|| श्री स्वामी समर्थ ||
आयुष्यात प्रेमाला अनन्यसाधारण असे महत्व आहे. आपल्यावर मनापासून अपेक्षा विरहित प्रेम करणारे कुणीतरी आहे हि भावना जीवन जगायला पुरेशी आहे. असे प्रेम करणाऱ्या व्यक्तीसोबत अखंड आयुष्य एकत्र घालवणे हा ईश्वरी आशीर्वादच आहे . प्रेम कुणावर होईल सांगता येणार नाही . स्वतःच्या जातीतील प्रेम विवाहाला अनेकदा कटकटी किंवा विरोध होतो तर आंतरजातीय किंवा अधर्मीय विवाहाला कश्या प्रतिक्रिया असतील ह्याचा विचार होणे आवश्यक आहे. राहू केतू परजातीत सुद्धा विवाह करवतात तसेच शनी हा विजोड जोडीदार देतो . प्रेमाचा ग्रह हा शुक्र आहे .चंद्र नेप हेही स्त्रीग्रह असल्यामुळे त्यांचा विचार करावा. स्थानांचा विचार केला तर ५ ७ ९ आणि लग्नस्थान हि स्थाने प्रेम विवाहासाठी पोषक असतात . वृषभ ,तूळ , मिथुन ,कर्क ,वृश्चिक आणि मीन ह्या राशी चा विचार केला पाहिजे. पत्रिकेत चंद्र राहू , शुक्र राहू ,सप्तमेशा बरोबर राहूची युती असेल तर आंतरजातीय प्रेम विवाह होऊ शकतो. शुक्रासोबत राहू किंवा केतू असेल तर रूढीबाह्य विवाहाकडे कल राहील. सप्तमेश ,सप्तम स्थानातील ग्रह आणि शुक्र जर राहू किंवा केतूच्या ,शनिच्या नक्षत्रात असतील . सप्तम स्थानात चंद्र शुक्र मंगळ हे ग्रह असतील आणि ते राहू केतू शनी ह्यांच्या युतीत असतील . सप्तमेश शनी पंचम स्थानात किंवा सप्तम स्थानात शुक्र राहू युती असेल तर. पंचमेश , सप्तमेश किंवा भाग्येश ह्यांचे मालक राहू केतूच्या युतीत असून ५ ७ ९ १ ह्या स्थानात असतील तर प्रेम विवाहाची शक्यता असते.
प्रेम हि निसर्गाची देणगी आहे तसेच भिन्नलिंगी आकर्षण हे सुद्धा नैसर्गिक आहे. तरुण पणात कुणीतरी आपल्याला आवडते तसेच कुणालातरी आपण आवडावे ह्या भावना मनात निर्माण होतात .आज मुले मुली ह्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावल्यामुळे आर्थिक स्थर सुद्धा उंचावला आहे , त्यातून निर्माण झालेला आत्मविश्वास सांगतो कि मी माझा जोडीदार पसंत करु शकतो , स्वतंत्र विचारसरणीचा , स्व कर्तुत्वावर पुढे येणारा जोडीदार आजकालच्या मुलांचा कल आहे तरीही आजही पालकांना आपल्या मुलांचे लग्न आपणच ठरवावे असे वाटते .
प्रेम होते पण त्या प्रेमाची परिणीती विवाहात फार कमी जणांची होते. असे असले तरी प्रेम विवाहाचे प्रमाण वाढत आहे. प्रेम आणि प्रेमविवाह ह्याचा सर्वांगीण विचार करताना ५ ७ ११ १ ह्या स्थानांचा विचार केला पाहिजे. तसेच चंद्र शुक्र आणि नेप ह्या ग्रहांचा विचार केला पाहिजे. मंगळ हा विलासी , कामप्रधान ग्रह असल्यामुळे शारीरिक संबंधा साठी त्याचा विचार केला पाहिजे. वृषभ कर्क तूळ मिथुन वृश्चिक आणि मीन ह्या राशींचा विचार केला पाहिजे. प्रेम भाव फुलण्यासाठी लग्न पंचम नवम लाभ स्थानात शुक्र चंद्र नेप ह्यासारखे ग्रह असणे . चंद्र शुक्र मंगळ नेप असे ग्रह जर पत्रिकेत वृषभ कर्क तूळ मिथुन वृश्चिक मीन ह्या राशीत उत्तम फळ देतील. शुक्र मंगळाच्या किंवा मंगळ शुक्राच्या राशीत असेल तर प्रेमात पडण्याचे योग येतात. सप्तमात किंवा पंचमात हर्शल नेप ह्यासारखे ग्रह असतील तर जगावेगळे प्रेम होते .अचानक होते आणि अचानक संपते सुद्धा .५ ७ ११ १ मध्ये जर बुध शुक्र युती असेल तर आणि हि युती प्रेमाच्या राशीत असेल तर एकापेक्षा अधिक प्रेम संबंध असू शकतात .
चंद्र शुक्र , बुध शुक्र ,शुक्र मंगळ ,शुक्र नेप ,हर्शल नेप अश्या युती असतील तर व्यक्ती चे प्रेमसंबंध होतात. पंचमेश आणि व्ययेश ह्यांचा संबंध आला तर अनेक प्रेम प्रकरणे घडू शकतात. श्रवण नक्षत्र हे शापित आहे त्यात असणार्या ग्रहांना सुद्धा अशुभत्व येते . १ ७ ५ ९ ११ १ ह्यांच्या स्वामींचा एकमेकांशी संबंध आला . लग्नेश सप्तमात किंवा सप्तमेश लग्नात किंवा सप्तमेश सप्तम स्थानात . पंचमेश सप्तमात आणि सप्तमेश पंचम स्थानात . पंचमेश सप्तमेश ,पंचमेश भाग्येश , सप्तमेश भाग्येश ह्यांची युती कुठेही असेल तर. शुक्र नेप ,शुक्र हर्शल ,शुक्र मंगळ युती असेल तर ज्यावर प्रेम केले त्याच्याशीच लग्न करायची इच्छा असते . लग्नेशाचा पंचमेश ,सप्तमेश किंवा भाग्येशाशी संबंध आला तर आपल्या पसंतीने लग्न करते.५ ७ ९ ह्या स्थानात चंद्र शुक्र ,नेप किंवा मंगळ असे ग्रह एकटे किंवा एकमेकांच्या युतीत असतील तर . शुक्र लग्नस्थानी किंवा शुक्र चंद्र नवपंचम योग असेल तर वरील नियमांपैकी जास्तीतजास्त नियम एकाच कुंडलीत असतील तर प्रेमविवाह होतो. सप्तमेश आणि व्ययेश एकत्र आले तर घटस्फोट होऊ शकतो .
प्रेम फुलते तेव्हाच खर्या अर्थाने जीवन फुलते. प्रेमाची भावना नसेल तर जीवन निरस होईल . कुणीतरी आपल्यावर प्रेम करते आहे हि भावना जीवन जगायला पुरेशी आहे. सहमत ????
सौ. अस्मिता दीक्षित
पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment