|| श्री स्वामी समर्थ ||
विवाह हा आयुष्याचा टर्निंग आहे पण अनेकदा कित्येकांच्या आयुष्यात “ विवाह “ हि घटना दुर्दैवाने घडताना दिसत नाही . आज त्याची कारण मीमांसा जाणून घेण्याचा प्रयत्न करुया .
सप्तमेश पापग्रह युक्त किंवा दृष्ट असेल ६ ८ १२ मध्ये असेल ,नीच वक्री अस्तंगत असेल किंवा वक्री ग्रहाच्या नक्षत्रात असेल वर वैवाहिक सौख्य मिळत नाही .
सप्तमेश व्ययात असून लग्नेश किंवा राशीस्वामी सप्तमात पापग्रह दुष्ट असेल तर वैवाहिक सौख्य मिळत नाही .
६ ८ १२ चे स्वामी सप्तमात असून त्यावर पापग्रहांची दृष्टी असेल तर विवाह होत नाही.
सप्तम भाव पापकर्तरी योगात असून शुक्र सुद्धा बिघडला असेल कन्या , सिंह राशीत असेल तरी विवाह होत नाही . लग्न कुंडलीत शुक्र सिंह राशीत आणि सिंह नवमांशात असेल तर विह कठीण झालाच तर टिकत नाही .
सप्तम भावातील वक्री हर्शल, वक्री प्लुटो विवाह सुखात न्यूनता आणतो. शुक्र केतू युती विरक्ती देते . वैवाहिक सौख्याची ओढ नसते. व्यय भावात पापग्रह असतील तरीही शैयासुख कमी मिळते . बुध शनीसारखे नपुंसक ग्रह सुद्धा विवाह विलंब करतात ,
मेष लग्नाला सप्तम भावात बुध असेल तर विवाहात अडचणी येतील. सप्तम भावात शनी केतू, शनी बुध असतील तर विवाहात अडचणी येतील, अनेकदा होणार नाही. सप्तमेश स्वतःपासून 6 8 12 ह्या भावात असेल किंवा त्रिक भावात असेल तरी त्रासदायक होयील. तुळेचा रवी सप्तम भावात आणि त्यावर शुभ ग्रहांची दृष्टी नसेल तर विवाह जमण्यात अडचणी येतील.
पत्रिकेत द्वितीयेश , सप्तमेश आणि व्ययेश ह्यांचा संबंध असेल तसेच ह्याचा 6 8 12 ह्या भावांशी सुद्धा संबंध असून त्यावर राहू शनीचा प्रभाव असेल तरीही वैवाहिक सुख न्यून मानावे लागते . अश्या जातकांचे अनेकदा विवाह झालेले दिसून येत नाहीत .
लग्न कुंडलीतील सप्तमेश नवमांश कुंडलीत दुषित असेल तर वैवाहिक सौख्य जवळ जवळ शून्य.
सप्तम भावातील दोन पेक्षा अधिक पापग्रह असून त्यावर पापग्रहांची दृष्टी असेल तसेच ह्या स्थितीत शुक्र सुद्धा दुषित असेल तर विवाह होणे कठीण होते .
सप्तमेश त्रिक भावात आणि त्रिक भावातील कुठलाही एक किंवा दोन ग्रह सप्तम भावात आले तरीही विवाह दुरापास्त होतो. शुक्र पापग्रहांच्या युतीत , दृष्टीत , वक्री असेल तरी वैवाहिक सुखात अडचणी निर्माण होतात.
अनेकदा विरक्ती देणारा केतूचा संबंध लग्न भाव किंवा सप्तम भाव ह्याच्याशी निगडीत असेल किंवा चंद्र केतूच्या नक्षत्रात असेल तरीही जातकाला स्वतःलाच विवाह करण्याची इच्छा नसते. ज्योतिष शास्त्राचे माध्यमातून आपण अनेक ग्रह स्थिती अभ्यासल्या .
अनेकदा कुटुंबातील जबाबदार्या , वडील भावंड असल्यामुळे लहान भावांच्या विवाहाच्या शिक्षणाच्या जबाबदार्या , आई वडिलांची जबाबदारी , आर्थिक स्थिती , घराच्या समस्या ह्यामुळे सुद्धा विवाह इतके लांबणीवर पडतात कि कित्येकदा पुढे होत सुद्धा नाहीत.
सप्तम स्थानाशी जर बाधकेशाचा संबंध आला तर अविवाहित राहण्याचे योग येतात . चर लग्नाला लाभेश हा बाधकेश आहे. स्थिर लग्नाला भाग्येश हा बाधकेश आहे. द्विस्वभावी लग्नाला सप्तमेश हा बाधकेश आहे. शुक्र हा जर चंद्र आणि रवी च्या मध्ये असेल तर पत्रिका अविवाहित राहण्याकडे जाते .हे दोघेही शुक्राचे शत्रू आहेत .
सध्याच्या युगात अनेक सामाजिक स्थिती मुळे मुलांना विवाह करावेसे वाटत नाहीत अशीही उदाहरणे आहेत . एकटा जीव सदाशिव अशी स्थिती अनेक तरुण बोलूनही दाखवतात . समाज आणि जग बदलत आहे पण तरीही मनापासून असे वाटते कि विवाह संस्था टिकली पाहिजे ...ती कमकुवत होणे आपल्या हिताचे निश्चितच नाही .
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment