Friday, 20 June 2025

रेशीमगाठी भाग 7 – मंगळ

 || श्री स्वामी समर्थ ||



मंगळाची पत्रिका ....अबबब... अशीच विनाकारण धास्ती समाजात आहे. मंगळ चांगला कि वाईट ह्याबद्दल बरेच समज गैरसमज आहेत. मंगळ हा व्यक्तीतील अहंकार , धाडस , शक्ती आहे आणि ती शक्ती चांगल्या आणि वाईट दोन्ही कामासाठी वापरली जाते. वैवाहिक जीवन हे कोमल, शीतल आहे, तिथे हिंसा क्रौर्य नाही . वैवाहिक जीवनात भावनिक गुंतवणूक असते तिथे नात्यांचा समतोल राखणे गरजेचे असते  म्हणूनच सप्तम स्थानात तूळ रास येते .तूळ रास हि शुक्राची रास असून ती जल तत्वाची रास आहे. शुक्र हा वैवाहिक सुखाचा ,आनंदाचा आणि जल तत्वाचा ,सौभाग्याचा कारक आहे. अश्या ह्या जलतत्वाच्या ग्रहासोबत जर मंगळा सारखा आगीचा धगधगता गोळा आला तर विपरीत परिणाम मिळू शकतात .कुंडलीतील १२  १ ४ ७ ८ ह्या स्थानात मंगळ असेल तर मंगळ दोष धरला जातो.१२ १ आणि  4 ह्या स्थानातील मंगळाची दृष्टी सप्तम स्थानावर येते तसेच सप्तम स्थानातील मंगळ स्वतः सप्तम स्थानातच असतो . 


अष्टम स्थानातील मंगळाचा दोष धरला आहे कारण अष्टम स्थान हे सौभाग्याचे स्थान आहे तसेच तिथे खर्या अर्थाने दोन्ही शरीराचे मिलन होते , त्यातही जलतत्व लागतेच .अश्या ठिकाणी मंगळ असेल तर अचानक संकटे ,सौभाग्याची हानी तसेच अचानक घातपाताची शक्यता असते म्हणून येथील मंगळाचा दोष धरला आहे. काही जण धनस्थानातील मंगळा सुद्धा दोष देतात कारण ते कुटुंब स्थान आहे .तसेच त्याची दृष्टी अष्टमावर पडते .अनेकांच्या पत्रिकेत हा योग सापडतो त्यामुळे फक्त त्याला दोष देणे चुकीचे ठरेल. मंगळ हि चेतना आहे,उर्जा आहे ,तामसी ,स्वतंत्र वृत्तीचा , वासना असणारा ,अविचारी असून अचानक तडकाफडकी फळे देणारा आहे. 


मंगळ स्वतःच्या राशीत ,उच्च राशीत असेल तसेच तो पापग्रहांच्या युती दृष्टीत नसेल किंवा क्रूर नक्षत्रात नसेल तर तो शुभ समजावा. शुभ मंगळात जिद्द , धैर्य , पराक्रम ,जोम , रोग प्रतिकारक शक्ती उत्तम असते. वासना शुभ असते. २ ७ ह्या राशीत मंगळाची धग अधिक असते. सप्तम स्थानातील धनु राशीचा मंगळ सुद्धा संरक्षक म्हणून काम करतो . मंगळ क्रूर नक्षत्रात किंवा वक्री असेल वाईट फळे देतो.. अशुभ मंगळ हा असंतुलित असतो .हव्यास ,असमाधानी वृत्ती ,प्रबळ वासना ,सहानुभूती नसणारा , हुकुमशाह असतो.


प्रथम स्थान –आत्मविश्वास ,आरोग्य, जिद्द उत्तम .संहारक नसून संरक्षक असतात .

चतुर्थ स्थान – वस्तू , घर चांगले असते.

सप्तमस्थान –बिघडला नसेल तर वासना शुद्ध ,जोडीदारासाठी संरक्षक ,शरीरसुख चांगले.

अष्टमस्थान –उत्तम आयुष्य आणि शरीरसुख .सासरी प्रगती दाखवणारा .

द्वादश स्थानी – वैद्य आणि संरक्षक क्षेत्रासाठी चांगला .परदेशात धंदा व्यवसाय.

सप्तम स्थान -पाशवी वृत्ती आणि वासना ,लैंगिक विकार ,लग्न स्थानावर  दृष्टी

चतुर्थ स्थान – नातेवाईकांशी वाद , पटवून घेण्याची वृत्ती नसते , हेखेखोर .वर्चस्व गाजवणारा , सप्तम स्थानावर दृष्टी 

प्रथम स्थान – हट्टीपणा , अहंकार , हव्यास , उतावीळ पणा ,अपघाती , वासना अधिक , ४ ७ स्थानांवर दृष्टी .अरेरावी करणारा उद्धट .

व्यय स्थान – पैशाची उधळपट्टी , चैनी, अनैतिक संबंध ,सप्तम स्थानावर दृष्टी.

अष्टम स्थान – सौभाग्याची हानी , ऑरेशन ,लैंगिक विकार आणि वृत्ती , अपघात .

एकाच्या कुंडलीत ज्या स्थानात मंगळ असेल त्याच स्थानात दुसर्याच्या कुंडलीत शनी असेल तर नक्कीच त्रासदायक होईल.

गुरूची दृष्टी किंवा युती मंगळाबरोबर असेल तर चांगली . मंगळाची शक्ती चांगल्या कामासाठी वापरता येते.  बरेच वेळा शुक्र , चंद्रासोबत युती असेल तर मंगळाची शक्ती कमी होते. हे सौम्य ग्रह मंगळाची धग कमी करतात . दोघांच्याही एकाच स्थानी पापग्रह असणे चांगले नाही . मंगळाला मंगळाचीच पत्रिका लागते असे नाही . मंगळाची वासना शक्ती शमवणारी पत्रिका असावी .कर्क लग्नी मंगळ असेल आणि दुसर्याच्या पत्रिकेत सप्तम स्थानात वृषभेचा मंगळ असेल .हा मंगळ वासना कमी करणारा तितका जोम नसणारा असतो ,त्याच्यासोबत सप्तमात वृषभेचा मंगळ असणारी पत्रिका असेल तर शुक्राच्या राशीतील मंगळाला वासना अधिक असतात .


अश्या ह्या पत्रिका एकत्र आल्या तर शारीरिक साधर्म्य असणार नाही .

मुलीच्या पत्रिकेत अष्टम स्थानात मंगळ आणि सप्तमेश रवी असेल  आणि मुलाच्या पत्रिकेत अष्टमात मंगळ हर्शल युती असेल तर. मंगळ रवी सारखे अपघाती ग्रह अष्टम स्थानात सौभाग्याची हानी करतील .मुलाच्या पत्रिकेत अष्टमात असलेली मंगळाची हर्षला सोबत असलेली युती अपघात दर्शवते. अश्या पत्रिका फक्त मंगळाला मंगळ म्हणून घेवू नये. काही लग्नांना मंगळ अशुभ फळे देतो. बुधाची ,शुक्राची आणि शनीच्या लग्नांना मंगळ चांगली फळे देत नाही . अश्या लग्नांना पत्रिकेत मंगळ १२ १ ४ ७ ८ ह्या भावात असेल आणि बिघडलेला असेल तर अशुभ होयील. आधुनिक काळात मंगळ हा स्त्रीयांना वरदान आहे असे म्हंटले जाते .मंगळ असणार्या मुली शूर ,धाडसी , कर्तुत्ववान ,अर्थार्जन करणार्या , उत्तम निर्णय क्षमता असणार्या असतात .

मंगळाची पत्रिका म्हंटली कि अगदी लगेच तोंड फिरवून विवाह मोडणे हे आजही आपल्या समाजात सर्रास होताना दिसते . ९०% लोकांच्या पत्रिकेत मंगळ आहे मग त्यांनी विवाह करायचे नाहीत का? पुढील भागात ह्याबद्दल अधिक माहिती घेवूया .

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी मार्गदर्शन : 8104639230







No comments:

Post a Comment