Friday, 13 June 2025

रेशीमगाठी भाग -6 विवाहाच्या पद्धती , सगोत्र विवाह , नाडी

 || श्री स्वामी समर्थ ||


पूर्वीच्या काळी समाज प्रगत नव्हता , शहरीकरण झालेले नव्हते , समाज शिक्षित नव्हता आणि त्यामुळे वैचारिक प्रगती आजच्यासारखी नव्हती . विवाह हे पंचक्रोशीत किंवा नात्यातच होत असत . मुलामुलींच्या अगदी उमलत्या कोवळ्या वयात संसाराला सुरवात होत असे. घरात पाच पंचवीस माणसे असत , सगळ्यांचा धाक पण वय लहान म्हणून शिस्त असली तरी भरपूर लाड होत असत . माहेर सासर एकाच वाटत असे. आई पेक्ष्याही त्या काळातील मुली सासू सोबत अधिक वर्ष घालवत असत. 

पूर्वीच्या काळी साधे जीवन मग त्यात विवाह हा आजकालचा संगीत , मेहेंदी वगैरे सारखा सोहळा नसे. सर्व चालीरीतींना अनुसरून घरची मोठी मंडळी विवाह ठरवत आणि संपन्न हि होत असत . 

तेव्हा विवाह ठरवायच्या पद्धती सोप्या सध्या आणि मजेशीर होत्या . स्त्रिया हळद कुंकवाच्या पुड्या टाकत जी पुडी उचलेल तिथे विवाह . पहिल्या ज्या स्थळाकडून होकार येयील तिथे मुलगी द्यायची असे ठरायचे. अनेकदा देवाला कौल लावून विवाह ठरत असत .

मुलीसमोर शेतजमिनीची , गोठ्यातील ,अग्निहोत्रातील , स्मशानातील , नापीक जमिनीतील ,चव्हाट्याच्या जागेवरील , नदीच्या पात्रातील , जुगारी अड्ड्यावरील असे मातीचे गोळे आणून ठेवत आणि मुलीला त्यापैकी एक गोळा उचलायला सांगत .

मुलीने शेतजमिनी  गोळा उचलला तर ती आल्यावर घरात अन्नाची बरकत येयील. गोठ्यातील गोळा उचलला तर गाई म्हशींची बरकत होयील. अग्निहोत्राचा गोळा उचलला तर घरातील धार्मिकता वाढेल, कुलाचार ,धर्म वाढेल. नदीच्या पात्रातील गोळा उचलला तर घरत पैशाचा ओघ राहील.पाणी म्हणजे जीवन ,लक्ष्मी. जुगारी अड्ड्यावरील उचलला तर घरात भावूबंदकी होयील.  चव्हाट्या वरचा उचलला तर घरातील भांडणे चव्हाट्यावर जातील. नापीक जमिनीतला गोळा उचलला तर ती आल्यापासून लाभ होणार नाहीत . स्मशानातील उचलला तर वैधव्य लवकर येयील अश्या समजुती असत आणि त्याप्रमाणे निर्णय होत असे. 


आजच्या आधुनिक काळात ह्या सर्व पद्धतीना आपोआपच  तिलांजली मिळाली . आजचे जग प्रगत आहे . आजची मुले आणि मुलीही अगदी परदेशात सुद्धा एकटे राहतात , मोठमोठ्या पदांवर काम करून घाम फुटेल इतके मोठमोठे पगार सुद्धा असतात . त्यामुळे आता पूर्वीच्या विवाह पद्धती अर्थातच मोडीत निघाल्या आहेत पण विवाह संकल्पनेला निदान आज तरी सुरुंग लागलेला नाही .


आता मुला मुलगी बाहेरच भेटतात ,त्यांना आपण अनुरूप आहोत असे वाटले तर दोन कुटुंबे एकत्र भेटतात .लग्नातील देणीघेणी त्याच्या मोठमोठाल्या याद्या ह्या सुद्धा आता बाद झाल्या आहेत . आजच्या काळात दोघांचे एकमेकांशी जमणे आणि त्यांनी एका छताखाली आनंदाने राहणे हेच सर्वात महत्व. पाश्च्यात्य संस्कृतीचे अनुकरण आपण नेहमीच करत आलो आहोत .आपली विवाह संस्था हि त्याला अपवाद नाही . भारतात सध्या लिव इन रिलेशन चे पेव फुटले आहे. आज मुलगा आणि मुलगी ह्यांनी एकत्र एका छताखाली आनंदात एकोप्याने राहणे हीच काळाची खरी गरज आहे. एखादी मुलगी छान नांदते तेव्हा आईवडील जावयाचे सुद्धा तितकेच कोडकौतुक करताना दिसतात .

म्हणून योनिमैत्रीचा विचार अधिक आहे. षडाष्टक योग टाळावा कारण त्याने शत्रुत्व येते म्हणून लग्न आणि चंद्र षडाष्टक टाळावे . सप्तमात २ शत्रू ग्रह आले तर वैवाहिक जीवनाची सुरवातच कटकटीतून होताना दिसते .तसेच अष्टमस्थानात सुद्धा शत्रूग्रह नकोत कारण ते लैंगिक सुखाचे स्थान आहे . 


एक नक्षत्र आणि एकच चरण असेल तर विवाह करू नये एक नाडी दोष निर्माण होतो , त्यांना संतती होण्यास अडथळे येतात. पण ज्यांना संतती नकोच असेल अश्यांसाठी हे पहायची गरज नाही. अश्यानी विवाह करायला हरकत नाही . समाजात परंपरागत ज्या गोष्टी चालू आहेत त्या एकदम अचानक खोडून टाकणे जमत नाही त्यामुळे आपल्याला गुणमिलन सुद्धा करून द्यायला पाहिजे.  किती गुण जुळतात तेही सांगायला लागते. 


पूर्वीच्या काळी सगोत्र विवाह करावे का असा प्रश्न येई . पूर्वी पलीकडच्या वाडीत ,पेठेत , नात्यात ,आत्याकडे मावशीकडे मुलगी दिली जात असे. अश्या मध्ये शारीरिक दोष निर्माण होतात असे  वैदिक शास्त्र सांगते त्यामुळे सगोत्र विवाह नकोत असे होते पण आता तसे होत नाही. मुलामुलीने एकत्र राहणे हे आजच्या काळात सर्वात महत्वाचे आहे.  सगोत्र विवाहासाठी काही उपाय शास्त्राने सुचवले आहेत .


विवाह कलाही होत होते आजही होत आहेत आणि भविष्यात सुद्धा होत राहतील . प्रश्न आहे तो कसे होतील आणि विवाहाची मूळ संकल्पना आपल्याच मातीत मूळ धरून टिकेल का  .


सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230



No comments:

Post a Comment