|| श्री स्वामी समर्थ ||
पूर्वीचा काळ वेगळा होता . पतीचे निधन झाले तर स्त्री दुसरा विवाह करण्याची रीत नव्हती किबहुना त्यावेळी स्त्रीचा पुनर्विवाह हि संकल्पना अस्तित्वातच नव्हती. विधवा म्हणून जीवन कंठीत करायला लागत असे. पण स्त्री गेली तर तिचे कार्य झाल्यावर लगेच पती मात्र विवाहबद्ध होत असे.
आज २१ व्या शतकात विलंबाने विवाह हि जशी समस्या आहे तशीच घटस्फोट हि सुद्धा एक ज्वलंत समस्या आहे. घटस्फोट झाल्यानंतर पुढील जीवन एकट्याने व्यतीत करायचे का ? हा प्रश्न पडतो आणि त्यावेळी पुनर्विवाहाचा विचार पुढे येतो. स्त्री आता घराबाहेर पडत आहे आणि स्वतःचे करिअर करत आहे. स्वतःच्या पायावर उभी आहे.
आजच्या काळात घटस्फोटाची कारणे म्हणजे वैचारिक मतभेद , विवाहबाह्य संबंध हि प्रामुख्याने समोर येतात . अनेकदा जोडीदाराचा आजारपणामुळे किंवा अपघाती मृत्य त्यामुळे पुनर्विवाह करावा लागतो . मुले लहान घरी वयस्कर आई वडील हेही कारण असते. .पुनर्विवाहासाठी जातक आल्यास त्याला ह्यापुढे उत्तम वैवाहिक सुख मिळणार कि नाही हे पाहावे लागते . प्रथम विवाहाचा विचार आपण सप्तम स्थानावरून करतो .द्वितीय विवाह हा भाग्यस्थानावरून पहिला जातो. अष्टमेश लग्नी किंवा सप्तमात असेल तर द्वितीय विवाहाचे योग पहिल्या पती/पत्नीच्या निधन झाल्यामुळे येतात. लग्नेश लग्नात किंवा षष्ठात असेल तर २ विवाह संभवतात . लग्नी मंगळ असेल आणि सप्तमेश ६ ८ १२ मध्ये असेल आणि पापग्रहांनी युक्त असेल तर पुनर्विवाह होऊ शकतो. मेष किंवा वृश्चिक लग्नात मंगळ असून सप्तम स्थानात बुध असेल आणि सप्तमेश शुक्र जर अष्टमात असेल तर एकापेक्षा अधिक विवाह होतात.
सप्तमात बुध मंगळ असतील किंवा बुध मंगळाच्या राशीत पापग्रह युक्त असेल . बुध हा एक घटना पुन्हा घडवतो. सप्तमेश बुध हा पापग्रहांनीयुक्त असून अशुभ नक्षत्रात असेल .सप्तम स्थानात उच्चीच्या किंवा निचीच्या ग्रहासोबत राहू किंवा केतू असतील तर . पुरुषाच्या पत्रिकेत १२ व्या स्थानी राहू असेल तर तो एकापेक्षा जास्ती विवाह घडवतो . नवम स्थानात राहू केतू किंवा केतू गुरु असे ग्रह असतील तर किंवा पापग्रहांची उपस्थिती जास्ती असेल तर पुनर्विवाह सहजासहजी होत नाही . शुक्र चांगला असेल ,नवमेश चांगल्या स्थितीत असेल दुसरा विवाह यशस्वी होतो.
पुनर्विवाह आजच्या काळात आवश्यक आहे. आर्थिक दृष्टीने तसेच मानसिक दृष्टीने सुद्धा. एकटेपणा जिव्हारी लागणारा असतो आणि त्यातून वैफल्य निर्माण होते आणि एकटेपणाच्या भावनेतून आत्मविश्वासाची कमी आणि मानसिक दौर्बल्य सुद्धा निर्माण होते . अनेकवेळा दोघानाही अपत्य असते त्यामुळे त्यांचाही विचार एकत्र येताना करावा लागतो . मुलांचा विचार सर्वप्रथम नाहीतर सगळेच दुखी होतील. वैचारिक मतभेदामुळे पहिला विवाह मोडला असेल तर दुसरा करताना तो निभावण्यासाठी पहिल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही ह्याचीही काळजी घेणे आवश्यक असते. आपल्या स्वभावात अमुलाग्र बदलही करावा लागतो . दुसरा विवाहात प्रेम नसते असेही नाही , सहवासातून प्रेम निर्माण होते पण अनेकदा तडजोड अधिक असते . ती करण्याशिवाय गत्यंतरही नसते हेही तितकेच खरे. विवाह टिकवण्याची जबाबदारी दोघांचीही असते मग विवाह पहिला असो अथवा दुसरा .
सौ. अस्मिता दीक्षित
पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment