Saturday, 14 June 2025

व्यवसाय आणि ग्रहयोग - भाग 2

 || श्री स्वामी समर्थ ||


पत्रिकेत गुरु बलवान असेल तर शिक्षण क्षेत्रात जातकाची प्रगती होते. शिक्षक पर्यायाने मुख्याध्यापक हे पद मिळते. १ ४ ५ ९ १० ह्या भावात गुरु तसेच १० मध्ये मंगळ रवी असतील तर शिक्षण क्षेत्रात यश मिळते . अधिकार योगासाठी ९ भावात गुरु आणि तसेच २ ६ सुद्धा गुरूशी संबंधित असावेत . शनी दशमात असेल तर अनेकदा सत्ता मोठे पद देतो . ह्या सर्वासाठी अर्थात दशा अनुकूल असाव्या लागतात . 

स्पर्धा परीक्षातील यश – आजकाल परदेशी शिक्षण घेण्यासाठी किंवा भारतात सुद्धा अनेक उच्च शैक्षणिक प्रवेश हे CET CAT ह्या माध्यमातून घेतले जातात . आजकाल स्पर्धा परीक्षा आपला प्रवेश आणि आयुष्याची पुढील वाटचाल ठरवताना दिसतात . ह्यासाठी प्रामुख्याने ६ वा भाव बघावा तसेच त्या नुसार दशाही अनुकूल हवी . 


रवी गुरु बुधाचे गोचर भ्रमण अश्यावेळी पाहावे लागते. सरकारी नोकरी म्हंटली कि रवी आणि ६ १० भाव आलेच. पोलीस सैनिक मिलिटरी साठी अर्थात धाडसी मंगळ सोबत राहु  ४ १० मध्ये चांगले फलित देतात . 


चिकित्सक राशी कन्या आणि संशोधक राशी वृश्चिक ह्या वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी प्रथम क्रमांकावर येतात . रवी बुध गुरु तसेच शुक्र सुद्धा बघावा. ६ १० तसेच २ भाव धन देणारा. मकर धनु राशीही ह्या व्यवसायासाठी पोषक आहेत . मंगळ सुस्थितीत असेल तर व्यक्ती उत्तम सर्जन होते. मंगल १ ५ ९ किंवा २ ६ १० ह्या राशीत स्थित असावा .व्ययेश मंगळ दशमात आणि इतर ग्रहांची साथ उत्तम डॉक्टर होवू शकते.  


आरोग्याचा कारक रवी बघावा तसेच चिकाटी देणारा ग्रह शनी . डॉक्टर हा समाजात वावरणारा असतो. त्यामुळे चंद्र बघावा. ज्याचा चंद्र अतिशय शुभ असतो तो समाजात लोकप्रिय होतो. आता ह्या व्यवसायातून लाभ देण्यासाठी धन आणि लाभ भावाची दशा बघावी . 


व्यवसाय कुठलाही असो माणसे जोडण्याची कला अवगत असेल तर व्यवसाय चालेल . त्यासाठी बुध शुक्र चांगले हवेत . दशम भावातील गुरु शुक्र मोठे व्यवसाय लाभ दर्शवतात . उत्तम व्यवस्थापन रवीकडे तर सत्ता मंगळ राहुकडे .


प्रत्येक व्यवसायासाठीचे शिक्षण , भांडवल अनेक गोष्टींसाठी पहावी लागते ती मानसिकता .  मला हे करायचे आहे आणि ते करायचे आहे असे नुसते म्हणून चालत नाही . मी मोठे बुटी पार्लर उघडले पण कुणीच तिहे फिरकत सुद्धा नाही तर केलेला डामडौल फुकट .त्यामुळे व्यवसाय करण्यापूर्वी आपली मानसिकता , त्या व्यवसायातील खाचखळगे आपल्याला कितीसे समजत आहेत तसेच त्यातील चढ उतारावर पाय रोवून उभे रहायची मानसिकता आपली आहे का? धंद्यात चिकाटी , दूरदृष्टी , माणसे ओळखण्याची कुवत सर्व लागते , सगळ्यात मुख्य स्वतः कष्ट करायची ताकद लागते , नफ्या तोट्याचे गणित मांडावे लागते कारण ते कोलमडले तर व्यक्ती कर्ज बाजारी होते . 


एखादा व्यवसाय करणे हे तप करण्यापेक्षा कमी नाही . आजकालची मुले कसलाही विचार न करता वडिलांना मला धंदा करायचा आहे असे सांगतात आणि पालक सुद्धा त्यांना कर्ज घेवून देतात . आपला मुलगा पायावर उभा राहण्याची स्वप्न पाहणे वेगळे आणि त्यासाठी परिश्रम घेवून ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवणे वेगळे . सर्वांगीण विचार केला तर यश दूर नाही , पण तसे झाले नाही तर जीवन नको त्या गर्तेत अडकेल म्हणून हे चार शब्द .


सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

No comments:

Post a Comment