|| श्री स्वामी समर्थ ||
शुक्राचा ठसा प्रत्येकाच्या आयुष्यावर कमी अधिक असतोच . आयुष्यातून सुख आनंद वजा केले तर आयुष्याला अर्थच उरणार नाही ते निरस होईल . शुक्र म्हणजे सकारात्मकता , निखळ आनंद आणि धबधब्यासारखे हास्य . शुक्रप्रधान व्यक्ती आजूबाजूला असतील तेव्हा वातावरण ताजेतवाने असते , शुक्राचा गोडवा हा माणसे जोडणारा आहे. असा हा शुक्र मने जोडणारा मनमिळाऊ आहे म्हणूनच तो माणसातच रमतो . भांडकुदळ नाही . असा हा शुक्र आपले आयुष्य सदाबहार ठेवत असतो. आपल्या चेहऱ्यावर निरागस हसू असणे हि देवाची देणगीच आहे .
शुक्राचे अनेक रंग आहेत . शुक्र हा जलतत्व दर्शवतो . हा नुसताच प्रणयाचा , शृंगाराचा रस नाही तर उच्च कोटीची अध्यात्मिकता भक्तीचा रस पण आहे. मागील लेखात आपण शुक्राचे उच्चत्व अनुभवले. रस म्हणजे ज्यामुले आपली तृषा भागते , आपल्याला आनंद मिळतो , आपली रसिकता शुक्र दर्शवतो मग ती कश्यातही असू शकते , एखादे वाद्य वाजवण्यात , अभिनय , फोटोग्राफी , सौंदर्यशास्त्र , पाकशास्त्र काहीही . शुक्रात प्रचंड आकर्षण शक्ती आहे . सिंह ह्या राजराशीतील शुक्र कमालीचा मादक असतो आणि राजासारख्या रुबाबात वावरणारा असतो . लग्नी शुक्र असणार्या व्यक्ती नेहमीच आनंदी , उत्साही , happening mode on असणार्या असतात . सकारात्मक आणि कलासक्त असतात . आज शुक्र कन्या राशीत कसा फलित होतो ते पाहूया . कन्या राशी हि बुधाची , व्यावहारिक आणि अर्थ त्रिकोणातील राशी . भयंकर चिकित्सक आणि हुशार पण इथे शुक्राला न मानवणारे वातावण असल्यामुळे इथे तो चांगली फळे न देता निचीचा होतो. बुध हा पृथ्वी तत्वाचा ग्रह आहे. पृथ्वीच्या पोटात कायकाय सामावले आहे म्हणजेच सर्व गोळा करून ठेवण्याची वृत्ती आहे बुधाची , मला काय मिळणार हे पाहणारा आहे , त्यामुळेच त्याला वाणी म्हंटलेले आहे. उत्तम बुध असणारे लोक उत्तम व्यावसायिक असतात ते ह्याच कारणामुळे , इथे सगळी देवघेव आणि पैशांचे हिशोब , आकडेमोड आहे. शुक्र भाव भावनांच्या विश्वात रमणारा आहे आणि बुधाला तसेही तुमच्या इमोशन्स शी फारसे घेणे देणे नाही . त्यामुळे इथे शुक्र कोमेजून जायील , त्याच्या मोकळ्या स्वभावाला न पेलणारी हि बुधाची राशी आहे.
नुसत्या आकर्षणावर बुध काम करत नाही . बुधाचा तर्क आणि शुक्राचे प्रेम ह्या दोन भिन्न गोष्टी कश्या बरे एकत्र येतील ? थोडक्यात शुक्राची स्टाईल वेगळी आहे .
निसर्ग कुंडलीत कन्या राशी षष्ठात येते जिथे आपले रिपू आहेत , इथे सेवा आहे . मोजून मापून प्रेम करणे किंवा मला काय मिळणार ह्या भावनेपोटी फक्त प्रेम करणे हे शुक्राला मुळीच मान्य नाही . शुक्र धबधबा आहे मग तो प्रेमाचा असो कि हास्याचा ..निर्मळ आहे , सौख्य प्रद आहे. व्यावहारिकता ह्या गोष्टीशी शुक्राचा ह्या गोष्टींशी दूरदूरचा संबंध नाही कारण त्याला मदहोश , मनसोक्त जगणे माहित आहे त्यामुळे इथे शुक्र नीच होतो.
वैवाहिक सुख म्हंटले कि सर्वप्रथम लक्ष्य जाते ते शुक्र ह्या ग्रहावर . शुक्र नीट तपासावा लागतो . शुक्राचे नवमांश बळ पाहिले पाहिजे . शुक्र जर कन्या राशीत आणि कन्या नवमांशातच असेल तर अश्या पत्रिकांचा अभ्यास वैवाहिक सुखासाठी केला तर उत्तर मिळेल .
शुक्र केतू युती हि शुक्राचे सर्व रसिक, सकारात्मक गुण शोषून त्याला शुष्क करणारी आहे. केतुला तर काहीच दिसत नाही तो मनाचा चष्मा लावून जग बघतोय आणि शुक्र हा आनंदाचा स्त्रोत त्यामुळे हि युतीही अभ्यासावी लागते . एका ओळखीच्या स्त्रीची पत्रिका पहिली . अनेक वर्ष मी त्यांना ओळखत होते . कधीच खळखळून न हसणे , साधे कपडे , 30 वर्षाच्या वयात ५० वर्षाच्या स्त्रीचा पोक्तपणा , नटण्याची आवड नाही . पत्रिकेतील शुक्र केतू युतीने मला सगळी उत्तरे दिले . शुक्र वैवाहिक सुखाचा कारक ,त्यांचे सप्तम स्थान पापकर्तरीत आणि सप्तमेश हर्षलच्या कुयोगात त्यात भर म्हणून शुक्र केतूच्या अंशात्मक युतीत . अकाली वैधव्य आले. शुक्र केतू युती ने जीवनातील सर्व मधुर रसांची चव चाखू दिली नाही .
शुक्र म्हणजे अष्टलक्ष्मी. शुक्राच्या दशेत कुलस्वामिनीची सेवा करावी . सर्वच स्त्रियांनी आपल्या कुलदेवीचा जप करावा. शुक्रवारी पांढरे वस्त्र किंवा तांदूळ दान करावेत . नवग्रह स्तोत्रात दिल्याप्रमाणे शुक्राचा जप करावा .
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment