|| श्री स्वामी समर्थ ||
जुलै च्या १० तारखेला गुरु पौर्णिमा आहे. २० जून पासून उपासनेला सुरवात केली तर १० जुलै ला २१ दिवसाच्या उपासनेची करता येयील . प्रत्येक क्षणी महाराज आपल्या सोबत असतात , दिसत नाहीत कारण तितकी आपली कुवत नाही पण ते असतात . आपल्याला दुक्ख झाले कि त्यांच्याही डोळ्यातून अश्रू येतात . आपल्या लाडक्या भक्तांना खरच ते काहीही कमी पडू देत नाहीत . खडतर तपस्या करून घेतील , परीक्षा घेतील पण एक दिवस इतके भरभरून देतात कि त्यांच्या सोबत केलेली सगळी रुसणी फुगणी आपण विसरून जातो. परत आपली कट्टी ची बट्टी होते.
गुरु पौर्णिमा हा आपल्या भक्तांसाठी महाराजांच्या चरणाशी आपल्या निष्ठा समर्पित करण्याचा दिवस, कृतकृत्य होण्याचा आणि गुरूंच्या प्रती आपल्या असलेल्या सद्भावना साधनेतून व्यक्त करण्याचा दिवस. आपले नित्य कर्म सोडून जप करत राहिलो तर महाराजांना ते आवडणार नाही . कारण खुलभर दुधाची गोष्ट . येतंय ना लक्ष्यात ?
प्रत्येक दिवस हि एक पायरी आहे . अश्या २१ पायर्यांची साधना आपल्याला महाराजंच्या समीप नेणार ह्यात शंका नको . आत्मिक समाधान आणि गुरुप्रती निष्ठा , समर्पण ह्याचा हा त्रिवेणी संगम आहे . आपली नित्याची दिनचर्या सांभाळून खालील पैकी कुठलीही एक साधना करून आपण गुरुपौर्णिमा साजरी करूया. प्रत्येक पायरीवर महाराज काही न काहीतरी बोध करून देतील, आत्मपरीक्षण करताना आपल्यातील चुकांचा आरसा दाखवतील . आपल्याला कुठे कुठे सुधारायला वाव आहे ते समजेल . प्रत्येक पायरी अनमोल आहे. आपल्याच आयुष्याचा लेख जोखा आपल्यासमोर उलगडेल. सतत दुसर्यांचे दोष काढणारे आपण आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त होवू . २१ व्या पायरीवर मन आणि चित्त दोघांचेही शुद्धीकरण होईल आणि महाराज काय चीज आहे ते अंशतः तरी समजेल.
खालील साधना हि आपल्या नित्य उपसानेसोबत करायची आहे . आपला नित्य कुल स्वमिनीचा जप , श्री सुक्त , गणपती स्तोत्र जे करत असू त्यासोबत खालील कुठलीही एक उपासना करायची आहे.
अखंड नामस्मरण किंवा संकल्पित नामस्मरण
श्री स्वामी कृपा तारक मंत्र ( रोज ११ २१ ५१ १०८ जमेल तसा )
श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण
श्री आनंदनाथ महाराज ह्यांचे श्री गुरुस्तवन स्तोत्र पठण
दत्त बावन्नी
मानसपूजा
स्वामी महाराजाच्या देवघरातील मूर्ती किंवा पादुकांना पूजा अभिषेक आरती नेवेद्य
वरील पैकी किंवा आपल्याला जे सुचेल त्याप्रमाणे आपण एखादी साधना २१ दिवस संकल्प करून करू शकतो त्याचसोबत रोज अन्नदान करू शकतो. ह्या सर्वाचा उपयोग म्हणजे आपल्या स्वतः मध्ये पुढील २१ दिवसात होत जाणारा बदल. आपल्याला पडणार्या प्रपंचातील अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्यालाच मिळत जातात .
प्रचीती विना भक्ती नाही आणि महाराज आपल्या भक्तांना प्रचीती दिल्याशिवाय कसे राहतील . अशक्य वाटणाऱ्या गोष्टी फक्त तेच शक्य करू शकतात . प्रचीती माणसाला जगायची उमेद देते आणि महाराजांच्या ठायी विश्वास द्विगुणीत करते .
गुरुपौर्णिमा , प्रगट दिन हि तर फक्त निम्मित्त आहेत , आपण ह्या दिवसांची वाट न पाहता अगदी ह्या क्षणापासून साधनेला सुरवात केली पाहिजे . आपल्यातील उत्तम माणूस , भक्त घडवण्याचे काम आपण केलेली साधना करत असते .साधनेतून तावून सुलाखून निघालेला भक्त महाराजांच्या समीप जातो, त्याला गुरु चरणांच्या शिवाय काहीही दिसत नाही. साधनेच्या ह्या काळात अनेक दिव्य चमत्कार होतात , आपल्याकडून महाराजांना नेमके काय अभिप्रेत आहे ते समोर येते . साधनेचा काळ हा आत्मपरीक्षणाचा असतो. आपल्या आतमध्ये अंतर्मनात डोकावून अनुभूती घेण्याचा असतो. मनाची सात्विकता , शांतपणा , संयम , विचार करण्याची क्षमता , मनन चिंतन सर्वकाही ह्या काळात होत जाते आणि त्यातून एक साधक तयार होतो.
लहान सहान गोष्टीत न अडकता आपले जीवन गुरु चरणांशी समर्पित करता आले पाहिजे हेच साधना शिकवते. भौतिक सुखे पायाशी हात जोडून उभी असताना झोपेच्या गोळ्या न घेता झोप येत नसेल तर त्या भौतिक गोष्टी किती निरर्थक आहेत आणि अश्याच सर्व गोष्टींच्या मागे आपण आयुष्यभर लागून आपली मनशांती मात्र घालवून बसतो. मनाची शांतता , मनाचा समतोल पुन्हा मिळवण्यासाठी ह्या २१ पायऱ्या २१ दिवसात चढताना दिव्य अनुभव येतात . आपलीच आपल्याला नव्याने ओळख होत जाते . आयुष्यभर दुसर्यांचे गुण अवगुण शोधणार्या आपल्याला आपल्यातील असंख अवगुणाची ओळख होते .
मन स्वीकारते पण अंतर्मन नाही अश्या सर्व गोष्टी आता आरशासारख्या स्वछ्य होतात आणि आपल्यातील आणि महाराजांच्या मधील आपल्या अहंकाराची भिंत जणू कोसळून पडते.
महाराजांचे अस्तित्व सहवास प्रत्यक्ष अनुभवायला मिळणारे भक्त किती किती भाग्यवान असतील . डोळे मिटले तरी अक्कलकोट शेगाव समोर उभे राहते तेव्हा तो क्षण आपण महाराजांच्या खूप समीप असतो .
स्वामी म्हणजे स्वाः मी...ह्या साधनेतून आपण आपल्यातील मी ला म्हणजेच अहंकाराला कायमची तिलांजली देण्याचा प्रयत्न करुया . महाराजांच्या नावातच आणि त्यांच्या चरणाशी आपले जग आहे बाकी सबकुछ फोल आहे , अर्थहीन आहे ह्याची जाणीव करून देणारी साधना आपल्याला कात टाकल्यासारखे नवीन जीवन देयील ह्यात दुमत नसावे.
तुम्हा आम्हा सर्वाना करत असलेल्या साधनेतून आनंद मिळूदे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना .
सौ. अस्मिता दीक्षित
पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment