Sunday, 15 June 2025

मंगळ केतू युती

 || श्री स्वामी समर्थ ||


सध्या अनिष्ट अशी मंगळ केतू युती सिंह ह्या अग्नी तत्वाच्या राशीत जुलै अखेर पर्यंत आहे.  त्याच सोबत गुरु अस्तंगत आहे . काहीच दिवसात शनी वक्री होणार आहे. रागावर भाव भावनांवर अत्यंत नियंत्रण असावे. ज्यांना BP चा त्रास आहे त्यांनी आपल्या प्रकृतीला जपावे. मंगळ म्हणजे आवेग , आवेश आणि वेग त्यामुळे वाहने जपून चालवावीत , शरीरातील उष्ण वाढेल त्यामुळे तामसी बोलणे आणि तामसी  भोजन टाळावे. 


मंगळ हा भूमिपुत्र आहे त्यामुळे जमिनीचे व्यवहार , रिअल एस्टेट पासून शेअर मार्केट पर्यंत बदल दिसून येतील. वातावरणात सुद्धा अनपेक्षित बदल होतील . सामान्य माणसाला त्रासदायक जीवन असणारा आहे. मोठे प्रवास टाळावेत . ज्यांना राग येतो त्यांनी तर पुढील दोन महिने गप्पच राहावे म्हणजे अनेक प्रसंग टळतील . युद्धाची पार्श्वभूमी सध्या आहेच . मंगळ हा रक्तासंबंधी विकार देतो . पुढील काळात आगी लागणे, घरांची मोठ्या प्रमाणात पडझड होण्याची शक्यता , वादळी वारे . प्रत्येक गोष्टीत आपले मत मांडणे आणि टोकाचे निर्णय रागाच्या भरात घेणे टाळा. मंगळ केतू युती चांगल्या भावात अध्यात्मिकता सुद्धा देयील. सप्तमात हि युती जोडीदारासोबत वाद घडवून दुरावा आणेल , अष्टम भावात मुळव्याध आणि अपघात . असो.

प्रत्येक भावातील मंगळ केतू युतीचे फळ वेगवेगळे असणार आहे आणि आपल्या मूळ पत्रिकेतील ग्रहांप्रमाणे ते बदलणार आहे . अति स्पष्ट बोलणे टाळावे , संबंध कायमस्वरूपी बदलतील. मंगळ म्हणजे भावंडे , रक्त विकार , शेजारी , पोलीस दल , रक्तदाब . मंगळाच्या हातात शास्त्र आहे त्यामुळे सर्जरी . ज्यांची काही दिवसात सर्जरी झालेली आहे त्यांनी जपावे . मूळ पत्रिकेत मंगळ केतू युती असेल किंवा मंगळ केतू ह्यांची दशा अंतर्दशा असेल त्यांनी जपावे.  

उपाय : हनुमान चालीसा नित्य पठण , सद्गुरू स्मरण   

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230


No comments:

Post a Comment