||
श्री स्वामी समर्थ ||
श्रावणातील
पौर्णिमा हि “ नारळी पौर्णिमा ” म्हणून सर्वत्र साजरी होते. समुद्र हे उपजीविकेचे
प्रमुख साधन असल्याने समुद्रकिनारी राहणारे आपले कोळी बांधव हा सण खास मोठ्या उत्साहात साजरा करतात. पावसाळ्यात
उसळलेला आणि बेभान झालेला समुद्र आपले रौद्ररूप दाखवतो, त्यामुळे कोळी बांधव
समुद्रात आपली नाव घालताना थोडे कचरतात .समुद्र शांत व्हावा आणि त्यांच्या बोटी
सुखरूप किनारी लागाव्यात म्हणून समुद्रात श्रद्धेने नारळ अर्पण करून त्याची
मनोभावे पूजा करणे हि प्रथा आहे. ह्यानंतर पावसाचा जोर कमी होवून शांत झालेल्या
समुद्रात कोळी बांधव आपली होडी मासेमारीसाठी उतरवतात. ह्या दिवशी घरोघरी करंज्या ,
नारळाच्या वड्या , नारळी भात असे नारळाचे गोड पदार्थ करून देवाला नेवैद्हाय दाखवून सण साजरा होतो.
रक्षाबंधन हा भाऊबहिणीतील नाजूक आणि विश्वासाचे बंधन उलगडणारा सण. आपल्या लाडक्या भावाला ओवाळून त्याच्याकडून हक्काने ओवाळणी घेण्यासाठी बहिणी अगदी नटूनथटून तयार होतात आणि डोळ्यात प्राण आणून आपल्या भावाची वाट पहात असतात. आयुष्यात काहीही झले, कितीही मोठे संकट आले तरी आपला भाऊ आपल्या पाठीशी खंबीर उभा राहणार हा विश्वास दृढ करणारा हा सण.
अंतर्नाद
च्या सर्व वाचकांना “ रक्षाबंधन आणि नारळीपौर्णिमेच्या ” मनापासून शुभेछ्या.
अस्मिता
लेख
आवडल्यास कॉमेंट सेक्शन किंवा खालील लिंकवर Click करून अभिप्राय द्या.
antarnad18@gmail.com
No comments:
Post a Comment