|| श्री स्वामी समर्थ ||
एक जोडपे ४-५ दिवसांसाठी एका रिसोर्ट मध्ये राहायला गेले. एकमेकांच्या सोबत एक छानसे वेकेशन घालवणार म्हणून खूप मजेत होते. तिथे गेल्यावर त्या मुलाच्या लक्ष्यात आले कि आपल्याला दिलेली रूम हि सी फेसिंग नाही म्हणजेच आपल्या खोलीतून समुद्र दिसतच नाही. त्याला राग आला आणि तरातरा तो तेथील मुख्य व्यक्तीला म्हणाला कि आमची खोली सीफेसिंग नाही. ह्यावर ते म्हणाले कि इथे बुकिंग करताना तुम्ही जर आम्हाला सी फेसिंग रूम हवी आहे असे सांगितले असते तर आम्ही नक्कीच अशी रूम दिली असती पण तुम्ही तसे काहीही सांगितले नव्हते . आताही देवू शकणार नाही कारण सर्व रूम बुक झाल्या आहेत . हे म्हंटल्यावर त्याच्या रागाचा पारा अधिकच चढला आणि त्याने त्या हॉटेल त्या मालकाला बोलावले आणि त्यालाही हाच प्रश्न विचारला. त्यानेही तेच उत्तर दिले त्यावर तो मुलगा खूप जास्ती चिडला आणि रूम मधे जावून त्याने घडलेला सर्व प्रसंग त्याच्या पत्नीला सांगितला.
पत्नी समजूतदार होती . तिने त्याला सांगितले सगळ्यात महत्वाचे काय आहे? तर आपण एकमेकांच्या सोबत एकत्र वेळ घालवणे . आपल्या खोलीतून समुद्र दिसणे हे महत्वाचे अजिबात नाही. आपल्याला वाटले तर रोज आपण समुद्रावर एक मस्त फेरी मारून येत जावू . त्यावर मुलगा अधिकच भडकला. झाले.. त्या दोघांच्यात तू तू मैमै सुरु झाले आणि पुढील ५-६ दिवस ना ते एकत्र जेवले ना ते एकत्र फिरले. त्यांच्यातील संवाद जणू संपला आणि ज्या मेमरीज ते मिळवण्यासाठी आले होते . जे आनंदाचे क्षण ते जगायला आले होते ते न उप्भाग्तच ते निघून गेले.
वेकेशन संपली पण त्यातून आनंद मिळाला नाही उलट डोक्याला ताप झाला. खरेतर चूक त्या मुलाचीच होती . समुद्र रूम मधून दिसावा अशी सूचना करून त्याने बुकिंग केले असते तर पुढील सर्वच टळले असते. कुठली गोष्ट किती ताणून धरायची हे महत्वाचे असते . राग राग राग कसला राग इतका ? आणि दुसर्याला वाट्टेल तसे बोलायचं अधिकार दिला कुणी तुम्हाला ? स्वतःचाही आनंद घालवायचा आणि इतरांचाही . घरातील एकवेळ ऐकून घेतील पण बाहेरचे कुणी का ऐकून घ्यायचे ?
सांगायचे तात्पर्य असे कि आपण आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवायला शिकले पाहिजे. आयुष्यात आपण सगळ्यांना आवडत नाही आणि सगळे आपल्यालाही आवडत नाहीत पण तरीही अश्या लोकांसोबत उठबस करावी लागते तेव्हा चार हात दूर राहणे पसंत केले तर सोपे होते. अनेकदा घरात , कामाच्या ठिकाणी अनेक व्याप असतात , असंख्य गोष्टीनी आपले आयुष्य आज घेरलेले आहे त्यात आर्थिक चिंता आणि आयुष्यात निर्माण झालेली अनिश्चीतता , संघर्ष करायला लावते. अश्या सर्वातून आपले आयुष्य आज जात असताना राग येणार. पण कुठल्या हि गोष्टीचा अतिरेक आपली स्वतःची तब्येत तर बिघडवण्यास आणि कुटुंबातील आनंदाला सुरुंग लावण्यास कारणीभूत ठरतो.
समाजजीवन जगताना ज्यांना क्रोध येतो किंवा ज्यांना समोरच्या शाब्दिक चकमकी करून दुसर्याला दुखावून सगळेच वातावरण गढूळ करण्याची सवय आहे त्यांनी समाजातील कुठल्याही कामात पडू नये . कारण त्यामुळे माणसे दुखावतात आणि ती हि कायमचीच...
सर्वात महत्वाचे आपण आणि आपले कुटुंब . त्यामुळे आपले आरोग्य जपा , आपल्या माणसाना आपण हवे आहोत .कालच योग दिवस झाला आहे तो फक्त कालच्याच पुरता मर्यादित नसून “ योग “ हि आयुष्यातील आनंदाची द्वारे उघडणारी गुरुकिल्ली आहे.
तसेही शेवटी माणसाना दुखावून आपल्याला मिळणार तरी काय ? माणसे जपणे हि एक कला आहे आणि ती आज प्रत्येकाने आवडो अथवा न आवडो शिकलीच पाहिजे तरच आपले आणि इतरांचेही आयुष्य सुसह्य होयील.
माणसे जपणे म्हणजे माणसातील परमेश वर जपणे . असतात तेव्हा माणसांचे महत्व नसते पण नसली कि आपण केलेल्या चुका आठवतात आणि पश्चात्ताप करण्याशिवाय गत्यंतर उरत नाही . माणसे जोडायला आयुष्य खर्ची होते पण तुटायला तोडायला एक क्षण पुरेसा असतो .
ज्यांना रागावर ताबा मिळवायचा आहे त्यांनी भरपूर व्यायाम करा तुमची सगळी एनर्जी तिथे खर्ची करा . अहंकारातून क्रोधाची निर्मिती आणि ते दुष्टचक्र चालूच राहते त्यामुळे हनुमान चालीसा रामरक्षा नित्य म्हणावी . स्वामी समर्थांचा जप नित्य उपासनेत असावा.
जुलै अखेरपर्यंत मंगळ केतू युती आहे . १३ जुलै ला शनी महाराज सुद्धा वक्री होणार आहेत आणि ते ह्या दोन ग्रहांच्या षडाष्टकात असणार आहेत तेव्हा आयुष्याचे , मैत्रीचे , हितसंबंध ह्यातील सूर बेसुरे होणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची आहे सर्वानीच .
सौ. अस्मिता दीक्षित
पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment