||श्री स्वामी समर्थ ||
कश्याला आपण सतत उठसुठ दुसर्यासोबत बरोबरी करत रहायची ? माझे केस हिच्यासारखे छान नाहीत. माझे घर माझ्या जावेसारखे मोठे ,प्रशस्त नाही , माझ्याकडे तिच्यासारखी साडी नाही , माझा मुलगा माझ्या बहिणीच्या मुलासारखा हुशार नाही . शेजार्यांनी घरात छान बाग केली आहे माझ्याकडे नाही .
आपले अर्धे आयुष्य नको त्या गोष्टीत खर्ची होते . असुदे कुणाकडे काही आणि ते आपल्याकडे नसले म्हणून बिघडले कुठे ? आपल्याकडे हि अश्या गोष्टी आहेत ज्या समोरच्याकडे नाही . अहो सतत च्या तुलनेने आपण स्वतःलाच कमी नाही का लेखत ?
आपण जसे आहोत तसे आहोत . प्रत्येकाला घडवताना परमेश्वराने काहीतरी विचार केलाच असेल. आता कावळा इतर पक्ष्यांसारखा छान रंगीत नाही म्हणून काय झाले ? आपल्याला पितरांचे पान ठेवतो तेव्हा नेमकी कुणाची आठवण येते बर ? म्हणजे कधी ना कधी त्यालाही महत्व आहेच कि . आपल्यात असंख्य चांगले गुण असतात पण ह्या तुलना करण्याच्या नादात आपण ते चक्क विसरून जातो .
आपण स्वतःकडून अवाजवी , नको नको त्या अपेक्षा करत राहतो .ह्या पूर्ण न होणार्या आणि गरज नसलेल्या अपक्षांचे ओझे बाळगताना आपण आपले आयुष्य जगायचेच विसरून जातो. प्रत्येकाला देवाने असे काही दिले आहे कि त्यामुळे प्रत्येक जण परिपूर्ण आहे. प्रत्येक जण आपापल्या जागी श्रेष्ठ आहे.एकमेकांसारखे दिसणे असलेच पाहिजे असा नियम नाही ,आणि ते नाही म्हणून इतर रंगांशी ओळख होतेय.
आपण जसे आहोत अगदी तस्सेच स्वतःला स्वीकारा .
परिचित ,आजूबाजूचे, सिनेमातील कलाकार अगदी कुणाशीही तुलना न करता जगा आणि तुम्हाला जाणवेल खरच आयुष्य किती सुरेख आहे .जगण्याचा आनंद द्विगुणीत होईल.
समोरचा आपल्याशी तुलना करत नाही मग आपण त्याच्याशी तुलना करून त्याचा आणि आपलाही खोटा अहंकार का बरे फुलवायचा ? पटतंय का ? नसतील आपले केस खूप छान पण मला चांगली दृष्टी आहे ज्याने मी हे छान सुंदर जग डोळे भरून पाहत आहे . माझी बाग नसेल हि पण मी माझे स्वयपाकघर सुरेख ठेवले आहे .माझा मुलगा अगदी ९०% मिळवत नसेलही पण माणूस म्हणून तो चांगला आहे,मोठ्यांचा मान ठेवतो .
अहो विचार केलात तर ज्या गोष्टींसाठी तुमचे मन खट्टू झाले आहे त्याहीपेक्षा नितांत सुरेख गोष्टी तुमच्यापाशी देवाने दिल्या आहेत . त्याचा शोध घेतलात तर तुमच्या सारखे सुखी तुम्हीच असे म्हणायची वेळ येयील.
आपण जसे आहोत तसेच स्वीकारण्यात मजा आहे, आपला रंग ,आपले दिसणे , हसणे आणि असणे सर्वात महत्वाचे . प्रत्येकाला देवाने वेगवेगळे घडवले आहे. सर्वांच्याजवळ सर्व नाही पण जे आहे ते आयुष्य आनंदाने व्यतीत करायला नक्कीच पुरेसे आहे. मी लिहू वाचू बोलू शकते हे काय कमी आहे का? प्रत्येकाला देवाने आनंदी राहण्यासाठीच इथे पाठवले आहे .
खरे सांगायचे तर कधीतरी तुलना हवीशी पण वाटते ,पण ती चांगल्या अर्थाने , आपल्यातील कमतरता भरून काढण्यासाठी ती नक्कीच उपयुक्त ठरते . पण ती तितक्याच Healthy Spirits ने घेतली पाहिजे .
तेव्हा तुलना करून आपले ,आपल्या कुटुंबाच्या आनंदला ओहोटी आणू नका. तुलनेने आधीच परिपूर्ण असलेल आयुष्य निरस होयील ,सततच्या तुलनेने आपल्यातील आत्मविश्वास कमी होतो . त्यामुळे दुसऱ्यातील गुण अवगुण पाहण्यापेक्षा माझ्यात जे जे आहे ते अधिक जास्ती सुंदर मला कसे करता येयील. मी स्वतः आणि इतरानाही आनंदी कसे करू शकेन ह्याचा विचार करा .
चित्रात जसे अनेक रंग असतात तशी सर्व प्रकारचे माणसेही हवीतच कि . जग विविधतेने नटलेले आहे आणि म्हणूनच ते मोहक आहे.
आपले जीवन अधिकाधिक सकारात्मक करुया . थोडक्यात काय तर " काॅपी कॅट " होण्यापेक्षा,जीवनावर प्रेम करा , मनसोक्त जागा आणि आनंदाचे " Brand Ambassador " व्हा.
अस्मिता
लेख आवडल्यास अभिप्राय द्यायला विसरू नका.
antarnad18@gmail.com
#अंतर्नाद # तुलना #आयुष्य #रंगहीन # प्रेम #कुटुंब #असूया #मत्सर #चित्र
#antarnad #comparison # colors #love #family #jealous #guilt #picture
#antarnad #comparison # colors #love #family #jealous #guilt #picture
अगदी खरंय ग... मला सुद्धा काॅपी कॅट होण्याचा फार राग आहे... माझी जाऊदे पण माझ्या मुलांची सुद्धा मी कुणाला तुलना करू देत नाही...ती जशी आहे तशी छानच आहेत... अगदी सर्वगुणसंपन्न नाहीत पण जे गुण त्यांच्यात आहेत ते तसेच असोत अशी मी गुरू माउली जवळ प्रार्थना करते. माझ्या जवळ जे नाही ते मिळवण्यासाठी मी प्रयत्न जरूर करते पण न मिळाल्यास वाईट वाटून घेत नाही.मी इतरांसारखी नाही हे मी स्वीकारते..पण माझ्या सारखी कोणी आहे का याचा शोध घेत बसत नाही.... मला सगळेच आपलेसे वाटतात... थोडक्यात काय तर मला सगळी फुलं , सगळे रंग , सगळे ऋतु आवडतात कारण त्यांच्यात होणारे प्रासंगिक बदल मी स्वीकारते...मग व्यक्तींमध्ये बदल होणारच...सगळे एकसारखे असूच शकत नाही मग तुलना करण्याची गरजच काय...पटतंय का...?
ReplyDelete🙏🙏👌
ReplyDeleteसुंदर विचार. मी पण कॉपी कॅट न होता जगते. खूप मस्त वाटतं
ReplyDeleteKhupch sunder .
ReplyDelete