन प्रपंच .
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment