Monday, 15 September 2025

सहजक्रिया

 || श्री स्वामी समर्थ ||

नारदमुनी स्वतः मोठे साधक होते .सदैव “ नारायण नारायण “ जप करत असत. एकदा श्री विष्णूंच्या भेटीला ते गेले आणि महा विष्णुना नमस्कार करून म्हणाले कि मी आपला महान भक्त आहे कारण मी सदैव आपलेच स्मरण करत असतो . तेव्हा विष्णू मनोमन समजले कि ह्याला आपल्या भक्तीचा अहंकार झालेला आहे . त्यांनी नारदाला सांगितले अजूनही एक भक्त आहे पृथ्वी लोकात जो माझा परम भक्त आहे. तेव्हा नारदांनी ते सरळ नाकारले आणि कोण आहे तो अशी विचारणा केली.

त्यावर वेश बदलून दोघे पृथ्वी लोकात एका शेतात आले जिथे एक शेतकरी नांगर चालवीत होता . पण नुसताच नांगर चालवत नव्हता तर मुखाने सदैव विष्णूंचे नाम घेत होता .

विष्णूनी नारदाला सांगितले कि ह्या भक्तापेक्षा तू मोठा भक्त आहेस हे सिद्ध करण्यासाठी तू हा नांगर चालव . फक्त एक फेरी मार पण तो चालवताना एका हातात तेलाने भरलेले मातीचे भांडे घे ज्यातील तेल नांगर चालवताना खाली सांडले नाही पाहिजे आणि एकीकडे मुखाने नामस्मरण सुद्धा केले पाहिजे . इतकेच ना हे तर सोपे आहे असे म्हणून नारदमुनी एका हातात तेलाचे भांडे घेवून नांगर ओढू लागले पण इथे तिथे तेल सांडणार तर नाही ना ह्या भीतीने खरच थोडे तेल सांडले. विष्णूनी त्यांना काय शिकवले ते त्यांना समजले आणि आपल्या अहंकाराला तिलांजली देत नारदमुनी त्यांच्या समोर नतमस्तक झाले.

प्रपंच करून परमार्थ करणे हि सहजक्रिया जरी वाटत असली तरी त्यात सर्वस्व ओतावे लागते . प्रपंचातील सर्व कर्म करताना परमेश्वराच्या चरणी लीन व्हावे लागते . प्रत्येक कर्म करताना त्याला हृदयात स्थान द्यावे लागते . क्षणभर सुद्धा त्याला न विसरता प्रपंच करत राहणे हे खचितच सोपे नाही . हि कठोर परीक्षा आहे कारण नाम घेणे म्हणजे भौतिक सुखापासून परास्त होणे आणि ते जमणे महाकठीण असते .

सातत्य आणि श्रद्धा असेल तर हेही जमते . नाम घेण्यासाठी वेगळे काहीही करावे लागत नाही इतकी हि क्रिया सहज होवून जाते . आपणही रोजच्या आपल्या प्रपंचात “ वेळ नाही “ हि सबब सांगतो त्यात तथ्य नाही. पोळ्या करताना , कपडे वाळत घालताना , स्वयंपाक करताना , चालता बसता उठता झोपता , आपली नित्य कर्म करताना नाम घेत राहणे हि क्रिया तितकीच आपल्याही नकळत सहज होवून जाते . फक्त करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती हवी .

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

Thursday, 11 September 2025

तनुस्थान

 || श्री स्वामी समर्थ ||


लग्न भाव म्हणजेच तनुस्थान हे महत्वाचे आहे , त्यात राशी बदलल्या तरी भाव महत्वाचा .जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर असलेली राशी हि जातकाच्या लग्नात येते. पूर्व क्षितिजावर सूर्य उगावतो तो लग्न बिंदू असतो . जन्म लग्नातील उदित राशी तिचा स्वामी आणि लग्नातील ग्रह हे जातकाच्या आयुष्यावर स्वभाव टाकतात जसे  प्रथम दर्शनी असलेले रूप रंग , शरीरयष्टी बांधा तसेच मन आणि स्वभावावर परिणाम करतात . लग्न बिंदू आत्यंतिक महत्वाचा आहे कारण ह्यातून आपण जन्म घेत असतो आणि त्यासोबत आलेल्या आपल्या चांगल्या वाईट वासना देखील ह्या जन्मात प्रवेश करत असतात . ह्या स्थानाला महत्व आहे कारण ह्या भावातील ग्रह बलवान असतात . केंद्रातील हे प्रथम आणि प्रमुख स्थान आहे.

लग्न बिंदू निश्चित करणे महत्वाचे असते. परवा एक पत्रिका पाहिली त्यात लग्न भावात शून्य अंशावर मेष लग्न उदित होते . आता मेष घ्यायचे कि मीन हा प्रश्न होता तेव्हा रुलिंग ची मदत घेतली . त्या दिवशी रुलिंग ला केतू असल्यामुळे मेष लग्न निश्चित केले आणि त्यानुसार केलेल्या पत्रिकेचे विवेचन सुद्धा बरोबर ठरले.

लग्न जेव्हा शून्य अंशावर उदित होते तेव्हा रुलिंग प्लानेट ची मदत देवासमान समजावी .

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

Wednesday, 10 September 2025

स्थित्यंतरे दाखवणारा अष्टम भाव

 || श्री स्वामी समर्थ ||


आपल्या आयुष्यात काहीही वाईट झाले किंवा उलथापालथ झाली कि आपण सर्वात खापर फोडतो ते शनी राहू केतू मंगळ ह्यांच्यावर . पण अनेकदा ह्यातील कुणीच त्याला जबाबदार नसून इतर अनेक योग त्या घटना घडवत असतात . उदा द्यायचे झाले तर अष्टम भाव , त्यातील ग्रह किंवा अष्टमेशाची दशा . एखादा ग्रह जेव्हा अष्टमेशाच्या नक्षत्रात असतो तेव्हा जीवनात अनेक स्थित्यंतरे बघायला मिळतात . अष्टम भाव हा प्रामुख्याने लग्नापासून आठवा असल्यामुळे मुख्यतः शारीरिक पीडा तसेच आर्थिक मानसिक शांतता हरवून टाकतो . नको ते व्याप आणि मनस्ताप मागे लागतात .नोकरीत निलंबन ,पैसे अडकणे , उधारी , व्यसने , व्यवसाय अचानक बंद पडणे , शारीरिक त्रास उद्भवणे आणि त्यामुळे मानसिक संतुलन बिघडणे ह्या गोष्टीना जातकाला सामोरे जायला लागते.

अष्टम भाव हा सप्तमाचा धन भाव आहे अनेकदा आपला जोडीदार आपल्यामागे समर्थपणे उभा असतो त्यामुळे नेहमीच अष्टम भाव नकारात्मक फळे देयील असे नाही . भावेश आणि भावातील ग्रह जर अष्टमेशाच्या नक्षत्रात असतील तर काय फळे मिळतात ते बघुया .

प्रथमेश किंवा प्रथम भावातील ग्रह जर अष्टमेश किंवा अष्टम भावाच्या नक्षत्रात असतील तर अपघात , तीव्र डोकेदुखी, नैराश्य, आळशी , आत्मघातकी वृत्ती असते . धनेश किंवा धन भावातील ग्रह जर अष्टमेश किंवा अष्टम भावाच्या नक्षत्रात असतील तर उधळपट्टी , बोलण्यात अडखळणे , कौटुंबिक सौख्य नसणे , आर्थिक गुंतवणुकीत फसवणूक होते. तृतीयेश किंवा तृतीय भावातील ग्रह जर अष्टमेश किंवा अष्टम भावाच्या नक्षत्रात असतील तर खोट्या बातम्या पसरवणे , खोट्या सह्या , करारात फसवणूक , भागीदार फसवतील.

चतुर्थेश किंवा चतुर्थ भावातील ग्रह जर अष्टमेश किंवा अष्टम भावाच्या नक्षत्रात असतील तर घरात दडपण , शिक्षणात अडथळे , आईशी न पटणे , मनाची ताकद कमी आणि घरात एकटे राहायला भीती वाटणे , वाहन अपघात , घराची चुकीची कागदपत्रे . भाग्येश किंवा भाग्यातील ग्रह जर अष्टमेश किंवा अष्टम भावाच्या नक्षत्रात असतील तर उच्च शिक्षणात अडथळे , वडिलांशी वितुष्ट , देवधर्म न होणे , न्यायालयीन कामात अडथळे , लाभेश किंवा लाभतील ग्रह जर अष्टमेश किंवा अष्टम भावाच्या नक्षत्रात असतील तर मित्र आप्तेष्ट ह्यांच्याकडून नुकसान , कुसंगती . व्ययेश किंवा व्यय भावातील ग्रह जर अष्टमेश किंवा अष्टम भावाच्या नक्षत्रात असतील तर अपघात , सर्जरी , चुकीच्या गुंतवणुकीतून तोटा , मनस्ताप , परदेशी कंपन्यांच्या व्यवहारात फसवणूक होते.

अष्टम भाव अनेक कंगोरे देत असतो त्यामुळे अभ्यास करावा तितका थोडाच आहे. एखादा नियम अनेक पत्रिकातून अनुभवला तर त्याची अनुभूती मिळाली असे समजायला हरकत नाही . एखादी घटना फक्त एक ग्रह घडवत नाही तर त्यास अनेक योग , ग्रह दशा कारणीभूत असतात . एखादा ग्रह भरभरून देणारा तर एखादा अडथळे निर्माण करणारा. सगळे रंग समजले पाहिजेत . असाच अभ्यास करत राहूया . तूर्तास इथेच पूर्णविराम .

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

Tuesday, 9 September 2025

भाकीत म्हणजे ब्रम्हवाक्य नाही

 || श्री स्वामी समर्थ ||

ज्योतिष शास्त्राचा आवाका प्रचंड मोठा आहे त्यामुळे त्याचा अभ्यास सुद्धा तितकाच सखोल आहे. एखाद्याच्या पत्रिकेबद्दल भविष्य कथन करणे सोपे नाही. प्रचंड दांडगा व्यासंग आणि उपासना असेल तरीही केलेलं भाकीत अनेकदा चुकू शकते कारण हे शास्त्र पूर्णपणे परिपूर्ण नाही. शास्त्र हे कर्माच्या सिद्धांतावर अवलंबून आहे म्हंटले तर वावगे ठरू नये. भविष्य कथन करण्याच्या अनेक पद्धती प्रचीलीत आहेत पण पद्धत कुठलीही वापरली तरी उत्तर बरोबर आले पाहिजे हे महत्वाचे आहे .

सर्वच कुंडल्या काही सोप्या नसतात . अनेक कार्यशाळा करून ज्योतिष येयील का? तर नाही. त्यातून मिळालेले ज्ञान आपल्याला अभ्यासाची दिशा दाखवेल. पण तुमचा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला परिपूर्ण ज्ञान देयील ह्या मताशी बहुतांश सहमत होतील. पुस्तक आणि प्रत्यक्ष आयुष्य हे वगळे आहे आणि म्हणूनच पुस्तकात दिले आहे २ ७ ११ लागले कि विवाह होईल पण त्याचा दशा लागूनही जेव्हा विवाह होत नाही त्याचे कारण आपला स्वतःचा अभ्यासच देवू शकतो .थोडक्यात ग्रंथात दिलेले नियम आयुष्यातील अनेक प्रश्न सोडवताना कसे लावायचे ते समजले पाहिजे . जसे मेष लग्नाला कन्येचा शुक्र हा प्रनायासाठी उत्तम नसेल पण कन्येसारख्या पृथ्वी तत्वाच्या राशीत तो आर्थिक दृष्टीने चांगले फलित देयील. अवास्तव पैसा खर्च करणारी व्यक्ती नसेल तर पैशाचा संग्रह करील.

प्रत्येक पत्रिका हे ज्योतिष अभ्यासका समोर असलेल एक आव्हान असते जिथे आपल्या ज्ञानाची आकलन शक्तीची अक्षरशः कसोटी लागते. जातक आपण दिलेल्या निर्णयावर विश्वास ठेवून पुढील मार्ग आखणार असतो त्यामुळे सांगणाऱ्या ज्योतिषाचीही जबाबदारी वाढते . सप्तम भावाचा सब बुध असेल तर दुसरा विवाह होईल हे नेहमीच शक्य होत नाही हे लक्ष्यात आले पाहिजे

अनेक वेळा पत्रिकेतील ग्रह आपल्यासमोर पेच निर्माण करतात , गुगली टाकतात अश्यावेळी आपली वयक्तिक उपासना उपयोगी पडते . आपल्या ज्ञानाचा कस लागतो तिथे आपला आतला आवाज सुद्धा ऐकावा लागतो . ज्योतिषाची तळमळ जातकाचा प्रश्न सुटावा अशी असेल तर प्रश्न निश्चित सुटतो .

एखाद्या पत्रिकेचे उत्तर उदा. विवाहाचा प्रश्न असेल आणि विवाह हि घटना जातकाच्या आयुष्यात घडणार नसेल असे संकेत जरी ग्रह देत असतील तरीही ती खुबीने त्याला न दुखावता सांगणे हे कौशल्य असते . अनेकदा आपण वर्तवलेले भाकीत जरी नकारात्मक असले तरी ते खरे झाल्यामुळे जातकाचा आपल्यावर विश्वास बसतो आणि अश्याही अवस्थेत तो पुन्हा आपल्याकडे प्रश्न घेवून निश्चित येतो असा अनुभव आहे.

सांगितलेले खरे झाले ना? मग ते कदाचित आपल्या मनासारखे नसेलही असो , भाकीत खरे झाले हे महत्वाचे असते. शास्त्राला मर्यादा आहेत त्यामुळे वाटेल त्या गोष्टीचे मुहूर्त काढून द्या हे जरी सांगितले तरी ते देणे उचित ठरणार नाही जसे घटस्फोट लवकर व्हावा असे प्रश्न हे न हाताळलेले बरे. निसर्गासमोर माणसाने नतमस्तक व्हावे हेच योग्य .

काही आपले प्रारब्ध भोग सुद्धा असतात त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर उपाय नसतो . जपताप्य , नामस्मरण , अनेकदा घटनेचा क्रम बदलवू शकत नाही पण आपली मनोधारणा बदलवू शकतात . आपले मतपरिवर्तन होवू शकते . एखादी गोष्ट

आयुष्यात घडणार नाही हे आपले मन स्वीकारते हाच नामाचा महिमा आहे. जसा काळ पुढे सरकतो तसे आयुष्य नव्याने सुरु करण्याची उमेद उपसना देत असते . आपले आप्त कुटुंबीय हे जग सोडून गेले तरी मागे राहिलेल्या व्यक्तींना जगावेच लागते तेही असलेल्या दुक्खाला दूर करून . कुणी कुणासाठी थांबत नाही हा संदेश आपल्याला ह्या घटनातून मिळतो.

ज्योतिष हे चमत्कार करणारे आणि होत्याचे नव्हते करण्याची ताकद असलेले शास्त्र नाही , ते परिपूर्ण शास्त्र आपल्याला पुढील घटनांचा फक्त संदेश देत असते . ग्रह आपल्या पुर्वकर्मांचा आरसा आहेत आणि त्याची फलिते देण्यास समर्थ आहेत म्हणूनच आपल्या पत्रिकेत त्या त्या भावात ठाण मांडून बसले आहेत . सारीपटावरील सोंगट्या प्रमाणे आपण त्यांना हलवू शकत नाही .आपल्या कर्मांनी आपल्या आयुष्याची जी वाट लावलेली असते ते आपले आयुष्य वाटेवर राजमार्गावर आणण्याचा प्रयत्न शास्त्र करते म्हणून त्याला मार्गदर्शक घटक म्हंटलेले आहे.

आजकाल लोकांना ज्योतिष हा एक छंद झालेला आहे. बर सांगितलेले उपाय करतील कि नाही हे ज्योतिषाला जातकाची पत्रिका बघूनच समजलेले असते पण तरीही मोठ्या आशेने तो उपाय सांगतो . उपाय करणे हे ज्याचे त्याचे प्रारब्ध आहे.

शास्त्राची परीक्षा घेण्यासाठी प्रश्न विचारू नयेत आणि ज्योतिष सांगूही नये. तितकी आपली पात्रता नाही हे नक्की. शास्त्र अनुभूती देणारे आहे आणि ते देतेच देते . ज्योतिष शास्त्रावर तुमचा विश्वास असो अथवा नसो सूर्य उगवायचा राहत नाही . निसर्ग ग्रह आपापली कामे चोख बजावत असतात . आपण सामान्य माणसे आहोत

आकाशातील ह्या लुकलुकणाऱ्या तारकांचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो आणि त्यांचे जन्मापासून असलेले विलक्षण आकर्षण आपल्याला त्यांचा अभ्यास करण्यात प्रद्युक्त करते . एखादे भविष्य चुकले तर पुन्हा अभ्यास करावा शेवटी भविष्य वर्तवणारा सुद्धा माणूसच आहे . खरतर स्वतःला ज्योतिष न म्हणवून घेता अभ्यासकच म्हंटले पाहिजे . हे तर्कशास्त्र आहे आणि त्याचा अभ्यास प्रत्येकाने करावा . आपले वेद , पुराण , ग्रंथ , उपनिषदे ह्या सर्वच अभ्यास करून आपल्या ऋषीमुनींचे आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करावा .

ग्रहतारे आपल्या जीवनाचा एक भाग आहेत आणि त्यांचा अभ्यास आपल्याला भाकीत वर्तवताना उपयुक्त होतो. पण म्हणून आपण केलेले प्रत्येक भाकीत हे ब्रम्हवाक्य असेल असे नाही आणि तसा अट्टाहास सुद्धा नसावा.

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230 

Saturday, 6 September 2025

राहूच्या दशेत नेमके कुठले शिक्षण घ्यावे ????

 || श्री स्वामी समर्थ ||


राहूची दशा अंतर्दशा असेल तेव्हा अनेकदा आता मुलाचे शिक्षणातील लक्ष उडणार , मग मुलगा सारखा घरा बाहेर राहणार , चुकीच्या संगतीत अडकणार , त्याचे अभ्यासावरून लक्ष उडणार असे एक ना अनेक प्रश्न बरेचदा विचारले जातात . राहू आणि केतू ह्यांचा अभ्यास तसा बराच मोठा आहे . त्यात प्रगत सोशल मिडीया जनमानसावर हाबी आहेच पण त्यामुळे अनेकदा कुठेतरी काहीतरी वाचून ते आपल्या पत्रिकेला जोडून पाहणे हे शहाणपणाचे नक्कीच नाही .

आज आपण राहूची कार्यक्षेत्र पाहूया . राहू हा एक छाया ग्रह आहे आणि त्याला राशी नाही त्यामुळे तो ज्या राशीत असतो त्या राशीस्वामीची फळे प्रदान करतो. राहूच काय तर प्रत्येक ग्रह वेगवेगळ्या भावात राशीत वेगवेगळी फळे देत असतो आणि ती चांगली वाईट दोन्ही असू शकतात . राहू बिघडला तर ड्रग्स किंवा नशिल्या पदार्थांच्या आहारी व्यक्ती जावू शकते .

ग्रह हा पूर्णपणे फलित देतो ते त्याच्या दशेत , अंतर्दशेत . वैदिक शास्त्रात राहू केतू ना जसे महत्व दिलेले आहे तसेच कृष्णमुर्ती ह्यानी राहू केतुना विशेष महत्व दिले आहे. आयुष्यातील अनपेक्षित वळणावर आपल्याला राहूच भेटत असतो , राहुने आज जग जवळ आणले असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही . संशोधन, गूढ विद्या ह्या सर्वांच्या मागे राहूच आहे नुसते तंत्रज्ञान नाही तर दशहतवाद , परदेशी प्रवास ,फसवणूक , राजकारण सुद्धा राहूचे कार्यक्षेत्र आहे.

राहू पत्रिकेत दुषित नसेल आणि शिक्षण घेता येयील अश्या भावांचा कारक असेल तसेच तश्या दशा सुद्धा राहुशी निगडीत असतील तर खालील कुठल्याही क्षेत्रातील शिक्षण आपल्या आवडीनुसार आणि इतर ग्रहस्थिती पाहून घेता येयील.

वेगवेगळया औषधांची निर्मिती , सायबर गुन्हे , AI ,Data Science आणि चित्रपट निर्मिती , Animation , Graphic Design , Computer Technology , फोटोग्राफी, Digital , सोशल मिडीया मार्केटिंग ह्या क्षेत्रात शिक्षण घेवून अर्थार्जन करता येयील.

परदेशी भाषा आणि परदेश खुणावत असतो जेव्हा राहू दशा असते. त्याचप्रमाणे गुढतेच कारक असलेला राहू गूढ विद्या ज्योतिष , तंत्र मंत्र साधना , मानसशास्त्र तसेच हिप्नोटीझम कडे आपला कल घेवून जातो. ह्या शस्त्रांचा अभ्यास राहू दशेत चांगला होतो. गुन्हेगार क्षेत्राशी संबंध असल्यामुळे गुन्हेगारांची मानस शास्त्र , फोरेन्सिक lab मधेही काम करता येयील.

राहू हा मायावी राक्षस आहे , ह्या दशेत प्रत्येक पावूल जपून टाकावे लागते कारण फसवणूक होण्याची शक्यता सर्वाधिक असते. राहू भ्रमित करतो त्यामुळे करायला जावे एक आणि व्हायचे भलतेच अशी गत होवू शकते तसेच राहू कुठून आपली फसवणूक करेल सांगता येत नाही . आपल्या गोष्टी गुप्त ठेवणे हितावह ठरते . जितकी गुप्तता तितके यश अधिक . जवळच्या लोकांकडून विश्वासघात आणि दिशाभूल . तसेच चुकीची संगत व्यसनाधीन करू शकते .

राहू कुठल्या भावात आहे आणि कुठल्या ग्रहासोबत आहे त्यावर शिक्षण कुठले घ्यायचे ते समजू शकते.

राहू हा आकर्षण निर्माण करणारा ग्रह असल्यामुळे कमी कष्ट करून मोठा फायदा मिळवण्याच्या नादात कित्येक जण आपले आयुष्य पणाला लावतात आणि सर्वस्व घालवून बसतात . शेवटी राहू हा मोह आहे , राहू हे राक्षसाचे धड असल्यामुळे त्याला जे जे दिसेल ते सर्व हवे आहे. राहू माणसाला passionate बनवतो आणि त्यासाठी बुद्धी भ्रमिष्ट सुद्धा करवतो म्हणूनच राहूच्या दशेतील सर्वच काळ हा दडपण देणारा असतो. शुभ संबंधित राहू असेल तर कुशाग्र बुद्धिमत्ता देतो आणि अरब पतीही बनवतो .

कुठलीही शिक्षण शाखा निवडताना आपली आवड , कुवत आणि अर्थात आर्थिक गुंतवणूक ह्या सर्वच सारासार विचार करूनच क्षेत्र निवडले पाहिजे. एखादी गोष्ट फक्त जाहिरातींना फसून किंवा अविचाराने केली उतावळे पणाने निर्णय घेतला तर आई वडिलांच्या कष्टाचे पैसे जातील पण आयुष्यातील सोन्यासारखा वेळ फुकट जायील तो पुन्हा येणार नाही.

शिक्षण क्षेत्राची निवड करताना राहू कुठल्या भावात आहे , नक्षत्रात कुठल्या आहे, युतीतील ग्रह , त्यावर कुणाच्या दृष्टी आहेत आणि अर्थात दशा कुठल्या ग्रहाची आहे ह्या सर्वाचा एकत्रित विचार करावा लागतो.

चुकीचे शैक्षणिक क्षेत्र निवडले तर पीछेहाट होते , अभ्यास करण्यास फारसा उत्साह नसतो कारण मुळात विद्यार्थ्याची आवड लक्ष्यात न घेता ते निवडलेले असते . त्यामुळे पुढे विद्यार्थ्याचा आत्मविश्वास कमी होतो , मी काहीच करू शकत नाही किंवा मला काही जमतच नाही अश्या खोट्या भ्रमाच्या कोशात तो स्वतःच अडकत जातो . म्हणूनच कुठले शिक्षण घ्यावे हे महत्वाचे आहे .

आपण घेत असलेल्या शिक्षणाचा नोकरी मिळवण्यासाठी उपयोग होईल कि नाही हेही पाहिले पाहिजे . राहूचे अवडंबर न माजवता अभ्यास पूर्वक सावधपणे पावले टाकली , ज्योतिष मार्गदर्शन घेतले तर योग्य शिक्षण क्षेत्र निवडून आयुष्य उंचीवर नेता येयील ह्यात दुमत नसावे.

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

Thursday, 4 September 2025

एकरूपता

 || श्री स्वामी समर्थ ||

भगवंत गोपाल कृष्ण एकदा रुक्मिणी सोबत रथातून जात असताना समोरून राधा कृष्णाचा धावा करत आली . तिला पाहून कृष्ण रथातून उतरले आणि तिच्याशी चार शब्द गुजगोष्टी करून पुन्हा रुक्मिणी सोबत निघून गेले. घरी आल्यावर रुक्मिणी ने विचारले , हि कोण होती तेव्हा तिची ओळख भगवंताने करून दिली. आता स्त्री हि स्त्रीचा मत्सर करणारच त्यात ती रुक्मिणी . प्रत्यक्ष आपल्या भगवंतावर प्रीती करणारी त्याला पुजणारी आहे तरी कोण ह्या मनातील द्वेषातून तिने राधेला एकदा घरी बोलावले आणि कडकडीत दुध तिला दिले. राधे ने कृष्णाचे नाव घेतच दुध प्राशन केले व घरी गेली. संध्याकाळी भगवंत घरी परतले .

ते दमले असतील म्हणून रुक्मिणी त्यांचे पाय दाबायला लागली असता तिला दिसले कि त्यांच्या पायावर फोड आलेले आहेत . तिने विचारले असता भगवंत उत्तरले आज राधा तुझ्याकडे आली असता तिला तू उकळते दुध दिलेस. कृष्णाचे नाव घेत तिने ते प्राशन केले . तिच्या अत्यंत प्रेमाने भरलेल्या हृदयात सदा सर्वकाळ विराजमान असलेले कृष्णाचे चरण त्यावर ते दुध पडले आणि भगवंतांचे पाय भाजले फोड आले.

राधेचे आपल्या आयुष्यातील आणि हृदयातील महत्व रुक्मीणीला भगवंतानी पटवून दिले. काय वर्णावी हि भक्ती आणि आपल्या देवाशी असलेली एकरूपता . खरच भक्ती असावी तर अशी . आपण सुद्धा ज्या देवतेचे पूजन करतो त्यावर अशीच निस्सीम श्रद्धा हवी . त्यांच्या बद्दल शंका घेवू नये . ते आपले काही वाईट करणार नाही हा भाव मनी ठेवूनच जीवन जगले पाहिजे. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तरीही ती त्यांचीच कृपा असा भाव मनात दृढ असला पाहिजे. ते जे करतील त्यातच माझे हित आहे असा भाव असावा. नुसत्या पूजा , प्रदक्षिणा , पोथ्या वाचून आणि धार्मिक यात्रा करून भगवंताच्या समीप जाता येणार नाही . पण आपला १६ आणे खरा खुरा शुद्ध भाव मात्र क्षणात आपल्याला त्याच्या समीप नेऊ शकतो ह्यात शंकाच नसावी.

हवी आहे ती अपार श्रद्धा , भक्ती आणि एकरूपता .

श्री स्वामी समर्थ

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230 

Wednesday, 3 September 2025

अद्भुत पंचम ( शेअर मार्केट )

 || श्री स्वामी समर्थ ||


पंचम हा धर्म त्रिकोणातील मुख्य भाव. अर्थातच धर्माने वागा आणि धर्माचे अनुकरण करा हे सांगणारा भाव पत्रिकेत अनन्यसाधरण असाच आहे. ह्या भावावरून आपण प्रेम , प्रणय , विद्या संतती , खेळ , कला , नाविन्य ,creativity , निर्मिती , ज्योतिष विद्या , तंत्र मंत्र आणि कमी कष्टात फायदा करून देणारे शेअर मार्केट पाहतो . आजचे युग प्रगत असले तरी संयम संपलेल्या पिढीचे आहे. आपल्याला न झेपणारी आव्हाने स्वीकारून मग स्वतःलाच बिझी आहे असे गोंडस नामकरण केलेल्या तरुणाईचे आहे.असो .

आज बाहेरील अनेक देश नोकरीसाठी सहज संधी उपलब्ध करून देत आहेत. पण ज्यांना ते शक्य नाही किंवा आहे त्यांचा मोर्चा शेअर मार्केट कडे सध्या मोठ्या प्रमाणात वळलेला आपल्याला दिसून येतो. आज मध्यमवर्ग सुद्धा ह्यात आपला सहभाग मोठ्या प्रमाणावर करत आहे .

आजच्या पिढीला ५-६ आकडी पगार मिळत असल्यामुळे विविध गुंतवणूक करताना शेअर मार्केट प्रथम दर्शनी डोळ्यासमोर आले तर नवल नाही . पण जसे आज कुंभ राशीतील राहुने AI दिले आहे तसेच कमी कष्टात अफाट फायदा करून देणारे शेअर मार्केट तरुणांवर प्रचंड हाबी आहे.

येथे असणारी रिस्क सुद्धा हसत घ्यायला ते तयार आहेत . चार मुले नाक्यावर किंवा कुठेही भेटली कि चहा सोबत चर्चेचा विषय म्हणजे गुंतवणूक हा असतोच . आपल्या चिमुकल्या जगाचे मोठे विस्तृत आधुनिक जग आपण स्वतःच केलेले आहे. आधुनिकतेच्या नावाखाली किंवा एक सोशल स्टेटस जपण्यासाठी अनेकविध गोष्टी आज घरात येत आहेत . घरात प्रत्येकाकडे फोन आहे अगदी लहान मुलांच्या कडे सुद्धा . मग पर्यायाने हे सर्व टिकवण्यासाठी मिळवला जाणार्या पैशाचा ओघ हा घरात अनेक पर्याया तून आलेला असावा ह्या हेतूने मग शेअर मार्केट हा एक मुख्य पर्याय निवडला जातो. अफाट मिळकत आणि त्यावर कर चुकवण्याची धडपड बस्स सध्या हेच जीवनाचे प्रमुख उद्दिष्ट झाल्यासारखे झाले आहे. सोशल मिडीयावर क्षणोक्षणी झळकणाऱ्या सोशल influencer च्या असंख्य जाहिराती मती गुंग करणाऱ्या आहेत .

एखादी नवीन गोष्ट करणे आणि त्याच्या आहारी जाणे ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत .त्यात मागची पैपै करून मिळवलेली पिढी म्हणजे अगदी टाकावू , त्यांच्या मतांचे अस्तित्वच नाही . तर असे हे भूल मोहिनी काहीही म्हणा पण सगळ्यांना येड करणारे शेअर मार्केट अभ्यासपूर्वक हाताळले तर फायदेशीर नक्कीच आहे पण इथे क्षणात रावाचा रंक सुद्धा होवू शकतो . आभाळाला गवसणी घालायला जावे आणि रस्त्यावर यावे असे नको व्हायला.

झटपट श्रीमंत होण्याचा हा पर्याय असे वाटणाऱ्या लोकांना ह्याची दुसरी बाजू माहित नाही . कुठल्याही गोष्टीचा अंमल चढला कि त्याची धुंदी उतरायला वेळ लागतो . हे आभासी जग आहे जे राहूचे आहे. Gpay , net , RTGS वगरे म्हणजे राहू . झटपट पैसा मिळवण्याच्या नादात आपल्या कुटुंबाची वाताहत तर होणार नाही ना ह्याची काळजी सर्वप्रथम केली पाहिजे. आपली गुंतवणूक हि कमी नफा मिळवून देणारी असली तरी चालेल पण हृदयाचा ठोका थांबवणारी नसावी .

दिसायला जितके हे चित्र गोंडस आहे तितके ते खरच आहे का? आज दोन पुस्तके वाचून जसे लोक स्वतःला ज्योतिषी म्हणवतात तसेच एक दोन ट्रेड केले कि मला ह्यातील सर्व ज्ञान अवगत झालेले आहे असा भाव मनात अनेकांच्या येत आहे आणि हीच पुढील संकटाची नांदी आहे.

ह्या जुगारात अनेकदा अंदाज चुकले आणि लाखोंचा तोटा झाला तर तो पेलवायाची ताकद आपल्यात आहे का? मग मानसिक संतुलन बिघडते आणि त्यावर उपाय म्हणून मग सर्व व्यसने समोर हात जोडून उभीच आहेत कि. एकदा यश मिळाले कि हात जणू आभाळाला लागतात मग जीवघेणी खेळी सुरु होते . अधिक हाव अधिक लालसा अधिक नफा मिळवण्याची नशा चढते मग आहे ते सर्व पणाला लागते आणि पुढे ...सुज्ञास न बोलणे उत्तम . आयुष्याच्या सारीपटावर पुन्हा एकदा भला मोठा अंधार , आपली पत गमावणारा . मिळवलेली अब्रू वेशीवर टांगणारा आणि घराण्याचे नाव पात पणाला लावणारा हा अंधार खरच जीवघेणा कि कित्येक आयुष्य सुद्धा ह्या अंधारात कायमची लुप्त होतात .

इतकी मोठी जोखीम घेणारा मध्यमवर्ग अनेक संकटाना तोंड देताना दिसतो . घरातील स्त्रीवर्गाचे दागिने सुद्धा गहाण ठेवून झटपट श्रीमंत दाम दुपटीने पैसा मिळवावा हे स्वप्न दाखवणारा हा जुगार मती गुंग करणारा आहे.

रोज मिनिटा मिनिटाचे ट्रेडिंग करणे , डोळ्याच्या खाचा आणि मेंदूला मुंग्या येयीपर्यंत आपले रोजचे काम सोडून ह्यात गुंतणे हे अत्यंत धोक्याचे आहे. फायदा हवा तर जोखीम घ्यायचीही तोटा सहन करण्याचीही मानसिकता हवी . सगळे कानाला कायम गोड गोड कसे ऐकायला मिळणार ???

हा जुगार जीवघेणा आहे. कुटुंब आणि कुटुंबाचे सुख स्वतःच्या हाताने नष्ट करताना दहा वेळा विचार करा . लक्ष्मी इतकी सहज नाही . अपार मेहनत करून ती कमवावी लागते . एखाद्या गोष्टीचा अपुरा अभ्यास पण डोंगर इतका ध्यास जीवनाला वेगळी कलाटणी देवू शकतो . ज्याला हा जुगार संयमाने खेळता आला तो ह्यात तरेल पण इतरांचे काय ?झटपट मिळवायचे कि झटपट घालवून बसायचे ????

एखाद्या ट्रेड मध्ये फायदा झाला कि मग हाव सुटते आणि मग अजून हवे अजून हवे हि जीवघेणी न संपणारी इर्षा अधिकच फुलत जाते . सुगीचे दिवस क्षणात संपतात आणि आपण भानावर येतो तेव्हा ओंजळीतून सर्व निघून गेलेले असते असे मात्र व्हायला नको .

ह्या सर्वच परिणाम मन शरीर झोप विचार ह्या सर्वावर होत असतो आणि कालांतराने तो हाताबाहेर जावून मोठ्या आजारांचे मूळ ठरतो . सतत २४ तास हाच विचार . एकमेकांची चौकशी बाजूलाच राहिली . फक्त पैशाची भाषा हेच आजचे बहुतांश जग झालेले आहे.

शेअर मार्केट अजिबात वाईट नाही . पण त्याची मोहिनी पडून त्यात आयुष्याची वाताहत झाली तर अर्थ नाही त्याला. अभ्यास पूर्वक आपले अंदाज बांधून त्यात पैसे लावणे हे नेहमीच समर्पक राहील .

सुरवात केली पण कुठे थांबायचे कुठे मनाला आवर घालायचे ते समजले पाहिजे .

ज्योतिषीय विश्लेषण पाहताना ज्यांचे पंचम अबाधित आहे किंवा जिथे बुध राहू दुषित नाहीत , धन पंचम लाभ हे भाव देत आहेत ह्या दशेत ह्यातून पैसा मिळू शकतो . पण ज्यांचे अष्टम , व्यय भाव कार्यान्वित आहे त्यांना काही न काही नुकसान होणार हे ठरलेलेच आहे .

घेतलेले शिक्षण आणि मिळकत त्याची मोट रोजच्या जीवनातील प्रश्नांशी बांधताना मग शेअर मार्केट सारखा झटपट श्रीमत होण्याचा मार्ग सोपा वाटतो आणि आपल्याही नकळत आपण त्यावर चालू लागतो . आज स्वतःचे घर नाही म्हणून अनेकांचे विवाह होत नाहीत हे चित्र आहे मग पैसा मिळवायचा तरी कसा. त्यासाठी अनेक इतर पर्याय आहेत पण ते झटपट पैसा देणारे नाहीत म्हणून ते खुणावत नाहीत किबहुना ते पर्याय म्हणून स्वीकारले जात नाहीत .

पैसा दुसर्याकडून उधार घेवून सुद्धा अनेकजण ह्या शर्यतीत भाग घेतात आणि मग तो डूबला कि तो परत कसा द्यायचा हा यक्षप्रश्न समोर उभा राहतो . त्यात मग स्वतःच्या ठेवी विकणे त्यावर कर्ज घेणे हे प्रकार सुरु होतात , घरची शांतता भंग होते आणि मग अश्यावेळी दोन घास सुखाचे खात होतो तेच बरे असे म्हणायची वेळ येते .

हव्यास मग तो कश्याचाही असो वाईटच असतो पण तो जीवघेणा नसावा. आपण जसे आहोत तसे आहोत . नशिबात असेल तो पैसा मिळणार आणि जायचा तो जाणार . कुणाला विचारायचे नाही , सल्ला घ्यायचा नाही स्वतःला शहाणे समजायचे अश्या व्यक्तींच्या अनेक पत्रिका पाहून हा लेख लिहायची इच्छा झाली . पुन्हा एकदा सांगावेसे वाटते कि शेअर मार्केट हा पर्याय प्रत्येकाने स्वीकारावा पण अभ्यासपूर्वक , त्याच्या अधीन जावू नये , त्याला सर्वस्व मानु नये इतकेच कारण जेव्हा मार्केट पडते आणि तोटा सहन करायला लागतो तो करायचीही हिम्मत नसेल तर सर्वस्व होते नव्हते ते सर्व पणाला लावायची खरच गरज आहे का? कुणाला दाखवायचे आहे श्रीमंत होवून ??????? विचार प्रश्न स्वतःलाच आणि बघा काय उत्तर मिळतेय ते . आपल्या मागील पिढ्यांनी आपल्याही पेक्षा आनंदात आयुष्य काढले हे विसरून चालणार नाही.

यश आणि अपयश दोन्ही खुल्या दिलाने स्वीकारता येण्याची धमक पाहिजे . नैराश्येच्या गर्तेत नेणारा हा बाजार आहे ह्याचे भान योग्य वेळेस झाले तर बरे. आपल्या आधीच्या पिढ्यांनी नाही का गुंतवणूक केली , पण सुरक्षित सावध , अनेक पर्याय आजही आहेत जे दोन टक्के कमी देणारे पण सुरक्षित आहेत . पोस्टात लोक आजही गुंतवणूक करतात जी सुरक्षित आहे त्याची लाज वाटायला नको .

माणूस पोटासाठी कष्ट करतो आणि धन कमावतो . पण त्यासाठी झटपट श्रीमत होण्याचा अट्टाहास नको . सगळे आयुष्य पणाला लावून मिळणार काय ? मोठे आजार , व्यसने , कौटुंबिक मतभेद कि नात्यातील संबंधातील तिढा ? नक्की काय हवे आहे आपल्याला ????????

आपले आयुष्य सुरक्षित असते जेव्हा आपण मिळवलेल्या संपत्तीचा विनियोग आणि गुंतवणूक योग्य ठिकाणी केलेली असते. आपली झोप उडवणारी कुठलीही गोष्ट लाभ देयील ? कि जीवनातील आनंद हिरावून घेयील ??????????? उत्तर आपले आपणच शोधायचे आहे . ज्याची त्याची सुखाची व्याख्या वेगळी असू शकते पण समाधानाची व्याख्या महत्वाची आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कुठे थांबायचे ते समजले पाहिजे . गेल्या कित्येक दिवसात शेअर मार्केट मध्ये अपयशाला सामोरे जावून कर्ज बाजारी होवून आयुष्याची वाताहत झालेल्या पत्रिका पहिल्या आणि मन सुन्न झाले. माणसाला नक्की मिळवायचे तरी काय असते ??? कसला हव्यास असतो नेमका ? कुणासाठी चालले आहे हे सर्व ? कुणाला दाखवायचे असते हे वैभव ?????एक न दोन प्रश्न पडले आणि हे वास्तव आपल्यासमोर मांडावेसे वाटले .

ऑप्शन ट्रेडिंग , इंट्रा डे ट्रेडिंग हे आकर्षण निर्माण करते पण ते क्षणिक असते . फ्युचर ऑप्शन , कॅडल स्टिक , निफ्टी , सेन्सेक्स , असेट अलोकेशन असे शब्द कानावर आदळू लागतात आणि माणूस ह्या चक्रात ओढला जातो. राहू सावधपणे आपली खेळी खेळत असतो पण ती समजायला आपल्याला उशीर होतो. समजते तेव्हा सर्व संपलेले असते .

गुंतवणुकीचे इतर अनेक मार्ग आहेत पण अपुरा अभ्यास ह्यामुळे आपल्याच आयुष्याचे चित्र बदलते .

आयुष्यभर ताठ मानेने , अभिमानाने जगलो , आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत कुणाही वर अवलंबून नको राहायला म्हणून थोडे थांबून विचारपूर्वक ,अभ्यास करून योग्य सल्ला घेवून गुंतवणूक करा . आपले आयुष्य दिशाहीन होण्यापासून आपणच वाचवायचे आहे, तसेच आयुष्यात शोर्ट कट नसतात हे सांगण्यासाठी हा लेखन प्रपंच .

विघ्नहर्ता सर्वाना चांगली बुद्धी देवूदेत .

श्री स्वामी समर्थ

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

Sunday, 31 August 2025

कर्णबधीर

 || श्री स्वामी समर्थ ||


आपल्या शरीराचे सर्व अवयव शाबूत असणे हीच खरी श्रीमंती आहे ह्याची खात्री , जेव्हा आपण एखादा अपंग , कर्णबधीर व्यक्ती पाहतो , तेव्हा खर्या अर्थाने पटते. हे सुंदर जग पाहता येवू नये किंवा समोरच्या माणसाचे शब्द ऐकायलाच मिळू नये आणि पर्यायाने बोलताही येवू नये ह्याचे दुक्ख खूप मोठे आहे. पण आज विज्ञान आणि संशोधन प्रगत झाल्यामुळे अश्या आजारांवर सुद्धा अनेक उपचार पद्धती पर्याय उपलब्ध होत आहेत हा मोठा दिलासा आहे .

आज आपण कर्णबधीर असणे ह्या विषयावर शास्त्रीय आणि ज्योतिषीय कारणमीमांसा करणार आहोत . अनुवांशिकता हे प्रथम कारण असू शकते . Connexin 26 हे कानाच्या आतील आरोग्यासाठी अति महत्वाचे आहे आणि त्यातील बिघाड अनेक प्रश्न निर्माण करते .

शरीरातील Cx26 प्रथिनांचे कार्य शरीरात जेव्हा योग्य प्रमारे होत नाही तेव्हा कान पोटॅशियमची पातळी नियंत्रित करण्यात असमर्थ ठरते. कानाच्या आतील भागाचा अपूर्ण विकास , जन्मल्यानंतर लगेच झालेले इन्फेक्शन किंवा जन्माच्या वेळेस निर्माण झालेली ऑक्सिजन ची कमतरता हि कारणे सुद्धा असू शकतात , ज्यावर कानाचे डॉक्टर अधिक माहिती नक्कीच सांगू शकतील .

सर्वसाधारण संशोधन केल्यास असे आढळून येते कि अनुवांशिकता हे प्रथम कारण असू शकते. मातेच्या गर्भावस्थेत घेतलेल्या औषधांचा परिणाम किंवा संसर्ग सुद्धा ह्याला कारणीभूत असू शकतो . काही औषधे बाळाच्या श्रवण शक्तीवर कायमची परिणाम करणारी असतात .

ज्योतिषीय कारणे बघताना डोळ्यासमोर येतो तो चंद्र जो संवेदना दाखवतो त्याचा ६ ८ १२ शी असलेला संबंध तसेच दुषित शुक्र . कानाच्या आत असतेली पोकळी . पोकळी म्हणजेच स्पेस ह्याचा कारक ग्रह गुरु अर्थातच डावलून चालणार नाही . शरीरातील प्रत्येक पोकळी हि गुरु ग्रहाच्या अमलाखाली आहे त्यामुळे गुरु हा श्रवण करण्यास मुलभूत मानला जातो.

अनेक वेळा मागील जन्मातील कर्म सुद्धा कारणीभूत असतात कारण बाळ आत्ता कुठे जन्माला आले आहे पण ते मूक बधीर म्हणून . त्याने ह्या जन्मात कुठलेच कर्म केलेले नाही आणि असे असतानाही ह्या गोष्टी त्याला जर त्रस्त करत असतील तर त्याचा पूर्व जन्माशी संबंध असलाच पाहिजे. शेवटी आजचा जन्म हा पूर्व जन्माचा आरसा आहे.

शरीरात असलेले काहीतरी व्यंग हे व्यक्तीला अनेक मानसिक शारीरिक सामाजिक संघर्ष करायला लावते. आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळे आहोत हि भावना जेव्हा त्यांच्या मनात रुजू लागते तेव्हा कुठेतरी आत्मविश्वास कमी व्हायला लागतो . अशी मुले हि फक्त पालकांची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची आहे . त्या मुलांचे अस्तित्व महत्वाचे आहे कारण तोही एक जीव आहे. प्रत्येक जीवात परमेश्वर आहे असे मानले तर त्यांना आपल्यात सामावून घेणे आणि इतरांच्या सारखीच वागणूक त्यांना देणे. त्यांच्यात काहीतरी कमतरता आहे हे भासवून न देता त्यांचे संगोपन केले तर त्यांचेही आयुष्य फुलण्यात मदत होईल. हि एक ईश्वरी सेवा आहे हे समजून प्रत्येकाने त्यात हातभार लावला पाहिजे. आज विज्ञान , शास्त्र प्रगत आहे . अनेक औषधे , कानाची यंत्रे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेता येतात त्यामुळे अश्या समस्यांवर नक्कीच मात करता येते .

आज माझ्याकडे एका कर्णबधीर व्यक्तीची पत्रिका आली होती म्हणून ज्योतिषीय दृष्टीने ह्याचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलाय. वरती नमूद केलेल्या पत्रिकेतील ग्रह आणि योग तिच्या पत्रिकेशी तंतोतंत जुळत आहेत . मोठ्या जिद्दीने ती ह्यातून बाहेर आलेली आहे हे विशेष कौतुक आहे. त्रिषडाय पापग्रह युक्त असतील तर व्यक्ती आपल्या प्रयत्नांनी आयुष्यात स्वतःला उभी करतेच करते . मंगळ बलवान असेल तर व्यक्ती कितीही खचली तरी पुन्हा उभी राहतेच .

आज गुरूचेच विशाखा नक्षत्र सुरु झाले आणि ह्या व्यक्तीचा फोन आला . आज बुधाच्या नक्षत्रावर लेख पोस्ट करत आहे .

श्री स्वामी समर्थ

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

तुझे तुजपाशी ( आपण आपल्या इच्छेने जन्म घेतला आहे ह्यातच सर्व आले. )

 || श्री स्वामी समर्थ ||

आपले आयुष्य हे सर्वार्थाने कुणाचे आहे तर आपले . मनुष्य स्वभावाप्रमाणे काहीही वाईट स्वीकारायला आपले मन तयार नसते . काहीही चांगले झाले कि त्याचे श्रेय घ्यायला आपण सगळ्यात पुढे असतो . आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट गोष्टीना आपण स्वतः आणि आपली पूर्व कर्म जबाबदार असतो . पण ती जबाबदारी स्वीकारायचे धाडस मात्र आपल्या अंगी नसते .

आयुष्यभर प्रत्येक गोष्टीत दुसर्याला दोष देत बसण्यात शहाणपणा नसतो तर प्रत्येक घटनेचा कृतीचा सारासार विचार करून ती तशीच्या तशी स्वीकारणे हेच अभिप्रेत असते जे आपल्याकडून होत नाही. माझ्या आयुष्यात जे जे काही घडत आहे त्या सर्वाला इतर कुणीही दोषी नसून मी स्वतः आहे हे जितक्या लवकर आपण स्वीकारू आयुष्य सुखाकडे प्रवास करू लागेल . आपले नामस्मरण ह्यात निश्चित मदत करते . जितके नाम घेवू तितके आपल्या आतमध्ये बघायला शिकू , हा जन्म आपल्या पूर्व कर्मांचा आरसा आहे. चांगल्या कुळात जन्म मिळणे , उत्तम कुटुंब कुटुंबात एकमेकांच्याबद्दल असलेले प्रेम अबाधित राहणे ,उत्तम शिक्षण , संस्कार , राहणीमान आणि कुटुंबियांचे प्रेम मिळणे हे भाग्य आहे. पुढे मनासारखी नोकरी , अर्थार्जन , आपल्या गुणांचे कौतुक आणि अर्थार्जनाच्या रुपात त्याचे चीज होणे चांगला जोडीदार मिळून आयुष्यातील आनंदाची चव चाखता येणे , भरपूर प्रवास , देवदर्शन आणि योग्य गोष्टी त्या त्या वेळेस मिळणे हे भाग्य आहे. आणि ते आपल्या पूर्ण आयुष्यातील चांगल्या केलेल्या कर्मांचा परिपाक आहे.

ह्याउलट जेव्हा गोष्टी मनासारख्या घडत नाहीत तेव्हा मनुष्य नेहमीच दुसर्याला दोष देत राहतो . पण माझ्याच बाबत हे का घडले. माझे कुठे चुकले ह्याचा विचार केला तर दुसर्याला दोष देणे थांबेल . प्रत्येक कृतीमागे आणि विचार मागे आपण स्वतःच असतो ह्याचा अर्थ उमगतो तो नामातून .

नामस्मरणाचे अनन्य साधरण असे महत्व सांगितलेले आहे ते ह्याच साठी कि आपली आपल्याला ओळख होण्यास मदत व्हावी. मी ह्याच कुळात का जन्म घेतला मला व्यसनी नवरा का मिळाला , माझा घटस्फोट का झाला , मला अपत्य का नाही , चांगले जीवन नाही , आर्थिक कुचंबना का आहे , चिडचिडा स्वभाव का आहे , असे काय आहे जे मला हवे आहे पण मला ते मिळताच नाही म्हणून मी इतरांचा द्वेष करत आहे , अनेक इच्छांची पुर्तता न झाल्यामुळे आयुष्यात आलेले रितेपण , कर्तेपणाची भावना पण अहंकार ह्यामुळे मिळालेला एकटेपणा , संसार आहे पण टिकवता आला नाही ह्याला जबाबदार कोण ? तर मी स्वतः ..जे इतके मोठे सूर्य प्रकाशा इतके सत्य स्वीकारायला पण अंगी खरेपणा लागतो . इथेच आपल्यावर केलेल्या संस्कार दिसतात .

जे जे काही मिळणार आहे ते तुमच्याच कर्माने आणि जे जे ओंजळीतून निघून जाणार आहे तेही तुमच्याच कर्माने . देवाने दिले पण ते सांभाळता आले नाही , मग तो पैसा असो कि माणूस ...शेवटी ते राहिले नाहीच मग ह्याचा दोष कुणाचा तर आपला स्वतःचाच .

तरुणपणी मनुष्य बेभान होवून वागतो , हातपाय धड असतात , मनात उमेद असते पुढे जाण्याची आणि एका वेगळ्याच इर्षेत जीवन पुढे जात असते पण अचानक ब्रेक लागल्यासारखे सगळे कोलमडून पडते तेव्हा लगेच ह्याने हे असे केले त्याने तसे केले म्हणून हे सर्व असे झाले . कुणीही काहीही केलेले नाही. जे जे काही घडले , घडत आहे आणि भविष्यातही घडणार आहे ते तसेच घडणार होते कारण ती तुमच्या पूर्व कर्माचीच फळे आहेत जी तुमच्या कर्माने तुम्हालाच चाखायची आहेत . आयुष्याच्या संध्याकाळी पैसा तर हवाच पण त्याही पेक्षा गरज असते ती माणसांची . कुणीतरी बोलायला लागते सहवास लागतो . पण त्याचा विचार तरुणपणी केलेला नसतो आणि विचार करावासा वाटतो तेव्हा कुणीही जवळ नसते हि खरी शोकांतिका आहे. पैसे फेकून माणसे कायमची धरून ठेवता येत नाहीत , माणसे कमवावी लावतात ,

एखाद्याच्या आयुष्यात काहीतरी वाईट झाले कि आपण हळहळतो पण त्याची कर्म पहिली तर झालेली शिक्षा कमीच वाटते .आयुष्यभर ना पैसा सांभाळता आला न माणसे , मग आयुष्याच्या शेवटी उरतो तो फक्त पोकळ अहंकार जो माणसे जोडू शकत नाही हे नक्की . एखादी गोष्ट स्वीकारायला तसेच दुसर्याला माफ करायला सुद्धा मोठे मन , धाडस लागते . ते नसेल तर शेवटी जवळ ना माणूस उरतो ना पैसा . शेवटी चार माणसे लागतात आपल्याला पोहोचवायला आणि ती जमवायला आयुष्य खर्ची करावे लागते . आयुष्यभर अनेकदा चूक असो अथवा नसो पडते घ्यावे लागते . तू माझ्या आयुष्याची वाट लावलीस तुला माफ करणार नाही हे बोलणारे तुम्ही आम्ही कोण ??????????? उलट असा विचार करा हे सर्व माझ्याच बाबत का घडतेय कारण मी तसे पूर्वजन्मी कर्म केले आहे म्हणून. साधे सोपे गणित आहे. विचारणा शुद्ध करा मन शुद्ध होईल आणि मन निर्मळ झाले तर पाणी वाहते होईल म्हणजे विचार साचून राहणार नाहीत आणि तसे झाले तर कुठलेही मानसिक शारीरिक आजारही होणार नाहीत . आपली जिव्हा हि माणसे जोडायला दिलेली आहे तोडायला नाही ह्याचे भान ठेवले तर आयुष्य अनेक अर्थानी सुसह्य होईल .

तात्पर्य आपले आयुष्य हे आपल्या कर्माभोवतीच सीमित आहे. जसे कर्म तसे फळ हा साधा सोप्पा नियम आहे त्यामुळे आपल्या आयुष्यात जे जे काही घडत आहे , घडले आहे आणि पुढे अंतिम श्वासापर्यंत घडणार आहे त्याला सर्वस्वी आपण स्वतःच जबाबदार आहोत . पास झालो तर श्रेय आपल्याला आणि कमी मार्क मिळाले तर पेपर कठीण होता ..असो . तुमच्या दुक्ख वेदना एकटेपणा जे काही असेल त्याला दुसरा दोषी असूच शकत नाही. ती आपलीच कर्म फिरून आपल्याला शासन करत असतात ह्याचा विचार का आणि आपल्या चुका मोठ्या मनाने स्वीकारा . जो हे करेल तो महासुखी होईल.

आपणच आपल्या माणसांशी किती वाईट वागलो आहोत ह्याचा विचार आयुष्याच्या संध्याकाळी एकटे पडल्यावर करण्यापेक्षा खूप आधी केला तर शेवटचा क्षण सुखात जायील. काही लोकांचा कितीही शिक्षा झाल्या तरी सुंभ जळला तरी ...अशी अवस्था असते त्याला कोण काय करणार .

शेवटी तुज आहे तुझ्यापाशी ....हेच सत्य आहे...त्रिवार सत्य ...

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

Sunday, 24 August 2025

चरणी ठेवितो माथा ...

 || श्री स्वामी समर्थ ||

चार दिवसापूर्वी “ माझे अडकलेले पैसे परत कधी मिळतील ?? “ असा एका जातकाने प्रश्न विचारला . त्याच्यासाठी प्रश्न कुंडली मांडतच होते पण तेव्हड्यात मला माझ्या एका दुसर्या जातकाने समुपदेशनाचे पैसे पाठवले . मी कुठलीही पत्रिका मांडली नाही आणि त्याला सांगितले तुझे पैसे मिळतील नक्की काळजी नको.

काल दुपारी त्याचे पैसे मिळाल्याचा फोन आला . निसर्ग सुद्धा आपल्याला शुभ संकेत देत असतो . पण आपण कान नाक डोळे उघडे ठेवले तर आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपली आपल्यालाच मिळतात कारण आपण सुद्धा ह्या ब्रह्मांडाचा , निसर्गाचाच भाग आहोत .

प्रश्न कुंडली मधेही जर कर्क लग्न आले तर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर सकारात्मक असते .

शेवटी अभ्यास महत्वाचा आणि तो आपल्या कडून करून घेण्यासाठी आणि आपल्या बुद्धीला योग्य दिशा देण्यासाठी स्वतः गणपती बाप्पांचे घरोघरी वाजत गाजत आगमन होत आहे. बुद्धीची हि देवता आणि तिचे पूजन करण्यात भक्तगण आपले देहभान हरपून जातात .

सर्वाना श्री गणेश चतुर्थीच्या अनेक अनंत शुभेछ्या . सर्वांच्या इच्छित कामना पूर्ण होवूदेत . येता गणेश उत्सव सर्व विघ्ने दूर करून जगात शांतता प्रस्थापित करणारा , आरोग्य प्रदान करणारा आणि तुमची आमची बाप्पावरील श्रद्धा दृढ करणारा असुदे हीच मोरयाच्या चरणी प्रार्थना .

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

Saturday, 16 August 2025

तळमळ फक्त एक घोट पाण्याची....

 || श्री स्वामी समर्थ ||


एक विधवा निराधार स्त्री एका गावात राहत होती आणि रोज ती दिवसभर पोटासाठी काम करत असे जेणेकरून तिला एक भाकरी तरी मिळत असे . तिची स्वामींवर खूप श्रद्धा होती . महाराजांना रोज सोने चांदी अनेकविध मिठाया अनेक उंची वस्तू भेट करणारे आणि नेवेद्य ठेवणारे खूप लोक गावात रोज मठात जावून महाराजांना अर्पण करत असत. पण हि स्त्री एका लोट्यात पाणी भरून महाराजांच्या चरणाशी ठेवत असे आणि मनोमन प्रार्थना करत असे कि तुम्हाला द्यायला माझ्याकडे दुसरे काहीच नाही आणि श्रद्धेने नतमस्तक होत असे.

एकदा एक धनिक जोडपे मठात आले आणि महाराजांना अनेक विध पक्वान्ने , फळे वगैरे ठेवत असताना त्या श्रीमंत स्त्रीने ह्या गरीब विधवा स्त्रीकडे पाहिले आणि म्हणाली हे काय स्वामिना ह्या लोट्यांतील पाण्याची गरज नाही . गरीब स्त्री हिरमुसली झाली आणि मनोमन विचार करू लागली कि ह्या अनेकविध उंची नेवैद्य , वस्त्रे ह्यापुढे हे पाणी ..खरच कि. म्हणून ती घरी गेली आणि दुसर्या दिवशी पुन्हा दर्शनाला आली पण काहीही न घेता . महाराज आले आणि म्हणाले हे काय मला तहान लागली आहे पाणी कुठे आहे. मनोमन काय ते ती समजली आणि लोटाभर पाणी आणले. महाराज पाणी प्यायले आणि संतुष्ट होवून तिला आशीर्वाद दिला.

त्यावेळी तिच्या डोळ्यातून ज्या अश्रुधारा वाहू लागल्या त्या तुम्हा आम्हा सर्वांच्याच डोळ्यात नेहमी येतात इतके आपले महाराजांच्यावर अतोनात प्रेम आहे. तिने आणलेल्या पाण्यात तिचा श्रद्धा भाव होता हे महाराज जाणत नसतील का? अखंड विश्वाची निर्मिती केलेल्या परमेश्वराचे चित्त तुमच्या मोदक आणि पुरणपोळी वर असेल का? त्याला तुमचा निर्मळ खरा भाव हवा आहे .

त्यांच्यासमोर आपल्या अहंकाराची धूळधाण होते , महाराज अहंकारीत व्यक्तीकडे ढुंकून सुद्धा पाहणार नाहीत. तुमची खरी तळमळ असेल तर त्यांचा वरदहस्त लाभल्याशिवाय राहणार नाही .

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

Friday, 15 August 2025

लग्नातील “ Harmony “ टिकवणारा “ शुक्र “

 || श्री स्वामी समर्थ ||

काही दिवसापूर्वी मला एका जातकाचा फोन आला. म्हणाल्या विवाहित जोडपे आहे पण अजून मुलबाळ नाही कारण काय तर अजून दोघे एकत्रच आलेले नाहीत . अश्या गोष्टी अनेकदा ह्याही पुर्वी ऐकल्या आहेत . विवाह हा एकमेकांच्या पसंतीने झालेला असतानाही अशी वेळ का यावी .

वैवाहिक सुख आणि भिन्नलिंगी आकर्षण दर्शवणारा ग्रह म्हणजे “ शुक्र “ सर्वप्रथम नजरेसमोर येतो. विवाहाची पहिली वीट रचणारा शुक्रच असतो. मुलीला मुलगा आणि मुलाला मुलगी प्रथम हळूच पाहते आणि मनोमन एकमेकांना वरतात , लाजून हसतात वगैरे , तर हि कळी खुलवणारा शुक्रच असतो .

दोघांच्याही पत्रिका गुण मिलन केल्यावर ग्रह मिलन करताना प्रामुख्याने शुक्र तपासावा लागतो . दोघांच्या मध्ये असणारे प्रेम खुलते ते आकर्षणं असेल तरच . शारीरिक आकर्षण नसेल तर पुढे त्या विवाहाची परिणीती काय होणार त्याचा अंदाज बांधू शकतो . हे आकर्षण क्षणिक नसले पाहिजे म्हणजेच निव्वळ शारीरिक ओढ नसावी तर प्रेमाचे धागे विणले जाणारे प्रेम हवे तरच विवाह दीर्घकाळ टिकेल .

दोघांच्याही आचार विचारातील साधर्म्य सुद्धा महत्वाचे आहे . जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन , प्रवासाच्या कल्पना त्याची नेमकी स्थळे , संसारातील गोडवा माधुर्य , खाण्यापिण्याच्या चोखंदळ आवडी , गुंतवणुकीचे विचार , एकमेकांचे छंद आणि त्यासाठीचे अपेक्षित सहकार्य , एकमेकांना पुरेसा वेळ देणे म्हणजे फक्त शारीरिक संबंध नाही तर एकमेकांचे होऊन जगणे , मन जपणे . एकमेकांच्या विचारात अति भिन्नता असेल तरीही संसार पुढे जाताना त्रासदायक होतो. संसार आनंदाने झाला पाहिजे , मनापासून केला पाहिजे तो लादला गेला नसावा.

लग्नातील “ Harmony “ टिकवायची असेल तर शुक्र ह्या ग्रहाची संमती असलीच पाहिजे. दोघांच्याही पत्रिकेतील शुक्र एकमेकांना पूरक असला पाहिजे . दोघांच्याही पत्रिकेत शुक्र एकाच ठिकाणी असेल तर चांगलेच. शुक्र प्रतियोगात नको . मुलाच्या कुंडलीत जिथे शुक्र आहे तिथे मुलीचा रवी नसावा . जिथे मुलाचा शुक्र आहे तिथे मुलीचा चंद्र असेल तर काही कालावधीनंतर मानसिक संघर्ष सुरु होतो आणि वैवाहिक जीवन भावनात्मक दृष्टीने डगमगू लागते . मुलाचा शुक्र आहे तिथे मुलीचा मंगळ असेल तर प्रेम आकर्षण ओढ अधिक असते. शुक्र असेल तिथे पत्नीचा बुध नसावा नाहीतर नाते टिकताना दिसत नाही . शुक्र असेल तिथे स्त्रीचा गुरु असेल तर एकमेकांच्यात बौद्धिक वाद होतील पण नाते टिकेल . शनी असेल तर मात्र विवाह खूप वर्ष टिकतो कारण शनी हा परिपक्व ग्रह आहे. Matured planet आहे. एकमेकांना समजुतीने घेतील. राहू असेल तरी विवाह टिकेल पण केतू असेल तर अजिबात सौख्य मिळणार नाही . केतू शुक्राला शुष्क करेल .

ह्या व्यतिरिक्त मुलाच्या किंवा मुलीच्या पत्रिकेत शुक्र हा ग्रह शनी राहू केतू हर्शल नेप ह्या ग्रहांनी दुषित झाला असेल तर वैवाहिक सुखाचे बारा वाजू शकतात . शेवटी आयुष्यातील आनंदाचा स्त्रोत म्हणजे शुक्र आणि जिथे त्यालाच ग्रहण लागते तिथे सुखाची होळी झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणूनच अत्यंत लक्षपूर्वक पत्रिका मिलन करावे लागते .

विवाह एकदाच होत असतो. विवाह हा फक्त त्या दोघांचे नाही तर एकंदरीत कुटुंबातील आनंद , सौख्य वृद्धींगत करणारा आणि दोन मने , कुटुंबे जोडणारा असल्यामुळे तो घाई घाई करून उरकून टाकू नये म्हणजे पुढील विघ्ने टळतील . सहमत ?????????

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

Wednesday, 13 August 2025

पैसा हीच माणसाची खरी ओळख

 || श्री स्वामी समर्थ ||


माणूस काम करत नाही तर त्याचे पोट त्याला काम करायला लावते . वितभर पोटाला भूक लागली कि काहीच सुचत नाही . नैतिक अनैतिक , चांगले वाईट हे सर्व पोट भरल्यावर करायच्या गप्पा आहेत . पण पोटाची भूक माणसाला काहीही करायला भाग पाडते हे आयुष्यातील संवेदनाशील चित्र आहे. माणसाच्या मनात नसतानाही माणूस चोरी करतो , चुकीच्या मार्गाने धन कमावतो ते सर्व काही ह्या दोन घासासाठी ..

पोटात प्रज्वलित झालेला भुकेचा यज्ञ आणि त्याला दोन घास अन्नाची आहुती देण्यासाठी म्हणजेच अन्नधान्य पर्यायाने पैसा मिळवण्यासाठी मनुष्य अविरत कष्ट करतो . जन्मल्यापासून अखेरच्या श्वासापर्यंत त्या दोन घासाची तजवीज करण्यासाठीच उभा जन्म वेचतो . पैशाचे मोल पैसा नसतो तेव्हा खर्या अर्थाने समजते .

आज आपण आपल्या पत्रिकेत असलेल्या “ धन योगा “ संबंधी जाणून घेवूया चर्चा करुया . आपण कुटुंबात जन्म घेतो ते निर्धन किंवा सधन असते जे सर्वस्वी आपल्या प्रारब्धावर अवलंबून असते . आपल्या कर्मांचा आरसा म्हणजेच आपला हा जन्म . देवाने विचारले असते तुला कुठल्या कुटुंबात जन्म हवा तर सगळ्यांनीच अमिताभ बच्चन किंवा अंबानीच्या घराकडे बोट दाखवले असते . असो

पत्रिकेतील द्वितीय भाव आपले कुटुंब आणि कौटुंबिक धन संपत्ती , आर्थिक सुबत्ता दर्शवते. आपले शिक्षण झाल्यावर नोकरी व्यवसाय करून आपणही धन अर्जित करायला लागतो . कष्ट सगळेच करतात पण त्याचा मोबदला वेगवेगळा असतो . त्यासाठी पत्रिकेतील ग्रहयोग आणि पूरक दशाही कारण ठरतात .

पैसा कोण मिळवणार आपण स्वतः म्हणून लग्न भाव , लग्नेश मुळात चांगले हवेत . लग्नातील राहू माणसाला बर्याच अंशी महत्वाकांक्षी करतो. पैसा हा राज मार्गाने मिळाला तर टिकतो आणि फळतो . कुठल्याही कृतीमागे विचार असतो आणि तो करण्यासाठी लागते ती बुद्धी . ती स्थिर असावी ह्यासाठी बुध महत्वाचा , मनाचा कारक चंद्र आणि ऐश्वर्य देणारा सर्व सुखांचा कारक शुक्र हे महत्वाचे ग्रह आहेत . गुरूला विसरून कसे चालेल .

नोकरी कि व्यवसाय ? शेवटी अर्थार्जन महत्वाचे . नोकरी अर्थार्जनात स्थिरता देयील पण व्यवसायात नफा तोटा होणार आणि तो पेलवायची मानसिक कुवत लागते . तसेच कुठला व्यवसाय करावा हेही समजले पाहिजे .

पत्रिकेतील अर्थ त्रिकोण हा २ ६ १० ह्या भावांनी तयार होतो. धन भाव पैसा . ६ वा भाव रोजच्या जीवनात मिळवलेला पैसा आणि १० वा म्हणजे दशम भाव हा नोकरी धंद्यातून पैसा कसा मिळवणार ह्याबद्दल सांगतो . पंचम भाव हा कमी कमी कष्टातील धन जसे शेअर मार्केट सट्टा जुगार , अष्टम स्त्रीधन , वारसा ह्यातून संपत्ती दर्शवतो.

धनेश तृतीयात असेल तर प्रवासातून , लिखाणातून , भावंडांच्या कडून पैसा मिळतो . रवी चंद्र , गुरु रवी , चंद्र गुरु हे योग संपत्ती साठी चांगले असतात . अर्थ त्रिकोणाशी ह्याचा संबंध असेल तर उत्तम धनप्राप्ती होते तसेच हे ग्रह पृथ्वी तत्वाच्या राशीत असतील तर धनाचा संचय होतो . धनेश व्यय भावात किंवा त्रिक भावात असेल तर पैसा टिकणार नाही . धन भावात राहू असेल तर वाम मार्गाने धन अर्चित होते . चंद्र शनी योगावर पैसा टिकतो , हे लोक कमी खर्च करणारे असतात . हा योग अशुभ असेल तर मात्र दारिद्र येते .

गुरु शुक्र लौकिक दृष्टीने पैसा नातेवाईक मित्र , लोकप्रियता मिळवून धन देतील. रवी मंगळ स्वतःच्या कर्तबगारीने , कष्टाने , पैसा मिळवतील. अष्टम भावाशी गुरु चंद्राचा योग आला तर वारसा हक्कानेही संपत्ती मिळते . मंगळावर शनीची दृष्टी धन मिळवण्यास अनंत अडथळे आणते . शनिवर हर्शल ची दृष्टी असेल तर आर्थिक नुकसान विशेषतः शेअर मार्केट मध्ये होते . शनी रिअल इस्टेट मधून तसेच काबाड कष्ट करून पैसा मिळवतो.

शुक्र चंद्राचे शुभ स्थानातील योग अर्थार्जनाला पूरक असतात . शुक्राची मंगळावर अशुभ दृष्टी किंवा मंगळाची शुक्रवार तसेच शुक्र दुषित असेल तर व्यसनांवर पैसा खर्च होतो. अश्या वेळी व्यक्ती उतावळा , पैशाच्या बाबत निष्काळजी होईल.

बुधाकडे संवाद आणि आकलन आहे. लेखन , जाहिरात क्षेत्र , छपाई , भाषणे , प्रवास , कमिशन ची कामे , सरकारी व्याज रोखे ह्यातून जर बुध चांगला असेल तर पैसा मिळेल.

शुक्र शनीचा अशुभ योग पैसा घालवेल . असे अनेकविध ग्रहयोग पैसा मिळवून देणारे आणि पैशाचा ओघ खंडित करणारे सुद्धा आहेत . मुळात धनेश दुषित नसावा . धनेश लाभेश हे स्थिर राशीत असावेत . लग्नेश आणि चंद्र मजबूत हवाच .

पोटाला भूक लागली कि माणूस काम करायला अर्थार्जनासाठी घराबाहेर पडतो आणि धन प्राप्त होते . मिळवलेल्या धनाचा उत्तम विनियोग करणे हे माणसाच्या हाती नक्कीच आहे. आज कुणी एकदा जेवायला घालेल पण कुणी ५ रुपये हातावर ठेवणार नाही . पैसा हे विष आहे शेवटी . संबंध बिघडू शकतात म्हणून शक्यतो नातेसंबंधात पैशाचे व्यवहार नकोत केलेत तर स्वछ्य असावेत तोंडी तर कधीच नको, कागदोपत्री व्यवहार असावेत .

आज व्यक्तीची ओळख हि आर्थिक स्थर काय आहे त्यावरूनच होते . कुठल्या गाडीतून व्यक्ती उतरते आहे , कुठले अत्तर लावले आहे, पेहराव वेशभूषा , परिधान केलेले दागिने ह्यावरून व्यक्तिमत्वाचा निकष लावला जातो . पैसा म्हणजे सबकुछ असणार्या ह्या जगात पत्रिकेत पैशाचा ओघ नसेल तर व्यक्तीला अनेक मानापमान आणि समस्यांना तोंड द्यावे लागते .

आपल्या कुलस्वामिनीची नित्य उपासना , श्री सुक्त पठण , महालक्ष्मी अष्टक हे लाभ करून देयील. आपल्या सद्गुरूंची उपासना जगायला बळ देते . अन्न दान, जल दान सर्वश्रेष्ठ आहे ते करत राहणे .

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

Friday, 8 August 2025

कश्याला कुणाची भीती ??

 || श्री स्वामी समर्थ ||


यमुना नदीत असलेला विषारी नाग “ कालिया “ ह्याच्या विषामुळे नदी चे पाणी आणि आजूबाजूचा परिसर तर दुषित होत होताच पण गुरेढोरे , वनस्पती सुद्धा मरत होती. कृष्णा ने कालियाच्या फण्या वर मर्दन करून त्याचा पराभव केला आणि त्याला नदी सोडून सागरात वास्तव्य कर असे सांगितले . तेव्हा कालियाने कृष्णाला सांगितले कि मी समुद्रात जायीपर्यंत गरुड मला बरोबर हेरेल आणि त्याची मला भीती वाटते म्हणून मी ह्या डोहात आश्रय घेतला होता.

त्यावर कृष्णाने त्याला सांगितले कि मी तुझ्या फण्यावर मर्दन करताना माझ्या पायांचे ठसे तुझ्या डोक्यावर उमटले आहेत त्यामुळे गरुड च काय कुणी तुला त्रास देवू शकत नाही . येतंय का काही लक्ष्यात ???

अगदी अश्याच प्रकारे भक्ताला जेव्हा त्याच्या साधनेमुळे प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थांचा वरदहस्त लाभतो तेव्हा आयुष्य वेगळ्याच अध्यात्मिक उंचीवर जाते . मग कश्याचीच भीती वाटत नाही आणि आसक्तीही , मोह सुद्धा वाटेनासा होतो. नामस्मरणाची मजा आयुष्यभर चाखत आणि त्याचा निर्भेळ आनंद घेत भक्त परिपूर्ण जीवन जगतो .

आयुष्यभर सगळे काही गोळा करत राहायचे ते कश्यासाठी ? ह्याची निंदा , त्याची नालस्ती , हेवेदावे , मत्सर हे करूनही काय मिळणार ? बाकी शून्य त्यामुळे ह्या सर्वाची उपरती होणे हि एका नामाची जादू आहे बर का . ती अनुभवण्यासाठी आपल्याला कष्ट करायला लागतील. आपल्या मनाला बजावत मनाला छडी मारत मारत नाम घ्यायचेच हा निश्चय करायचा . सीरिअल बघायला कसे बसतो तासंतास अगदी तसेच नामस्मरणात आपला जीव ओतला तर आहे तेच आयुष्य अमृतासारखे होयील ह्यात शंकाच नाही.

सतत भाती , भयगंड वाटतो ते अनेक उपाय करतात जसे कुठल्या कुठल्या शांती वगैरे आणि हजारो रुपये घालवतात पण नामस्मरण मात्र करत नाहीत . अहो नाम फुकट आहे पण ते सुद्धा घ्यायचा कंटाळा आहे किंवा त्यावर विश्वासच नाही. नामस्मरण करायला ५ मिनिटे आपण एका जागी बसू शकत नाही म्हणजे किती मन चंचल आहे बघा आपले. आणि ह्या चंचल मनामुळेच आपले आयुष्य देखील सैरभैर आहे .

वादळात असलेल्या नौके सारखे कुठेतरी भरकटत राहतो आपण आणि एकदिवस आपली इहलोकीची यात्रा संपते , पण वजाबाकी शून्य काय मिळवले आपण ह्या जन्मात काहीही नाही . भीतीने ग्रासते ते मन आणि पैसा खर्च करून मन शांत होत नाही तर त्याचा लगाम नामस्मरण हाच आहे . पण आपला विश्वासच नाही देवावर . नुसते महाराज महाराज करायचे अनेक यात्रा करायच्या पण आम्ही अजूनही नर्मदेचे गोटेच. महाराज आणि मी एकच आहोत. माझ्या आजूबाजूला महाराज खडा पहारा ठेवून आहेत कोण काय करणार मला इतका विश्वास असायला हवा प्रत्येक भक्ताला मनोमनी. पण नाही . जप करतो पण त्यात जीव ओतला तर त्यांच्याशी एकरूप होवू .

महाराजांचा वरदहस्त ज्याला लाभला त्याने कश्याचीही भीती बाळगायची गरज नाही . आम्हाला सोपे सोपे सगळे हवे , रत्न घाला , महाराजांना नारळाची तोरणे बांधा सगळे करा पण नाम ते घ्यायचे राहूनच जाते , तिथे लक्ष्यच नाही आहे आपले .

आजच सकाळी एका मुलीची पत्रिका पाहिली . दुसरा विवाहाचा प्रश्न होता . सध्या माहेरी राहते आहे , स्वतःचेही घर आहे . असो पण घरात राहायला एकटेपणाची भीती वाटते. साहजिक आहे , तसे वय फार नाही. मी तिला समजावले आणि म्हंटले दुसर्या विवाहाचीही गत पहिल्यासारखी होणार म्हणून आहे ते आयुष्य ठीक आहे , ह्या भानगडीत नाही पडलीस तर अधिक सुखी राहशील. पत्रिकेत विवाहाचे योगच नाहीत . असो आता राहिला प्रश्न भीतीचा . भीती वाटते म्हणून आपण जगायचे सोडून देतो का ? देणार का ? तर नाही ..वाटेल भीती पण जर महाराज प्रत्यक्ष आपल्या घरात आहेत आपल्या सोबत असा विचार जरी केला तर सगळी भीती क्षणात पळून जायील . तिलाही तेच सांगितले नामस्मरण हि एक जादू आहे , ज्या गोष्टींची भीती वाटते त्या गोष्टी कधीच प्रत्यक्षात घडत नाहीत .

आज दुपारपर्यंत चंद्राचेच नक्षत्र आहे . आज श्रावणी शनिवार आणि पौर्णिमा , उत्तम योग . चंद्र म्हणजेच मन . आज दुर्दम्य इच्छाशक्ती ठेवा आणि नामस्मरणाला सुरवात करा . महाराजांचा वरदहस्त लाभल्याशिवाय राहणार नाही हा संपूर्ण विश्वास ठेवून नाम घ्या .

रक्षाबंधन आणि नारळीपौर्णिमेच्या सर्वाना खूप शुभेछ्या .

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

Thursday, 7 August 2025

राजाची शेळी

 || श्री स्वामी समर्थ ||

एका राजाने राजदरबारात घोषणा केली कि कुणीही विद्वानाने माझ्या लाडक्या शेळीला रानात दिवसभर पोटभर चारावयाचे आणि संध्याकाळी परत आणायचे . आणल्यावर मी स्वतः तिला चारा देईन. जर तिने चारा खाल्ला तर तिचे पोट भरलेले नाही असे समजून त्या विद्वानाला मी देहदंड देयीन .आता ह्या साठी कुणीच पुढे यायला तयार नाही , आपला जीव कोण धोक्यात घालेल नाही का .

एक माणूस पुढे आला आणि म्हणाला मी प्रयत्न करतो त्याने शेळीला दिवसभर रानात खूप फिरवले आणि खा खा चारा खायला दिला . संध्याकाळी दरबारात आल्यावर राजाने विचारले पोट भरले आहे कि हिचे त्याने मान डोलावली. तेव्हा राजाने पुन्हा तिला चारा खायला घातला. शेळीने चारा खाल्ल्यावर राजा म्हणाला पोट भरले असेल तर ती कश्याला खाईल . असे म्हंटल्यावर आपली आता धडगत नाही म्हणून तो माणूस खूप घाबरून गेला. बघा शेळी हे असे जनावर आहे कितीही पोट भरले तरी चारा दिसल्यावर ती त्याला तोंड लावणारच . असो .

दिसरया दिवशी अजून एक व्यक्ती पुढे आला आणि त्याने शेळीला रानात नेले . जाताना त्याने आपल्या हातात एक दंडुका घेतला . शेळीने चार्याला तोंड लावले कि हा तिच्या तोंडावर तो दंडुका मारत असे. असे दिवसभर त्याने केले. अश्यामुळे शेळी उपाशीच राहिली आणि दिवसभर त्या दंडुक्याचा प्रसाद खात राहिली. संध्याकाळी राजासमोर तिला आणल्यावर त्याने तिला पोटभर चारा खायला घातला का असे विचारले आणि पुन्हा तिच्या तोंडाशी चारा नेला . शेजारी हा दंडुका ठोकत उभा. काय बिचार्या त्या शेळीची हिम्मत तो चारा खायची .

झाले देह्दंड बाजूला राहिला राजाच्या बक्षिसाचा तो मानकरी ठरला.

ह्यावरून आपण काय बोध घ्यायचा तो घ्यायचा .

श्री स्वामी समर्थ

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

इटुकला पिटुकला -बुध होणार मार्गी.....हुश्श...

 || श्री स्वामी समर्थ ||


परमेश्वराने मानवाला जे सर्वात मोठे वरदान दिले आहे ते म्हणजे “ बुद्धी “ आणि त्यावर अंमल आहे तो बुधाचा . आता दिलेल्या बुद्धीचा वापर कसा करायचा ते मात्र प्रत्येकाच्या हातात आहे. काही लोक ती समाजहितासाठी , आपले आयुष्य पुढे नेण्यासाठी , सन्मार्गाने जगण्यासाठी , ज्ञानप्राप्तीसाठी , राजमार्गाने अर्थार्जन करण्यासाठी वापरतात तर काही कुटील मार्गाने आपल्या बुद्धीचा वापर नाही तर ह्रास करून घेतात .

बुध हा इटुकला पिटुकला जरी असला तरी त्याची किमया अफाट आहे , भल्याभल्यांना तोंडघशी पाडणारा हा बुध गेले काही दिवस “ वक्री “ अवस्थेत होता . पृथ्वीच्या गतीपेक्षा त्याची गती कमी झाल्यामुळे तो मागे जात आहे अशी भासमान स्थिती दिसत होती . बुधाकडे बुद्धी , लेखणी , आकलनशक्ती , मज्जासंस्था ,शिक्षण , प्रवास आणि सर्वात मुख्य म्हणजे संवाद असल्यामुळे हा ग्रह वक्री होवून त्याने आपल्या सगळ्यांचेच “ वांदे “ केले होते . पण आता ११ ऑगस्ट ला बुध कर्क राशीतच मार्गी अवस्थेत येणार असल्यामुळे आपल्याला अगदी “ हुश्श “ होणार आहे. बुध मार्गी झाल्यामुळे आपल्याला अनेक अडलेल्या कामातून दिलासा आणि मार्ग मिळणार आहे.

बुध वक्री असताना संवादात गोंधळ. आपण जे म्हणतो त्याचा समोरचा भलताच अर्थ काढतो आणि संवादाचे १२ वाजतात . गैरसमज , चुकीची कागदपत्रे , अनेक चुका झाल्यामुळे हवे ते काम वेळेत न होणे, पेपर वर्क अडकणे , बोलण्याचा गैरअर्थ , इमेल ह्यात गोंधळ. प्रवास वेळेत न झाल्यामुळे मिटिंग उशिरा किंवा रद्द मग त्यावरून होणारी डोकेदुखी , ह्याला समजावू कि त्याला अशी भ्रामक अवस्था . सर्व व्यवहार कमी अधिक गतीने होणे. बुध वक्री असताना महत्वाचे निर्णय , प्रवास नेहमी टाळावेत . बुध म्हणजे बातम्या , जाहिरात , मिडिया त्यामुळे नवीन उत्पादांचे अनावरण बुध वक्री असताना करू नये.

आजकालचे इंटरनेट चे युग त्यात ह्याची मेल त्याला जाणे , डेटा लॉस , files corrupt होणे ह्या सारख्या असंख्य गोष्टीना आपण गेले काही दिवस तोंड देत आहोत . बुध मार्गी झाल्यावर ज्यांचे interview झालेले आहेत पण offer आलेली नाही त्यांना ती येणार , वाट पाहत असलेले इमेल , मेसेज येणार . अर्थात तश्या दशाही पूरक असाव्यात . त्यामुळे आता आपण सुटकेचा श्वास सोडून मोकळा श्वास घेत कामाचा “ पुनश्च हरिओम “ करायला हरकत नाही .

इथे काही शाश्वत नाही आज एक तर उद्या दुसरे असे बदल निसर्गात सुद्धा होतात तर आपले जीवन ते काय . कधी एखादा भरमसाट मेसेज करून आपल्याला विचार करायला भाग पाडेल तर कधीमहिने मेसेजच येणार नाहीत . चलता है. Take it Easy. आहे हे असे आहे . बुधाला राजकुमार म्हणून संबोधले आहे तेव्हा त्याचे नखरे हे असणारच .

त्यात भरीस भर म्हणून कि काय “ शनी “ सुद्धा वक्री आहे . सध्या आपण संयम घालवून बसलो आहोत . हो हो आपण सगळेच आणि कदाचित त्याचीच किंमत चुकवण्यासाठी आणि आपले आयुष्य शिस्तबद्ध करण्यासाठी ग्रह वक्री होत असावेत .

चला तर मग कामाला लागुया , झालेले गैरसमज , कामातील चुका निस्तरुया , बिघडले आहे तिथे काही वेगळे घडेल ह्यासाठी प्रयत्न करुया , शेवटी सगळे आपलेच आहेत राव , अगदी ग्रह सुद्धा . सहमत ?????

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230 

Tuesday, 5 August 2025

रूढी परंपरांच्या पल्याड लिव्ह इन ( ज्योतिषीय दृष्टीकोण )

 || श्री स्वामी समर्थ ||

पूर्वीच्या काळी प्रचलित नसणाऱ्या किंवा ऐकिवात सुद्धा नसलेल्या अनेक गोष्टीपैकी एक म्हणजे “ लिव्ह इन रिलेशनशिप “ हा नवा अध्याय आपल्या संस्कृतीत जोमाने फोफावत आहे. आम्ही अमुक अमुक वर्ष लिव्ह इन मध्ये होतो हे सर्रास ऐकायला मिळते . पण आपल्या परंपरा , संस्कृती ह्या गोष्टीना तग धरून देतील का हा प्रश्न आहे. 

मुळात हे विचार मनात यायला एकच गोष्ट कारणीभूत आहे ती म्हणजे “ कसलीही जबाबदारी नको “. आरामात राहायचे एकत्र  तेही आपल्या इच्छा पूर्तीसाठी पण त्यातून कधीही सटकता येयील असे हे आपले सोय पाहणारे गोड बंधन .

विवाह हि एक जबाबदारी आहे. आपली वंशवेल वाढवणे हा प्रमुख उद्देशाने विवाहसंस्था जन्माला आली . ती नसती तर समाजात अराजकता माजली असती . प्रेम हि एक भावना आहे आणि ती सहवासातून फुलत जाते . एकमेकांसाठी जगणे आणि एकमेकांचे होऊन जगणे ह्यात खरी गम्मत आहे आणि मग आयुष्याचा आनंद , प्रवास सुखकर होतो .

जेव्हा व्यक्ती वैचारिक , आर्थिक , मानसिक , सामाजिक आणि लैंगिक दृष्टीनेही सक्षम होते तेव्हाच पालकांनी त्याचा विवाह करावा . विवाह म्हणजे एक जबाबदारी आहे तीही संपूर्ण आयुष्यभराची . ज्यांना ती पेलवत नाही किंवा पेलावण्याची ताकदच नसते नुसतेच आपले बेफिकीरीने जगायचे ते हा कन्सेप्ट आनंदानी स्वीकारतील. मुळातच ह्यामागे जबाबदारी टाळणे हा हेतू स्पष्ट आहे. आयुष्यभराची साथ आयुष्य समृद्ध करते हे न समजणे हे दुर्दैवच म्हंटले पाहिजे.


पाश्चिमात्य लोक आपल्या चांगल्या गोष्टींचे समर्थन करतात . कर्ज काढून भारतात आपल्या संस्कृतीचा अभ्यास करायला येतात ती संस्कृती आज आपल्यालाच  नकोशी झाली आहे त्यातील उदात्त विचारांची बैठक नकोशी झालेली आहे हे आजचे चित्र आहे पण समाजाच्या भविष्यासाठी हे निश्चित पोषक नाही. हि खरी शोकांतिका आहे . 


स्वैराचाराला बंधन म्हणूनच विवाह संस्था आहे. पण आजच्या कलियुगात कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. जगायचे तेही फक्त स्वतःपुरते . मुले होणे संसार होणे ह्यात किती प्रेम आहे , मुलांना मोठे होताना पाहणे ह्यात स्वर्गसुख आहे आणि म्हणूनच कुटुंब व्यवस्था जन्माला घातली आहे परमेश्वराने . पण त्याला बगल देवून आपल्याला सर्व सुखे हवी पण जबाबदारी नको म्हणून हि असली थेर आता माणसाला सुचत आहेत . मुक्त विचारसरणी घाला चुलीत , त्याच्या नावावर मोठमोठ्या गप्पा मारायच्या आणि आधुनिक विचारांचे आम्ही कसे भोक्ते आहोत हे मिरवायचे जे बिन बुडाचे आहे आणि अशोभनीय आहे . भारतीय संस्कृतीची पाळेमुळे घट्ट आहेत आणि त्याचा अभिमान प्रत्येक भारतीयाला असलाच पाहिजे. भारतीयांच्या मनातील देवांचे , परंपरांचे अधिष्ठान उखडून टाकणे सहज सोपे नाही. आपले वेद , पुराण संस्कृती ह्यावर आपली नितांत  श्रद्धा आहे.

आपली एखादी पिढी ह्या पाश्चिमात्य नको त्या गोष्टींचे अनुकरण करू पाहत आहे कारण कसली बंधने नको मुक्त जगायचे आहे. पण हा पायंडा पडू शकणार नाही इतकी आपली संस्कृतीची पाळेमुळे भक्कम आहेत . ह्या कडे वळण्याचा मानसिक कल एखाद्या जातकाचा कसा होतो ह्याचा थोडा अभ्यास करुया .


सर्व सुखाचा आणि विवाहाची परिभाषा शिकवणारा ग्रह शुक्र जेव्हा हर्शल राहू केतू नेप ह्यांनी दुषित होतो आणि त्याच सोबत चंद्र तेव्हा ह्या विचाराना खतपाणी घालतो  . मुळातच हर्शल हा रूढी झुगारून देणारा ग्रह आहे . प्रामुख्याने पत्रिकेतील काम त्रिकोण महत्वाचा आहे , सप्तम जे आपला जोडीदार आणि तृतीय हे सप्तम भावाचे म्हणजे विवाहाचे भाग्य दर्शवते . विवाहातून होणारे अनेकविध लाभ हे लाभ भावातून प्रत्ययास येतात . जगावेगळ्या ह्या गोष्टींसाठी सर्वप्रथम स्वतःचे मन आणि बुद्धी ने सहमती दिली पाहिजे म्हणजे जातक स्वतः जेव्हा ह्या विचारांनी प्रेरित होतो म्हणजे लग्न भाव महत्वाचा आहे. पंचम जिथे प्रणय फुलतो आणि अष्टम जिथे खरा शारीरिक संबंध येतो , आता ह्यात आपला धर्म काय सांगतो म्हणून नवम भाव डावलून कसा चालेल. मित्र मैत्रिणी लाभातून म्हणून लाभ भाव नजरेत येतोच.

एखाद्या गोष्टीसाठी हिम्मत लागते , पुढाकार घेणे मंगळाचे काम तसेच रिती रिवाज आणि धर्माने सांगितलेल्या गोष्टींचे अनुकरण न करता धर्माच्या विरुद्ध आचरण करणारा राहू सुद्धा पत्रिकेत काम करत असतो . गुरु शनी हेही विचारात घ्यावे लागतात .


अनेकदा सप्तम भाव शनी राहू मंगळ केतू ह्यांनी दुषित होऊन विवाहाची आसक्ती उरत नाही म्हणून मग शोर्टकट म्हणजे लिव्ह इन . पंचम भाव सुस्थितीत असेल तर रोमान्स फुलतो , प्रेम होते पण तरीही बंधन नको असते अश्यावेळी त्या मुक्त स्वरूपाचे प्रेम लिव्ह इन हा पर्याय स्वीकारते . 


लिव्ह-इन रिलेशनशिप ही जन्मकुंडलीतील सप्तम , पंचम भाव आणि शुक्र हा राहू केतू ह्यांच्या प्रभावाखाली त्यात धैर्य आणि साहस देणाऱ्या मंगळाच्या  प्रभावाखाली दिसते. पारंपरिक विवाहाच्या अडचणी, स्वतंत्र विचार, आणि शारीरिक/मानसिक आकर्षण यांचा मिलाफ असलेली ग्रहस्थिती असल्यास अशी नाती प्रबळ होतात. राहू हा रूढी विरुद्ध वागणारा आणि नेहमीची चौकट तोडून बंधने झुगारून देणारा आहे . त्याचसोबत हर्शल . 

शिस्त बंधन कुणालाच नको असते. साधे घरात आल्यावर चपला नीट ठेवणे , घरातील शिस्त वेळच्या वेळी झोप हेही कुणाला नको असते . शारीरिक आकर्षण पण बंधन नको हे समीकरण म्हणजे लिव्ह इन . आपल्याला जे हवे ते मिळवणे पण विवाह टाळून हा सोपा विचार म्हणजे “ लिव्ह इन “ जो आपल्या संस्कृतीच्या विरोधात आहे. 

पाश्चिमात्य कुठल्याही संस्कृतीचे , विचारांचे अनुकरण जरूर करावे पण त्यासाठी आपल्या संस्कृतीचे उल्लंघन होवू नये . नवे विचार रुजवावेत पण जुन्या विचारांना फाट्यावर न मारता . आपल्या घरात दोन तीन पिढ्या असतात . प्र्तायेकाला हे नवीन विचार सहज मानवतील , झेपतील का हा विचार तरुणांनी नक्कीच सर्व प्रथम केला पाहिजे. ज्यांच्या अंगावर खेळून लहानाचे मोठे झालो त्यांनाच अक्कल शिकवायची म्हणजे त्यांना दुक्ख देण्यासारखेच आहे. मुळात कश्याला कुणाचे अनुकरण करायचे ? आहे ते काय वाईट आहे. पिढ्यान पिढ्या जे चालत आहे त्यात कुणाचे नुकसान झाले आहे का? नाही ना. आपल्या संस्कृती आपले हितच पाहणाऱ्या आहेत . उगीच समोरचा करतो म्हणून आपणही करायचे हे अर्थहीन आहे . 

विवाह हे एक बंधन आहे आणि ते स्वीकारणे हीच आपली संस्कृती आहे. उठसुठ दुसर्याचे अनुकरण करणे म्हणजे आपल्या संस्कृतीचा अपमानच म्हंटला पाहिजे . लोक आपले कुठे अनुकरण करतात , परदेशस्थ लोक त्यांच्या धर्माला धरून असतात मग आपण ह्याच त्यांच्या गुणाचे का नाही अनुकरण करत . भलतेच वागून प्रसिद्धी मिळत नाही आणि सुख तर त्याहून नाही . आपल्या पूर्वजांनी विचारपूर्वक समाजाची रचना केलेली आहे. काळ कितीही बदलला तरी आपली संस्कृती तीच आहे आणि आपल्या संस्कृतीने जे काही सांगितले आहे ते आपल्या कल्याणासाठीच आहे . आधुनिकतेच्या नावाखाली ते झुगारून देणे म्हणजे शहाणपण नाही . लिव्ह इन हा एक व्यवहार आहे आपल्या नको त्या भोगांच्या तृप्तीसाठी निवडलेला पर्याय.  जिथे कुणालाच उत्तर देण्यास आपण बांधील नाही , नाही पटले चला ब्याग भर आणि निघा हे तर भेकडपणाचे लक्षण झाले. 


समाजाचे हित जपणे हे आपलेही सर्वांचे कर्तव्य असल्यामुळे ह्या गोष्टीना अजिबात खतपाणी , प्रोत्चाहन न देणे हे समाजातील प्रत्येक घटकाचे कर्तव्य आहे. प्रेमाची भावना अत्यंत नाजूक कोमल आहे . फुलपाखरासारखे प्रेम हे प्रेम नसते ते फक्त वासनेने भरलेले आकर्षण असते. हे प्रेम खरे असूच शकत नाही जे आज हिच्यावर उद्या तिच्यावर होत जाते . खरे प्रेम जबाबदारी कधीही टाळणार नाही . माणूस हा आयुष्यात प्रेमाच्या भावनेचाच भुकेला असतो , कुणीतरी आपले असावे , आपल्याला आपले म्हणावे आणि त्याची साथ आयुष्यभर मिळावी ह्या साठी प्रयत्नशील राहावे पण त्यासाठी लिव्ह इन हा चुकीचा मार्ग स्वीकारू नये. अनेकदा ह्यातून काहीच निष्पन्न होत नाही , आयुष्याची कुटुंबियांची वाताहत तर होतेच पण बदनामीही होते , कारण समाज हे सहज स्वीकारत नाही आणि नेमके हेच आपल्याला समजत नाही . सहमत ??

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

 



आपला आतला आवाज - केतू

 || श्री स्वामी समर्थ ||


आपल्या सद्गुरूंवर आपली नितांत श्रद्धा तर हवीच पण त्याहीपेक्षा अधिक हवा तो विश्वास. गुरु आपले कधीतरी वाईट करतील का? विचारा प्रश्न स्वतःच्याच मनाला. आई आपली गुरु आहे ती जेवणात विष कालवून देयील का नाही अगदी तसेच जेजे होते आहे ते त्यांच्या इच्छेने ह्याची खुणगाठ एकदा मनात पक्की झाली कि आयुष्यात प्रत्येक गोष्टीचे उत्तर आपले आपल्यालाच मिळत जाते. आत्मचिंतन हाही एक अध्यात्माचा भाग आहे. स्वतःच्या आत मनात डोकावले तरी सुद्धा अनेक प्रश्नांची उकल सुटते .

आज चंद्र केतुच्याच नक्षत्रात आहे . केतू ला दिसत नाही पण त्याच्याकडे मन आहे आणि स्पर्शज्ञान सुद्धा आहे. बाह्य जगातील कुठल्याच गोष्टीचा आस्वाद दृष्टी नसल्यामुळे घेता येत नाही म्हणूनच मग स्वतःच्या आतमधील सुंदर जग आणि स्वतःच्या असीम व्यक्तिमत्वाची ओळख करून घेण्याचा केतू प्रयत्न करतो. ज्यांचा केतू चांगला असतो त्यांना गुरुसारखीच फळे मिळतात .

स्वतःच्या आत पाहायला शिकवणारा हा केतू असामान्य ताकदीचा आहे . माणूस सगळ्यात दुर्लक्षित करतो ते आपला श्वास आणि आपल्या आतील आवाज . आपला आवाज सतत आपल्याला काहीतरी सांगू पाहत असतो पण भौतिक सुखात मश्गुल झालेले आपल्यापर्यंत तो आवाज पोहोचताच नाही . कुठल्याही अगदी कुठल्याही प्रश्नाचे उत्तर कोण देवू शकतो तर आपले मन , पण त्याला न विचारता जगभर आपण विचारत बसतो . दहा लोक हजार गोष्टी सांगतात आणि आपण अजूनच बुचकळ्यात पडतो . पण आपल्या आतला आवाज आपल्याला नेहमीच वास्तव दाखवतो , आपल्या मनाने दिलेला कौल माणसाने नेहमीच ऐकावा कारण तो सौ टक्का खरच असतो .

केतू म्हणजे आत्मिक प्रेरणा , आंतरिक शक्ती , गूढता , अध्यात्मिक ज्ञान आणि अध्यात्मिक ज्ञानाचे दालन . शुभ केतू ध्यान धारणा , योग ह्याकडे आपले लक्ष्य केंद्रित करायला मदत करतो. ध्यानात आपल्या सद्गुरूंची गाठभेट करून देणारा हा केतूच तर आहे .

ज्यांचे मन सदैव अशांत किंवा बेचैन असते किंवा एखाद्या अनामिक भीतीने ग्रासलेले असते त्यांनी योग , साधना केली तर मन स्थिर होण्यास मदत होते . पत्रिकेत केतू बिघडलेला असेल तर भ्रमात राहणे , मन अशांत , उदासी , भीती , निर्णयक्षमता नसणे , एकलकोंडेपणा , मानसिक तणाव आणि त्यातून निर्माण होणारे मनाचे आजार ह्या गोष्टीना व्यक्तीला सामोरे जावे लागते . केतू अध्यात्मिक प्रगतीचे मार्ग खुले करून देतो पण त्या मार्गावर चालणे सोपे नसते. दुर्दम्य इच्छाशक्ती लागते . केतूचा परिणाम अनेकदा पायातील नसा आणि नर्व्हस सिस्टीम वर होताना दिसतो . केतू म्हणजे मंदिरावरील कळस त्यामुळे शुभ असेल तर कीर्ती यश शिखरापर्यंत करिअर जावू शकते अन्यथा मानसिक ताणताणाव आणि आजार मागे लागतात .

केतूचा मुख्य गुण म्हणजे विरक्ती , धन भावात केतू असेल तर अश्या व्यक्ती विरक्त किंवा एकट्या एकट्या राहतात . कुटुंबाबद्दल फारश्या आसक्त नसतात . केतू आपल्याला अंतर्मुख होवून स्वतःच्याच आयुष्याकडे त्रयस्थाच्या नजरेतून पाहायला शिकवतो . शेवटी हे आपले आयुष्य आहे आणि आपल्या प्रश्नांची उकल शेवटी आपली आपल्यालाच करावी लागते ..

आपल्या प्रश्नांची उत्तरे आपल्या मधेच आहेत बाहेर शोधायची गरजच नाही . अंतर्मुख होवून बघितले तर आपल्या आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन मिळेल आणि आपली स्वतःचीही नव्याने ओळख होयील . प्रयत्न करा आणि अभिप्राय सुद्धा कळवा.

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी मार्गदर्शन : 8104639230

Monday, 4 August 2025

फलित

 || श्री स्वामी समर्थ ||


आपण घरात असतो तेव्हा सगळ्या खोल्यातील दिवे पंखे चालू ठेवत नाही. ज्या खोलीत असतो तिथलाच दिवा पंखा चालू असतो , दुसर्या खोलीत जाताना दिवे पंखे बंद करून जातो कारण आता तिथून आपण दुसर्या खोलीत जाणार असतो. ग्रहांचेही अगदी तसेच आहे . सगळे नवग्रह आपल्या आयुष्यात एकाच वेळी काम करत नाहीत किबहुना त्याची फळे एकाच वेळी मिळत नाहीत . एखादी घटना घडवण्याचा हक्क दशा स्वामीकडे असल्यामुळे ज्या ग्रहाची दशा असते त्या ग्रहाची सत्ता आपल्या पत्रिकेवर त्या कालावधीत असते , तसेच त्यातील अंतर्दशा , विदशा ह्या सुद्धा बलवान असतात आणि फलिते देतात .

अपुरा अभ्यास किंवा शास्त्राची अर्धवट माहिती तसेच न समजलेले वाचन ह्यामुळे अनेकदा आपण आपले वाईट करणारे “ पापग्रह “ असतात असा चुकीचा समज करून घेतो . हा समज जनमानसात इतका खोल रुजलेला दिसतो कि काहीही वाईट झाले कि माझी साडेसाती आहे , माझी राहू दशा आहे लगेच सुरु होते .

एखाद्या पत्रिकेत जातक मुळातच घाबरट किंवा कमकुवत आत्मविश्वास नसलेला असेल , एखादी नवीन गोष्ट करण्यासाठी उत्सुक किंवा आत्मबल नसलेला असेल तर अश्यावेळी सर्वप्रथम लग्न लग्नेश आणि चंद्र कमकुवत असतो असे दिसून येते . मग इथे राहू केतू शनी कुठे आले ? येतंय न लक्ष्यात . अनेकदा चोर सोडून संन्यासाला फाशी असाच काहीसा प्रकार घडतो कारण अर्धवट ज्ञान . पत्रिकेत उधळपट्टी करणारे ग्रह योग असतील तर व्यक्ती कायम धन अर्जित करेल पण त्याचा संचय नाही करू शकणार मग दशा कुठलीही असो.

चंद्र शुक्र गुरु हे नैसर्गिक शुभ ग्रह आहेत . पण तेही जर बिघडले तर तेही शनी राहू पेक्षाही वाईट फलित देतात हे लक्ष्यात ठेवले पाहिजे . उदा. चंद्रच पत्रिकेत दुषित किंवा बलवान नसेल तर मन कमकुवत असेल. उदा चंद्र नेप युती किंवा चंद्र हर्शल युती ती मानसिकता बिघडवणारी आहे. पण हा ह्या माणसाचा स्वभाव होईल आणि तोही कायमचा . मग राहू दशा असो अथवा बुध किंवा मंगळ ,व्यक्ती चा चंद्र हर्शल युतीमुळे असलेला विक्षिप्त स्वभाव कमी होणार नाही तो तसाच राहील. कारण तीच ग्रहांची बैठक घेवून जातक जन्माला आलेला आहे.

आजचेच उदा बघा . एका स्त्रीने जिचा घटस्फोट झालेला आहे तिने दुसर्या विवाहाचा प्रश्न केला . मी तिला म्हंटले नाही केले तर अधिक सुखी राहाल . तर म्हणाली मग आधीचा नवरा पुन्हा येयील का माझ्यासोबत. आता काय बोलायचे कळेना . चंद्र किती बिघडला असेल हे ह्या उदा वरून समजेल.

व्ययात मंगळ अनेकदा नुकसान , पैशाचा अपव्यय दर्शवतो . मग अश्यावेळी दशा कुठलीही असो , खर्चिक वृत्ती जातकाची अमुक अमुक ग्रहस्थितीमुळे असते त्याला वाईट दशेची जोड मिळाली तर ती वाढेल कमी होणार नाही .

विवाहा साठी पत्रिका पाहताना मुळात वैवाहिक सौख्य आहे कि नाही ते शुक्रावरून समजते . मग शुक्र कन्या किंवा सिंह राशीत वा नवमांशात असेल , तसेच हर्शल , राहू नेप ह्या ग्रहांच्या सोबत असेल तर वेगळे फलित मिळते. लग्न आणि नवमांश पत्रिकेत शुक्र सिंहेत असेल तर विवाहच होत नाही किंवा झालाच तर टिकत नाही . शुक्र लग्नी असेल तर जातक सुंदर असेल पण त्यासोबत पापग्रह असतील तर त्या पापग्रहांची दृष्टी सप्तम भावावर जावून वैवाहिक सौख्य बिघडवणारा शुक्र तर बिघडेलच पण सप्तम भाव सुद्धा बिघडेल हे लक्ष्यात आले पाहिजे . आता अश्यावेळी दशा कुठली असेल ते महत्वाचे पण फळ फक्त दशाच देत नाही हि अशी मुळात पत्रिकेत असलेली ग्रहस्थिती सुद्धा देते ह्यासाठी हा लेखन प्रपंच .

वैवाहिक सुखाचा शुक्र सौख्य देत नसेल तर कितीही दशा आल्या तरी विवाह सौख्य नाही ते नाहीच कारण शुक्र दुषित असणे हा पत्रिकेतील मोठा दोष आहे .

अनेकदा पत्रिकेत असलेली मुळ स्थिती डावलून आपण दशेला दोषी ठरवतो . दशा ज्या ग्रहाची असेल तो ग्रह त्या दशेत संपूर्णपणे कार्य करणारच पण म्हणून प्रत्येक दशा भीती दडपण न्यूनगंड देयील असे नाही . मूळ पत्रिकेतील चंद्राची स्थिती त्याला कारणीभूत असेल हे लक्ष्यात घेतले पाहिजे .

बाबा नेहमीच रागावतात , फटके मारतात त्यामुळे ते शालेय जीवनात जणू व्हिलन असतात जसे आपले पापग्रह पण अति झाले कि कधीही न ओरडणारी कायम पदराखाली घेणारी आणि माया करणारी आई सुद्धा रौद्र रूप धारण करून मुलाला उपाशी ठेवते जसे आपले शुभग्रह . अनेकदा पापग्रह आयुष्य पुढे नेतात जसे भाग्यातील राहू परदेशी नेण्यास उत्सुक असतो . चांगली नोकरी मिळाली दुबईला तरीही राहू वाईट का?

मूळ ग्रहस्थिती दशेनुसार बदलत नाही . पत्रिकेतील ग्रह आपल्या पूर्व कर्मानुसार फलित प्रदान करणारच . फक्त त्या फलिताचा कालावधी ठरवतो तो दशास्वामी इतकेच .

प्रत्येक वेळा दोष दशेला न देता मूळ ग्रहस्थिती सुद्धा तपासावी लागते तेव्हाच नेमके फलित देणारे ग्रह आरशासारखे स्वछ्य दिसतात .

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230  

Sunday, 3 August 2025

रहस्य अर्थ त्रिकोणाचे

 || श्री स्वामी समर्थ ||


शास्त्रात चतुर्वीद पुरुषार्थ सांगितले आहेत . संपूर्ण जीवन जगताना पायरी पायरीने येणारे हे चारही पुरुषार्थ आपले जीवन परिपूर्ण करत असतात . जो धर्म अर्थ आणि काम हे तीनही त्रिकोण संपूर्णपणे खर्या अर्थाने जगतो किंवा उपभोगतो तोच मोक्षाकडे वाटचाल करू शकतो . जर आपल्या कुठल्याही इच्छा राहिल्या तर पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो . जो पर्यंत आपण ह्या चक्रातून बाहेर येत नाही तोवर पुनरपि जननं ...चालूच राहणार .

आज आपण अर्थ त्रिकोणातील बारकावे बघुया . अर्थ त्रिकोण हा २ ६ १० भावाने तयार होतो . अर्थ त्रिकोण नावाप्रमाणे अर्थार्जनाशी आणि त्याच्या असलेल्या विनियोगाशी निगडीत आहे . द्वितीय भाव हा कुटुंबाचा आणि इथून आपल्या अर्थ त्रिकोणाची खरी सुरवात होते . आपण जन्माला येतो तेव्हा पैसा घेवून येत नाही पण नशीब मात्र नक्कीच घेवून येतो. कुटुंबातील व्यक्ती आपले पालन पोषण करतात आणि त्यामुळे आपण आपल्या पायावर उभे राहतो . इथे आपली वाणी सुद्धा आहे . मन शुद्ध असेल आणि मनामध्ये चांगले विचार असतील तर आपोआपच माणूस चांगले बोलणार . आपले आप्त , कुटुंबातील सर्व व्यक्ती ह्यांच्याशी आपण आदराने वागलो तर अर्थार्जनाचा ओघ सुरु राहील. शेवटी ज्यांनी कमवायला लायक बनवले त्यांचा आदर केलाच पाहिजे .

षष्ठ भाव हा रोजचे दैनंदिन जीवन त्यात आपले सहकारी , घरातील नोकर माणसे तसेच रोजच्या जीवनात भेटणारे असंख्य जे आपले जीवन पुढे नेण्यास मदत करतात त्यांच्याशीही आपली वागणूक सभ्यतेची , आदरपूर्वक संम्मान देणारी असेल तर रोजच्या जीवनात अडचणी येणार नाहीत . घरातील पाळीव प्राणी , अगदी घरात लावलेली झाडे ह्यांचे संगोपन हि आपली जबाबदारी आहे .त्यांच्या सेवेत , वाढ होण्यात आपण कमी पडत नाही ना हे पाहणे आपले प्रथम कर्तव्य आहे .

दशम भाव हा तर आपले कर्म . आपले कर्म शुद्ध असेल तर ह्याही भावाचे म्हणजे नोकरी व्यवसायाचे फळ उत्तम मिळणार ह्यात दुमत नाही. दशम आणि लाभ हे दोन्ही भाव प्रत्यक्ष शनी महाराजांच्या कडे आहेत . कर्म उत्तम करा ते लाभ पण करून देतील. शनीसारखा दाता नाही हे आपल्यापैकी अनेकांनी अनुभवले सुद्धा असेल.

आयुष्यात शेवटी पैसा महत्वाचा कारण त्यावरून आपले असणे आणि नसणे ठरत असते . कुणाही पुढे पैसा मागून जगावे लागावे ह्यासारखे दुर्दैव आणि लाचारी ती काय . पोटा पुरते कमवणे आणि ते धन संचित करण्यासाठीच तर षष्ठ भावात पृथ्वी तत्वाची कन्या राशी आहे . पृथ वी तत्व हे गोष्टी धरून ठेवणारे आहे . पैसा मिळवणे त्याहीपेक्षा तो योग्य ठिकाणी गुंतवून आयुष्याची संध्याकाळ सुरक्षित करणे हेही महत्वाचे आहे . लक्ष्मी सुद्धा सन्मार्गाने आली पाहिजे .

लग्नाच्या वेळी मुलगी देताना ७ वी मधील गणितातील मार्क कुणी विचारणार नाही पण आज पैसा किती कमावतो ते नक्कीच विचारणार . असा हा अर्थ त्रिकोण जो आयुष्य घडवतो किंवा बिघडवतो .

पत्रिका कुणाची आहे ? तुमची ना म्हणजेच प्रथम भाव म्हणजे तुम्ही स्वतः . ह्या भावातून आपण पाहतो ती आपली बुद्धी आणि त्यातून केलेले विचार . व्यक्तीचा मेंदू योग्य पद्दतीने काम करेल जेव्हा आपले विचार योग्य असतील , ह्याचे वाईट होवूदे त्याला बघून घेयीन हे विचार आयुष्य उतारावर नेतात . म्हणूनच प्रथम भावातून दिसते ती आपली सोच . ती जर निट असेल तर व्यक्तिमत्व उत्तम घडणार आणि त्याची छाप पडल्याशिवाय राहणारही नाही .

अर्थ त्रिकोण आणि त्यातील ग्रह त्यांचे योग महत्वाचे असतात . अनेकदा उत्तम शिक्षण असून नोकरी नाही , व्यवसाय चालत नाही . लक्ष्यात घ्या जसे कर्म तसे फळ . दशमात शनी स्वतः आहे. तिथे गुडघे आहेत . कर्म उत्तम तर आपण पायावर उभे राहू सक्षमपणे नाहीतर सगळेच व्यर्थ आहे . दशम म्हणजेच कर्म चांगली असतील तर लाभ आणि सुखाची निद्रा शनी देणारच .

आपली प्रत्येक कृती काहीतरी विचार देत असते . आणि त्यात कुठे चूक झाली तर शनीचे आपण अपराधी ठरतो .आपले कर्म हे आपल्या हातात आहे पण त्याचे फळ देणे हे शनी महाराजांच्या हाती आहे.

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

Wednesday, 30 July 2025

पौराणिक कथा -जगण्याचे निम्मित्त फक्त नाम

 || श्री स्वामी समर्थ ||


एक राजा होता , तसा आस्तिक होता पण तो कधी नाम घेत असे हे कुणाला कधीच समजले नाही . त्याची पत्नी फार देवदेव करत असे आणि तिला सारखे वाटायचे कि आपल्या यजमानांनी नामस्मरण करावे. तिने त्याला अनेक प्रकारे समजावून सांगितले पण त्याने नाम घेतले नाही .

त्याच्या अंकारणात नाम होते पण व्यक्त कधीच केले नव्हते त्यामुळे पत्नीला त्याला लवलेशही नव्हता . तिने आपला प्रयत्न सुरु ठेवला पण त्याने कधीही नाम घेतले नाही . एकदा शयनगृहात राजा एका कुशीवर झोपलेला असताना पत्नी आली त्याला जराशी चाहूल लागली आणि त्याने कूस बदलली तेव्हा त्याच्या मुखातून “ राम “ असा शब्द बाहेर आला जो पत्नीने ऐकला . तिला राजा नाम घेत आहे हे ऐकून जणू हर्षवायू झाला . दुसर्या दिवशी अख्या गावाला पेढे वाटायचा निर्णय तिने घेतला आणि पेढेवाटप सुरु झाले. जेव्हा राजाला पेढा दिला तेव्हा त्याने हे सर्व कुठल्या आनंदाप्रीत्यर्थ पेढे वाटप चालू आहे हे विचारले असता तिने रात्रीचा प्रसंग कथन केला आणि आपल्या मुखातून “ राम “ हा शब्द आल्यामुळे मी आत्यंतिक आनंदाने मिठाई वाटत आहे हे सांगितले.

राजाला अतीव दुक्ख झाले . म्हणाला “ जन्मभर हृदयात सांभाळून ठेवलेला राम आज मुखातून निघून गेला .आता जगायचे कारणच उरले नाही . “ असे म्हणून त्याने प्राणत्याग केला . जन्मभर नामाच्या ओढीने जगला , अंतकरणात फक्त राम राम आणि राम होता . पण त्याने जगाला ते कळून दिले नाही . नामाचे महत्व ज्याने जाणले तो नाम घेतल्याशिवाय राहणारच नाही . फरक इतकाच कि काही प्रगट स्वरुपात घेतात तर काही मनात घेतात . नामाचे फळ आत्यंतिक मोठे आहे आणि ते नाम घेणार्या साधकाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वराने सांगितले आहे फक्त एकदा तरी माझे नाव घेतलेस तर जन्माचे तुझ्या मी सार्थक करीन.

आयुष्य सरते पण नाम घ्यायचे राहूनच जाते . नाम हे म्हातारपणी उतारवयात घ्यायचे नसून ते जन्मल्या आल्यावर पहिल्या श्वासापासून अंतिम श्वासापर्यंत घ्यायचे आहे. नामाची गोडी लागते पण त्यासाठी ते मनात मुखात असणे मात्र अत्यावश्यक असते . नाम हे आपल्या कृतीतूनही दिसणे आवश्यक आहे.

अनेक लोकांना मी कसा मोठा नाम घेणारा हे दाखवायची अति हौस असते . असुदेत तसेही चालेल पण येन तेन प्रकारे नाम घ्या आणि आपल्या आयुष्याचे सार्थक करून घ्या . दंभाने घेतलेलेही शेवटी नामच आह. नाम दंभ कमी करेल , आपल्यात अमुलाग्र बदल करेल पण नाम तसेच राहील . नामाने आपल्या चित्तवृत्ती बदलतात इतके त्याचे महत्व आणि सामर्थ्य आहे .

नामाचे महत्व अनन्यसाधारण आहे हे सर्व आपण वाचतो ऐकतो पण नाम घेत मात्र नाही . कधीतरी क्षणभर का होईना नामात रंगून गेलेले वारकरी डोळ्यासमोर येतात . काय मिळवायचे असते त्यांना ? काहीही नाही . पण माऊली भेटल्याचा उत्कट आनंद ते अनुभवत असतात . अखंड आयुष्य गेले आणि आयुष्याच्या संध्याकाळी काय मिळवले ह्याचा हिशोब केला तर बेरीज वजाबाकी शून्य येते कारण एकाच परमेश्वराचे नाम घ्यायचे राहूनच गेले. आणि जे राहून गेले तेच महत्वाचे होते किबहुना जन्म त्यासाठीच झाला होता पण आपण मोहात अडकून सगळे जमा करत बसलो वैभवाच्या पाठी धावत राहिलो पण खरे वैभव तर नामात परमेश्वराच्या चरणी आहे हे कळेपर्यंत आयुष्याची अखेर आली . नामात विलक्षण शक्ती आहे ती अनुभवावी लागते ज्याची त्यालाच . अनुभव घेण्यासाठी आत्ता ह्या क्षणी सुरवात करुया .

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230